प्रदीप निफाडकर यांच्या गझलदीप या पुस्तकातील काही मजकूर खाली देत आहे. मराठी गझलांबद्दलच्या काही गैरसमजांबाबत ते लिहितात...
मराठीत ऊर्दू गझलेचाच अनुवाद असतो हा आणखी मोठा गैरसमज आहे. आणि त्याला आमचे काही सन्माननीय गझलकार जबाबदार आहेत. ऊर्दूतील काही शेर अगदी तसेच्या तसे उचलले आहेत. उदाहरण म्हणून हे शेर दिले जातात.
ऊर्दू: अब मैं राशन की कतारों में नजर आता हू
अपने खेतोंसे बिछडने की सजा पाता हुं।
मराठी: मी रेशनच्या रांगेमध्ये उभा राहतो आता
शिवार विकुनी आल्याची मी सजा भोगतो आता
ऊर्दू: तुम्हारे शहर का मौसम बडा सुहाना लगे
मैं एक शाम चुरा लूं, तुम्हे बुरा ना लगे
मराठी: मधुमासासम दरवळणार्या कळ्याफुलांचे गाव तुझे
तुझ्या गावची खुडून घ्यावी एक संध्याकाळ मला
ऊर्दू: देर लगी आने में तुमको शुक्र है फिर भी आये तो
आस ने दिलका साथ न छोडा वैसे हम घबराये तो
मराठी: उशीर झाला तुला यायला अखेर तू आलास तरी
तगमग झाली जरी जिवाची तुटली नाही आस तरी
ऊर्दू: आ तुझे मैं गुनगुनाना चाहता हुं
अपने होटोंपे सजाना चाहता हूं
मराठी: पुन्हा वाटते की तुला गुणगुणावे
तुला गुणगुणाया तुझे ओठ व्हावे
मिसळपावच्या गझल तज्ज्ञ सदस्यांनी ऊर्दू व मराठी गझलांचे मूळ गझलकार सांगावेत ही विनंती. शक्य झाल्यास त्या गझलाही द्याव्यात.
याला वाङ्मयचौर्य म्हणतात की तरही गझल हे ही स्पष्ट करावे.
प्रतिक्रिया
26 Jan 2008 - 10:42 pm | धनंजय
बोलायचे तर अनुमतीशिवाय अनुवाद म्हणजे प्रत-अधिकाराचे उल्लंघन. हे वाङ्मयचौर्य असते. विडंबन मात्र वाङ्मयचौर्य नसते. अभ्यासपूर्ण उल्लेख (याबद्दल अधिक विवेचन अन्यत्र वाचावे) हेदेखील वाङ्मयचौर्य मानले जात नाही.