अविनाश धर्माधिकारी शिवसेनेत

विकास's picture
विकास in काथ्याकूट
14 Mar 2009 - 8:47 pm
गाभा: 

आत्ताच सकाळमधे वाचल्याप्रमाणे, अविनाश धर्माधिकारी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे.

त्याचा फायदा नक्की कोणाला काय होईल ते काळ ठरवेल. धर्माधिकारींनी पुर्वी भाजप आणि स्वतंत्रपणे निवडणूका लढवून पाहील्या आहेत पण हवे तसे जमले नाही. आता कदाचीत डिएसके वि. धर्माधिकारी करण्याचा शिवसेनेने बेत केला (पुणे त्यांच्या हातात असेल तर) तर आश्चर्य वाटायला नको.

आयएएस सोडून अस्वस्थ दशकाची डायरी लिहीणार्‍या धर्माधिकारींनी चाणक्य मंडळ वगैरे स्थापून नवीन पिढी तयार करायचा प्रयत्न नक्कीच केला. त्यात त्यांना काही अंशी तरी यश नक्कीच आले असे त्यांचे विरोधक पण म्हणतील. पण स्वतःचे कौशल्य त्यांनी जेथे वापरू शकले असते तेथे बदल घडवायला वापरले नाही - अर्थातच प्रशासकीय सेवेत अथवा राजकारणात. आता सक्रीय राजकारणात उतरल्याने, कुठेतरी काहीतरी त्यांना जागा मिळेल असे वाटते आणि काही अंशी मराठी (राजकारणातला) अरूण शौरी तयार होईल असे वाटते. त्या अर्थी त्यांचा हा निर्णय नक्कीच चांगला आहे.

अशीच चांगली माणसे सर्वच पक्षांनी घेयला सुरवात करोत, अशी तुम्हा-आम्हाला शुभेच्छा! :-)

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

14 Mar 2009 - 9:01 pm | प्रकाश घाटपांडे

अशीच चांगली माणसे सर्वच पक्षांनी घेयला सुरवात करोत, अशी तुम्हा-आम्हाला शुभेच्छा

म्हणजे पक्षाचा विकास होईल;) ;-)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विद्याधर३१'s picture

14 Mar 2009 - 9:06 pm | विद्याधर३१

संघाच्या तालमीत तयार झालेला एक कार्यकर्ता ...बंड्खोरी करून शिवसेनेच्या वळचणीला गेला.
एक चांगला सनदी अधिकारी राजीनामा देवून सक्रिय राजकारणात उतरला. पण स्वतःचे जनमानसातील स्थान पक्के करता आले नाही.

अवांतरः पुणे भाजप लढवणार आहे.

विद्याधर

अबोल's picture

14 Mar 2009 - 9:48 pm | अबोल

चा॑गला माणुस हि स्वता: चि ओऴख जपुनच काम करावे, राजकिय पक्षाप्रमाणे आपण बिगडु नये हेच देवापाशि मागणे

क्लिंटन's picture

14 Mar 2009 - 9:49 pm | क्लिंटन

मी शाळेत असल्यापासून अविनाश धर्माधिकारींचा चाहता आहे. आणि त्यांचा शिवसेनेत सामील व्हायचा निर्णय धक्कादायक आहे असे मला वाटते.शिवसेनेच्या अनेक ध्येयधोरणांना आणि पध्दतींना (राडा, गुंडगिरी इत्यादी) त्यांची संमती असेल असे वाटत नाही. पण पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षाच्या धोरणांना त्यांचा स्वत:चा विरोध असला तरीही त्यांना पक्षाच्या ’शिस्तीप्रमाणेच’ जावे लागेल. हे धर्माधिकारींसारख्या स्वतंत्र बाण्याच्या व्यक्तीला कितपत पचनी पडेल याची कल्पना नाही.

मात्र त्यांच्यासारखे स्वच्छ चारित्र्याचे, व्यासंगी आणि कुशल प्रशासक संसदेत असणे चांगलेच असेल.सभागृहात पैशाची बंडले फडकावायला लाज न वाटणारे, जनतेच्या पैशावर स्वत:चे खिसे भरणारेच खासदार निवडून जावेत हे एक मोठे दुर्दैव आहे. तेव्हा अशा प्रवृत्तींना विरोध करायला आणि शामाप्रसाद मुखर्जी, राममनोहर लोहिया यासारख्या दिग्गजांची उणीव भासू न देणारा खासदार धर्माधिकारींच्या रूपात मिळू दे अशी आशा बाळगू या. त्यांना मावळमधून शिवसेनेचे तिकिट देणार अशी बातमी होती. ती जर खरी असली तरी मतांच्या राजकारणात तिथे राष्ट्रवादीपुढे त्यांचा टिकाव लागेल असे वाटत नाही. निदान राज्यसभेत तरी त्यांना शिवसेनेने पाठवावे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळून त्यांच्या व्यासंगाचा आणि कौशल्याचा जनहितासाठी वापर व्हावा ही अपेक्षा.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

मैत्र's picture

16 Mar 2009 - 12:02 pm | मैत्र

अतिशय धक्कादायक..
धर्माधिकारींचा अनुभव, प्रयत्न, परखड मतं, वैयक्तिक शक्ति स्थळं आणि बुद्धिमत्ता, ज्ञान प्रबोधिनीची पार्श्व भूमी हे कुठलंही त्यांच्या शिवसेना प्रवेशाशी जुळत नाही.
मी काही काळ चाणक्य मंडलाशी निगडित होतो. इतका तत्वनिष्ठ आणि आक्रमक मनुष्य दुसरा नसावा.
पण त्याच बरोबर त्यांचे अनेक चाहते, विद्यार्थी वगैरे त्यांच्या राजकारण प्रवेशानंतर दूर गेले. अनेकांना त्यांच्या कोलांट्या उड्या पटल्या नाहीत. ते स्वतंत्र पणे एकदा पुण्यातून उभे राहिले. बहुतेक ३४००० मते मिळवली. पहिल्या प्रयत्नात अपक्ष उमेदवाराने काँग्रेस च्या बालेकिल्ल्यातून इतकी मतं क्वचितच घेतली असतील. पुढच्या वेळी ते उभे होते तेव्हा पुण्याची जागा मिळवण्यासाठी त्यांना भाजपने पटवले आणि त्यांनी रावतांना पाठिंबा जाहीर करून उमेदवारी मागे घेतली व भाजप प्रवेश केला. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो.
तिथून बाहेर पडे पर्यंत ताबडतोब त्यांचे असंख्य परंपरागत पाठिराखे त्यांना दुरावले. तिथल्या दबक्या आवाजातल्या चर्चा, मंडलातून गळत गेलेले निष्ठावंत.
पण एक मात्र खरं की तरीही त्यांना शिवसेना किंवा भाजपचं तिकीट मिळालं तर पाठिंबा मिळेल.

या सगळ्या पार्श्वभूमी वर शिवसेना प्रवेश उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा अत्यंत धक्का दायक आहे. शिवसेना आणि त्यांच्या मतांचा काहीही संबंध वाटत नाही. आणि भाजपचे कार्यकर्ते असताना, उमेदवारी मागे घेतल्यावर त्यांना नेहरू युथ सेंटरचे संचालक पद देण्यात आलं जे त्यांच्या अनुभव आणि कामाला अत्यंत अनुरुप होतं. असं असताना भाजपातून शिवसेना या सहकारी पक्षात प्रवेश करण्याचा कुठलाच संदर्भ लागत नाही.

अवांतरः जर डी एस के मायावतीच्या तिकीटावर उभे राहू शकतात तर हे पचनी पडण्यासारखं आहे.
पुण्याचं राजकारण बदलायला लागलं आहे एकंदरीत.

आळश्यांचा राजा's picture

16 Mar 2009 - 11:14 pm | आळश्यांचा राजा

आळश्यांचा राजा

संदर्भ अगदी सोपा आहे. मुळात नोकरी सोडली 'सक्रीय' राजकारणासाठी. म्हणजे निवडणुकीला उभे राहून जिंकण्यासाठी. नेहरू युवा केंद्रातल्या पदापेक्षा मोठी पदे आय ए एस मधे च मिळाली असती. भा ज पा मधे दिसले की काही किंमत मिळत नाही. राज ठाकरेंच्या झटक्यामुळे शिवसेना नेतृत्व धर्माधिकारींसोबत फार माज करेल असे वाटत नाही, त्यांना गरज आहे. असे परस्पर सोयीचे गणीत आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

14 Mar 2009 - 10:04 pm | प्रकाश घाटपांडे

मग अरुण भाटियांचे काय?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

चन्द्रशेखर गोखले's picture

14 Mar 2009 - 10:53 pm | चन्द्रशेखर गोखले

अविनाश धर्माधिका-यानी शिवसेनेत प्रवेश केला हि चांगली आणि आनंदाची बातमी आहे. आज चांगली आणि प्रामाणिक माणसे राजकीय पक्षांमध्ये असण हि काळाची गरज आहे, मग ती कुठच्याही पक्षांत का असेना. तमाम मराठी तरुण वर्गा साठी हि खरोखरच आनंदाची बातमी आहे. भरतकुमार राउत नाहीका शिवसनेत..? राजकारण हे सरळ आणि विचारी माणसांच कामच नव्हे, असा विचार प्रत्येक विचारशील माणुस करू लागला तर चांगली माणस राजकारणात येणार कशी...? मी तर म्हणतो सुधीरभाउ जोशीं नंतर एक चांगल व्यक्तीमत्व शिवसेनेला धर्माधिकारींच्या रूपान मिळालेलं आहे. शिवसेना त्यांचा मराठी तरूणांच्या फायद्यासाठी चांगला आणि पुरेपूर उपयोग करून घेइल अशी खात्री वाटते...!!

विकास's picture

14 Mar 2009 - 11:32 pm | विकास

वरील प्रतिसादाशी पूर्ण सहमत. अजून काही लिहावेसे वाटत नाही.

शिवसेना त्यांचा मराठी तरूणांच्या फायद्यासाठी चांगला आणि पुरेपूर उपयोग करून घेइल अशी खात्री वाटते...!!

ह्या पेक्शा मला तरी असे वाटते - शिवसेना त्यांचा चांगला आणि पुरेपूर उपयोग करून घेइल अशी खात्री वाटते...!!

-
अफाट जगातील एक अडाणि.

नीलकांत's picture

14 Mar 2009 - 11:00 pm | नीलकांत

काल संध्याकाळी मोबाईलवर मॅसेज आला की ए.डी.सर (अविनाश धर्माधिकारी सर) शिवसेनेत गेले. ताबडतोब मटा आणि सकाळवर पाहिले. सकाळने बातमी दिली होती. सरांचा शिवसेनेत येण्यासाठी बिलंब झाला त्याकरीता सरकारी खाक्यानुसार दिलगीरी व्यक्त करतोचा शेरा सुध्दा होता.

सरांचा सर्वच प्रवास सारखा धक्कादायक झालेला आहे. आणि त्यांच्या मित्राच्या शब्दांत सांगायचे झाल्यास प्रत्येक नवं दशक ते नवं आव्हान घेऊन ते पार पाडण्याचा प्रयत्न करतात. ज्ञानप्रबोधिनीचे पुर्णकालीन कार्यकर्ता ते मुक्तपत्रकारीता त्यापुढे भारतीय प्रसासकीय सेवेत दाखल होणे दहा वर्ष तेथे झाल्यावर अचानक त्या सेवेचा राजीनामा देऊन सक्रीय सामाजीक चळवळीत येणं पुढे चाणक्य मंडलची स्थापना करून गेले दहा वर्षं मराठी मुलं केन्द्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत पुढे गेले पाहिजेत यासाठी पुढाकार घेणे आणि आता तर शिवसेनेद्वारा सक्रीय राजकारणात प्रवेश.
त्यांचा प्रत्येक निर्णय घेतल्यावर सर्वांनाच धक्कादायक असा असतो.

आता पेपर मध्ये आलेल्या बातम्यांबाबत...
सर आताच काही निवडणूकीला उभे राहत नाहीत. म्हणजे लोकसभेला तर नक्कीच नाही. एकतर शिवसेनेला पुणे जागा नाही आणि ते जर लोकसभेला उभे राहत असते तर एवढ्या उशीरा सक्रिय झाले नसते. साध्या चर्चेसाठी सुध्दा सरांचा गृहपाठ झालेला असतो ही तर निवडणूक आहे. ( हा एक अंदाज आहे)
आजचा टाईम्स म्हणतो की सर विधानसभा निवडणूकीत उभे राहण्याची शक्यता आहे त्यासाठी कोथरूड विधानसभा मतदार संघ निवडण्याची शक्यता आहे.

एक पक्ष म्हणून शिवसेनेत सर कसे ऍडजेस्ट होतात हेच फार महत्वाचं वाटतं. पण उद्या सेना भाजपाचं सरकार आल्यास महाराष्ट्राला एक उत्तम प्रशासक मंत्री म्हणून भेटण्याची शक्यता खुप वाढलेली आहे.

कृपया भाटीया आणि धर्माधिकारी सरांची तुलना करू नका, गेल्या पाच वर्षांत भाटीया कुठे होते आणि सर किती वेगवेगळ्या पातळींवर काम करत होते याचा मागोवा घेणं जास्त महत्वाचं आहे.
नीलकांत

विकास's picture

14 Mar 2009 - 11:46 pm | विकास

कृपया भाटीया आणि धर्माधिकारी सरांची तुलना करू नका, गेल्या पाच वर्षांत भाटीया कुठे होते आणि सर किती वेगवेगळ्या पातळींवर काम करत होते याचा मागोवा घेणं जास्त महत्वाचं आहे.

असेच म्हणावेसे वाटले.

बाकी राजकारण त्यांनी जवळून पाहीले आहे. त्यामुळे सुरवातीस जड गेले तरी जमणार नाही असे वाटत नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

15 Mar 2009 - 9:58 am | प्रकाश घाटपांडे

भारतीय राजकारणात जर भारतीय प्रशासन सेवेचे संवेदनशील अधिकारी आले तर ती गोष्ट आश्वासक वाटते. भाटिया व धर्माधिकारी दोघेही यात मोडतात. कामाच्या पद्धतीत वा विचारसरणीत फरक असेल पण प्रामाणीकपणाबद्द्ल लोकांच्या मनात संदेह नाही. अरुण भाटिया बद्द्ल इथे माहीती आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विकास's picture

15 Mar 2009 - 10:03 am | विकास

>>>भारतीय राजकारणात जर भारतीय प्रशासन सेवेचे संवेदनशील अधिकारी आले तर ती गोष्ट आश्वासक वाटते. भाटिया व धर्माधिकारी दोघेही यात मोडतात.

हे एकदम मान्य!

मात्र त्यांच्या संकेतस्थळावरून ते पुण्यातून खासदारकीसाठी उभे रहाताना दिसले पन एक अक्षर मराठीत नाही हे बरोबर वाटले नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Mar 2009 - 12:30 am | बिपिन कार्यकर्ते

धर्माधिकारींसारखा माणूस सक्रिय राजकारणात उतरतो आहे हीच मूलतः अतिशय सकारात्मक बाब आहे. त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांनी कुठल्या पक्षात प्रवेश केला ही बाब माझ्या दृष्टीने अगदी गौण आहे. सध्या सगळ्याच राजकिय पक्षांबाबत असे म्हणता येईल, "वोइच दारू, बस बोतलका कलर अलग अलग है".

त्यामुळेच, धर्माधिकारी शिवसेनेत कसे तगतात यापेक्षा सक्रिय राजकारणात (ज्याला निवडणुकांचे राजकारण किंवा मराठीत इलेक्टोरल पॉलिटिक्स म्हणतात) कसे मिसळतात हे बघायला मी उत्सुक आहे. असे बरेच लोक पुढे आले, मग ते कोणत्याही पक्षात जावोत, तर सद्य भयाण राजकिय वास्तव नक्कीच सुधारेल. पण मला नेहमी अशी पण शंका वाटत आली आहे की, एखाद्या राजकिय पक्षात प्रवेश केला की मग 'पार्टी लाईन' मागे जाण्याखेरीज गत्यंतर उरत नाही. अशा परिस्थितीत धर्माधिकारींसारख्या स्वयंप्रकाशित लोकांचे काय होणार? इथे केवळ पक्षाच्या तथाकथित ध्येय धोरणांचा प्रश्न नाही तर 'पक्षशिस्तीचा' देखील संबंध येतो. ध्येय धोरणं सगळ्यांचीच मस्त असतात. पण उद्या एखाद्या वादग्रस्त प्रकरणात शिवसेनेने काही नैतिकतेच्या विरुध्द भूमिका घेतली तर धर्माधिकारींसारखे काय करतील?

नीलकांतने मांडलेला भाटियांबाबतचा मुद्दा थोडासा बरोबर वाटतो. थोडासा याकरिता म्हणतो की मागे अदितीने एका 'प्रोफेशनल्स' पार्टी बद्दल काही माहिती दिली होती. त्यात अरूण भाटियांचा सहभाग खूप सक्रिय आहे हे वाचले होते. अजून माहिती कोणी देईल का?

नीलकांत कडून अपेक्षा: तुझा आणि धर्माधिकारींचा बराच संबंध आहे / असावा. जमले तर त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून त्यांची भूमिका इथे मांडता येईल का तुला? सक्रिय राजकारण का? शिवसेनाच का? पुढे काय बेत आहेत? काय उद्दिष्टं आहेत? इ.इ.

बिपिन कार्यकर्ते

हरकाम्या's picture

15 Mar 2009 - 1:46 am | हरकाम्या

देव धर्माधिकारींचे भले करो. मला वाट्ते त्यांचे वाटोळे होणार, कारण प्रत्येक पक्शाला
निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार पाहिजे आहे आणि धर्माधिकारी त्यातले
नाहीत. त्यामुळे त्यांचा पोपट होणार हे नक्की .

बुद्ध's picture

15 Mar 2009 - 8:37 am | बुद्ध

माणूस बदलतो .. धर्माधिकारीं त्याला अपवाद नाही ,,, उगाच एकाध्याविषयी पुर्वग्रह ठेवणे बरोबर नाही , बी पॉसिटीव ...

बुद्ध

नरेश_'s picture

15 Mar 2009 - 9:55 am | नरेश_

धर्माधिकारी सर पूर्वी 'रायगड' चे जिल्हाधिकारी होते. त्यांचा व्यासंग व विद्वत्ता यांचा देशाला आणखी फायदा व्हावा , हीच सदिच्छा !!!

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

शक्तिमान's picture

15 Mar 2009 - 5:26 pm | शक्तिमान

भाटीया आणि धर्माधिकारी यापैकी भाटीयांचा स्वत:चा पक्ष आहे तर धर्माधिकारी शिवसेनेत गेले आहेत..
यावरूनच काय तो बोध घ्यावा....

प्रसाद लेले's picture

15 Mar 2009 - 7:52 pm | प्रसाद लेले

सहमत आहे वस्तुनिष्ठ१००% खर

सहज's picture

16 Mar 2009 - 7:13 am | सहज

उद्धव ठाकरे व अविनाश धर्माधिकारी यांच्यात काय ठरले असावे की धर्माधिकारीं शिवसेनेत दाखल झाले?

महाराष्ट्रात राष्ट्रवादी, काँगेस, शिवसेना, भाजप इ पक्षांना भक्कम पर्याय नाही का?

धर्माधिकारी, भाटीया अशी लोक सनदी सेवेत राहून पुरेसे कार्य करु शकले नसते का? म्हणजे सनदी सेवेत असताना त्यांच्याकडून झालेली लोकोपयोगी कामे व गेल्या काही वर्षातील त्यांच्याकडून घडलेली कार्ये याचा उहापोह घेता येईल का (नीलकांत)?

कारण आता शिवसेना इ सारख्या पक्षात जाउन सिस्टीममधे जाउन काम करण्यासारखेच आहे तर मग सनदी सेवेत राहून????

छोटा डॉन's picture

16 Mar 2009 - 8:57 am | छोटा डॉन

सर्वात प्रथम धर्माधिकारीसरांच्या ह्या इनिंगला शुभेच्छा ...!!!
बघु आता पुढे कसे घडते ते, लोकसभेच्या अनुषंगाने काही होईल असे वाटत नाही मात्र विधानसभेसाठी शिवसेनेचा एक अभ्यासु आमदार विधिमंडळात जाण्याची सुचिन्हे आहेत. बहुसंख्य प्रश्नांची उत्तरे येणारा काळ देईलच ...

>>उद्धव ठाकरे व अविनाश धर्माधिकारी यांच्यात काय ठरले असावे की धर्माधिकारीं शिवसेनेत दाखल झाले?
ते आत्ता सांगणे अथवा त्याबद्दल भाष्य करणे अवघड आहे.
पण शिवसेनेला ह्यामुळे एक अभ्यासु चेहरा असलेला नेता मिळाला व "इमेज" तयार करायला एक संधी मिळाली असे मी मानतो. तर सरांना एक "मंच" आणि पाठीमागे काम करणारा कार्यकर्त्यांचा संच तसेच एक संघटना मिळाली आहे असे मानण्यास हरकत नाही.
एवढी कारणे पुरेशी आहेत बहुदा ...
तसेही आजची शिवसेना व पुर्वीची "राडा" संस्कॄतीवाली शिवसेना ह्यात जमिन-आस्मानाचा फरक आहे, कदाचित हेच सरांना भावले/सोईचे वाटले असावे. शिवसेनेच्या नव्या "कॉर्पोरेट चेहर्‍यात" सरांना स्वारस्य वाटले असल्यास आश्चर्य नाही.

>>महाराष्ट्रात राष्ट्रवादी, काँगेस, शिवसेना, भाजप इ पक्षांना भक्कम पर्याय नाही का?
नाही, सध्यातरी नाही ...
असावा असेही नाही ...
फक्त ह्याच पक्षात काही "हुशार, अभ्यासु आणि जबाबदार" नेते आले तर पक्षाचा चेहरामोहरा आणि निती बदलली तरीही हरकत नाही. एखादा नवा पक्ष येणे तो सुस्थापित होणे ह्या गोष्टी अवघड आहेत व त्याला अनेक बंधने पडतात ...
त्यापेक्षा अशा "लायक" व्यक्तींनी सध्या ह्याच पक्षांकडे उपलब्ध असणार्‍या संघटनेचा उपयोग करुन घेतला असल्यास त्यात काही वावगे ठरणार नाही.

>>धर्माधिकारी, भाटीया अशी लोक सनदी सेवेत राहून पुरेसे कार्य करु शकले नसते का?
बरेच मतप्रवाह अथवा मतभेद असु शकतात ...
राजकारण्यांच्या मदती/संमतीशिवाय किती सनदी अधिकारी यशस्वी ठरले आहेत ह्याचा अभ्यास केला तर ह्याच सनदी नेत्यांनी राजकारणी होऊन कामं करण्याचा निर्णय घेणे पटण्यासारखे आहे.

>>कारण आता शिवसेना इ सारख्या पक्षात जाउन सिस्टीममधे जाउन काम करण्यासारखेच आहे तर मग सनदी सेवेत राहून????
नुसते सनदी सेवेत राहुन "बरेच काही" करणे थोडे अवघड होते. तिथे बर्‍याच ठिकाणी ऍडजस्टमेंट करावी लागेल.
ह्याउलट एखाद्या पक्षामार्फत काम करणे मला तरी सुलभ वाटते ...
"टु चेंज द सिस्टिम यु हॅव टु बी इन द सिस्टिम" असे असले तर ह्यातली जी सो कॉल्ड सिस्टिम आहे ती "सनदी सेवा" नसुन "राजकीय पक्ष" आहे असे मानण्यास हरकत नसावी. उलट त्यामुळे "चेंज" अजुन सोपा होईल ..

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

हुप्प्या's picture

16 Mar 2009 - 8:53 am | हुप्प्या

वस्तुनिष्ठ यांची प्रतिक्रिया अत्यंत कोत्या मनाने लिहिलेली वाटते. एखाद्याचे वलयांकित व्यक्तिमत्व काहींचा पोटशूळ जागा करते त्यातला प्रकार वाटतो.
धर्माधिकारी आरंभशूर आहेत वगैरे मला माहित नाही. पण चाणक्य मंडळ हे कोचिंग क्लासेस चालवले ही काय वाईट गोष्ट आहे का? की ती बेकायदेशीर आहे? पोटापाण्याकरता इमानदारीत एखादा धंदा चालवत असेल तर त्याची हेटाळणी का करायची? त्याद्वारा एकेकाळी दुर्लक्षित प्रशासकीय सेवेत मराठी लोक जावेत म्हणून हा प्रयत्न असेल तर त्याला घालून पाडून का बोलायचे? अशी किडकी मनोवृत्ती आपल्याकडे का आहे?
धर्माधिकारींचे वक्तृत्व उत्तम आहे. अभ्यासपूर्ण, प्रभावी भाषणे हे या माणसाचे वैशिष्ट्य. त्याला दिडकीची भांग वगैरे तारे तोडून वस्तुनिष्टाने आपली नालायकी सिद्ध केली आहे. हे टिळकांचे वाक्य आहे. पण हे या प्रसंगी अत्यंत गैरलागू आहे असे माझे मत.
का आपल्याला तसे वक्तृत्व येत नाही याची खंत व्यक्त करायचा ही एक चमत्कारिक पध्दत आहे?
धर्माधिकारींच्या कुठल्याही गोष्टीला चांगले म्हणायचेच नाही असा चंग बांधलेल्या व्यक्तीला त्यांचे सगळेच गैर वाटते.
स्वतंत्रपणे निवडणूक लढवून पाहिली. आपल्या मर्यादा लक्षात आल्या. आता त्यातल्या त्यात बर्‍या पक्षात जाऊन काही काम करता येते का बघू असा त्यांनी विचार केला असेल. आणि त्यात मला आजतरी काही गैर वाटत नाही.

चिरोटा's picture

16 Mar 2009 - 11:37 am | चिरोटा

स्वतंत्रपणे निवडणूक लढवून पाहिली. आपल्या मर्यादा लक्षात आल्या. आता त्यातल्या त्यात बर्‍या पक्षात जाऊन काही काम करता येते का बघू असा त्यांनी विचार केला असेल

ह्यात त्यान्ची वैचारिक mediocrity च दिसत नाही काय? व्यक्तिशहा ते बुध्दिमान असतील ह्यात वाद नाही पण पक्ष बदलुगिरी करण्यार्या अशा माणसाने तत्व निश्ठा,सचोटीच्या गप्पा माराव्यात हे जरा जास्तच.

हुप्प्या's picture

16 Mar 2009 - 8:03 pm | हुप्प्या

काय वाट्टेल ते काय बोलताय? पक्ष बदलूगिरी काय? धर्माधिकारी कुठल्या पक्षात होते? त्यांनी एकमेव निवडणूक लढवली ती अपक्ष म्हणून. तेव्हा पक्ष बदलूगिरी म्हणणे निरर्थक आहे.
मला तरी ह्यात काही गैर वाटत नाही. एकट्याने निरर्थक झुंजत रहाण्यापेक्षा कुठल्या पक्षाचा आधार घेतला तर काय हरकत आहे? अगदी भ्रष्ट पक्षात चांगली माणसे असतात की. त्यांची इच्छा असेल तर त्यांना स्वच्छ रहाता येते. कार्य करता येते. आपले विचार जास्त लोकांपर्यंत पोचवता येतात.

हे म्हणजे कुणी दुकान उघडावे आणि शुभेच्छा द्यायच्या ऐवजी दिवाळखोरीचा अर्ज मागवून ठेव असले कुजकट बोलायचे यातला प्रकार वाटतो (संदर्भ पु.ल.). निदान पुढे काय होते ते बघा आणि मग ठरवा चांगले की वाईट ते.

आळश्यांचा राजा's picture

16 Mar 2009 - 8:32 pm | आळश्यांचा राजा

आळश्यांचा राजा

यापूर्वी धर्माधिकारी भा ज पा मध्ये होते.

आळश्यांचा राजा's picture

16 Mar 2009 - 3:02 pm | आळश्यांचा राजा

आळश्यांचा राजा

नाना लोकांची नाना मते वाचली. सराना दुसरा कोणताहि पर्याय नव्हता असे स्पष्ट दिसून येते. यापुर्वी पक्ष-पाठिंब्याशिवाय राजकारणात काय उपरेपण येते ते त्यांनी चांगलेच अनुभवले आहे. त्यांना ओळखणारा कुणीही त्यांच्या क्षमता, हेतू याविषयी शंका घेऊ शकत नाही. त्यांच्या चुका खूप झाल्या असतील. कुणाच्या होत नाहीत? काम करणाराच्याच होतात. सद्यस्थितीत एवढे चांगले पर्याय राजकारण्यांमधे नाहीत. सरांना गेल्या दहा वर्षात माणसे सांभाळता आलेली नाहीत हे सत्य आहे. पण त्यांच्याकडे साधने नव्हती हेही सत्य आहे. चाणक्य त्यानी पोट भरण्यासाठी चालवले आहे असे म्हणाण्यापूर्वी हे लक्षात घ्यावे लागेल की दहा वर्षे आय ए एस मधे असणारा माणूस कॉर्पोरेट मधे किती मोठे पद आणि पैसा मिळवू शकला असता. या माणसाने नोकरीत नवा पैसा खाल्ला नाही ही वाटते तेवढी साधी गोष्ट नाही. त्यांच्या जागी दुसरा कुणीही कमीत कमी दहा ते पंधरा कोटी मिळवून त्या जोरावर कुठल्याही पक्षात दहा वर्षांपूर्वीच गेला असता.

अरुण भाटिया हा चांगला पर्याय आहे. पण राजकाराणपेक्षा हा माणूस एन जी ओ मधे व्यवस्थित बसेल. याला ग्रामीण भाग सोडा, मराठमोळ्या शहराचाही गंध नाही. पुण्यातला कॉसमपॉलिटन जमाव त्यांच्या मनी असावा.

सबब शहाण्या लोकांनी मत बनवण्याची घाई करू नये.

चिरोटा's picture

16 Mar 2009 - 3:31 pm | चिरोटा

या माणसाने नोकरीत नवा पैसा खाल्ला नाही ही वाटते तेवढी साधी गोष्ट नाही. त्यांच्या जागी दुसरा कुणीही कमीत कमी दहा ते पंधरा कोटी मिळवून त्या जोरावर कुठल्याही पक्षात दहा वर्षांपूर्वीच गेला असता

आय्.ए.एस. अशिकारी देशात बरेच आहेत.त्यातले काही भ्रश्ट आहेत आणि काही नाहीत्.अगदी बिहारमधेपण सचोटिचे आय्.ए.एस अधिकारी आहेत.

सरांना गेल्या दहा वर्षात माणसे सांभाळता आलेली नाहीत हे सत्य आहे. पण त्यांच्याकडे साधने नव्हती हेही सत्य आहे

एकिकडे हुशारिचा आणि चरित्र्याचा दाखला द्यायचा आणि आजुबाजुच्या परिस्थितीला दोष द्यायचा हे तितके योग्य वाटत नाही.माझ्यामते धर्माधिकारी हे पण एन जी ओ मधे योग्य आहेत.

आळश्यांचा राजा's picture

16 Mar 2009 - 7:00 pm | आळश्यांचा राजा

आळश्यांचा राजा

"आय्.ए.एस. अशिकारी देशात बरेच आहेत.त्यातले काही भ्रश्ट आहेत आणि काही नाहीत्.अगदी बिहारमधेपण सचोटिचे आय्.ए.एस अधिकारी आहेत."

दुसरे काही लोक सचोटीचे असतील म्हणून धर्माधिकारींच्या सचोटीची किंमत कमी होत नाही. शिवाय हे दुसरे 'स्वच्छ' लोक कशाच्या 'अध्यात मध्यात' पडत नाहीत. चाकोरीबाहेर जाउन, स्वत:ला त्रास करून घेऊन, चार लोकांचे भले करता येईल का याचा विचार सहसा सचोटीची मंडळी करत नाहीत. तेंव्हा स्वच्छ पण आणि उचापत्या करणारा धाडशी माणूसपण हा दुर्मीळ योग आहे.

आपण बिहारचा दाखला दिलात. बिहार हे आपल्याला भ्रष्टाचाराचे परिमाण वाटते. माहितीसाठी सांगतो, काळ्या पैशाची नदी पंजाब, गुजरात, महाराष्ट्र अशा भरपूर उद्योग असलेल्या राज्यात जेवढी मोठी आहे, तेवढी बिहार मध्ये नाही. सचोटीचा मुद्दा महत्त्वाचा अश्यासाठी की आपल्या राज्यातले आणि एकंदरच देशातले राजकारण पैशाभोवती फिरते आहे. हा पैसा सामान्य जनतेला प्रत्यक्ष नाडूनच मिळवलेला असतो असे नाही, पण त्याचे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतात, पर्यायाने जनतेला त्रास भोगावा लागतो. राजकारण्यांनी गरीब राहिले पाहिजे असे कुणी म्हणणार नाही. पण त्यांच्याकडे शेकडो कोटी रुपयांची पाशवी संपत्ती येते कुठून? आपण या मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून धनवान लोकांना मते देतो, पण सचोटीच्या माणसातले छोटे दोष पकडून त्याला एकटे पाडतो हे योग्य आहे का?

"एकिकडे हुशारिचा आणि चरित्र्याचा दाखला द्यायचा आणि आजुबाजुच्या परिस्थितीला दोष द्यायचा हे तितके योग्य वाटत नाही.माझ्यामते धर्माधिकारी हे पण एन जी ओ मधे योग्य आहेत."

अर्थातच एन जी ओ मध्ये ते योग्य निश्चितच आहेत. पण ती त्यांची मर्यादा ठरावी का? ते तर पत्रकारितेतही योग्य होते, आय ए एस मध्येही योग्य होते. मी भाटियांच्या मर्यादेविषयी बोलत होतो. पुणे मतदारसंघ म्हणजे केवळ इंग्रजी बोलणारे शहरी लोक नव्हेत.

धर्माधिकारी हे पूर्ण पुरुष आहेत, शिवाजीचा अवतार आहेत असे मला मुळीच म्हणायचे नाही. पण आजपर्यंत आपण कसल्या कसल्या लोकांना निवडून देत आलो आहोत? त्यांच्या तुलनेत या माणसाचा विचार व्हावा. त्यांना लावता तीच फुटपट्टी सर्वांना लावा. लोक सांभाळता आले नाहीत हा केवळ नेत्याचाच दोष असेल असे म्हणणे बरोबर नाही. शिवाजी महाराजांना, टिळकांना, गांधीजींना, सावरकरांना, नेहेरूंना, इंदिरा गांधींना लोक सोडत आलेले आहेत. भली भक्कम संघटना, माणसे, पैसा सर्व असताना बाळासाहेब ठाकरेंना माणसे जपता आली नाहीत म्हणून तुम्ही त्यांना नेतृत्व गुण नसलेला माणूस म्हणणार का?

तारतम्याने एखाद्या माणसाचे मूल्यमापन व्हावे एवढाच नम्र हेतु.

संदीप चित्रे's picture

16 Mar 2009 - 7:17 pm | संदीप चित्रे

अजिबातच शंका नाही पण त्यांचा 'खैरनार' होऊ नये ही सदिच्छा !

विकास's picture

16 Mar 2009 - 7:38 pm | विकास

...पण त्यांचा 'खैरनार' होऊ नये ही सदिच्छा !

अगदी मनातले बोललात!

चिरोटा's picture

16 Mar 2009 - 7:31 pm | चिरोटा

हा पैसा सामान्य जनतेला प्रत्यक्ष नाडूनच मिळवलेला असतो असे नाही, पण त्याचे अर्थव्यवस्थेवर परिणाम होतात, पर्यायाने जनतेला त्रास भोगावा लागतो. राजकारण्यांनी गरीब राहिले पाहिजे असे कुणी म्हणणार नाही. पण त्यांच्याकडे शेकडो कोटी रुपयांची पाशवी संपत्ती येते कुठून

बरोबर्.आणि धर्माधिकारी आता ज्या पक्षात जात आहेत त्या पक्षाचे नेतेपण त्याला अपवाद नाहित्.१९९५-१९९९ च्या काळात जर आपण महाराश्ट्रात असाल तर त्या पक्षाच्या नेत्यान्च्या भ्रश्टाचाराच्या सुरस कहाण्या आपणास माहित असतिलच्.खुद्द अण्णा हजारे ह्यानी भ्रश्ट मन्त्र्यान्विरुध्ध पुकारलेले आन्दोलन धर्माधिकारी ह्याना माहित असणारच.कुठल्याही पदावर नसताना प्रचन्ड सम्पत्ति -होटेल्स्,इस्टेट्स आणि गाड्या सेना नेत्रुत्वाकडे कशा आल्या हे प्रशासकिय सेवेत काम केलेल्या धर्माधिकारी ह्याना ठावुक असणारच.खुद्द बाळासाहेब ठाकरे ह्यानीच मन्त्र्याना पाठीशी घातले होते हेही आपणास ठावुक असेल.
सेनेत सामिल झाल्यावर अश्या नेत्यान्विरुध्ध धर्माधिकारी आवाज उठवण्याची धमक दाखवतिल का? की 'भ्रष्टाचार सगळीकडेच असतो,पुरावे द्या मगच बोलु' अशी विधाने करुन प्रश्न उडवुन लावतिल? अर्थात केवळ सेनाच नाही तर इतर पक्ष पण त्याच लायकिचे आहेत.

आळश्यांचा राजा's picture

16 Mar 2009 - 8:22 pm | आळश्यांचा राजा

आळश्यांचा राजा

सेनेत सामिल झाल्यावर अश्या नेत्यान्विरुध्ध धर्माधिकारी आवाज उठवण्याची धमक दाखवतिल का? की 'भ्रष्टाचार सगळीकडेच असतो,पुरावे द्या मगच बोलु' अशी विधाने करुन प्रश्न उडवुन लावतिल?

यालाच मी म्हणतो की सर्वांना एकच फुटपट्टी लावा. सगळ्या उमेदवारांना हा प्रश्न विचारणार असाल तर यांनाही विचारा.

अर्थात केवळ सेनाच नाही तर इतर पक्ष पण त्याच लायकिचे आहेत.

इथे शिकलेला माणूस मार खातो. चिखल आहे म्हणून तिथे जायचेच नाही तर चिखल काढणार कसा? बरं सगळेच पक्ष त्या लायकीचे आहेत म्हणून कुठ्ल्याच पक्षात जायचे नाही. मग पक्ष पाठीशी नाही म्हणून राजकारण करता येत नाही. सगळेच नालायक म्हणून कुणाला मतही द्यायचे नाही. पण तुम्ही मत दिले नाही म्हणून चिखलातले लोक सत्तेवर यायचे रहात नाहीत. सत्तेवर येतात. सहसा रोज रोज कुणाचे (म्हणजे शहरी मध्यमवर्गीयांचे) फार मोठे काम सरकार दरबारी अडलेले नसते. त्यामुळे सहज लक्षात येत नाही की ही मंडळी देशाची नेमकी कशी वाट लावतात. असो. पण आपण काही जबाबदारी घेण्याचे टाळायचे आणि टीका करण्याचे स्वातंत्र्य मात्र पुरेपूर भोगायचे या शिकलेल्या माणसांच्या वृत्तीमुळेच आज आपल्या राजकारणाची ही दशा झालेली आहे.

येणार्या काळात धर्माधिकारी कसे वागतात हे दिसेलच. पण आजवरचे त्यांचे चारित्र्य (संधी असूनही) स्वच्छ राहिले आहे हे ध्यानात ठेवायला हवे.

टायबेरीअस's picture

16 Mar 2009 - 9:19 pm | टायबेरीअस

एक चांगला प्रयत्न ठरू शकतो.. अविनाश जी शिवसेनेच्या मदतीने काही चांगले बदल घडवून आणू शकले तर शिवसेनेचे भले,धर्माधिकारींचे भले, समाजाचे भले.. विन -विन्-विन सिच्युएशन!