मा. सरपंच महोदय श्री. तात्याबा यांच्या कल्पनेतील पहिले जागतीक मिसळपाव संमेलन होणार होणार म्हणता पुढे ढकलले गेले.मिसळपावचे गावकरी जगभर विखुरले गेले आहेत. पुण्यात होणार्या या संमेलनाकरिता बर्याच गावकर्यांना वेळेअभावी उपस्थीत राहता येणार नाही,हे उघड आहे. अशावेळी मिसळपावच्या प्रतिभावान ग्रामस्थांकरिता एखादे ऑनलाईन साहित्य संमेलन भरावे अशी कल्पना आमच्या डोक्यात आली. या संमेलनादरम्यान साहित्यस्पर्धा आयोजीत करता येईल व या साहित्याचे परीक्षण करण्याकरिता मिपाच्या दिग्गजांची परीक्षक म्हणून मदत होईल. पुरस्कार म्हणून मिपाची प्रमाणपत्रे(हि सुद्धा ऑनलाईन) देता येतील. सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्यासारख्यांना या स्पर्धेतून बरेच काही वाचता आणि शिकता येईल.
या संमेलनाचे स्वरुप असे असेल( उदाहरणार्थ)
१)एखादा आठवडा साहित्य संमेलन म्हणून जाहिर करावा.
२)या आठवड्यात प्रसिद्ध होणारे सर्व साहित्य स्पर्धेत समाविष्ट करण्यात यावे.
३)प्रत्येक विभागाकरीता स्वतंत्र स्पर्धा असावी(लेख,कविता,विडंबन,चारोळ्या वगैरे)
४)दिग्गज ग्रामस्थांकडून या साहित्याचे परीक्षण करुन त्यानुसार त्यांना गुण देण्यात यावेत.
५)विजेत्या स्पर्धकाला ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात यावी.
वरील नियम केवळ उदाहरणादाखल देण्यात आले आहेत. इतर ग्रामस्थांनी आपापले विचार मांडावे(आपटू नये).
ही कल्पना अद्याप सरपंचांना कळविण्यात आलेली नाही. त्यांचे मत जाणून घेण्यास उत्सूक आहोत.
-इनोबा मिसळे
(काळजीवाहू) व्यवस्थापक
जागतीक मिसळपाव साहित्य संमेलन
प्रतिक्रिया
24 Jan 2008 - 9:16 pm | स्वाती राजेश
कल्पना एकदम मस्त आहे.
भारताबाहेरील सदस्य सुद्धा सहभागी होतील.
24 Jan 2008 - 9:28 pm | ऋषिकेश
हे फार आवडलं.. सहमत आहे.
फक्त एक सुचना क्र.४ बद्दल
४)दिग्गज ग्रामस्थांकडून या साहित्याचे परीक्षण करुन त्यानुसार त्यांना गुण देण्यात यावेत.
या ऐवजी मते नाहि का घेता येणार. परिक्षक फक्त प्रत्यक गटात ५ नॉमिनेशन्स घोषित करतील व त्यातील विजेते मात्र सगळे गावकरी मिळून ठरवतील.
आणि हे संमेलन आठवडाभर चालून त्याची सांगता पुण्याला होणार्या प्रत्यक्ष संमेलनात करता येईल. काय म्हणजे जे भेटु शकतात ते भेटतीलच पण आमच्या सारख्या दूरस्थ गावकर्यांनाही सहभागी होता येईल
-ऋषिकेश
25 Jan 2008 - 12:28 am | इनोबा म्हणे
तुमच्या सुचनांबद्दल धन्यवाद!
या ऐवजी मते नाहि का घेता येणार
मते घेण्याची कल्पना चांगली आहे,पण मते घेण्यात एक अडचण आहे;बरेचसे सदस्य एकावेळी अनेक सदस्यनामांचा उपयोग करतात. काही सदस्य आपल्या साहित्याला प्रथम क्रमांक मिळवण्याकरिता बनावट मतांचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी गुणी साहित्यीकालाच त्याचा फायदा मिळावा यासाठी परीक्षकांचा मुद्दा मी उपस्थीत केला होता.
हे संमेलन आठवडाभर चालून त्याची सांगता पुण्याला होणार्या प्रत्यक्ष संमेलनात करता येईल
ही कल्पना छान आहे.
(उत्सूक) -इनोबा
24 Jan 2008 - 9:42 pm | सुनील
समहत आहे!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
24 Jan 2008 - 10:08 pm | विसोबा खेचर
अनिवसे साहेबांची कल्पना खरोखरंच चांगली आहे. इच्छुकांनी या बाबतीत काय ते धोरण ठरवून संबंधित योजना जाहीर करावी असे वाटते!
अवांतर -
आम्ही काही व्यक्तिगत कारणांमुळे संबंधित साहित्यस्पर्धेत भाग घेऊ इच्छित नाही, तसेच आमच्या नांवाचा या स्पर्धेकरता कधीही विचार होऊ नये अशी संबंधितांना आमची विनम्र विनंती आहे.
आमचे साहित्य हे नेहमी 'नंबर वन'च असते असे आम्ही मानतो तसेच ते कसे आहे, चांगलं आहे, की बरे आहे, की वाईट आहे, स्पर्धेसंदर्भात इतरांच्या तुलनेत ते कसे आहे हे ठरवण्याचा भाईकाका आणि कुसुमाग्रज यांच्याव्यतिरिक्त कुणालाही अधिकार नाही असे आम्ही मानतो!
कळावे,
आपला,
(अत्यंत मुजोर!) तात्या अभ्यंकर.
25 Jan 2008 - 12:38 am | इनोबा म्हणे
तात्याबा,तुम्ही एक साहित्यीक म्हणून या संमेलनात भाग घेऊ शकत नसलात तरी आमच्या दिग्गजांपैकी एक असल्याने आपण या संमेलनात परीक्षक म्हणून काम पहावे, अशी आमची नम्र विनंती!
इच्छुकांनी या बाबतीत काय ते धोरण ठरवून संबंधित योजना जाहीर करावी असे वाटते!
योजना जाहीर करणारे आम्ही कोण? इथे व्यक्त झालेल्या मतांचा आदर ठेवून आपणच काय ती योजना जाहीर करावी.
(नम्र) -इनोबा
25 Jan 2008 - 12:49 am | चतुरंग
भाईकाका आणि कुसुमाग्रज यांना 'भेटल्याखेरीज' तुमचं साहित्यिक मोल आम्हाला समजणार नाही तर.
असो, आपली 'तिकडे' गाठ पडल्यावर आम्ही ते समजून घेऊ!!
चतुरंग
24 Jan 2008 - 11:52 pm | प्राजु
पण उत्तम साहीत्य कोणते .. किंवा बक्षीस ... इ. गोष्टी नसतील तरी चालतील.. एक आठवड्याच्या या सम्मेलनात.. वेगवेगळ्या विषयांवर इ-परिसंवाद, किंवा विनोदी काव्य , एकाच विषयावर कविता लिहिणे... अशा गोष्टी करू शकतो..
विचार करून बघू.
- प्राजु
25 Jan 2008 - 12:56 am | इनोबा म्हणे
कल्पना चांगली! पण नव्या साहित्यीकांना प्रोत्साहन मिळावे हा या योजनेमागचा हेतू आहे.
तसे तर परिसंवाद,गप्पा टप्पा ह्या होणारच आहेत.
(धोरणी) -इनोबा
25 Jan 2008 - 12:33 am | वरदा
मस्तं कल्पना..
25 Jan 2008 - 9:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विनायकराव,
ऑनलाइन साहित्य संमेलनाची कल्पना फारच उत्तम आहे. आम्हीही त्यात सहभागी होऊ !!!
आमचे याबाबत मत असे-
कविता स्पर्धा दि. ते दि.
चोरोळी / आरोळी -//-
कथा स्पर्धा ( शब्द मर्यादा ) -//-
विडंबन - //-
एकांकिका ( अगदी लहाण ) -//-
विनोदी लेखन -//-
वादविवाद / परिसंवाद -//-
शेला पागोटे -//-
आणखी काही (सुचवा )
१)समजा कविता स्पर्धा सुरु झाली तर त्यात मत व्यक्त करता येणार नाही ( प्रतिसाद देऊ नये ) लगेच दुसरी कविता त्यापाठोपाठ आली पाहिजे. ( कविता स्पर्धा -साहित्य संमेलन त्याचा असा उल्लेख करावा )
२) इथे काही परिक्षक निवडू ,त्यांनी त्याचे परिक्षण करावे !!! किंवा लेखनावर मिसळप्रेमींच्या प्रतिक्रिया व्य. नि. ने घ्याव्यात.
३) अजून काही सुचले तर टाकतो इथे :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
25 Jan 2008 - 10:40 am | इनोबा म्हणे
अगदी बरोबर....
२) इथे काही परिक्षक निवडू ,त्यांनी त्याचे परिक्षण करावे !!! किंवा लेखनावर मिसळप्रेमींच्या प्रतिक्रिया व्य. नि. ने घ्याव्यात.
हे बरे होईल,परिक्षकांकडेच व्य. नि. पाठवावे लागतील ना. आणखी काही कल्पना असल्यास सुचवा.
25 Jan 2008 - 10:33 am | दीपा॑जली
छान आहे कल्पना .
वेगवेगळे लेख्,कविता,चारोळ्या,विड॑बन वाचायला मजा येईल.
25 Jan 2008 - 12:24 pm | झकासराव
काय सुपिक डोके आहे विनायका तुझ :)
चला अजुन सुपिक डोक्याच्या मालकानी त्यात भर घाला बघु.
25 Jan 2008 - 12:46 pm | मनीष पाठक
२) या आठवड्यात प्रसिद्ध होणारे सर्व साहित्य स्पर्धेत समाविष्ट करण्यात यावे.
या ऐवजी आतापर्यंतचे सर्व साहित्य यात समाविष्ट करावे. कारण त्यातही खुपसे दर्जेदार साहीत्य आहे व ते वगळले जाउ नये असे वाटते.
(वाचक) मनीष पाठक
25 Jan 2008 - 1:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता नवीन सुरुवात.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
25 Jan 2008 - 1:46 pm | प्रमोद देव
मी लिहितो त्याला "साहित्य" म्हणतात असे मला मुळीच वाटत नाही.त्यामुळे मी ह्यात भाग घेणार नाही.
तेव्हा पुलं म्हणतात, "नट म्हणून अपयशी ठरला तर अभिनय कसा करावा हे इतरांना शिकवावे अथवा स्वतः लेखक म्हणून काही प्रभाव पाडता आले नाही की संपादक बनावे!" च्या चालीवर म्हणतो की हवे तर परीक्षक म्हणून राहीन. कारण त्यासाठी काही विशेष पात्रता लागते असे वाटत नाही. स्वतःला ज्येष्ठ म्हणवून घेतले की झाले. त्यातून मी इथल्या सदस्यांच्या सरासरी वयापेक्षा बराच(वयाने हो) मोठा आहे म्हणजेच ज्येष्ठ आहे हे सिद्ध करू शकतो. तेवढीच कॉलर टाईट! :D
काय मंडली मंग कंदी करताय सुर्वात? आपुण तैय्यार हाय!
प्रमोदकाका
स्वघोषित संपादक
25 Jan 2008 - 7:52 pm | स्वाती राजेश
वरील स्पर्धेमध्ये पाककले चा सुद्धा विचार करावा जेणेकरून भगिनींबरोबर पुरुषांना देखील यामध्ये भाग घेता येइल.
असे पदार्थ सांगावेत कि ते सुद्धा या स्पर्धेत भाग घेतील.
27 Jan 2008 - 5:07 pm | सुधीर कांदळकर
प्रकार तोंडी लावायला असूंद्यात की.
28 Jan 2008 - 8:21 am | अघळ पघळ
कल्पना छान आहे. आम्ही आस्वादरुपी सहभाग घ्यायला आहोतच. तारीख पक्की झाली का संमेलनाची?
सुचवणी: सदर संमेलनातल्या लेखक लेखिकांची विजेतेपदासाठी समस पाठवून निवड करावी. ज्याला सर्वात जास्त समस तो विजेता!! काय सरपंच कशी वाटली कल्पना?? :)