मायावति फॉर्म्युला

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
6 Mar 2009 - 2:04 pm
गाभा: 

उत्तरप्रदेशात यशस्वी ठरलेला सोशल इंजिनि‌अरींगचा फॉर्म्युला महाराष्ट्रातही लागू करत बहुजन समाज पक्षाने राज्यात चार ब्राह्मणांना उमेदवारी दिली आहे.
आपणास महाराष्ट्रात हा फॉर्म्युला यशस्वि होइल असे वाटते का?..बुध्धिमत्ता आहे पण जातिच पाठबळ नाहि..असा हा समाज पुन्हा या फॉर्म्युला द्वारे राजकारणात प्रभाव पाडु शकेल का?

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

6 Mar 2009 - 2:28 pm | छोटा डॉन

अविनाशजी, राग नका मानु ...
आपल्याला मी काही प्रश्न विचारु इच्छितो ...

१. आपल्याला "सोशल इंजिनीयरिंग" ह्या फॉर्म्युलाबद्दल किती माहिती आहे ?
२. तो उ.प्र.मध्ये यशस्वी ठरला म्हणजे नक्की काय झाले ? किती उमेदवार निवडुन आले अथवा मतांच्या टक्केवारीत किती वाढ झाली ह्याचा आपल्याला अंदाज आहे का ?
३. महाराष्ट्राच्या राजकारणाचा व मतदारांच्या मानसिकतेचा आपला किती अभ्यास आहे ?
४. ह्या निमीत्ताने प्राबल्य असलेल्या मतदारसंघात ( उदा :पुणे, नाशिक वगैरे ) ब्राम्हण उमेदवार उभे केले म्हणजे त्यांना बरीच ब्राम्हण मते मिळतील असा विश्वास आपल्याला आहे का ?
५. निवडणुका कुठल्या मुद्द्यांवर लढवल्या जातात व ऐनवेळी मतदान कुठल्या मुद्द्याच्या आधारे होते ह्याबाबर आपला अभ्यास काय सांगतो ?

तुर्तास इतकेच.

कोणताही काथ्याकुट सुरु करताना प्रथम लेखकाने आपली मौलीक मते मांडावीत असा सर्वसाधारण प्रघात आहे. आपण नुसती चर्चा छेडल्याने मला आपली मते नक्की काय आहेत व आपला काय अभ्यास अथवा इंटरेस्ट आहे हे जाणुन घेऊ वाटले.
आपण ह्या प्रश्नांची उत्तरे दिल्यास माझ्या बहुसंख्य अपेक्षा पुर्ण होतील ..
त्या निमीत्ताने एक "सकस ओळख" असलेल्या चर्चेला सुरवात होईल ...
सध्या आपण जे वर लिहले आहे ते योग्य नाही , आधी थोडे विस्ताराने आपले म्हणणे मांडा व मग लोकांचा कौल विचारा ना ?
लोकांना जेव्हा काही समजेल तेव्हाच लोक आपले मत मांडतील ना ???

मी आपल्याला आश्वासन देतो की आपण माझ्या अपेक्षा पुर्ण केल्या तर मी आपल्या सर्व शंकांचे निरसन करणारा एक "विस्तॄत आणि सविस्तर" प्रतिसाद टाकेन की ज्यात सर्व बाजु व्यवस्थीत कव्हर होतील ...
मी आपल्या प्रतिसादाची वाट पहात आहे ...

------
( सुस्पष्ट आणि सविस्तर )छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

मृगनयनी's picture

6 Mar 2009 - 3:07 pm | मृगनयनी

माननीय "डी. एस. के." राजकारणात येणार... हे बर्‍याच दिवसापासून ऐकुन होते.... पण "ब.स.प." तर्फे उमेदवारी स्वीकारतील... असे स्वप्नातही वाटले नाही! :(

असो....

हाथी नही गणेश है! ब्रह्मा विष्णु महेश है| ___/\___

अवधूत चिन्तन श्री गुरुदेव दत्त! :)

तीच गोष्ट नाशिकच्या "काळाराम मन्दिराच्या" पुजार्‍यांची..
आणि ... रत्नागिरीच्या परुळेकरांची!!!

(अर्थात "कलियुगा"त हे असंच घडत राहणार आहे, असें "पवित्र मनुस्मृती" मध्ये काही हजार वर्षांपूर्वीच लिहून ठेवलेले आहे....... आणि आता त्याची सत्यता ही पटू लागलेली आहे.)
----------------------------

मायावती बाईंनी चाल तर खूप छान खेळली आहे. महाराष्ट्रात राहून "आठवले-गटाला" जे जमलं नाही... ते माया' बै नी... करुन दाखवलं.

अर्थात.. या सगळ्यामागे मायावतीचे खासगी सचिव "सतीशचंद्र मिश्रा" यान्चा सिंहाचा वाटा आहे!

लेट सी.... व्हॉट कॅन हॅपन ? :-?
___

राज ठाकरेंची पंखी,

मृगनयनी.

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

श्रावण मोडक's picture

6 Mar 2009 - 4:40 pm | श्रावण मोडक

थोडी माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे.
२. तो उ.प्र.मध्ये यशस्वी ठरला म्हणजे नक्की काय झाले ? किती उमेदवार निवडुन आले अथवा मतांच्या टक्केवारीत किती वाढ झाली ह्याचा आपल्याला अंदाज आहे का ?
हा तुमचा प्रश्न. यापैकी किती उमेदवार निवडून आले यासोबतच किती जणांना उमेदवारी दिली याविषयीची माहिती -
मायावतींनी २००७ च्या मे महिन्यात झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत ठाकूर, बनीया आणि ब्राह्मण जातीच्या १३९ जणांना उमेदवारी दिली होती. त्यात ८४ ब्राह्मण होते. त्यातून १९ ठाकूर आणि ३४ ब्राह्मण निवडून आले आहेत. या माहितीचा स्रोत असणारी पीटीआय ही वृत्तसंस्था विश्वासार्ह आहे. पण ही आकडेवारी निकालाच्या दुसऱ्याच दिवशीची आहे. त्यामुळे अधिक-उणे ३ असे गृहीत धरणे सोयीचे.

चिरोटा's picture

6 Mar 2009 - 3:00 pm | चिरोटा

भारतिय राजकारणाला जातिचा शाप तसा आधिपासुन आहेच. कुठलाहि पक्ष कितिही दावे करत असला तरी तिकिट देताना जातिचा विचार करतोच.निवडुन येणारा कोणिहि असो, जात्,धर्म ह्यान्च्या पलिकडे जावुन तो किती लोकभिमुख कामे करतो हे महत्वाचे.
आता लोकाभिमुख कामे प्रत्येकवेळी काय्द्याच्यात बसतिलच असे नाही.ही कामे करताना तो सरकारी अधिकारी लोकाना कसे 'साम्भाळुन' घेतो, मदत मागायाला आलेल्या लोकाना तो कसे 'पटवतो' हे ही महत्वाचे.
प्रा.मधु दन्डवते(ब्राम्हण) कोकणातुन ५ वेळा निवडुन आले. राष्त्रिय आणि आन्तर-राष्त्रिय पातळिवर त्यान्चि ख्याति 'अभ्यासु आणि बुध्धिमान खास्दार' अशी होति.कोकणात मात्र 'काम न करणारा माणुस्/कायद्यावर बोट ठेवणारा माणुस' अशी त्यान्ची प्रतिमा होति. पर्यायाने कोकण रेल्वे सारखा महाकाय प्रकल्प पुर्णत्वास नेवुनपण ते दोनदा हरले आणि त्यानि ज्या पक्षात भरिव काम केले त्या पक्षानेपण त्याना बाजुला सारले.
महाराशट्रातिल ब्राम्हण समाज विखुरला गेला आहे.इतर काहि जातिन्प्रमाणे तो एकसन्घ नाहि. तेव्हा ब्राम्हण जातिचे राज्क्लारण मायवति करु बघतिल तर अपयश पदरात पडेल.

निखिलराव's picture

6 Mar 2009 - 3:02 pm | निखिलराव

पुण्यात डी. एस. के फक्त मतं खाणार.... लिहुन ठेवा .

आपला......
" जय हो "

ढ's picture

6 Mar 2009 - 3:37 pm |

कुणाची???

निखिलराव's picture

7 Mar 2009 - 12:34 pm | निखिलराव

प्रिय "ढ"
तुमच नाव खरचं छान आहे.
अभिनंदन.............

ढ's picture

7 Mar 2009 - 12:49 pm |

धन्यवाद!!!

डी.एस्.के. ब्राह्मण समाजाचे असल्याने भाजप शिवसेनेची मतं खाणार का
बसपा तर्फे उभे असल्याने काँग्रेस /राष्ट्रवादी/रिपब्लिकन यांची मतं खाणार ?

आपण लिहून ठेवा म्हटल्याने यासंदर्भात काही विवेचन अपेक्षित होते.

असो.

चिरोटा's picture

6 Mar 2009 - 5:15 pm | चिरोटा

जो उमेद्वार हरेल तो डि.एस्.के. च्या नावाने बोटे मोडेल असे निखिल् रावाना म्हणायचे आहे असे दिसते.थोड्क्यात डि.एस्.के. सम्भाव्य विजयि आणि पराभवि उमेद्वारान्चि काही मते खेचणार असे सुचवायचे दिसते.

शैलेन्द्र's picture

6 Mar 2009 - 6:04 pm | शैलेन्द्र

ब स पाचे तंत्र-

  1. आज पडायचे
    • ऊद्या पाडायचे
      • परवा लढायचे
        1. तेरवा गाडायचे

महाराष्ट्रात ब स पाचा "ऊद्या" चालु आहे... परवा ऊजाडतो का ते बघु...

अविनाशकुलकर्णी's picture

6 Mar 2009 - 7:09 pm | अविनाशकुलकर्णी

डॉन ..यु.पी मधे ब्राहम्ण १४ टक्के आहेत.दलित+ब्राहम्ण +ठाकुर असा फार्मुला यु. पीत चालला..महाराष्ट्रात हा प्रयोग प्रथमच होत आहे..त्या मुळे ब~याच अभ्यासकांना सुध्धा काय होइल हा अंदाज बांधता येत नाहि..महाराष्ट्र हा पुरोगामी वगैरे असला तरी निवडणुका जातिच्या आधारावर लढल्या जात आहेत. हे नक्कि...त्या पार्श्व भुमीवर हा विचार महाराश्ट्राला नवा आहे..व हा प्रयोग हि नवा आहे..त्य मुळे हा काथ्या कुट आहे..

चिरोटा's picture

6 Mar 2009 - 7:54 pm | चिरोटा

अविनाश ,मला हा फार्मुला अजुनपण कळत नाहि आहे.ब्.स्.पा.ला नक्कि काय साधायचे आहे? ठिक आहे, ब्राम्हण उमेद्वार उभे केले परन्तु त्या मतदार्सन्घात बहुजन समाजाचि सन्ख्या खुप आहे का?रत्नागिरिचेच उदाहरण घ्यायचे तर तिथुन ब्राम्हण उमेद्वार निवडुन आले आहेत (१९७७-१९८०). मला ब्.स.पा. /उत्तर प्रदेशच्या राज्कारणाविषयि खुप कमि माहिति आहे.
मायावति ह्या फोर्मुला मधुन काय साधु इच्चितात? मुख्य म्हणजे हा फोर्मुला मायावति वापरणार म्हणजे नक्कि काय करणार?
उमेदवाराच्या जातिचा आणि मतदार्सन्घात कुठल्या जातिचे किति लोक ह्याचा अभ्यास न करता तिकिट देणार?
माझ्यामते शिव सेनेने हा पुर्वि प्रयोग केला होता(किन्वा अजुन्पण करतात) परन्तु यश मर्यादित मिळते असे मला वाटते.

अविनाशकुलकर्णी's picture

6 Mar 2009 - 7:59 pm | अविनाशकुलकर्णी

काल आय.बि.एन लोकमत वर आजचा सवाल यावर हि चर्चा झाली. त्यात ५२% लोकांनि का फॉर्मुला यशस्वि ठरेल असे मत दिले आहे.बि.एस.पी चे श्री गरुड याम्चे असे म्हणणे आहे कि त्या मतदार संघातल्या बहुजन समाजाचि मते ब्राह्मणाना मिळवुन देवुन ते उमेदवार निवडुन आणु शकतिल...व त्या प्रमाणे बि.एस.पी..लोक जागरण करीत आहे...हा नवा प्रयोग आहे.त्या मुळे काय होइल या बद्दल सा~यानांच उत्सुकता आहे..

हरकाम्या's picture

6 Mar 2009 - 9:38 pm | हरकाम्या

मला नवल ह्या गोश्टींचे वाटते की डी एस के सारखा हुशार माणूस या मायाजालात
कसा फसला.?

स्वामि's picture

6 Mar 2009 - 10:13 pm | स्वामि

डी.एस्.के.(वि)जय हो!!!

अडाणि's picture

7 Mar 2009 - 1:17 am | अडाणि

हा प्रयोग महाराष्टात चालेल असे वाटत नाही. पुण्यात कुलकर्णी हे भाजपाची मते खाणार... त्यामुळे कलमाडी ला जिंकणे अजुनच सोपे जाणार आहे. एकंदर काँग्रेस चा उमेदवार पुण्यात जिंकायची सध्या शक्यता जास्त आहे. (कारण बी जे पी अजून उमेदवारच शोधत आहे....) मागील ४ लोकसभा निवड्णुका पहाता पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची एकत्र ताकद खूप आहे ( साधारणपणे १ ते सव्वा लाख मते जास्त भाजप आणि शिवसेनेपेक्षा ...) हे पाहता डी एस के उभे राहुन भाजपाला त्रास होणार हे नक्की !!!

अफाट जगातील एक अडाणि.

क्लिंटन's picture

7 Mar 2009 - 9:28 am | क्लिंटन

सहमत. डी.एस.कुलकर्णींची उमेदवारी भाजपला त्रासदायक ठरणार असे वाटते.

अवांतर: डी.एस.कुलकर्णी आणि अरूण गवळी यांच्यात साम्य काय? दोघेही बसपाचे लोकसभा उमेदवार आहेत. अरूण गवळींच्या पंगतीत डी.एस.केंना जायला कसे आवडले हेच समजत नाही.बसपच्या राज्यातील उमेदवारांच्या बैठकीत किंवा इतर ठिकाणीही डी.एस.के अरूण गवळीबरोबर शोभून दिसतील का?

---विल्यम जेफरसन क्लिंटन

मैत्र's picture

9 Mar 2009 - 3:18 pm | मैत्र

एकदम योग्य प्रतिक्रिया...
स्वतःच्या मुख्यमंत्रीपदाचा दुरुपयोग करून स्वत:चे पुतळे आंबेडकरांसारख्या प्रचंड बुद्धिमान आणि क्रांतिकारी व्यक्तिच्या बरोबरीने स्वतःच उभारणे, स्वतःच्या वाढदिवसाचे मोठे सोहळे करुन लाखो / कोटी गोळा करणे.
अशा आणि अनेक हीन पातळीवरच्या गोष्टी करणार्‍या मायावतीला मदत करण्यासाठी (केंद्रात) पुण्यातून उमेदवारी घेऊन डी एस के यांनी खरं तर आपली पत घालवली आहे. काँग्रेसचं तिकीट घेतलं असतं तर कलमाडींच्या ऐवजी त्यांना जास्त सपोर्ट मिळाला असता...
वर लिहिल्या प्रमाणे ते आता भाजपा आणि मनसे दोघांची मतं खाणार.. तीही फार नाही. त्यांना हे प्रश्न पत्रकार परिषदेत (गवळी व मायावती) उघडपणे विचारून त्यांची मतं जनतेपुढे प्रदर्शित केली पाहिजेत.
मुळात कोणी मायावतीला पुण्यात स्थान देणं आणि तेही डि एस के सारख्या नामवंत व्यक्तीने हेच आश्चर्यकारक आहे.
मायावतीच्या जातीच्या राजकारणाइतकंच हे अनाकलनीय आहे.

अमोल केळकर's picture

7 Mar 2009 - 9:55 am | अमोल केळकर

राजकारणाची फारशी माहिती नाही परंतू आपले हे वाक्य विचार करण्यासारखे आहे.

'बुध्धिमत्ता आहे पण जातिच पाठबळ नाहि..असा हा समाज पुन्हा या फॉर्म्युला द्वारे राजकारणात प्रभाव पाडु शकेल का?

किंबहूना या गोष्टीची आजच्या घडीला नितांत आवश्यक्ता आहे.

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

निळु's picture

7 Mar 2009 - 8:00 pm | निळु

मायावतींचे आतापर्यंतचे युपीतले भ्रष्ट, खुनशी ,जातीय,तत्वशुन्य राजकारण बघता ते महाराष्टासारख्या पुरोगामी,सुधारक,विकासशील राज्याला धोकादायकच ठरेल.
त्यामुळे ती पिडा युपीतच बरी.म्हणुन कोणत्याही सोशल इंजि. इ. भुलथापांना बळी न पडता त्यातल्या त्यात योग्य उमेदवारास मत
द्यावे.

चिरोटा's picture

9 Mar 2009 - 9:42 am | चिरोटा

उमेद्वार बघुनच लोकानि मत दिले पाहिजे.(वरिलपैकि कोणि नाहि हा उपाय मस्त आहे मात्र हलकट राजकारणी ते होवु देणार नाहित).सोशल इंजि वगैरे सगळी बन्डलबाजी वाटते.उत्तर प्रदेशासारख्या राज्यात आज सर्वपक्षिय राजकारणी बेफाम पैसा जमवुन आहेत्,खुद्द मायावती पण अपवाद नाहित आणि तेथिल जनता दारिद्र्यात आहे.तेथे मायावति आणि ब्.स्.पा. खरोखरच कार्य करते तर हरकत नव्हती सोशल इंजि च्या गपा ऐकायला.