गाभा:
मिसळपाव या संकेतस्थळावर छोटा डॉन यांनी नेट वरुन घेतलेल्या दारोळ्या माझ्या "चषक माझा" या विडंबनातील आहेत. त्या मिसळपावच्या सदस्यांना पाजवल्याबद्दल आभार. ऑर्कूटवर हे पुस्तक खालील पत्त्यावर ऊपलब्ध आहे.
http://www.orkut.com/Community.aspx?cmm=30757858
..अविनाश ओगले
प्रतिक्रिया
23 Jan 2008 - 8:28 pm | सुनील
आमच्या कार्यालयात ऑर्कूटला अग्नीभिंतीत रोखल्यामुळे दारोळ्या वाचता आल्या नाहीत, त्या आता घरी गेल्यावर वाचेन. अन्यथा दिवसाची सुरुवात चहाऐवजी दारोळ्यांनी झाली असती!!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
23 Jan 2008 - 8:31 pm | छोटा डॉन
"मिसळपाव या संकेतस्थळावर छोटा डॉन यांनी नेट वरुन घेतलेल्या दारोळ्या माझ्या "चषक माझा" या विडंबनातील आहेत."
मी केव्हा म्हटले की त्या मी लिहल्या आहेत, त्यात तळटीप ""नेटवरून साभार" यासाठीच टाकली होती.....
असो. नव्या पूस्तकाचा पत्ता दिल्याबद्दल अनेक धन्यवाद !!!
निर्व्यसनी [ छोटा डॉन ]
23 Jan 2008 - 9:19 pm | अविनाश ओगले
डॉन, प्लीज गैरसमज नको. नेट वरुन साभार या तळटीपेबद्दलच मी नेट वरुन घेतलेल्या असे म्हटले आहे. त्या मिसळपाव वरील सर्वाना पाजवल्याबद्दल तुझे आभारही मानले आहेत. उर्वरित दारोळ्या वाचाव्यात म्हणून पुर्ण पत्ता दिला.
27 Jan 2008 - 3:35 pm | सुधीर कांदळकर
धन्यवाद.