रेसिपी हवी आहे!!

किट्टु's picture
किट्टु in पाककृती
11 Mar 2009 - 9:02 pm

मला 'वांगी काप' कसे करतात त्याची रेसिपी हवी आहे.

प्लीज कोणी मदत करेल का? 8>

प्रतिक्रिया

नरेश_'s picture

11 Mar 2009 - 9:05 pm | नरेश_

.

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

किट्टु's picture

11 Mar 2009 - 9:09 pm | किट्टु

आता भेटायला वेळ नाही आहे..

टारझन सर, प्लीज रेसिपी देता का?

चकली's picture

11 Mar 2009 - 10:00 pm | चकली

वांग्याचे काप -- > http://chakali.blogspot.com/2007/08/vangyache-kap.html
वांग्याची भजी --> http://chakali.blogspot.com/2007/12/vangyachi-bhaji.html

माझ्या ब्लॉग वर इकडे आहेत.

चकली
http://chakali.blogspot.com

आपला अभिजित's picture

11 Mar 2009 - 11:28 pm | आपला अभिजित

पिठात अजिबात पाणी घालू नये, हे काही झेपले नाही.

मी पाणी घालून पण काप करून पाहिलेत. फक्त भज्यांपेक्षा जरा घट्ट पीठ भिजवावे लागते.
आणि तुम्ही लिहिलेली धनेपूड नि अजून काय काय कशासाठी? नुसत्या डाळीच्या पिठापेक्षा हे छान होतात का?

जृंभणश्वान's picture

12 Mar 2009 - 1:23 am | जृंभणश्वान

पिठात पाणी घातले तर काप छान खुसखुशीत होत नाहीत असा माझा अनुभव आहे.
चकलीताय योग्य ते कारण सांगतीलच. (काप का काप, पानी का पानी हो जायेगा)

चतुरंग's picture

12 Mar 2009 - 1:53 am | चतुरंग

हे बरोबर आहे. कारण वांग्याचे काप खुसखुशीत होण्यासाठी त्यातले जास्तीचं पाणी उडून जायला हवं.
काप त्यांच्या अंगच्या ओलसरपणानेच पिठात घोळवले की थोडे कोरडे होणार आणि पुढे तेलावर परतले की अगदी खुसखुशीत होणार!

चतुरंग

चकली's picture

13 Mar 2009 - 10:02 am | चकली

मला जे सांगायचे होते ते तुम्ही अगदी बरोबर समजावलेत!

चकली
होळी स्पेशल -पुरणपोळी

चकली's picture

13 Mar 2009 - 9:59 am | चकली

>>पिठात अजिबात पाणी घालू नये, हे काही झेपले नाही.

वांग्याचे काप करताना पाणी घातले तर काप खुसखुशीत होत नाहीत.

>>मी पाणी घालून पण काप करून पाहिलेत. फक्त भज्यांपेक्षा जरा घट्ट पीठ भिजवावे लागते.

मी पण करून पाहिले. बिन पाण्याचे मला जास्त पसंत पडले.

>>आणि तुम्ही लिहिलेली धनेपूड नि अजून काय काय कशासाठी? नुसत्या डाळीच्या पिठापेक्षा हे छान होतात का?

हो.

चकली
http://chakali.blogspot.com

किट्टु's picture

13 Mar 2009 - 3:54 pm | किट्टु

>>>मी पण करून पाहिले. बिन पाण्याचे मला जास्त पसंत पडले.

अगदी बरोबर... बिन पाण्याचेच छान लागतात...मी पण दोन्ही करुन पाहीले...

पाण्याचे केले की ते एकदम वांग्याचे भजी वाटतात...

परिकथेतील राजकुमार's picture

12 Mar 2009 - 1:10 pm | परिकथेतील राजकुमार

सौजन्य := गुगलोबा

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

किट्टु's picture

12 Mar 2009 - 2:22 pm | किट्टु

काल मी 'वांगी काप' केले होते , आणि मस्त पण झाले होते.सर्वांना आवड्ले.

फक्त फोटो काढायचा तेवढा राहिला. :(

आपला अभिजित's picture

11 Mar 2009 - 10:16 pm | आपला अभिजित

१. आधी बाजारातून किंवा शक्यतो शेजार्‍याकडून वांगी आणावीत.

२. ती स्वच्छ धुवून घ्यावीत.

३. एक विळी/सुरी/चाकू/करवत/हेक्सॉ/तलवार/दाढीचे ब्लेड घ्यावे. (हे सुद्धा शेजार्‍याकडून आणलेले चालेल. मात्र दाढीचे ब्लेड असल्यास, ते शक्यतो वापरलेले नसावे!)

४. वरील आयुधे (किमान एक) वापरून वांग्याचे काप करून घ्यावेत.

झाले वांग्याचे काप!!!!!!

(टीप : मिपा वरील अवांतर प्रतिक्रियांच्या प्रथेला पूज्य मानून, केवळ ती परंपरा जपण्यासाठी ही प्रतिक्रिया टाकली आहे.
कळावे, लोभ असावा, राग नसावा.)

लिखाळ's picture

11 Mar 2009 - 10:20 pm | लिखाळ

:)

(टीप : मिपा वरील अवांतर प्रतिक्रियांतील विनोदाची वाहवा करण्याच्या प्रथेला पूज्य मानून, केवळ ती परंपरा जपण्यासाठी ही प्रतिक्रिया टाकली आहे.
कळावे, लोभ असावा, राग नसावा.)
(अजून एक टीप : वरील प्रतिक्रियेतील प्रत्येक वाक्य वेगळे डकवून खाली लोळतहसण्याची मुद्रा आहे असे मानावे. तरच अवांतर प्रतिक्रियांतील विनोदाची वाहवा करण्यार्‍या प्रतिसादाला शोभा आहे असे म्हणतात.)
-- लिखाळ.

अवलिया's picture

11 Mar 2009 - 10:24 pm | अवलिया

मिपावर तिरके प्रतिसाद चांगले दिसतात म्हणुन टाकला आहे. राग आला असेल वा नसेल तरी तिरकीच प्रतिक्रिया द्या :)

--अवलिया

किट्टु's picture

11 Mar 2009 - 11:07 pm | किट्टु

सर्वांचे मी आभार मानते, मुख्यकरुन चकलीताई आणि आपला अभिजीत चे.

>>(टीप : मिपा वरील अवांतर प्रतिक्रियांतील विनोदाची वाहवा करण्याच्या प्रथेला पूज्य मानून, केवळ ती परंपरा जपण्यासाठी ही प्रतिक्रिया टाकली आहे.
कळावे, लोभ असावा, राग नसावा.)
राग नाही आला. फक्त पहिली प्रतिक्रिया थोडी तिरकी वाट्ली म्हणुन अशीच प्रतिक्रिया दिली.

नरेश_'s picture

12 Mar 2009 - 9:37 am | नरेश_

आमची मेली चालच तिरपी.
पण एक सांगू का, पाककृतीच्या दालनात पाककृतीच शोभून दिसते, नाही का ?
काही हवं नको ते आपण अवांतर म्हणून विचारु शकतोच की.

>>>>राग नाही आला. फक्त पहिली प्रतिक्रिया थोडी तिरकी वाट्ली म्हणुन अशीच प्रतिक्रिया दिली.

तुम्ही खिलाडूपणे घेतल्याचे पाहून आनंद वाटला :-)

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

किट्टु's picture

12 Mar 2009 - 2:29 pm | किट्टु

नरेश,
पाककृतीच्या दालनात पाककृतीच शोभून दिसते, अगदी बरोबर बोललात...
राग नसावा... :)

वेडू's picture

13 Mar 2009 - 4:03 pm | वेडू

ओवन मधुन बेकरी पाव कसे बनवतात पाक् कुति पाहिजे