चिकन बनवण्यासाठी सगळ्यात चांगला मसाला कोणता?

सालोमालो's picture
सालोमालो in पाककृती
6 Mar 2009 - 11:17 am

दोस्त हो,

मी एक एन्ट्री लेवल कुक आहे. परवा मी चिकन पहील्यांदा बनवले होते. छान झालं होतं. पण काहीतरी मिसिंग होत. तो अरोमा, तो रंग आणि मुळात ती चव जी यायला पाहीजे होती. काहीच माहित नव्हतं म्हणून मी एवरेस्ट चा मीट मसाला वापरला होता. ठीक होता. पण अजून चांगला मसाला नक्कीच अस्तित्वात असेल. जरा मदत कराल का?

सालो

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

6 Mar 2009 - 11:29 am | विंजिनेर

हा सर्वात उत्तम.
कृती:
१०-१५ काळी मिरी, थोडं जिरं, १-२ इंच दालचिनी (+ आवडत असल्यास धणे) हे मंद आचेवर, जड बुडाच्या कढईत ५-१० मि. कोरडे भाजून घ्यावेत.
वास सुटल्यावर, कोरड्या ताटलीत काढून घ्यावेत. नंतर मिक्सर मधे बारीक दळून घ्यावे.
घट्ट झाकणाच्या डब्यात साठवून ठेवणे आवश्यक आहे(नाहीतर स्वाद निघून जातो).

सुनील's picture

6 Mar 2009 - 11:36 am | सुनील

ह्यात थोडी लवंग घातलीत तर अधिकच उत्तम!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पिवळा डांबिस's picture

7 Mar 2009 - 8:56 am | पिवळा डांबिस

जड बुडाच्या कढईत ५-१० मि. कोरडे भाजून घ्यावेत.
काय राव तुम्ही!!!!!!
कमाल करता!!!!
त्यांच्याकडे जर "जड बुडाची कढई" असती तर ते कशाला मिपावर रेसेपी मागत फिरले असते!!!!
:)
सिरियसली: हे बघा सालोमालो, तुम्ही प्रथम तापलेल्या तेलात डालचिनी, लवंग, काळी मिरी आणि तमालपत्र यांची फोडणी करा.....
आणि मग त्यात कांदा टाकून ब्राऊन होईपर्यंत परता......
नंतर त्यात आल्या-लसणासी पेस्ट टाकून परता......
मग त्यात चिकनचे तुकडे टाकून पुन्हा परता.......
त्यानंतर त्यात हवा तो गरम मसाला घाला (चवीनुसार!!!!!).....
चिकन चांगले होईल.....

"सबका मंगल होये रे!!!!!!"

प्रभाकर पेठकर's picture

6 Mar 2009 - 11:37 am | प्रभाकर पेठकर

२० काळी मिरी
२० लवंग
२" दालचिनी
१ टेबलस्पून अख्खे धणे
१ टी स्पून जिरे,
६ हिरवी वेलची
१ टी स्पून बडीशोप

वरील सर्व जिन्नस तव्यावर किंचित गरम करून नंतर थंड झाल्यावर मिक्सरवर वस्त्रगाळ दळून घ्यावेत.
वरील मसाला एक किलो चिकनला पुरेसा आहे.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

मी लाल तिखट + MDH गरम मसाला + MDH किचन किंग असे मिक्स करून वापरतो. किचन किंग चांगला आहे मसाला.
किचन किंग मुळात तिखट असल्याने लाल तिखट आवडीप्रमाणे घेणे.
ओला मसाला - १ मोठा कांदा (तेलात काळपट लाल होईपर्यत भाजून ) , आलं , लसूण , टोंमॅटो - हे सर्व एकत्र करून त्याची पेस्ट करणे. त्यात वर सांगितलेले कोरडे मसाले घालणे.
शान चे ही चांगले आहेत मसाले पण बहुतेक तो पाकिस्तानी ब्रँड आहे .

सालोमालो's picture

6 Mar 2009 - 3:08 pm | सालोमालो

रविवारी करून बघतो.

सालो

अडाणि's picture

8 Mar 2009 - 1:42 am | अडाणि

तुम्हाला जर जास्ती कष्ट न घेता चिकन करायचे असेल तर हा 'कढाई चिकन' मसाला वापरून बघा. पुण्यात मिळतो. बे एरियात पण मिळतो. चिकन एकदम मस्त तिखट होते, रस्सा घट्ट होतो आणि मुख्य म्हणजे पटकन होते...

हा मसाला आणि दही चिकनला लावून तासभर (वेळ कमी असेल तर कमी वेळ...) मुरवत ठेवा, मग नंतर कढाईत तेल टाकून सर्व मिश्रण टाका. थोडे परतून त्यात पाणी टाका व शिजवा...मिठ सुध्धा वेगळे टाकावे लागत नाही.

सुंदर चिकन तयार होते पटकन !!!

अफाट जगातील एक अडाणि.

विसोबा खेचर's picture

8 Mar 2009 - 9:47 am | विसोबा खेचर

चिकन बनवण्यासाठी सगळ्यात चांगला मसाला कोणता?

'जीव ओतणे..'

हा कुठलीही पाकृ बनवतानाचा अत्यावश्यक पदार्थ! तो नसेल तर सारं व्यर्थ आहे. आणि तो असेल तर चिकन तर दूरच राहिली, फोडणी दिलेली, मीठमिरची घालून केलेली साधी आमटीदेखील खूप समाधान देऊन जाते, जीव तृप्त करते..!

तात्या.

chipatakhdumdum's picture

11 Mar 2009 - 2:04 am | chipatakhdumdum

तात्या ...../\.....