शरद पवार भविश्यातील पंतप्रधान ? ?

हरकाम्या's picture
हरकाम्या in काथ्याकूट
14 Mar 2009 - 12:00 pm
गाभा: 

आपले क्रुशीमंत्री आणि क्रिकेट बोर्डाचे अध्य्क्श श्री. शरद पवार ह्यांना सध्या
पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागलेली आहेत. आणि त्यादिशेने त्यांची वाटचाल चालू
आहे, हा माणूस अत्यंत हुशार आहे हे नक्की. कुठ्लेही पाउल टाकताना हा माणूस
अत्यंत योजनाबध्द रीतिने टाकतो. समजा हा माणूस पंतप्रधान झाला तर काय होईल
आणि त्यातल्यात्यात त्यांनी परराश्ट्र खाते त्यांनी संभाळले तर काय होईल हे सांगता
येत नाही. पण आपला शेजारी ?? पाकिस्तान याची चांगलीच पंचाईत होईल.
पाकी सत्ताधार्यांना कसे वागवे हेच समजणार नाही. ह्या चिनी लोकांची पण तीच
पंचाईत होणार आहे.
पण मराठि लोकांना मात्र छान वाटेल असे वाटते. कारण आतापर्यंत कुणीच
मराठी त्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेला नाही. आपण मराठी लोकांनी
आतापर्यंत दुसर्याची तळी उचलून धरण्यात धन्यता मानली.
शरद पवार हे पंतप्रधान होतील असे आपल्याला वाटते का ?
क्रुपया आपले मत द्या . तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पहातोय!

प्रतिक्रिया

शक्तिमान's picture

14 Mar 2009 - 12:17 pm | शक्तिमान

नक्कीच व्हायला हवेत.
पंतप्रधान होण्यासाठी सध्याच्या काळामध्ये परफेक्ट उमेदवार आहेत ते.
त्यांचा अभ्यास, व्यासंग याच्या तोडीस-तोड माणूस सापडणे सध्या अवघड आहे.

tushar_raje's picture

16 Mar 2009 - 4:33 pm | tushar_raje

ज्या व्यक्तीला शेतकर्‍या॑ पे॑क्षा क्रीकेट मह्त्वाचा वाटतो, असा माणुस प॑तप्रधान बनुन देशाचे काय हीत करेल?
ही व्यक्ती म॑त्री असताना जास्त शेतकर्‍या॑नी आत्मह्त्या केल्या.

अविनाशकुलकर्णी's picture

14 Mar 2009 - 12:54 pm | अविनाशकुलकर्णी

नरेंद्र मोदि हे योग्य उमेदवार आहेत

मृगनयनी's picture

6 Apr 2009 - 11:57 am | मृगनयनी

+१

सहमत!

"नरेन्द्र मोदि" पन्तप्रधान झाल्यास भारत-देशात हिन्दुन्च्या भावनांचा आणि हिन्दु-कल्याणाचा किमान विचार तरी केला जाईल, अशी माफक अपेक्षा आहे.

अर्थात, सगळे पक्ष इथून तिथून सारखेच! पण त्यातल्या त्यात "भाजप" ( शिवसेना युती) बरा! :)

२६/११ च्या मुम्बई बॉम्बस्फोटांपेक्षा.....मालेगाव बॉम्ब्स्फोट प्रकरणावर सारखे बोट ठेवून हिन्दूंच्याच नावाने खडे फोडणार्या शरद पवारांपेक्षा देशद्रोह्यांचा नायनाट करण्यास उत्सुक असलेले "नरेन्द्र मोदी" १००००००००० पटींनी चांगले!

""भाजप, धर्माचे राजकारण करून हिन्दु-मुस्लिम समाजात फूट पाडतो"" अशा बुळबुळीत आरोळ्या मारणार्‍या "राष्ट्रवादी" वाल्यांची जात्यांधता प्रत्येक "आरक्षणात" दिसून येते.

त्यामुळेच आज देशाला " शरद पवारा" ची नाही ,तर "नरेन्द्र मोदीं "ची जास्त गरज आहे.

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Apr 2009 - 12:26 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

जागल्या's picture

6 Apr 2009 - 9:53 pm | जागल्या

कुलकणी भाऊ
आपणाशी सहमत आहे मी...

जागल्या

घाशीराम कोतवाल १.२'s picture

14 Mar 2009 - 12:58 pm | घाशीराम कोतवाल १.२

स्वातंत्र्यानंतर ६० वर्षाने का होइना महाराष्ट्राला या देशाचे नेतत्रुत्व करायची संधी मिळेल
आणी सध्याच्या काळात त्यांच्या सारखा परफेक्ट उमेदवार नाहि आहे देशामधे तसे चंद्राबाबु नायडु आहेत पण
ते आघाडीचे राजकारण नाही करु शकत बेरिज वजाबाकि च्या राजकारणा शरद पवारांचा हात धरु शकणारा नेता
कोनीच नाहि कस उचलाव कसे आपटाव हे त्यांना बरोबर ठाउक आहे

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

परिकथेतील राजकुमार's picture

14 Mar 2009 - 1:02 pm | परिकथेतील राजकुमार

आम्हाला तर बॉ 'रामदास आठवले' पंतप्रधान व्हावेत असे वाटते.

निळा कोब्रा
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

घाशीराम कोतवाल १.२'s picture

14 Mar 2009 - 1:07 pm | घाशीराम कोतवाल १.२

आम्हाला तर बॉ 'रामदास आठवले' पंतप्रधान व्हावेत असे वाटते

अगागा ठार मेलो काय पन प रा =)) =)) =))

अरे हा माणुस काय बोलतो काय करतो
साला राजकारणी आहे कि जोकर
फुला फुलांचे शर्ट घालण्यात आणी तोंड वाकडे करुन बोलण्यात जन्म गेला
साला जागेची भीक मागुन निवडणुका लढवण्यात हे धन्यता मानतात

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

परिकथेतील राजकुमार's picture

14 Mar 2009 - 1:19 pm | परिकथेतील राजकुमार

अरे हा माणुस काय बोलतो काय करतो

बोलायचे एक आणी करायचे वेगळेच हा एक यशस्वी राजकारणी असल्याचा पुरावा आहे.

साला राजकारणी आहे कि जोकर

राजकारणात सर्व दु:ख विसरुन सतत जनतेला हसर्‍या चेहेर्‍यानेच सामोरे गेले पाहिजे ! आणी काय हो, दाढिवाला जोकर तुम्हाला तरी कधि बघायला मिळणार ?

फुला फुलांचे शर्ट घालण्यात आणी तोंड वाकडे करुन बोलण्यात जन्म गेला

फुला फुलांचे असले तरी खादिचे असतात हो ते.

साला जागेची भीक मागुन निवडणुका लढवण्यात हे धन्यता मानतात

सतत गरजवंत असणे हे अजुन एक यशस्वी राजकारण्याचे लक्षण. ह्याच अनुभवाचा पुढे जागतीक बँकेकडुन, अमेरीकेकडुन मदत मागताना उपयोग होईल.
रामदास आठवले आगे बढो .. हम तुम्हारे साथ है !!

निळा कोब्रा
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

घाशीराम कोतवाल १.२'s picture

14 Mar 2009 - 2:21 pm | घाशीराम कोतवाल १.२

पण हा माणुस पुर्ण देशाचे वाटोळे करणार नक्कि

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

अनामिका's picture

14 Mar 2009 - 2:03 pm | अनामिका

त्यांचा अभ्यास, व्यासंग याच्या तोडीस-तोड माणूस सापडणे सध्या अवघड आहे.
हाच निकष लावायचा असेल तर मिपावरील बरेच सदस्य पवारांपेक्षा काकणभर जास्तच सरस असतिल्.मग त्यांच्या पैकी कुणाला तरी करायचे का पंतप्रधान.?................ :?
फक्त मराठी माणुस पंतप्रधान व्हायला हवा म्हणुन , ज्याला मराठीची काही चाड नाही पण तो केवळ मराठी भाषिक आहे या एका गुणवत्तेपायी त्या व्यक्तीला पंतप्रधान करणार का?
सध्या सेनेलापण नसते वेध लागलेत्...................नको त्या लोकांच्या वळचणीला जाऊन स्वतःकडे जे उरलेले आहे ते देखिल घालवुन बसतील...............पण यांना सांगणार कोण?...............सध्या सगळी अक्कल आपल्यालाच आहे अशा आविर्भावात सेनेचे ताज्या दमाचे नेते वागत आहेत्...........आणि हेच उद्धवचे सल्लागार .............. जशी पेशवाई रसातळाला नेण्यात नाना फडणवीसांचा हातभार लागला तसेच सेनेला इतिहासजमा करण्याचे कार्य हे सल्लागार मंडळ करतय सध्या.............शरदबाबु बाळासाहेबांचे मित्र असले तरी ते काय चिज आहेत हे बाळासाहेबांना सांगायची गरज नाही.........पण मराठी मराठी म्हणुन ओरड करायची आणि वास्तविक पाहता जो पक्ष आणि पक्षाचे नेते मराठीची आणि मराठी माणसाची गळचेपी महाराष्ट्रात करतात आणि इतरांच्या हस्ते होत असलेली गळचेपी उघड्या डोळ्यांनी बघतात अश्या पक्षाशी संधान बांधण्याचा विचार करणे म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिकांचा विश्वासघात करण्यासारखे आहे...............राजकारणात कुणी कायमचा शत्रु अथवा मित्र नसतो पण म्हणुन काय कुणाचीही हाजीहाजी करायची का?.........
कालच्या झी२४ तास वरील मुलुखमैदान या चर्चासत्रात कॅ सुधिर सावंत यांनी शरद पवारांच्या गलिच्छ व संधिसाधु राजकारणाची यथेच्छ व योग्य मापे काढलीत..........
पवारांना पंतप्रधान पदाची स्वप्ने पड्तात त्यात काय नवल ति तर लालु व मायावतीला तर पडतातच पण गेला बाजार कदाचित रामदास आठवलेंना देखिल पडत असतिल कुणी सांगावे!
आधी स्वतःची कर्मभुमी असलेल्या महाराष्ट्राचे भले करुन दाखवा आणि मग हिंदुस्थानचे पंतप्रधान होण्याची दिवास्वप्न बघा म्हणाव..................आबांना काय जातय ठराव मांडायला?सध्या त्यांचे कुणी तासगाव मधे देखिल ऐकत नाही..............कुठुन तरी कायम चर्चेत रहायचा हव्यास दुसर काय?
"अनामिका"

घाशीराम कोतवाल १.२'s picture

14 Mar 2009 - 2:11 pm | घाशीराम कोतवाल १.२

कालच्या झी२४ तास वरील मुलुखमैदान या चर्चासत्रात कॅ सुधिर सावंत यांनी शरद पवारांच्या गलिच्छ व संधिसाधु राजकारणाची यथेच्छ व योग्य मापे काढलीत..........

त्या बद्द्ल तर बोलुच नये नवाब मलिकचा चेहरा बघण्यासारखा झाला होता साल काय बोलु कस बोलु हे त्याला कळत नव्हते..

सध्या सेनेलापण नसते वेध लागलेत्...................नको त्या लोकांच्या वळचणीला जाऊन स्वतःकडे जे उरलेले आहे ते देखिल घालवुन बसतील...............पण यांना सांगणार कोण?...............सध्या सगळी अक्कल आपल्यालाच आहे अशा आविर्भावात सेनेचे ताज्या दमाचे नेते वागत आहेत्...........आणि हेच उद्धवचे सल्लागार .............. जशी पेशवाई रसातळाला नेण्यात नाना फडणवीसांचा हातभार लागला तसेच सेनेला इतिहासजमा करण्याचे कार्य हे सल्लागार मंडळ करतय

अहो म्हनुन तर राज म्हणाले माझा विठ्ठल बडव्यांच्या ताब्यात गेलाय ...
उध्दव ठाकरेची विनाषकाले विपरित बुद्धी झाली आहे कारण आता जर सत्ता नाही तर भविष्यात राजच्या समोर तर नाहिच नाही
आपण पुन्हा कधी सत्ता नाही मिळवु शकत हे उध्दव ठाकरे ना चांगले पटले आहे ...

फक्त मराठी माणुस पंतप्रधान व्हायला हवा म्हणुन , ज्याला मराठीची काही चाड नाही पण तो केवळ मराठी भाषिक आहे या एका गुणवत्तेपायी त्या व्यक्तीला पंतप्रधान करणार का?

दुरदैव हो आमचे कि आमचे नेते एकादुसर्‍याची उणी दुणी काढण्यात आणी दिल्लीश्वरांची हाजी हाजी करण्यात ह्यात घालवतात
आता संधी आहे तर करा ह्या तेल लावलेल्या पैलवानाला मदत काय

**************************************************************

प्रमोद देव's picture

14 Mar 2009 - 2:20 pm | प्रमोद देव

मला नक्कीच आनंद होईल. पण पवार पंतप्रधान झाले तरी महाराष्ट्राला काडीचाही फायदा होणार नाही हेही तितकेच खरे..
सद्या ते कृषीमंत्री आहेत आणि महाराष्ट्रातच जास्तीत जास्त शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या होत आहेत.
पवार स्वत:च्या पोळीवर तूप ओढून घेण्यात जरी कुशल असले तरी सामान्य लोकांसाठी त्यांच्या कर्तृत्वाचा उपयोग शून्य आहे.
मुख्यमंत्री,त्यानंतर संरक्षण मंत्री आणि आता कृषीमंत्री म्हणून कोणते लक्षात राहील असे काम त्यांनी केलेय?मला तरी तसे काही आठवत नाहीये.
लाल बहाद्दुर शास्त्री आणि इंदिरा गांधी हे खर्‍या अर्थाने महान होते आणि काही प्रमाणात राजीव गांधी आणि वाजपेयी पंतप्रधान म्हणून बर्‍यापैकी वाटले. इतरांची कारकीर्द तशी सामान्यच वाटली. पवार पंतप्रधान झाल्यास ह्या 'इतरांच्यातच' ते गणले जातील.

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

कुंदन's picture

16 Mar 2009 - 4:50 pm | कुंदन

+११

निखिलराव's picture

14 Mar 2009 - 2:31 pm | निखिलराव

मला नक्कीच आनंद होईल. पण पवार पंतप्रधान झाले तरी महाराष्ट्राला काडीचाही फायदा होणार नाही हेही तितकेच खरे..

आता संधी आहे तर करा ह्या तेल लावलेल्या पैलवानाला मदत काय

तिमा's picture

14 Mar 2009 - 6:31 pm | तिमा

देवसाहेबांचे पटले. हा माणूस कोणाच्या कामाचा नाही. फक्त त्यांचे स्वतःचे उखळ पांढरे होईल.

मुकेश's picture

14 Mar 2009 - 7:22 pm | मुकेश

शरद पवार पंतप्रधान झाले तर एक मराठी माणूस म्हणून नक्कीच आनंद होईल.
पण या माणसाच्या कू-कर्मांचा आणि सू-कर्मांचा विचार करता भारताचे भविष्य अंधारातच वाटते.

नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत असे मला वाटते.

१.५ शहाणा's picture

15 Mar 2009 - 12:27 pm | १.५ शहाणा

शरद पवार हे उद्याचे पंतप्रधान आहेत.
हा उद्या कधी उजाडेल हे माहीत नाही

शिवापा's picture

15 Mar 2009 - 11:30 pm | शिवापा

रामदास आठवले होणे शक्य नाहि त्यामुळे त्यांची भीती वाटत नाहि पण मायावती अथवा मोदी यांच्यापैकी कोणिही पंतप्रधान झाले तर मग देश सोडून द्यावा असे वाटते. (पाहिजे तर भुतानात जाईन किंवा नायजेरिया पण चालेल)

कुठ्लेही पाउल टाकताना हा माणूस अत्यंत योजनाबध्द रीतिने टाकतो. समजा हा माणूस पंतप्रधान झाला तर काय होईल आणि त्यातल्यात्यात त्यांनी परराश्ट्र खाते त्यांनी संभाळले तर काय होईल हे सांगता येत नाही. पण आपला शेजारी ?? पाकिस्तान याची चांगलीच पंचाईत होईल.पाकी सत्ताधार्यांना कसे वागवे हेच समजणार नाही.

ही पावले तो स्वतहाच्या फायद्यासाठी टाकतो(इतर राजकारणी टाकतात तशिच).गेले पाच वर्षे क्रुषी मन्त्री असताना कधीही 'पवारानी शेति विषयक अमुक अमुक प्रश्न सोडवला' असे झाले नाही.देशातली ६०% जनता क्रुषी क्शेत्रात असताना 'ग्रेट मराठा' खुप काही करु शकत होता.मात्र ह्याचे लक्ष होते-सोन्याच्या कोमब्डी कडे-क्रिकेट मधे.! महाराश्ट्राचे मुख्य्मन्त्री असताना त्यानी राज्याचे किती कल्याण केले हे आपण जाणतोच.(१९८८- ते १९९०/१९९३-१९९५) ह्या काळात भाई ठाकुर्,पप्पु कलानी वगैरे 'थोर नेते' ही 'ग्रेट मराठ्याचीच' राज्याला मिळालेली 'देणगी'.ह्याच काळात underworld प्रचन्ड बोकाळले होते.राज्यात जागान्च्या किमती आवाक्याबाहेर वाढल्या त्या ह्या काळात्.तशी सुरवात १९८५ पासुन झालिच होती.'शरद पवार भुखन्ड खावुन श्रिखन्ड चाटत आहेत' 'सन्माननीय' बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्क वर म्हणाले होते- १९९० च्या निवडणुकित.!!१९९५ च्या निवडणुकीत 'पवार Enron चे एजन्ट आहेत' असे म्हणणारे ठाकरे आज पवार ह्यान्च्या बरोबर गुलु गुलु चुम्बा चुम्बि करत आहेत!!. 'राजकारणात कोणिच शत्रु नसतो' वगैरे बोलणे ठिक असले तरि कमरेचे सोडुन डोक्याला गुन्डाळले तर जर जास्तच!! पवार पण 'बाळासाहेब व्यक्ती म्हणुन चान्गले आहेत' वगैरे म्हणालच आहेत!!

ह्या चिनी लोकांची पण तीच पंचाईत होणार आहे

चिनि राज्य्कर्ते दुधखुळे नाहित.आणि आन्तर्राश्ट्रिय राजकारणात तर ते भारतिय नेत्यान्च्या बरेच मैल वर आहेत.ज्या भारतिय नेत्यानी स्वतहाचाच देश विकायला काढलाय ते काय डोम्बल आन्तर्राश्ट्रिय राजकारण करणार?

समीरसूर's picture

16 Mar 2009 - 12:17 pm | समीरसूर

पवार हे धूर्त आणि हुशार राजकारणी आहेत हे खरे असले तरी त्यांच्या नेतृत्वाचा महराष्ट्राला किंवा एकूणच भारत देशाला काही फायदा होईल असे वाटत नाही. त्यांच्या राजकारणातल्या हुशारीचा उपयोग ते बहुतांशी स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वतःच्या राजकीय आकांक्षा पूर्ण करण्यासाठी करून घेतात असे वारंवार दिसून आले आहे. त्यासाठी ते तडजोडीच्या (राजकीय भाषेत याला बेरीज-वजाबाकीचे राजकारण असे गोंडस नाव आहे) राजकारणात कुठल्याही थराला जायला तयार असतात. दोन दिवसापूर्वी बोललेले आज खोडून काढून तिसरेच काहीतरी बोलायचे आणि दोन दिवसांनी पुन्हा कोलांटीउडी मारून भलतेच काहीतरी बोलायचे या त्यांच्या सवयीमुळे पक्ष कार्यकर्ते गोंधळात पडतात, जनता गोंधळात पडते आणि पक्षनेत्यांना नेमके काय करावे हे कळत नाही. शिवाय त्यांच्या कृषीमंत्रीपदाच्या काळात त्यांनी शेतकर्‍यांसाठी किंवा भारताच्या कृषीक्षेत्रासाठी काहीच केले नाही. नुसत्या सभा घ्यायच्या, लोकांना भेटायचे, शेतकर्‍यांच्या जमिनी घेऊन तिथे मोठे गृहप्रकल्प उभारण्यासाठी प्रोत्साहन (अर्थात मोबदला घेऊनच) द्यायचे, काहीतरी गुळमुळीत बोलत रहायचे आणि कुठल्याच प्रश्नावर ठाम आणि आग्रही भूमिका न घेता फायद्याच्या गोष्टींमध्ये बचावात्मक भूमिका घेत काहीतरी दर्जाहीन राजकारण करत रहायचे असा पवारांचा राजकारणी खाक्या राहिलेला आहे. या सगळ्या स्वार्थी राजकारणाचा उबग जनतेला आला आहे. पवारांची ही शैली देखील जनतेच्या लक्षात आलेली आहे त्यामुळे त्यांचे पंतप्रधान होणे अवघड नव्हे तर अशक्यच आहे असे मला वाटते. किंबहुना त्यांनी होऊच नये असेच वाटते. मराठी माणूस पंतप्रधान व्हावा असे अगदी मनापासून वाटते खरे पण उगीच कुठल्याही फक्त स्वार्थ साधणार्‍या आणि देशाचा आणि लोककल्याणाचा अजिबात विचार न करणार्‍या मराठी माणसाने पंतप्रधान व्हावे असे मला वाटत नाही. कुठलीच तात्विक बैठक नसलेला नेता म्हणून पवारांचे वर्णन करावे लागेल. महाराष्ट्रातील आणि मुंबईतील मराठी लोकांचा प्रश्न असो, रेल्वेमधल्या भरतीचा प्रश्न असो, शेतकर्‍यांच्या आत्महत्येसारख्या भीषण घटनांचा प्रश्न असो, डबघाईला आलेल्या साखर कारखान्यांचा प्रश्न असो, मुंबईवरील मुस्लिमधार्जीण्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा प्रश्न असो, जागतिक मंदीचा प्रश्न असो, घटणार्‍या शेतमालाचा प्रश्न असो, सतत वाढणार्‍या महागाईचा प्रश्न असो, मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न असो किंवा अजून कुठलाही देशावर किंवा सामान्य जनतेच्या जगण्यावर परिणाम करणारा प्रश्न असो, पवार कधीच पेटून उठत नाहीत. प्रत्येकाची स्वतःची अशी मते असतात. आपल्याजवळ अधिकार आहेत तर इतरांसाठी काहीतरी चांगले करावे, त्यांचे जगणे सुसह्य करावे अशी सुप्त मते प्रत्येकाच्या मनात असावी लागतात. अशा कुठल्याच मतांच्या किंवा तत्वांच्या तराजूमध्ये धगधगणार्‍या प्रश्नांना तोलून त्यांच्यावर आग्रही आणि ठाम भूमिका पवारांच्या बोलण्यातून, वागण्यातून, राजकारणातून दिसत नाही. दिसून येते ती फक्त प्रत्येक तत्वाला केराची टोपली दाखवत पंतप्रधान होण्याची केविलवाणी धडपड. ती या निवडणुकांमध्ये यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे. या निवडणूकीत भाजपदेखील आपली प्रतिमा हरवून बसला आहे. लालकृष्ण अडवाणींनी पुन्हा एकदा राममंदिराचा मुद्दा उकरून काढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता पण आता त्याला यश गवसणे अशक्य आहे. बौद्धिक दिवाळखोरी असलेला पक्ष म्हणजे भाजप! कुठलाच मुद्दा नाही, काही ठोस कार्यक्रम नाही आणि केवळ काँग्रेसवाल्यांवर बिनबूडाचे आरोप करून काहीतरी राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न भाजपचे नेते करत आहेत. मागे नितिन गडकरींनी काहीतरी आरोप मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांच्यावर केले होते. ते खरे असतील किंवा नसतील हा मुद्दा अलाहिदा पण त्या आरोपांमधून भाजपची दयनीय स्थिती समोर आली हे मात्र खरे! माझ्या मते मनमोहन सिंग पुन्हा पंतप्रधान होतील आणि काँग्रेसच पुन्हा सत्तेत येईल. नरेंद्र मोदींनी गुजरातचा कायापालट केला आहे असे मी खूप लोकांकडून ऐकले आहे. त्या माणसाने गुजरातचे नशीब बदलले हे मात्र नक्की. कालच्या त्यांच्या पुण्यातल्या सभेची गर्दी बघून त्यांनी आपल्या घणघाती व्यक्तीमत्वाने आणि ठोस कृतीमुळे किती प्रभाव पाडलेला आहे हेच दिसून येते. असे दुर्दैवाने कुठल्याच (१-२ सन्माननीय अपवाद वगळता) मराठी नेत्याच्या बाबतीत घडत नाही. पवारांच्या बाबतीतसे फक्त बारामतीमध्ये होते. सध्याचे फॉर्मात असलेले राजकीय व्यक्तीमत्व नि:संशय नरेंद्र मोदी आहेत हे मात्र पटते. तिसर्‍या आघाडीला पण काही अर्थ नाही. सत्तेची चाहूल लागताच यातले बरेच उंदीर जहाज सोडून पळायला लागतील आणि तिसर्‍या आघाडीचा धुव्वा उडेल. म्हणजे पुन्हा एकदा काँग्रेस आणि कंपनीला सत्तेत यायला मिळेल असे वाटते. बघू काय होतय ते, घोडामैदान जवळच आहे.... :-)

--समीर

अगदी बरोब्बर्...शरद पवार यांची पातळी सगळे जण ओळखुन आहेत्..आणि त्यांची पक्षनिष्ठा जगजाहिर आहे ;)..
एका पक्षात होइनासे झाले कि दुसरा पक्ष काढायचा...पुरोगामी आघाडी, परत कोंग्रेस, नंतर रा.काँग्रेस इ...त्यामुळे शरद पवार हे काही पंतप्रधान होत नाहित....कारण या त्यंच्या धोरणामुळे अनेक राजकिय शत्रु त्यानी स्वतः निर्माण केले आहेत..जेव्हा त्याना संधी होति..(माझ्या मते देवेगौडा च्या वेळी...चुभुद्याघ्या)तेव्हा त्याना पद्धतशिर पणे चहातुन माशी काढल्यागत बाहेर काढले..आणी रा. कोंग्रेस ची आता एवढी ताकत ही नाही कि आता त्याना पंतप्रधान पद मिळेल..

सध्या तर परत कोंग्रेस आणी गट्बंधन च सत्तेवर येइल असे वाटत आहे..त्यावेळी मुलायम्-मायावती, आणी दक्षिणेकडचे करुणानिधी हेच परत kingmaker होतिल असे दिसत आहे..आणि ही लोक बाकी कुणालाही सहमती देतिल्..पण शरद पवारांना नाही.. हे पक्के.. :(

------------------
केदार जोशी

चिरोटा's picture

16 Mar 2009 - 3:05 pm | चिरोटा

१००% सहमत्.आता कुठलाही पक्ष जात्/धर्माचे राजकारण करुन देश पेटवु पाहील तर मतदार त्यानाच पेटवतील असे वाटते.नरेन्द्र मोदी हे नि:सन्शय फॉर्मात आहेत्.मात्र त्यन्च्याच पक्शात त्यान्च्यावर 'जळणारे' पण अनेक आहेत.सन्धी मिळुनपण पवारानी आपल्याच पायावर दगड मारुन घेतला आहे असे मला वाटते.राष्ट्रिय राजकारणात पवार आहेत खरे पण शेतकर्यान्चे प्रश्न सोडवणारा नेता अशी प्रतिमा त्यानी कधिच तयार केली नाही. मोदी त्यान्च्यापेक्षा १० वर्षानी लहान्,मायावती तर १६ वर्षानी लहान.परन्तु एक ठराविक राजकारण करुन त्या दोघानी स्वतःचे असे राश्ट्रिय स्थान निर्माण केले आहे. तीच गोष्ट लालु,जया,चन्द्राबाबु ह्यान्ची.
सन्धी मिळुनपण आणि क्षमता असुन्पण एका ठराविक मर्यादेपलिकडे पवार गेले नाहीत. गुळ्गुळीत उलट्सुलट बोलायचे आणि पुणे जिल्ह्यापलिकडे बघायचे नाही ,राज्यात कम्पुशाही तयार करुन आपले अस्तित्व टिकवणे ह्या पलिकडे पवार गेले नाहीत.
मराठी माणुस पन्तप्रधान वगैर बोलायला ठीक पण ह्या ग्रुहस्थाने आधी बरेच दिवे लावले आहेत तर 'मराठी,मराठी' म्हणण्यात काय हशील? पुर्वि मराठी माणसाला राश्ट्रिय राजकारणात महत्व नाही म्हणुन महाराश्ट्र्/मराठी मागे पडतो अशी ओरड व्हायची.
शिवराज पाटिल्,सुशिल्कुमार्,पवार ह्यानी गेल्या पाच वर्षात राज्याचे आणि देशाचे काय कल्याण केले ते आपण बघतोच.ह्याचा अर्थ अमराठी राजकारणी काही फार कर्त्रुत्ववान आहेत असा नाही.पण पवार आता मराठी कार्ड खेळुन बघत आहेत.

शरद पवारांच्या पंतप्रधान होण्यासंदर्भात होत असलेल्या चर्चेच पेव सध्या प्रसारमाध्यमांमधे फुटलय.
या पार्श्वभुमीवर मटमधिल हा लेख पवारांच्या आजपर्यंतच्या राजकिय वाटचालीवर योग्य प्रकारे प्रकाश टाकणारा आहे.आणि म्हणुनच हा लेख इथे टाकण्याचा प्रपंच!

पवारांची पंतप्रधानकी!-
मराठी माणूस उच्चपदावर असला की मराठी माणसाची शान वाढते, असा विचार अनेकांच्या मनात घर करून असतो. पवार पंतप्रधान होतील की नाही यापेक्षा ते मराठी असल्याने ते पंतप्रधान व्हावे असं वाटणं ही लोकशाहीची घोर विटंबना आहे. एक म्हणजे या निवडीला साऱ्या देशाची संमती असणं आवश्यक आहे आणि दुसरं म्हणजे अशा व्यक्तीच्या डोक्यावर साऱ्या देशाची जबाबदारी असते; फक्त महाराष्ट्राची नव्हे हे इथे लक्षात ठेवलं पाहिजे.

..

पंतप्रधानांची खुचीर् पटकावण्याचा संधी आता एखाद्या मराठी माणसाला मिळावी अशी भावना आता महाराष्ट्रीयांमध्ये आहे, असं विधान शरद पवार यानी नुकतंच व्यक्त केलं आहे. खेड्यापाड्यांपर्यंत संपर्क असलेला आणि सत्ताभिलाषांची बेरीज-वजाबाकीची गणितं समजणारा पवारांइतका दुसरा 'जाणता नेता' महाराष्ट्रामध्ये नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे खुद्द पवारांना पंतप्रधान व्हायचं आहे असा अनेकांनी त्याचा अर्थ लावला तर तो विपर्यस्त म्हणता येणार नाही.

निवडणुकांचे निकाल जाहीर होतील तेव्हा कोणत्याही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार नाही; काहीसं अनिश्चिततेचं वातावरण असेल; त्यामुळे सर्वाधिक संख्या असलेल्या पक्षाला निरनिराळ्या प्रांतातील छोट्या पक्षांना तसंच राष्ट्रवादीसारख्या फुटकळ पक्षाना हाताशी धरूनच सत्तेचा गड काबीज करता येईल असं भाकित काहींनी वर्तवलं आहे. या गोंधळात शिवसेनेच्या दोन आकडी खासदारांचा पाठिंबा असलेल्या पवारांना दिल्लीच्या तख्तावर विराजमान होण्याची संधी मिळेल, असा काहींचा होरा आहे.

या संदर्भात स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राची शान वाढवणाऱ्या काही व्यक्तींची ओळख करून घेणं आवश्यक ठरेल.

सी. डी. देशमुखांची मराठी माणसाला ओळख आहे ती एक बुद्धिमान व्यक्ती, प्रशासक म्हणून. सर्वात कमी वयातील आयसीएस अधिकारी, सेवानिवृत्तीनंतर इंग्रजांच्या काळातले भारतीय वंशाचे ते पहिले गव्हर्नर. नेहरूंच्या काळात नियोजन मंडळाचे प्रमुख. केंदीय अर्थमंत्री. पुढे नेहरूंशी तात्त्विक मतभेद झाल्यामुळे त्यानी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (हा राजीनामा त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्यावरून दिला नव्हता.) पुढे युनिव्हसिर्टी ग्रँट्स कमिशनचे अध्यक्ष म्हणून त्यानी काम केलं. अगदी शेवटचा श्वास घेईपर्यंत ते काम करत राहिले.

स्वातंत्र्योत्तर काळातलं डॉ. धनंजयराव गाडगीळ हे दुसरं उदाहरण. केंब्रिजची अर्थशास्त्राची पदवी घेऊन ते भारतात आले. गोखले इन्स्टिट्युटमध्ये संशोधनाचं काम करत त्यांनी आयुष्य वेचलं. त्यांना भारतातली शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती बोचत होती. सहकाराचं वाण साखर कारखान्यापुरतं मर्यादित राहू नये यासाठी ते प्रयत्नशील होते. शेतीचा विकास आणि शेतकऱ्याची दैन्यावस्था संपण्यासाठी ते अखेरपर्यंत प्रयत्नशील होते. डॉ. गाडगीळांनी एकीकडे अर्थशास्त्रातलं संशोधन तर दुसरीकडे शेतीक्षेत्रातलं काम अशी भरीव कामगिरी केली आणि या साऱ्यामागे त्यांच्या मनात सतत दरिदी शेतकऱ्याची अवस्था सुधारण्याची तीव्र इच्छा होती. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर धनंजयरावांकडे नियोजन मंडळाची धुरा सोपवली. महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी जे काम डॉ. गाडगीळांनी केलं त्याचा आपल्याला अभिमान बाळगायला हवा.

उच्च शिक्षण नाही; उच्च घराणं; उच्च पद नाही अशा अवस्थेत केवळ आपल्या गावचा विकास घडवून आणायचा हा ध्यास घेऊन राळेगण शिंदीचं (शिंदीच्या दारूमुळे हे नाव प्रसिद्धीला आलं होतं) रूपांतर राळेगण सिद्धीमध्ये करणाऱ्या अण्णा हजारेंचा उल्लेख केल्याशिवाय जलसंधारण, व्यसनमुक्ती, ग्रामविकास यासंबंधीचा कोणताही विचार आज पुढे जाऊ शकत नाही. अगदी नियोजन मंडळाच्या दस्तावेजातही अण्णांच्या कामाचा उल्लेख आढळतो. ग्रामीण भागातल्या कामाचा तो एक आदर्श वस्तुपाठ ठरला आहे.

अण्णांच्या पाठोपाठ हिवरेबाजार इथले सरपंच पोपटराव पवार यांच्या कामाचा उल्लेख आजकाल होतो. जलसंधारणाची कामं, पर्यावरणाचा विकास, रोजगार आणि व्यवसाय या संदर्भात पोपटरावांच्या कामाची सर्वत्र दखल घेतली गेली आहे. या साऱ्यांची दखल जगभर घेतली गेली. मराठी म्हणून त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली नाही. मग मराठी माणसाच्या विरोधात काही कटकारस्थान सुरू आहे, अशी हवा सर्वत्र उठवण्यात काय मतलब आहे?

या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या संदर्भात पवारांच्या कारकिदीर्चा ताळेबंद मांडणं उचित ठरेल.

केंदात १९७७ साली जनता पक्षाचं सरकार स्थिर झाल्यावर पुरोगामी लोकशाही दल स्थापन करून ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतरही काँग्रेस (समाजवादी) पक्षाचे घोडे नाचवण्याचा प्रयोग त्यांनी चालूच ठेवला. पण त्यात त्यांना यश मिळालं नाही.

राजीव गांधी पंतप्रधान झाल्यावर ८६ साली पवार 'स्वगृही' म्हणजे काँग्रेसमध्ये परतले. ८८ साली ते पुन्हा मुख्यमंत्री झाले. ९१ साली राजीव गांधींच्या हत्येनंतर केंदात काँग्रेस सरकार आलं. नरसिंहराव पंतप्रधान झाले. पवारांना संरक्षण खाते मिळालं. १९९३मध्ये मुंबईतल्या दंग्यांच्या काळात आधी पवार मुंबईत आले. त्यावेळी केंदाकडून लष्करी साह्य देण्याबाबत पवारांवर चालढकल केल्याचे आरोप झाले आणि सुधाकरराव नाईक आणि पवार यांचे संबंध बरे नसल्याने मुद्दाम ही गोष्ट केल्याचे आरोप झाले. मात्र, कायदा आणि सुरक्षा हे राज्य सरकारचे विषय आहेत आणि सरकारकडून अशी विनंती येणं आवश्यक आहे, असा पवित्रा पवारांनी घेतला. पुढे मुंबईतल्या दंग्यांच्या पार्श्वभूमीवर नाईकांनी राजीनामा दिला आणि पवार महाराष्ट्रात परतले.

९३ नंतर मुख्यमंत्रिपदाच्या काळात पवारांनी वादग्रस्त एन्रॉन प्रकल्प महाराष्ट्रात आणला. या प्रकल्पामुळे वीज मंडळ दिवाळ्यात निघण्याची वेळ आली. गुंतवणूकदार बँकांचे शेकडो कोटी पाण्यात गेले. पवारांचं कर्तृत्व यापुरतं मर्यादित नाही. कुप्रसिद्ध गुन्हेगारांना तिकिटवाटप करून त्यांना सन्मानाने आमदार करण्यात पवारांनीच पुढाकार घेतला.

महाराष्ट्रातील पवारांची तीन हप्त्यांतली एकूण कारकीर्द साडेसहा वर्षांची आहे. त्यांच्या कारकिदीर्तल्या दोन महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख व्हायला हवा. पहिलं काम म्हणजे शहरी कमाल धारणेतून मुक्त झालेल्या जमिनींतून विकासकांना इमारती बांधण्यासाठी जे प्लॉट खुले केले गेले त्यांतले दहा टक्के निवासी गाळे आथिर्क मागासांसाठी मुख्यमंत्र्यांच्या स्वाधीन करण्याची योजना. प्रत्यक्षात असे निवासी गाळे पत्रकार, नोकरशहा आणि राजकारणात उठबस करणाऱ्या व्यक्ती यांच्या वाट्याला आल्या.

गेल्या अकरा वर्षांत महाराष्ट्रात सुमारे पन्नास हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या प्रामुख्याने विदर्भातल्या चार जिल्ह्यांत झाल्या. या आत्महत्यांमागे कापूस उत्पादकांची ससेहोलपट हेच असल्याचं ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी नमूद केलं आहे. त्यांच्या मते शेतकऱ्याला कापसाचं बियाणं पूवीर् १० रुपये किलोने मिळायचं; पण आता बीटी कॉटन बियाण्यासाठी त्याला किलोला चार हजार मोजावे लागतात. त्यात पुन्हा या बियाण्यांसाठी उगवणक्षमतेचा निकष ८५ टक्क्यांवरून ६० टक्के करण्यात आला आहे. असं बियाणं शेजारच्या आंध्र प्रदेशात निम्म्या किमतीला मिळतं. पण अशा कारभारात हस्तक्षेप करावा, असं पवारांना वाटलं नाही. भारतात अमेरिकन कापूस आयात होतो. त्यामुळे शेतकऱ्याच्या विपन्नावस्थेत भर पडते. पण आयात होणाऱ्या कापसावर उत्पादन शुल्क वाढवून शेतकऱ्यांचे हितसंबंध जपावेत, असं पवारांना वाटत नाही.

शरद पवार शेतकीमंत्री झाल्यावर त्यांनी केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा मांडणं आवश्यक आहे. २००६-०७ या वर्षात १.६ कोटी टन गहू खरेदीचं सरकारचं लक्ष्य होतं. पण यापैकी फक्त १.१ कोटी टनाची खरेदी होऊ शकली. कारण या काळात सरकारचा खरेदीचा भाव दर टनाला ६५० रुपये होता. आयटीसी, रिलायन्स या कंपन्यांनी तसंच कारगिल व आर्चर डॅनियल्स मिडलँड या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बाजारात अधिक भावाने खरेदी केली.

या कॉपोर्रेट कंपन्या टनाला ७५०-८०० रुपये देत होत्या. नंतर सरकार खडबडून जागं झालं आणि मग त्याने दर टनामागे ५० रुपये बोनस देऊ केला. परिणामी सरकारला ५० लाख टन गहू आयात करावा लागला. पुढे याच कंपन्यांनी टनामागे ११०० ते १२०० रुपये भावाने हा गहू विकून भरपूर नफा कमावला. या साऱ्याचा परिणाम गव्हाचे भाव वाढण्यात न झाले तरच नवल. गोष्ट अशी असेल तर मग आपले शेतकी मंत्री शेतकऱ्यांचे कैवारी आहेत असं कसं म्हणावं?

पवारांच्या अलिकडच्या राजकारणातल्या कृती त्यांच्या बागुलबुवा पद्धतीच्या राजकारणाच्या शैलीच्या निदर्शक आहेत. त्यात कोणत्या विचाराचा लवलेश नाही. शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या आचारविचारांत महदन्तर आहे. सेनेबरोबर युती करण्याचा बागुलबोवा दाखवून अधिकाधिक जागा आपल्या खिशात टाकण्याच्या कृतीमुळे त्याची सौदा करण्याची शक्ती वाढली असली तरी जनमानसात काही आदर निर्माण होईल, अशी ही कृती खासच नाही. आणि उद्या निवडणुकीनंतर संघ-सेना परिवाराची शक्ती चुकूनमाकून जास्त होते आहे असं त्यांच्या लक्षात आलं तर पवार सेनेच्या माध्यमातून संघपरिवारालाही साकडं घालायला कमी करणार नाहीत. थोडक्यात म्हणजे दोन्ही डगरींवर पाय ठेवण्याचा हा खेळ आहे. याची नांदी तिकिटवाटपाआधीच झाली आहे. पवारांच्या असल्या खेळींमुळे त्यांची विश्वासार्हता खरंतर धोक्यात येते; पण पवारांना ते महत्त्वाचं वाटत नाही! समाजातल्या तळागाळातल्या माणसाशी नातं जोडणाच्या नव्हे तर खुचीर् बळकावण्याच्या राजकीय स्पधेर्च्या गाळाशी जाण्यातले ते आघाडीचे उमेदवार आहेत; असं सर्वसामान्य मतदारांचं मत झालं तर आश्चर्य नाही. -रमेश पाध्ये, अशोक राजवाडे (मटावरुन साभार)

"अनामिका"

चिरोटा's picture

6 Apr 2009 - 12:26 pm | चिरोटा

१९६८ पासून भारतात राहणार्‍या सोनिया गान्धी ह्यान्च्यावर 'विदेशी'पणाचा मुद्दा काढत पवार ह्यानी नविन पक्ष काढला.कॉन्ग्रेस् मधले बरेच लोक आपल्या मागे येतील हा त्यान्चा समज खोटा ठरला. पुन्हा सत्तेसाठी कॉन्ग्रेस पक्षाशी युती करुन पवारानी आपली वैचारीक दिवाळखोरी दाखवून दिली.
उद्या ते पन्तप्रधान म्हणून निवडुन नाही आले तर 'मराठी माणूस पाठीशी उभा न राहिल्याने मी मागे पडलो.'असे बोलायला ते कमी करणार नाहीत.
भेन्डि.
क्ष्^न + य्^न = झ्^न

कवटी's picture

6 Apr 2009 - 11:34 am | कवटी

त्यांनी परराश्ट्र खाते त्यांनी संभाळले तर काय होईल हे सांगता
येत नाही. पण आपला शेजारी ?? पाकिस्तान याची चांगलीच पंचाईत होईल.
पाकी सत्ताधार्यांना कसे वागवे हेच समजणार नाही. ह्या चिनी लोकांची पण तीच
पंचाईत होणार आहे.

चीनी आणि पाकिस्तानी राज्यकर्ते इतके *त्ये आहेत असे वाटते का तुम्हाला? आणि पवारांच्याकडे या दोन देशांची पंचाईत करण्या इतके पोटेंशीअल असते तर ९१ मधेच नरसिंहरावांऐवजी ते पंतप्रधान झाले असते आणि अजुनही तेच राहिले असते.

पण मराठि लोकांना मात्र छान वाटेल असे वाटते.
हो नक्कीच ! हे छातीचा कोट करून उत्तर भारतियांचे महाराष्ट्रात रक्षण करणार... मग मराठी लोकाना छानच वाटेल की....

कवटी

विसोबा खेचर's picture

6 Apr 2009 - 12:48 pm | विसोबा खेचर

शरद पवार काय किंवा इतर कुणी काय, कुणीही जरी पंतप्रधान झाले तरी आम जनतेच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? निदान माझ्यासारख्या सामान्य माणसाला तरी काहीच फरक पडणार नाही!

तात्या.

समीरसूर's picture

6 Apr 2009 - 3:03 pm | समीरसूर

कुणीही सत्तेत आले तरी सामान्य जनतेच्या जीवनात फारसा फरक पडत नाही. शरद आणि अजित, दोन्ही पवारांनी पुणे महापालिकेत राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीची सत्ता आल्यावर कलमाडींविरुद्ध जोरदार आघाडी उघडली होती. अजितदादा त्याबाबतीत आघाडीवर होते. लोकसभेत कलमाडींना धूळ चारून राष्ट्रवादीचा उमेदवार पुणे लोकसभा मतदार संघातून निवडून आणण्याची भाषा पवार करायला लागले होते. या पार्श्वभूमीवर कलमाडींच्या मांडीला मांडी लावून त्यांची प्रचारसभा घेणार्‍या शरदरावांचा घरच्या वर्तमानपत्रातला (म्हणजे दैनिक सकाळ मधला) फोटो पाहून रंग बदलणार्‍या सरड्याचीच आठवण होत होती. माझ्या मागच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे शरद पवार हे संधिसाधू राजकारणी आहेत. जिथे सत्तेची चाहूल लागेल त्या कळपात सामिल होऊन आपल्या पोळीवर तूप ओढून घेण्यात ते तरबेज आहेत. हाच काय तो त्यांच्यातल्या राजकारण्याचा रंग! धर्मांच्या राजकारणावर उभ्या राहिलेल्या पक्षांच्या मागे कदापि न जाण्याची शपथ घेऊन पुणे महापालिकेत साळसूदपणे (आणि निर्लज्जपणे) शिवसेनेशी युती करून राष्ट्रवादीने पक्षाची वैचारीक बैठक किती कमकुवत आहे किंबहुना पक्षाला आणि पक्षाध्यक्षांना कुठलीच वैचारीक बैठकच कशी नाही हे सिद्ध केले.

सध्या सगळ्यात केविलवाणी अवस्था अडवाणीजींची झालेली आहे. राममंदिराचा शिळा प्रश्न पुन्हा गरम करून जनतेच्या माथी मारण्याचा त्यांचा प्रयत्न खरोखरीच हास्यास्पद आहे. अयोध्येत राममंदिर झाले काय किंवा मस्जिद झाली काय, त्याने सामान्य माणसाच्या जीवनातले त्याला जेरीस आणणारे प्रश्न थोडीच सुटणार आहेत. भ्रष्टाचार, बेरोजगारी, वीज आणि पाण्याची भीषण टंचाई, घटणारी वृक्षराजी आणि त्यायोगे जाणवणारा असह्य उन्हाळा, प्रदूषण, वाहतुकीचे दिवसेंदिवस भीषण होत जाणारे प्रश्न, सरकारी ऑफीसातली अनुभवाला येणारी मुजोरी, वाढती महागाई, गगनाला भिडलेले जीवनावश्यक वस्तूंचे भाव, दहशतवाद्यांचे हल्ले इत्यादी प्रश्न जनतेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. त्यांचे रोजचे जगणे जिथे एक लढाई आहे तिथे राम मंदिर, अयोध्या इत्यादी मुद्दे फारच गौण आहेत असे मला वाटते. आताशा त्यांनी स्विस बँकेतील भारतातून गेलेला अब्जावधी रुपयांचा काळा निधी पुन्हा भारतात आणण्याचे आश्वासन देऊन लोकांना भुलविण्याचे प्रचारतंत्र अवलंबले आहे. हा काळा पैसा स्विस बँकवाले काय सहजासहजी अडवाणींना देणार आहेत काय? भारतीयांचा असा काळा पैसा तिथे आहे हेच सिद्ध करणे हेच मुळात अवघड आहे. त्यामुळे त्यांच्या या मुद्यात ही काही दम नाही. आणि समजा चुकून त्यांना हा पैसा मिळाला तर त्यातला ९०% पैसा नेतेमंडळीच (अपवाद कुठलाच पक्ष नाही) हडप करतील यात तीळमात्र शंका नाही. भाजपच्या राज्यात त्यांच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचाराची परमावधी गाठली होती. पोलिस स्टेशन, तलाठी कार्यालये, वीज बोर्ड आणि इतर शासकीय कार्यालयातून अमूक एक रक्कम दर आठवड्याला संबधित खात्याच्या मंत्र्याकडे पोहोचलीच पाहिजे असा दंडक घालून भाजपच्या नेत्यांनी जनतेला अक्षरशः लुबाडले. पाच वर्षात कित्येक मंत्री कोट्याधीश झाले. आजही बघा, सगळ्या उमेदवारांकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे. कुठून आला इतका पैसा? राजकारणात सुरुवात केल्यानंतर काही वर्षातच ही मंडळी स्वतःचे उखळ पांढरे करून घेतात. काल मुंबईला युतीची सभा झाली. उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकून हसू येत होते. या माणसाला अजिबात भाषण करता येत नाही. उद्धव ठाकरे म्हणजे ९ ते ५ इमाने-इतबारे कारकुनाची नोकरी करून वरण-भात खाणारा एक पापभिरू मुंबईकर वाटतो. त्यांच्या भाषणात अजिबात जोश नसतो, सामान्य कार्यकर्त्यांना स्फूरण यावे असे त्यांना अजिबात बोलता येत नाही. अडवाणी ऐंशीव्या वर्षी सत्तेच्या लालसेने घसा फोडून भाषण करत होते. त्यांच्या भाषणाला पण दमडीचा अर्थ नव्हता. शरद पवार तोंडातल्या तोंडात घास गिळत असल्याप्रमाणे काय बोलत असतात त्यांचे त्यांनाच माहित. जे काही बोलतात ते खूप मनोरंजन करणारे असते. कधी तिसरी आघाडी तर कधी शिवसेना अशा कोलांट्याउड्या मारून बघत आहेत बिचारे. कुठेतरी पंतप्रधानपदाचे गाजर मिळेल या आशेत लढताहेत. कधी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा असे मराठी जनतेला वाटत आहे असे म्हणून मुक्यानेच स्वतःकडे बोट दाखवून लक्ष वेधून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत तर दुसर्‍या क्षणाला काँग्रेसने फटका मारल्यावर मनमोहन सिंगच कसे लायक पंतप्रधान आहेत असं पोपटपंची केल्याप्रमाणे बरळत आहेत. इकडे पुण्यात डीएसके झोपडपट्यांमधून नमस्कार करत हिंडत आहेत. ३०-३५ कोटींची मालमत्ता जाहिर केलेला हा बिल्डर पैसे न वाटता निवडून येण्याची भाषा करत आहे आणि जनतेने निवडणूक निधी द्यावा असे म्हणून इमोसनल अत्याचार करत आहे. गोपीनाथ मुंडे अचानक गप्प-गप्प झाले आहेत. पूनम महाजनना डावलल्याने ते नाराज झाले आहेत असे समजते. आणि ते नाराज नसूनही तसा काय कप्पाळ फरक पडणार आहे देव जाणे. एकूण काय, मस्त सर्कस रंगात आलेली आहे. सगळी माकडे अगदी जीव खाऊन उड्या मारताहेत. एकमेकांच्या गळ्यात शेपट्या अडकावून एकमेकांना पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. दी ग्रेट सर्कस ऑफ इंडियन ईलेक्शन्स!!

--समीर

जागल्या's picture

6 Apr 2009 - 3:05 pm | जागल्या

समस्त महाराश्ट्र जनहो........

शरद पवार पंतप्रधान ?
अरे या मानसाला लायकी आहे का?

हा दरोडेखोर आहे.
हा देशाची तिजोरी पार साफ करीन
व प्रत्येक गावीं स्वताची जमीन खरेदी करील.
आताच निम्मा महाराश्ट्र घशात घातलाय
जागे व्हा रे बाबानों....

जागल्या

चिरोटा's picture

6 Apr 2009 - 4:18 pm | चिरोटा

मध्यम वर्ग मतदान करीत नाही म्हणून हे नालायक लोक निवडून येतात अशी ओरड बरेच लोक करत असतात्.पण सगळेच उमेद्वार हरामी असतील तर निवडून तरी कोणाला देणार्?

हा काळा पैसा स्विस बँकवाले काय सहजासहजी अडवाणींना देणार आहेत काय?

ते देणार नाहीत हे अडवाणीना ठावूक आहे.जर सत्तेवर आले तर 'स्विस बॅन्क अडून बसली आहे,आमचा काय दोष?' असे ते म्हणतील.
इकडे कर्नाटकात पण माकडान्ची सर्कस रन्गात आली आहे.पान्ढरे,भगवे,हिरवे,ताम्बडे सगळे देव पाण्यात घालून बसले आहेत.देवेगौडा ह्याना आपल्या दोन पुत्राना केन्द्रिय मन्त्री करायच्या इर्षेने पछाडलेले आहे.मुख्यमन्त्री येडियुरप्पा ह्यानी कर्नाटकात नातेवाइकाना तिकेटे देवून भा.ज.पा.ची कॉन्ग्रेस करुन टाकली आहे.कॉन्ग्रेसवाले बघावे तेव्हा पान्ढरे कपडे घालून गॉगल लावून जिकडे तिकडे उन्हात फिरत आहेत.
क्ष्^न + य्^न = झ्^न