कोंबडी रस्सा

लवंगी's picture
लवंगी in पाककृती
8 Mar 2009 - 9:23 am

नमस्कार मंडळी. आजचा बेत कोंबडी रस्सा.

साहित्य : १ किलो कोंबडी
२ बारीक चीरलेले टोमॅटो
१ बारीक चीरलेला कांदा
१ लसूण - २" आल यांची पेस्ट
२ चमचे लाल तिखट
१ चमचा हळद
बारीक चीरलेली कोथींबिर

कोंबडीला आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, मीठ लावून २ तास ठेवावे. जास्त तिखट आवडत असल्यास ३-४ हिरव्या मिरच्या उभ्या चीरून यात मुरवताना टाकाव्या.

वाटणाचा मसाला - ५ लाल मिरच्या
१ चमचा जीरे
१ चमचा धणे
१/२ वाटी खोबरे
४ लवंगा
२० काळीमिरि
१ मसाला वेलची
३ वेलची
१/४ जायफळ
२ कांदे उभे चीरलेले
१ चमचा खसखस

तेलावर वरील खडा मसाला, कांदा, खोबरे भाजुन वाटण बारीक वाटून घ्यावे.

भांड्यात तेल गरम करुन बारीक चीरलेला कांदा - टोमॅटो चांगले बारीक होईतो परतुन घ्यावे. मुरवलेले चिकन त्यात टाकून परतावे. वर झाकण ठेवून बारीक आचेवर एक वाफ काढावी. चीकनमध्ये वाटण टाकावे. थोडे रस्स्शापुरता पाणी घालावे. वर झाकण ठेवून चांगले शीजवावे.

वरून बारीक चीरलेली कोथींबीर घालून सर्व करावे. तयार आहे कोंबडीचा रस्सा.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

8 Mar 2009 - 9:25 am | अवलिया

रविवार सकाळ मिपावर आलो, सार्थक झाले.

मस्तच :)

--अवलिया

अडाणि's picture

8 Mar 2009 - 11:00 am | अडाणि

ती कापलेली कोंबडीपण धन्य झाली...

अफाट जगातील एक अडाणि.

लवंगी's picture

8 Mar 2009 - 6:36 pm | लवंगी

अश्या प्रतिक्रीया वाचुन मी पण धन्य झाले.

विसोबा खेचर's picture

8 Mar 2009 - 9:26 am | विसोबा खेचर

काय बोलू? काय लिहू?!

तात्या.

लवंगी's picture

8 Mar 2009 - 6:33 pm | लवंगी

धन्यवाद तात्या

दोन वाटी रस्सा पाठवुन द्या इकडे.
वेताळ

दोन वाटी रस्सा पाठवुन द्या इकडे.
वेताळ

दोन वाटी रस्सा पाठवुन द्या इकडे.
वेताळ

सहा वाट्या रस्सा + फोडी पाठवुन द्या इकडे.
पुन्हा पुन्हा नको मागायला ;-) ....संकोचायला होतं.

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

आणी हे पुणेरी आमंत्रण नाही.

नरेश_'s picture

8 Mar 2009 - 6:46 pm | नरेश_

_/\_
धन्यवाद ताई.

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

गणपा's picture

8 Mar 2009 - 1:27 pm | गणपा

==+
=P~ ||
\~~/

सहज's picture

8 Mar 2009 - 1:29 pm | सहज

आवडेश आवडेश!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Mar 2009 - 1:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नॉनव्हेजच्या रेसेपी अजून येऊ द्या...

स्वाती२'s picture

8 Mar 2009 - 6:33 pm | स्वाती२

आईगं! फोटो पाहून खल्लास. बाऊल मधलं ओटमिल आता घशाखाली उतरणे अशक्य.

प्राजु's picture

8 Mar 2009 - 9:18 pm | प्राजु

बेक्कार!!! सकाळी सकाळी अशी रेशिपी पाहून बेक्कार वाट लागली...!
फोटो जीवघेणा आहे...
मस्त रेसिपी.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुक्या's picture

9 Mar 2009 - 1:33 am | सुक्या

=P~ काय ती रेसिपी . . वाट लागली फोटो पाहुन.
कोंबडी रस्सा . . आमचा आत्मा शांत झाला .. त्या कोंबडीच्या आत्म्यालाही शांती लागलीच असेल . .

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला (आन चिकन खायला =P~) आम्ही केव्हाही तयार असतो.

प्रतिक्रियां बद्दल सर्वांचे आभार