लागणारे साहित्य :
पाव किलो बोनलेस चिकन
२०० ग्राम सुरण
आल, लसुण, मिरची, कोथिंबिर वाटण,
हिंग चिमुटभर,
हळद अर्धा चमचा
गरम मसाला अर्धा चमचा
अर्धे लिंबु
चवी पुरते मिठ
बेसन व कॉर्नफ्लॉवर प्रत्येकी अर्धा वाटी.
तळण्यासाठी तेल.
क्रमवार पाककृती:
प्रथम चिकन व सुरण वेगवेगळे वाफवुन शिजवुन घ्यावेत. नंतर ते पाणी काढुन कुस्करावेत. नंतर चिकन, सुरण, वाटण, गरम मसाला, अर्ध्या लिंबाचा रस, मिठ, हिंग हळद सर्व एकत्र करावे.
आता बेसन व कॉर्नफ्लॉवर एकत्र करुन त्यात चवीपुरते मिठ हिंग हळद घालुन पाणी टाकुन भज्यांच्या पिठाप्रमाणे जरा घट्ट कालवावे.
आता वरील सारणाचे लिंबापेक्शा थोडे मोठे गोळे करुन ते भिजवलेल्या पिठात बुडवुन काडुन गरम तेलात मध्य आचेवर तळावेत व सॉस बरोबर वाढावेत.
प्रतिक्रिया
16 Mar 2009 - 5:55 pm | गणपा
जागुतै, यकदम येगळी पाकृ. तेव्हढा फोटु टाकायच बघ की.
16 Mar 2009 - 10:51 pm | पक्या
पाकृ छान वाटतीये. फोटो हवा होता.
हे वडे तळण्याऐवजी बर्गर मध्ये पॅटी म्हणून पण वापरता येतील. :?