मद्त

श्रेया's picture
श्रेया in काथ्याकूट
6 Mar 2009 - 2:16 pm
गाभा: 

वाढदिवसा साठी भेट म्हणुन उपयुक्त अशा कोणत्या वस्तु देता येतील माहिती असल्यास सुचवा

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

6 Mar 2009 - 2:19 pm | विनायक प्रभू

ज्याचा वाढदिवस आहे त्याचे वय काय? स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी हे नको का कळायला. हो नाहीतर घोटाळा होइल.

विनायक पाचलग's picture

6 Mar 2009 - 2:22 pm | विनायक पाचलग

जर ती व्यक्ती नेट वापरत असेल
तर इ मेल मधुन तीला मिसळ्पावची लिंक द्यावी
उत्तम आवडणारा बिनखर्चीक उपाय
आपला
विनायक

छानसे वाचलेले

विनायक पाचलग

पक्या's picture

6 Mar 2009 - 2:35 pm | पक्या

मिसळपावची लिंक ; मस्त रे विनायका.

श्रेया's picture

6 Mar 2009 - 3:18 pm | श्रेया

१.आई
२.वडिल
३.भाउ
४. बहिण
५. मित्रांसाठी

वय १५ च्यावर

विंजिनेर's picture

6 Mar 2009 - 3:30 pm | विंजिनेर

१.आई
२.वडिल
३.भाउ
४. बहिण
५. मित्रांसाठ

या सगळ्यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे भलताच योगायोग आहे हो :)
असो, माझ्यातर्फे सगळ्यांना शुभेच्छा!
(बाकी भेटवस्तू तर तुम्ही पाठवालच की ;) नि.ह.घे)

केवळ_विशेष's picture

6 Mar 2009 - 2:22 pm | केवळ_विशेष

वाढदिवस?

किती वय? रिलेशन काय आहे...

ज्या कोणाचा आहे त्या व्यक्तीस "वाढदिवसाच्या शुभेच्छा" मिपा स्टाईलनी :)

अवलिया's picture

6 Mar 2009 - 2:38 pm | अवलिया

फक्त दहा मिनिटे केवळ त्या व्यक्तीसाठी, जगाशी सगळे संपर्क तेवढ्या काळासाठी तोडुन... बास!!!
बाकी काही भौतिक वस्तु दिली काय नाही दिली काय.. काही फरक नाही.

--अवलिया

दशानन's picture

6 Mar 2009 - 2:40 pm | दशानन

१००% सहमत.

हेच म्हणतो आहे.

केवळ_विशेष's picture

6 Mar 2009 - 2:52 pm | केवळ_विशेष

१ लंबर सोलूचन आहे... मान गये!

पाषाणभेद's picture

6 Mar 2009 - 3:19 pm | पाषाणभेद

आपण तर १० मिन्टांपेक्शा जास्त मिंन्टे देउ बाबा.
पाषाणभेद

दिपक's picture

6 Mar 2009 - 3:29 pm | दिपक

ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या आवडीनुसार वस्तु ठरावावी लागेल.. देताना सरप्राईज करुन द्या म्हणजे त्याला/तिला खुप आनंद होईल आणी कायमचे आठवणीत पण राहिल.. :)

चिरोटा's picture

6 Mar 2009 - 3:32 pm | चिरोटा

टिकतिल(आणि परवडतिल) अश्या वस्तु-
१)कन्गवा
२)व्यक्ति पुरुष अस्ल्यास्-घरी घालाय्चि चड्डि (बर्म्युडा) ,स्त्री अस्ल्यास-गाउन
३)छोटा २/३ भान्ड्यान्चा सेट
भेन्डि-४००००२

अमित काकडे's picture

7 Mar 2009 - 1:10 pm | अमित काकडे

मित्रांनो,

किती सुंदर प्रकारे तुम्ही विचार करू शकता..

सगळ्यांचे हे विचार जर वाढदिवस असणारया त्या व्यक्तिला कळले तर हि सुद्धा एक छान भेटच होइल त्यांच्यासाठी.

काय म्हणता...

धमाल मुलगा's picture

7 Mar 2009 - 1:33 pm | धमाल मुलगा

बेश्ट ऑप्शन आहे हा!

वयोगटाप्रमाणे पुस्तकांची निवड बदलायची. बस्स..एकदम सोप्पं आहे की नाही? :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::