मातीच्या भांड्यातला पालकगोश

चित्रादेव's picture
चित्रादेव in पाककृती
6 Mar 2009 - 2:34 am

step-1

step-2

step-3

step-4

ही एकदम सोपी साधी कृती आहे. गरमागरम पालकगोश आणि पराठे मस्त लागतात. कल्पनाशक्ती ताणून पहा, तुम्ही आळसाहून सोप्यावर पडून आहात. बाहेर मुसळधार पाउस पडतोय आणि स्वंयपाकघरातून मटण शिजतानाच सुगंध... तुम्ही उठून स्वंयपाक खोलीत आलात म्हणून समजा(आणि त्यानंतर आत जेवण कोण करतय त्यावर बरेच अवलंबून आहे नंतरची रीयक्शन) :)
बरे कृती कडे वळूया,

१ किलो बकर्‍याचे कोवळं मटण,
१ पालक जुडी धूवून, निथळून ठेवलेली,
३ चमचे आले,लसूण,कोथींबीर्,पुदीना ची पेस्ट्,(ही आवडीप्रमाणे प्रमाण प्रत्येकाचे कमी ज्यास्त करावे),
३ चमचे दही,
१ चमचा कश्मीरी मिर्च मसाला,
२ चमचे गरम मसाला,
१ चमचा तिखट,
४ ,५ सुख्या लाल मिरच्या,
तेल प्रमाणानुसार,
मिठ चवी प्रमाणे,
३ मोठे कांदे पातळ कापलेले,
सुखा खडा मसाला : फोडणीला १ मसाला वेलची, २ साधी वेलची, २ काड्या दालचीनी, २ तेजपत्ता, थोडेसे केसर, ४-५ दाणे काळमीरी, ३-४ दाणे लवंगा,
चपातीचे पिठ अथवा फॉइल मडक्याला बंद करायला.

मुरवणी:
मटण नीट साफ करून त्यात हळद्,तिखट्,गरम मसाला, आले पेस्ट, दही कश्मिरी मिर्च घालून मुरवत ठेवा बाहेरच १ तास.
साफ सफाइ:
पालक कच्चाच बारीक वाटून घ्या.
फोडणी:
मातीचे भांडे गरम पाण्यात बुडवून ठेवा आधी १५ मिनीटे. हे देसी दुकानातून आणा. अमेरीकेतील भांडे हे फक्त अवन साठीच योग्य असते.गॅस मंद ठेवून मातीच्या भांड्यात तेल घाला. मग कांदा मस्त हळूवार परता. गुलाबी असु द्या. काळा होवु देवू नका. वरील खडा मसाला त्यात टाकून परतत रहा. आता मटण घाला आणि परता. पाणि अजाबात नाही घालायचे.:) खमंग वास आला की आता झाकण ठेवा. त्याच झाकणावर गरम पाणि टाकून ठेवा. बाजूने चपातीच्या गोळ्याच्या चकतीनी तोंड बंद करा. नाहीतर फॉइल वापरा ,चपाती फुकट जाईल असे वाटत असेल तर. मधून मधून पाणी संपत असे वाटले की गरम पाणिच झाकणात ओता पण झाकन अजाबात उघडायचे नाही. साधारण ४५ मिनीटाने वाटलेला पालक टाकावा. आता झाकण थोडेसे उघडे ठेवून शिजवावे. जवळपास एक तास निवांत पडा नाहीतर गप्पा मारा कोणाशी. मटणाची हड्डीपासून मांस मस्त गळून पडते. खूप चिवट नाही वा खूप नरम नाही.

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

6 Mar 2009 - 2:42 am | संदीप चित्रे

चित्रादेव...
मस्त म्हणजे मस्तच ....
बायको पालक्-मटण / पालक-चिकन करतेच...
या लेखाच्या निमित्ताने तिला पुन्हा एकदा करायला सांगता येईल ;)

चित्रादेव's picture

6 Mar 2009 - 2:54 am | चित्रादेव

धन्यवाद तुमच्या तत्काळ प्रतिसादाबद्दल. :)

बेसनलाडू's picture

6 Mar 2009 - 3:07 am | बेसनलाडू

करायलाच हवे!!! करणारच! मातीचे भांडे नसणे, अवन् असणे, इलेक्ट्रिक् शेगडी असणे अशी मर्यादित (!) सामुग्री असताना कसे करावे, हा प्रश्नच आहे; पण हरकत नाही. काहीतरी खटपटी करेन. मटणा ऐवजी चिकन सुद्धा चांगले लागेल ना? मी पालक चिकन या पूर्वी केले आहे; पण थोडे वेगळ्या पद्धतीने.
(खटपट्या)बेसनलाडू

चित्रादेव's picture

6 Mar 2009 - 4:48 am | चित्रादेव

बेसनलाडू, तुमच्याकडे मातीचे भांडे नसले तरी चालेल हो. फक्त चव वेगळी लागते मातीच्या भांड्यात. आठवा पाहू तो मातीच्या भांड्यातील आमटी.(जर गावी खल्ली असेल तर.. ) :)

विंजिनेर's picture

6 Mar 2009 - 5:33 am | विंजिनेर

"हैदराबाद हाऊस" मधे घुंगरू मटण मिळतं(मला वाटतं ही आंध्र किनारपट्टीची खासियत आहे).
अशीच असते पण त्यात पालका ऐवजी घुंगरू(अंबाडी/चुका?) ची भाजी घालतात.
तो पदार्थ ही अफलातून लागतो.
त्याची पाकृ माहिती आहे का कुणाला?

सुक्या's picture

6 Mar 2009 - 5:45 am | सुक्या

नवीन प्रकार पाहीला आज .. पालक घालुन कधी चिकन / मटन खाल्ले नाही. करुन पहावे लागेल.
बाकी फोटो मस्तच.

जवळपास एक तास निवांत पडा
हे जरा कठीण वाटतयं. :B

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

विसोबा खेचर's picture

7 Mar 2009 - 10:00 am | विसोबा खेचर

टिउ's picture

7 Mar 2009 - 10:06 am | टिउ

१९६९ - २००९
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

फारच उच्च प्रतिसाद...हसुन हसुन मेलो!

बाकी पाकृ मस्तच...

प्राजु's picture

7 Mar 2009 - 10:10 am | प्राजु

सुटले एकदाचे सगळे!!! (ह घ्या)
आता नवी पाकृ द्यायला हरकत नाही. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

8 Mar 2009 - 6:48 am | चतुरंग

अशक्य!! =)) =)) =)) =))
तात्या, हसून हसून मेलो!!
मान गये बॉस, तुमच्या कल्पनाशक्तीची दाद द्यायला हवी!!!

चतुरंग

परिकथेतील राजकुमार's picture

9 Mar 2009 - 12:44 pm | परिकथेतील राजकुमार

तात्या ते विनंती केल्याप्रमाणे जायच्या आधी तुमचा चश्मा, घड्याळ, चप्पल आणी शेवटचे अन्न ' मातीच्या भांड्यातला पालकगोश' ज्या ताट-वाटित खाल्लीत तेव्हडे मपल्या नावावर करुन जा ;)

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो..
आमचे राज्य

दिपक's picture

9 Mar 2009 - 12:48 pm | दिपक

आयचा घो...

काय माणुस आहे हा तात्या.. मेलो सपंलो.... =)) =)) =)) =))

घाशीराम कोतवाल १.२'s picture

9 Mar 2009 - 1:11 pm | घाशीराम कोतवाल १.२

आज आपले मिपाचे मालक मातीच्या भांड्यातला पालकगोश बघुन स्वर्गवासी झालेत
आता हे मिपा कोण चालवणार बरे ? ;)

तात्या आपल्या काहि वस्तु परा ने मागितल्या
काहि मला द्या लिलाव करता येइल
आणी पैसे पण मिळतील

अवांतर मिपा माझ्या नावावर करु शकता माझी हरकत नाहि...
8>

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

सहज's picture

7 Mar 2009 - 10:29 am | सहज

बकरी नसेल तर चिकन ते नको असल्यास टोफू किंवा पनीर किंवा बटाटा असे पर्याय दिले तर ५ पाकृ झाल्या की :-)

छान आहे पाकृ. बकरीचे घालुनच केली पाहीजे.

बाकी तात्याच्या फोटोवर जाउ नका त्याने जन्ममरणाचा फेरा चुकविला आहे असेच दिसते. का तिकडून परत पाठवले तात्या ;-)

चित्रादेव's picture

8 Mar 2009 - 1:27 am | चित्रादेव

अरेरे! हे काय झाले? पण जाताना सुद्धा चेहरा हसतमुख आणि प्रसन्न होता हो... समाधानाने गेले हो....
(ह. घ्या). :)

पावती पोचली. धन्यवाद. :)