उपवासाचा बेत!

मिना भास्कर's picture
मिना भास्कर in पाककृती
7 Mar 2009 - 8:46 pm

वरइचा भात :)
१ वाटी वरईचे तांदूळ,
३ ते ४ हिरव्या मिरच्या,
जिरे,
मीठ चवी पुरते,
फोडणी साठी तुप
प्रथम वरईचे तांदूळ निवडून , धुवून घ्या. एका पातेल्यात २ ते ३ चमचे तुप टाका, गरम झाल्या वर जिरे, हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाका. नंतर धुतलेले वरईचे तांदूळ टाकून छान परतून घ्या. दोन वाट्या पाणी टाका. चवी नुसार मीठ घाला. भात शिजत आला म्हणजे झाकण टाका, गॅस बंद करा. वाफेवर भात मुरू द्यात.

शेंगदाण्याची आमटी:
१ वाटी खंमग भाजून सोललेले शेंगदाणे, (दाणे करपू देवू नये.)
४ ते ५ हिरव्या मिरच्या,
जिरे, मीठ चवी पुरते,
फोडणी साठी तुप
शेंगदाणे मिक्सर वर बारीक वाटून घ्या. वाटून होत आले की, त्यात थोडे थोडे करून दोन वाट्या पाणी घाला. (आमची आजी पाट्यावर हे दाणे वाटायची, त्याची चव मिक्सर मधे वाटलेल्या दाण्यांना येत नाही, पण आता काळा नुसार बदलायला हवे, आणि इथे परदेशात कुठुण आणायचा पाटा वरवंटा?)
आता एका पातेल्यात २ ते ३ चमचे तुप टाका, गरम झाल्या वर जिरे, हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाका. मग हे दाण्याचे पाणी ओता. मीठ घाला. छान उकळी आली की गॅस बारीक करा. ५ ते ७ मि. नी गॅस बंद करा, आणि गरम गरम भात आमटीचा स्वाद घ्या. <:P

(आवडीनुसार कोथींबीर टाकली तर उत्तमच. काही ठिकाणी उपवासाला कोंथीबीर वापरत नाही , म्हणून इथे लिहीली नाही.)

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

7 Mar 2009 - 10:41 pm | अविनाशकुलकर्णी

उपासाचा बेत..कि उपवासाचा बेत???????