संस्कृती आणी आपण

मराठमोळा's picture
मराठमोळा in काथ्याकूट
4 Mar 2009 - 8:47 pm
गाभा: 

संस्कृतीआणी संस्कार.. सुखी संसारचा आणी आयुष्याचा पाया. हा पाया भक्कम असला कि कोणत्याही बिकट परिस्थितीवर व संकटांवर मात करण्यासाठी आवश्यक असलेले गुण माणसाच्या अंगी आपोआपच जोपासले जातात. आता ही संस्कृतीआणी संस्कार म्हणजे तरी काय? माझ्या मते आपल्या पुर्वजांनी त्यांच्या अनुभवावरुन अथवा त्यांना अवगत असलेल्या विद्येवरुन "हे करणे योग्य" आणी "हे करणे अयोग्य" असे जे सांगून ठेवले आहे अशा सर्व गोष्टींचे संकलन म्हणजे संस्कृती होय.

आजकाल बरेच जणं आम्ही सुसंस्कृत घरातले आहोत असे ठासुन सांगतात. आता एखादं घर किवा व्यक्ती सुसंस्कृत आहे कि नाही हे तपासण्यासाठी मापदंड किवा प्रमाण काय?
दारु किवा सिगारेट पिणे आपल्या संस्कृतीत बसते का? आणी ह्या सवयींचे वाढलेले प्रमाण आपण पाहतोच आहोत.
तसेच आजकालची किती लहान मुले संध्याकाळी शुभंकरोती म्हणतात? किवा त्याना पसाय्दान माहीत आहे? आपण तरी त्याना प्रेरित करतो का?
तरुण पिढीमधे किती जण सकाळी लवकर उठून देवपूजा करतात? किवा घराबाहेर पडताना आई वडिलांचा आशिर्वाद घेणे योग्य समजतात? आई वडिलांना व मोठ्या भावा बहिणीला सर्रास विचार न करता प्रत्त्युत्तरे दिली जातात.
परस्त्रीवर नजर न टाकणे (आजकाल जरा अवघडच कारण काही ठराविक स्त्रियानापण तेच हवे असते).
सांस्क्रुतिक कार्यक्रमांच्या नावाखाली धमक्या देऊन वर्गणी वसुल केली जाते आणी पडद्यामागे संस्क्रुतीचे वाभाडे काढले जातात हे तर आपण जाणताच.

माफ करा. माझे निरीक्षण चुकले असेलही.. किवा काळाच्या गरजेप्रमाणे संस्कृतीसुद्धा मॉडर्न बनली असावी. प्रत्येकजण आपल्या सोयीप्रमाणे ह्या संस्कृतीला "मोल्ड" करुन घेत असतो. काय तर म्हणे उपासाच्या दिवशी दारु पिताना पेल्यात दोन साबुदाण्याचे दाणे आठवणीने टाकतात.. असो..
थोडक्यात तात्पर्य असे कि सर्वजण कळत नकळत संस्क्रुतीच्या पाठीत सुरा खुपसत असतात, पण मुद्दा असा कि अश्या ह्या जखमी झालेल्या संस्कृतीचा वारसा आपण पुढच्या पिढीला देणार कि येणार्‍या पिढीला संस्कृतीची गरजच राहिलेली नाही? थोडं आत्मपरिक्षण करावं लागेल..

आपला,
अर्धसंस्कृत मराठमोळा

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

4 Mar 2009 - 9:24 pm | नितिन थत्ते

मी सुसंस्कृत आहे की नाही हे तुम्हीच ठरवा.

>दारु किवा सिगारेट पिणे आपल्या संस्क्रुतीत बसते का? आणी ह्या सवयींचे वाढलेले प्रमाण आपण पाहतोच आहोत.
मी सिगरेट पीत नाही. दारू कधीकधी पितो. (दारू पिणे हे संस्कृतीत बसतेच. वाल्मिकीरामायणात रामाच्या वनवासाविषयी बोलताना "भरतानंतर रामाला राज्य मिळाले तर ते चव गेलेल्या शिळ्या दारूसारखेच आहे" असे कौसल्या सहजपणे म्हणते)
>आजकालची किती लहान मुले संध्याकाळी शुभंकरोती म्हणतात? किवा त्याना पसाय्दान माहीत आहे? आपण तरी त्याना प्रेरित करतो का?
संध्याकाळी शुभंकरोति म्हणण्यास मी प्रेरित करीत नाही. पसायदान माहिती असायला काही हरकत नाही.
>तरुण पिढीमधे किती जण सकाळी लवकर उठून देवपूजा करतात?
मी करीत नाही
>घराबाहेर पडताना आई वडिलांचा आशिर्वाद घेणे योग्य समजतात?
गरजेचे आहे असे समजत नाही
>आई वडिलांना व मोठ्या भावा बहिणीला सर्रास विचार न करता प्रत्त्युत्तरे दिली जातात.
विचार करून (गरज असेल तर) प्रत्युत्तर देतो. आई वडील किंवा मोठे भावंड म्हणत आहे म्हणून प्रत्युत्तर द्यायचेच नाही असे मानत नाही.
>उपासाच्या दिवशी दारु पिताना पेल्यात दोन साबुदाण्याचे दाणे आठवणीने टाकतात
उपास (धार्मिक कारणाने) करीतच नाही. उपास फक्त पोट बिघडल्यावरच करतो. त्यामुळे पुढच्या गोष्टी गैरलागू

याखेरीज
इतरांशी सौजन्याने वागतो.
आपली प्रत्येक कृती इतरांना त्रासदायक नाही ना हे कटाक्षाने पाहतो.
समाजात वावरताना समाजाचे नैतिक नियम पाळतो.
कायदे तोडत नाही.
पैसे खात नाही.
नोकरीच्या ठिकाणी जात, लिंग, धर्म यावर आधारित भेदभाव करीत नाही.
परंतु हे सारे बहुधा सुसंस्कृतपणाच्या व्याख्येत बसत नाही.

>येणार्‍या पिढीला संस्क्रुतीची गरजच राहिलेली नाही?
तुम्ही ज्या गोष्टींना संस्कृती म्हणता त्या म्हणजेच संस्कृती असेल तर कदाचित राहिलेली नाही.

(संस्कृतीभंजक) खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

टिउ's picture

4 Mar 2009 - 9:49 pm | टिउ

उत्तम प्रतिसाद...

मराठमोळा's picture

4 Mar 2009 - 10:00 pm | मराठमोळा

टिउ साहेब,

उत्तम प्रतिसाद म्हणजे काय? आपण संस्क्रुती हळुहळू विसरत चाललो आहोत हे मान्य करायला तयार नाही हेच ना?
किवा "मला जे पटत तेच मी करणार आणी तीच माझी संस्क्रुती" असेच ना?

नितिन थत्ते's picture

4 Mar 2009 - 10:22 pm | नितिन थत्ते

काही विशिष्ट (मु़ख्यतः धार्मिक किंवा अध्यात्मिक) गोष्टी करीत नसला तर बाकी वागणूक चांगली असूनही त्या माणसाला असंस्कृत म्हणायचे का?.
किंवा त्या विशिष्ट गोष्टी करणे सुसंस्कृत असण्यासाठी पुरेसे आहे काय? बाकी वागणूक कशीहि असली तरी?

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

मराठमोळा's picture

4 Mar 2009 - 10:54 pm | मराठमोळा

अहो खराटा साहेब,

मी काही आद्य शंकराचार्य नाही.. मी जे म्हणालो ती माझी वैयक्तीक मते आणी लहानपणापासुन संस्कृती म्हणुन शिकलेल्या गोष्टीपैकी आहेत..
दारु मी सुद्धा पितो.. पण तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे असे मला वाटत नाही. मी असे कधी म्हणालो कि मी सर्वगुणसंपन्न आहे म्हणुन.. आपल्या सर्वाना आपल्या संस्कृतीचा आदर आहे आणी म्हणुनच एवढ्या प्रतिक्रिया उमटल्या..
पण प्रामाणिक मत असे कि बर्‍याचशा चांगल्या गोष्टी दुर्मिळ वनौशधीप्रमाणे लोप पावत चालल्या आहेत हे नक्की.

आपला,
मराठमोळा मावळा

टिउ's picture

4 Mar 2009 - 11:49 pm | टिउ

दारु/सिगारेट पिणारे, शुभंकरोती न म्हणणारे, पसायदान माहीत नसणारे, देवपुजा न करणारे सगळे लोक असंस्कृत असतात असं तुमचं मत दिसतंय.

एकच उदाहरण देतो: बारावीला माझ्यासोबत एक मुलगी होती. खुप हुशार. रात्र रात्र अभ्यास, सकाळी आधी आईवडिलांचा आशिर्वाद, मग पुजा, परत अभ्यास, संध्याकाळी देवळात असा रोजचा प्रोग्राम. थोडक्यात एकदम आदर्श पाल्य. बरं यापैकी मी काहीच करत नसल्याने पोरगा वाया गेलाय हे तिच्या घरच्यांचं माझ्याबद्दलचं मत. पुढे प्रेमात पडली . जातीबाहेरचा मुलगा म्हणुन वडिल रागावले, रागात काहीतरी बोलले. पळुन जाउन लग्न केलं. आता वडिल बोलावतात तरी मुलगी घरी येत नाही. आई वडिलांशी बोलत नाही. १० वर्ष झाले!

तुमच्या संस्कृतीच्या व्याख्येत बसणारी एकही गोष्ट मी करत नसलो तरी एक चांगला माणुस म्हणुन माझ्या आई वडिलांनी मला घडवलं याचा मला अभिमान वाटतो. तुम्ही म्हणता तीच संस्कृती असेल तर मी असंस्कृतच आहे...

मनिष's picture

5 Mar 2009 - 11:47 am | मनिष

एकच उदाहरण देतो: बारावीला माझ्यासोबत एक मुलगी होती. खुप हुशार. रात्र रात्र अभ्यास, सकाळी आधी आईवडिलांचा आशिर्वाद, मग पुजा, परत अभ्यास, संध्याकाळी देवळात असा रोजचा प्रोग्राम. थोडक्यात एकदम आदर्श पाल्य. बरं यापैकी मी काहीच करत नसल्याने पोरगा वाया गेलाय हे तिच्या घरच्यांचं माझ्याबद्दलचं मत. पुढे प्रेमात पडली . जातीबाहेरचा मुलगा म्हणुन वडिल रागावले, रागात काहीतरी बोलले. पळुन जाउन लग्न केलं. आता वडिल बोलावतात तरी मुलगी घरी येत नाही. आई वडिलांशी बोलत नाही. १० वर्ष झाले!

तिला आवडणार्‍या पुरुषाशी तिने जर जातीबाहेर लग्न केले तर संस्कृतीचे (किंवा कुणाचेही) काय घोडे मारले बॉ? तुमच्या उदाहरणात तसा सूर जाणवला म्हणून विचारले. बाकी मूळ विषय/आशय इतका प्रतिगामी (माझ्या मते) आहे, की त्याला प्रतिवाद करण्याइतकेही महत्त्व द्यावेसे वाटत नाही.

टिउ's picture

5 Mar 2009 - 8:51 pm | टिउ

मुद्दा तो नाही. जातीबाहेर लग्न केलं ही चांगलीच गोष्ट आहे. पण इतकी वर्ष आई वडिल हे देवापेक्षा मोठे असा आव आणणारी ती मुलगी, बघा आम्ही आमच्या मुलीवर किती चांगले संस्कार केले आहेत, आमचंच घर कसं सुसंस्कृत असं सांगणारे तिचे आईवडिल आणि आताची परिस्थिती यातला विरोधाभास दाखवायचा होता.
असली संस्कृती जपणारेच फक्त चांगले आणी बाकीचे वाया गेलेले असं लेखकाचं मत दिसल्यामुळे वरील उदाहरण दिलं होतं...

मराठमोळा's picture

4 Mar 2009 - 9:54 pm | मराठमोळा

हेच मी म्हणत होतो.. प्रत्येकजण आपल्या सोयीप्रमाणे ह्या संस्क्रुतीला "मोल्ड" करुन घेत असतो.
आणी काळाच्या गरजेप्रमाणे संस्क्रुतीसुद्धा मॉडर्न झालेली आहे. तुमच्या मी सुसंस्कृत आहे की नाही हे तुम्हीच ठरवा. ह्या प्रश्नाबद्दल मी काहीही बोलू शकत नाही कारण मी स्वतः ह्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे.

दारू पिणे हे संस्कृतीत बसतेच. वाल्मिकीरामायणात रामाच्या वनवासाविषयी बोलताना "भरतानंतर रामाला राज्य मिळाले तर ते चव गेलेल्या शिळ्या दारूसारखेच आहे" असे कौसल्या सहजपणे म्हणते

असहमत. जर दारु पिणे संस्क्रुतीचा भाग असता तर घरोघरी चहा देण्याऍवजी दारु च दिली नसती का?
देवाची आरती झाल्यानंतर तिर्थाच्या जागी रम दिली असती.

आपला,
प्रामाणिक मराठमोळा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Mar 2009 - 10:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जर दारु पिणे संस्क्रुतीचा भाग असता तर घरोघरी चहा देण्याऍवजी दारु च दिली नसती का?
अहो मराठमोळे साहेब, चहा आणि दारूतला फरक समजणे हा पण संस्कृतीचाच भाग आहे का नाही? लहान मुलांना चहा देता का दूध? मग तिथे संस्कृती येते का वैद्यकशास्त्र??
आणि जर दारू आपल्या संस्कृतीचा भाग नाही तर आपल्या संस्कृतात सोमरस हा शब्द कुठून आला?

मला कधी घरी शुभंकरोति म्हणायला शिकवलं नाही, आई वडिलांनी कधी "आम्ही मोठे आहोत म्हणून आम्हाला मान द्यायचा" हे शिकवलं नाही, देवपूजा करायला लावली नाही (स्वतःसुद्धा कामाला उशीर होत असताना देवासमोर बसले नाहीत), मोठा भाऊ आणि मी अजूनही प्रचंड वाद घालतो आणि मला एखादी गोष्ट पटली नाही तर मी त्याला सरळच "मला मान्य नाही, मी करणार नाही" असं सांगते, वडिलांनाही मी तसं एक-दोनदा सांगितलेलं आहे आणि मोठ्या मनाने दुसर्‍याचं स्वातंत्र्य त्यांनी मान्य केलं.

परस्त्रीवर नजर न टाकणे (आजकाल जरा अवघडच कारण त्याना पण तेच हवे असते).
या वाक्यावर मात्र मोठ्ठा आक्षेप आहे. तुम्हाला आजच्या स्त्रियांबद्दल नक्की काय म्हणायचं आहे ते सरळ बोला. तुम्ही हे वाक्य कोणाकडे बघून करत आहात? आणि या वाक्यावरून कोण किती सुसंस्कृत आहे हे अगदी चांगलंच समजत आहे. इंद्राला हजार डोळे का आणि अहल्येची शिळा का झाली हे सगळ्यांनाच माहित आहे, तुम्ही त्यांचेच वंशज दिसता.
परस्त्रीवर नजर कोण, का आणि कसं टाकतं हे बायकांना चांगलंच समजतं. त्यांचा उपयोग जशा अप्सरा करून घ्यायच्या, (पुरूष) देवांच्या आज्ञेवरून, तसा उपयोग काही बायका करत असतील, म्हणून तुम्ही हे जे सर्वसमावेशक विधान केलं आहेत त्याचा निषेध.

तुम्ही कोणाकडे काय नजरेने बघता यात मला काही रस नाही. पण अशी भडक आणि सर्वसमावेशक विधानं करणं कोणत्या संस्कृतीचं व्यवच्छेदक लक्षण आहे तेही सांगा जरा.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

मराठमोळा's picture

4 Mar 2009 - 10:23 pm | मराठमोळा

ह्या प्रतिसादाची मला अपेक्षा होतीच. तुम्ही अगदीच भडक स्वभावाच्या किवा परखड व्यक्तीमत्त्व असलेल्या आहात अस मला वाटल.
ठीक आहे.
तुम्ही त्यांचेच वंशज दिसता
मी तुम्हाला उद्देशुन कोण्तेही विधान केले नव्हते. त्यामुळे तुम्ही माझ्यावर जो मुक्तपणे चिखल उडवलात त्याची खंत वाटली. असो.

माझा लेख कोणी मोठ्या मनाने वाचलेला दिसत नाही आणी माझी विधाने सर्वानी स्वतःवर ओढुन घेऊन प्रतिसाद दिल्यासारखी वाटत आहेत. मला कोणावरही माझे विचार लादायचे नाहीत.

इथे फक्त विचारमंथन चालु असावे असे मला वाटते...

कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.

आपला,
विचारी मराठमोळा.

नितिन थत्ते's picture

4 Mar 2009 - 10:30 pm | नितिन थत्ते

विचारमंथनच चालू आहे.
तुम्ही संस्कृतीची कल्पना इतकी संकुचित केली आहे की एकूणात नैतिकतेने वागणे हा काही सुसंस्कृतपणाचा भाग नाही असा टोन लेखात दिसला. म्हणून मी स्वतःचे उदाहरण दिले.

बाकी तुम्ही 'परस्त्री' च्या मुद्द्यात कंसातील वाक्य लिहिले नसतेत तर अदितीचा प्रतिसाद असा आला नसता.

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Mar 2009 - 10:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बाकी तुम्ही 'परस्त्री' च्या मुद्द्यात कंसातील वाक्य लिहिले नसतेत तर अदितीचा प्रतिसाद असा आला नसता.
एग्ग-जॅक्टली!
कंसातले वाक्य नसते तर "चालू द्या" फारतर एवढंच लिहिण्याचे कष्ट घेतले असते. पण एकतर सरसकट सगळ्याच आजकालच्या स्त्रियांवर चिखलफेक केलेली पाहून राहवलं नाही.

मी तुम्हाला उद्देशुन कोण्तेही विधान केले नव्हते. त्यामुळे तुम्ही माझ्यावर जो मुक्तपणे चिखल उडवलात त्याची खंत वाटली. असो.

चिखल मी उडवला नाही, तो उडला, कारण तुम्हीच चिखलात दगड मारलात.

एक काम करा, लेख लिहिलात की आधी नीट वाचा; काय लिहायचं आहे आणि काय लिहिलं आहे याचा विचार करा आणि मगच लेख प्रकाशित करा.
असो. यापुढे मला या विषयावर काहीही प्रतिक्रिया देण्याची इच्छा नाही. आजच्या दिवसात फारच शाब्दीक हिंसा केली आहे.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

मराठमोळा's picture

4 Mar 2009 - 10:45 pm | मराठमोळा

माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

बरोबर आहे,, कारण
आणि जर दारू आपल्या संस्कृतीचा भाग नाही तर आपल्या संस्कृतात सोमरस हा शब्द कुठून आला?

संस्कृतात शब्द असण्याचा संस्कृतीचा काय संबंध?? आणी दारू आपल्या संस्कृतीचा भाग आहे म्हणजे तरी काय हो?

अवलिया's picture

4 Mar 2009 - 10:51 pm | अवलिया

संस्कृतात शब्द असण्याचा संस्कृतीचा काय संबंध?? आणी दारू आपल्या संस्कृतीचा भाग आहे म्हणजे तरी काय हो?

http://www.misalpav.com/node/5254 हा धागा वाचा.

त्यातील प्रियालीताईंची प्रतिक्रिया जरुर वाचा...
मी तुमच्यासाठी खास इथे देतो

भगवान श्रीराम आणि कृष्ण मांसाहारी होते काय? तर हो नुसते मांसाहारी नव्हते तर ते आणि सीतामाई (अ)पेयपानही करून होते. रामायण काळातील ब्राह्मण मांसाहारी होतेच आणि क्षत्रिय तर होतेच होते. एवढेच नव्हे तर सीतेने गंगेला १०० घट दारू देईन असा नवसही बोलला होता. (नेमके आठवत नाही पण अयोध्या कांडाचा शेवट किंवा अरण्यकांडाची सुरुवात येथे हे प्रकरण आहे. इच्छुकांनी तपासून पहावे.)

आता कोणाला पुढील प्रश्न पडला तर त्याचेही उत्तर देते.

भगवान श्रीकृष्ण मांसाहारी होते आणि दारू प्यायचे का? तर हो तेही हे सर्व करायचे.

कालच रात्री महाभारतातील खांडव-दाह पर्व वाचत होते. त्यातील काही भाग असा -

कृष्ण आणि अर्जुन क्रिडेसाठी यमुनातिरी गेले असता, सोबत सर्व राजस्त्रियांना घेऊन गेले. तिथे त्यांनी मनसोक्त क्रिडा केली. द्रौपदी आणि सुभद्रा पिउन इतक्या तर्र झाल्या होत्या की आपली उंची वस्त्रे आणि आभूषणे त्यांनी इतरांना वाटून टाकण्यास सुरुवात केली. दारूच्या नशेतील काही स्त्रिया खेळत होत्या, गात होत्या, नाचत होत्या अगदी भांडाभांडीही सुरु झाली होती. कृष्ण आणि अर्जुन या सर्व क्रिडांची गंमत लुटत होते. पांडवांच्या वैभवाची साक्ष देता येईल असे वातावरण तेथे होते. यानंतर त्यांनी काही वेळ एकांतात घालवण्याचे ठरवले आणि ते उठून एका निर्जन स्थळी गेले. तेथे त्यांनी आपल्या भूतकाळाच्या आणि शौर्याच्या खूप गप्पा मारल्या.

अचानक एक तेजपुंज ब्राह्मण त्यांच्यासमोर उभा राहीला. त्याची झळाळती कांती आणि दाढी उगवत्या सूर्याची आठवण करून देत होती. त्याने या दोघांकडे त्याला तृप्त करण्याची अभिलाषा प्रकट केली. अर्जुन आणि श्रीकृष्णाने अधिक विचारता त्याने सांगितले की तो साक्षात अग्नी असून त्याची भूक प्रचंड आहे आणि ती एखाद्या प्राण्याने मिटण्यासारखी नसून संपूर्ण खांडववनच त्याची क्षुधाशांती करू शकेल.

हे शब्दशः भाषांतर नाही, एक थोडक्यातला अनुवाद आहे.

बाकी चालु द्या..

--अवलिया

मराठमोळा's picture

4 Mar 2009 - 11:03 pm | मराठमोळा

आधीच्या प्रतिसादामधे तुम्ही मला गीता वाचण्याचा सल्ला दिलात. आणी आता
भगवान श्रीकृष्ण मांसाहारी होते आणि दारू प्यायचे का? तर हो तेही हे सर्व करायचे.
असे म्हणत आहात. गीतेमधे मांसाहार व सोमरसपान वर्ज्य सांगितलेला आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

आणी जर हे सर्व आपल्या संस्कृतीचा भाग आहे असे म्हणत असाल तर आनंदाच्या प्रसंगी (जसे लग्न) अथवा सणासुदीला मांसाहार व सोमरसपान का करित नाहीत??

आणी हो शुद्धलेखनाची चुक लक्षात आणल्याबद्दल धन्यवाद..

आपला,
खरा मराठमोळा

अवलिया's picture

4 Mar 2009 - 11:12 pm | अवलिया

मुळात गीता ही कृष्णाने सांगितली नाही, महाभारतात ती नंतर प्रक्षिप्त करण्यात आली.
इतिहासाची माहिती करुन घ्या.

गीतेमधे मांसाहार व सोमरसपान वर्ज्य सांगितलेला आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
हे तुम्हाला कोणी सांगितले? काहितरीच..

आणी जर हे सर्व आपल्या संस्कृतीचा भाग आहे असे म्हणत असाल तर आनंदाच्या प्रसंगी (जसे लग्न) अथवा सणासुदीला मांसाहार व सोमरसपान का करित नाहीत??
लग्नाच्या वरातीत पिवुन तर्राट नाचणारे तुम्ही पाहिले नाही का? मित्राच्या लग्नात त्याच्या कडुन दारुची पार्टी घेणारे आपण कधी पाहिले नाही का? अहो कुठल्या काळात वावरता आहात, जागे व्हा !!

--अवलिया

मराठमोळा's picture

4 Mar 2009 - 11:21 pm | मराठमोळा

तुम्हाला जर ह्या विषयात रस नसेल तर एक विनंती. प्रतिसाद देऊ नका..
उगाचच काहीही लिहुन बाकीच्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु नका.
हे तुम्हाला कोणी सांगितले? काहितरीच..
कोणी सांगायची गरज नाही. तुम्ही गीता वाचली असेल तर कळेल.
मुळात गीता ही कृष्णाने सांगितली नाही, महाभारतात ती नंतर प्रक्षिप्त करण्यात आली.
इतिहासाची माहिती करुन घ्या.

हे ठरवणारे तुम्ही किवा आम्ही कोण?? असो.
लग्नाच्या वरातीत पिवुन तर्राट नाचणारे तुम्ही पाहिले नाही का? मित्राच्या लग्नात त्याच्या कडुन दारुची पार्टी घेणारे आपण कधी पाहिले नाही का? अहो कुठल्या काळात वावरता आहात, जागे व्हा !!

लग्नाच्या जेवणात मांसाहार करायची आणी दारु प्यायची पद्धत आहे का? महारष्ट्रात तरी नाही.

मी इथे शब्दिक लढाई खेळायला आलेलो नाही याची नोंद घ्यावी.

लग्नाच्या जेवणात मांसाहार करायची आणी दारु प्यायची पद्धत आहे का? महारष्ट्रात तरी नाही.

मला तुम्ही महाराष्ट्रात कधी पासुन राहता ते सांगा.तुम्हाला सगळा महाराष्ट्र समजला हा तुमचा गैरसमज आहे.लग्नात मांसाहार वर्ज्य आहे हे तुम्हाला कोणी सांगितले? सर्रास मांसाहार चालतो.मी जेवलो आहे कित्येक लग्नात.

वेताळ

अवलिया's picture

4 Mar 2009 - 11:33 pm | अवलिया

तुम्हाला जर ह्या विषयात रस नसेल तर एक विनंती. प्रतिसाद देऊ नका..
हे सांगणारे तुम्ही कोण ?

उगाचच काहीही लिहुन बाकीच्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु नका.
तुमच्या मतानुसार प्रतिसाद नसेल तर ती दिशाभुल.... ?
अरे वारे वा!! असे कसे.. म्हणजे तुम्ही करणार ते प्रेम, आम्ही केले तर लफडे..
हा दुटप्पीपणा आहे..
चर्चा सुरु झाली, की मतमतांतर येणार ते सहन करायची तयारी हवी. नसेल तर गपगुमान रहावे.
उगाच मधुन आम्ही नाही जा ! असा रडीचा डाव खेळु नये.

कोणी सांगायची गरज नाही. तुम्ही गीता वाचली असेल तर कळेल.
गीतेतील मुळ संस्कृत श्लोक संदर्भासह आणि स्पष्टीकरणासह द्या.. वाटल्यास वेगळा धागा टाका.....
आणि हो मुळ श्लोकच लागतील, उगा कुणा गोवंशरक्षण संस्थेचे दाखले नका देवु.. परत रडत बसाल पर्तिसाद देवु नका म्हणुन

लग्नाच्या जेवणात मांसाहार करायची आणी दारु प्यायची पद्धत आहे का? महारष्ट्रात तरी नाही.

संस्कृतीत तुम्ही महाराष्ट्रीयन संस्कृती असा विचार केला की भारतीय संस्कृती..
बर महाराष्ट्रातीलच फक्त असेल तरी एकदा भेट द्या... मंगल कार्यालये आणि लॉन्स व्यतिरिक्त गावाकडे, पाड्यांवर मंडप टाकुन साज-या होणा-या लग्नांना.. कळेल सगळे नीट.

मी इथे शब्दिक लढाई खेळायला आलेलो नाही याची नोंद घ्यावी.
आम्ही खेळतो, त्यातुन ज्ञानाची देवाण घेवाण करतो.

बाकी यावर तुमचा प्रतिसाद देवुन ठेवा. मी उद्या सकाळी उत्तर देतो. आता मी झोपत आहे. शुभरात्री :)

--अवलिया

नीधप's picture

5 Mar 2009 - 11:21 am | नीधप

मांसाहार आणि सोमरसपान जर आपल्या संस्कृतीत निषिद्ध असतं तर आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या आयुर्वेदात मांसाहार आणि सोमरसाधारीत उपाययोजना आल्याच नसत्या.
हे मी फेकत नाहीये.
कोंबडीच्या अंड्याच्या कवचाचे भस्म अनेक औषधांच्यात वापरले जाते.
सोमरसाबद्दल म्हणायचं तर आयुर्वेदातली सगळी आसवं आणि आरिष्टं ही सेल्फ जनरेटेड अल्कोहोल्स असतात.
आसवं म्हणजे अश्रू नव्हेत तर द्राक्षासव इत्यादी
आणि आरिष्ट म्हणजे संकट नव्हे तर ज्याचे नाव अमुकतमुकारिष्ट (पटकन नाव आठवले नाही!)
ऋग्वेदात यज्ञकर्मांच्या रितीमधे अग्नीला मांस व सुरा अर्पण करण्याचे विधी आहेत.
देवीला उरूसात बळी देणे, राखणदाराला राखण देणे अश्या अनेक प्रथा आपल्या हिंदू धर्मात प्रचलित आहेत.
बहुतांशी सर्व आदिवासी जमातीत लग्नाचं जेवण हे मांस आणि दारूशिवाय पूर्ण होत नाही.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

राघव's picture

5 Mar 2009 - 11:55 am | राघव

चांगला गोंधळ चालु आहे! :)
माझ्या मते दारू/सिगारेट्/चहा/सोमरस/नॉनव्हेज/जुगार(द्युत) (..आणखीही बरेच लिहिता येईल) हे सर्व सुसंस्कृतपणाच्या आड येते असे मला वाटत नाही. त्यांची सवय लागते व नंतर त्याशिवाय राहुच शकत नाही अशी जी भावना येते, ती आड येते. असे झाले की अधोगती सुरु होते. तेथे असंस्कृतपणा सुरु होतो.
बाकी चालु देत..
मुमु़क्षु

अवलिया's picture

5 Mar 2009 - 11:58 am | अवलिया

अगदि बरोबर... भान न सुटणे महत्वाचे.

--अवलिया

मराठमोळा's picture

5 Mar 2009 - 12:02 pm | मराठमोळा

आता कसे मुद्दयाला धरुन बोललात. तुमचे विचार मला मनापसुन पटले. अशाच प्रतिक्रिया अपेक्षित होत्या मला.
धन्यवाद..

मराठमोळा's picture

4 Mar 2009 - 11:32 pm | मराठमोळा

चिखल मी उडवला नाही, तो उडला, कारण तुम्हीच चिखलात दगड मारलात.
तुम्ही स्त्रियाना चिखल समजता का?

ऍडीजोशी's picture

5 Mar 2009 - 12:14 am | ऍडीजोशी (not verified)

तुम्ही लिहिलेलं परस्त्रीवर नजर न टाकणे (आजकाल जरा अवघडच कारण त्याना पण तेच हवे असते).

हे वाक्य मूळ लेखात (आजकाल जरा अवघडच कारण काही ठराविक स्त्रियानापण तेच हवे असते). असं आहे. अर्धवट वाचून गैरसमज करून घेऊ नका.

बाकी वाद चालू द्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Mar 2009 - 11:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

नाय रे भौ, मूळ वाक्यावरून (जे मी बोल्ड टायपात टाकलं आहे) आरडाओरडा झाला म्हणून नंतर वाक्य संपादित झालं. काल बुधवार होता तरी मला आज सुट्टी नाही, त्यामुळे मी फक्त ताकाच्या अंमलाखालीच होते! ;-)

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

पिवळा डांबिस's picture

4 Mar 2009 - 11:13 pm | पिवळा डांबिस

जर दारु पिणे संस्क्रुतीचा भाग असता तर घरोघरी चहा देण्याऍवजी दारु च दिली नसती का?
खरं बघायला गेलं तर चहापेक्षा दारू हीच जास्त आपली संस्कृती आहे.....
चहा ब्रिटिशांनी भारतात आणला फक्त दोनशे वर्षांपूर्वी....
दारू ही ॠषीमुनींच्या काळापासून भारतात आहे.....
आपल्या देवादिकांनी, ॠषीमुनींनी, राजेरजवाड्यांनी आणि बहुसंख्य सामान्य जनतेने (काही धुवट मंडळी सोडून!!!) आपलीशी केलेली गोष्ट आहे ती!!!!
खरां का खोटां? प्रामाणिकपणे सांगा....
:)

अवलिया's picture

4 Mar 2009 - 11:16 pm | अवलिया

तेच म्हटले आमचा आघाडीचा फलंदाज कुठे गेला...
हांग आश्शी.. आता कसा संस्कृतीला भक्कम आधार आला ;)

--अवलिया

मराठमोळा's picture

4 Mar 2009 - 11:26 pm | मराठमोळा

चांगला डांबिसपणा आहे. असो..
आपल्या देवादिकांनी, ॠषीमुनींनी, राजेरजवाड्यांनी आणि बहुसंख्य सामान्य जनतेने (काही धुवट मंडळी सोडून!!!) आपलीशी केलेली गोष्ट आहे ती!!!!
हम्म्म्म्म्म्म मला ह्या प्रश्नांची उत्तरे द्या?
आपण आपल्या आईवडिलांसमोर किवा वडिल्धार्‍या लोकांसमोर दारु पितो का? किवा पिऊन जातो का?
आईवडिलांनी किवा शाळेत आपल्याला दारु पिणे चांगले असते असे कधी सांगितले होत काय?

मी दारु पिण्याविरुद्ध आहे असे नाही पण हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे असे मला वाटत नाही..

विकास's picture

5 Mar 2009 - 8:46 am | विकास

या संबंधात अस्मादिकांचा दारू...एक दृष्टांत हा लेख/अनुभव वाचावा.

त्याचे तात्पर्य एकच: माणसाने नशाबाज होऊ नये - दारूचे पण आणि संस्कृतीरक्षणाचे पण...

बाकी चर्चेसंदर्भात काय लिहावे? जिंदगीसे लढते लढते...नही नही, वाद घालते घालते मै थक गयां हूं!

नितिन थत्ते's picture

4 Mar 2009 - 10:12 pm | नितिन थत्ते

संस्कृती ही काळानुरुप बदलतच असते.

ज्याला तुम्ही संस्कृती म्हणत आहात ती कदाचित मागील १००-१५० वर्षांपेक्षा जुनी नसावी.
रामदासस्वामी बहुधा शुभंकरोती म्हणत नसावेत. आणि एकनाथांच्या काळी आरतीनंतर मंत्रपुष्पांजली म्हणत नसणार (ती १७ व्या शतकातील सभासदाने लिहिली).

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

अवलिया's picture

4 Mar 2009 - 10:18 pm | अवलिया

संस्क्रुती आमच्यात संस्कृती असे लिहितात...

परिवर्तन संसार का नियम है असे मी मागील जन्मात कृष्ण होतो तेव्हा म्हटले होते..
ते आजही लागु आहे त्यामुळे या जन्मात नवे काहीच सांगत नाही...

गीता वाचा ... सगळे मुद्दे आपोआप सुटतील.

--अवलिया

टिउ's picture

4 Mar 2009 - 11:59 pm | टिउ

कृष्ण (म्हणजे तुम्ही) मागच्या जन्मी हिंदी बोलायचा का?

अवलिया's picture

5 Mar 2009 - 8:12 am | अवलिया

नाही. संस्कृत आणि प्राकृत... :)

--अवलिया

पक्या's picture

4 Mar 2009 - 11:50 pm | पक्या

>>थोडं आत्मपरिक्षण करावं लागेल..
बहुधा तुम्हालाच.

माझ्या ओळखीत म्हणा किंवा आजूबाजूला पाहिलेली, नात्यातील वगैरे बरीच माणसे आहेत जी आपण वर सांगितलेली संस्कृती उत्तम रितीने संभाळत आहेत...म्हणजे देवपूजा, रोजचे मंत्रपठण , श्लोकपठण , दारू न पिणे वगैरे. पण हीच माणसे खोटे बोलणे, पैसे खाणे, कुठेही वेळेवर न जाणे , इतरांचा मत्सर करणे, स्वार्थासाठी जमेल ते करणे, कामापुरता मतलब साधणे हे करताना पाहिले की वाटते ही कसली संस्कृती. हाताने जपमाळ ओढायची आणि तोंडाने मात्र शिव्या द्यायच्या.
नुसतेच शुभंकरोती किंवा पसायदान म्हटल्याने चांगला नागरिक घडत नाही त्यासाठी चांगले संस्कार हवेत.
सुसंस्कृत असणे आणि संस्कृती सांभाळणे यात बराच फरक आहे, भाऊ. संस्कृती मध्ये परंपरा ही येतात ज्या काळानुरूप पडद्याआड जाऊ शकतात किंवा नव्या रूपात समोर येऊ शकतात. सुसंस्कार मात्र मरेपर्यत साथ देतात.

हे फक्त माझेच विचार आहेत असेच प्रत्येक प्रतिसादानंतर म्हणायचे असेल तर ते विचार तुमच्याकडेच ठेवा. विचारमंथन अपेक्षित असेल तर आवडत्या नावडत्या सर्वच प्रतिक्रियांचा स्वीकार करा आणि त्यावर सकारात्मक दृष्टीने उहापोह करा.

अदितीच्या वरिल विचारांशी सहमत.

असो.. चालूद्या.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

परिकथेतील राजकुमार's picture

5 Mar 2009 - 11:23 am | परिकथेतील राजकुमार

अरे काय संबंध ??
आम्ही आमच्या घरात संध्याकाळी नागडे नाचु नाहितर शुभंकरोती म्हणु, जोवर समाजाला आमच्या कुठल्याही कृतीचा काहिहि उपद्रव नाही तोवर आम्ही कोणालाही कसलेही उत्तर द्यायला बांधील नाही !!

अवांतर :-
१) आपली धर्मपत्नी आपण जेवल्यावर आपल्याच ताटात जेवते का ?
२) आपण रोज सकाळी धरतीला वंदन करुन मगच तिच्यावर पाय ठेवता काय ?
३) आपण गंगाकिनारी जाउन सर्व पितरांचे श्राद्ध घालुन आला आहात काय ?
४) काहि स्त्रियांना परपुरुषांनी आपल्याकडे वाईट नजरेने बघावे असे वाटते हे तुम्हाला त्यांच्या संपर्कात न येता कसे कळाले ? अशा स्त्रिया आपण कुठे बघितल्या आहेत ?
५) आपण दसर्‍याला सीम्मोलंघन करता काय ?
६) आपण ग्रहणात अन्नपाणी व्यर्ज करता काय ? ग्रहण झाल्यावर गार पाण्यानी आंघोळ करता काय ?

असंस्कृत
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

विनायक प्रभू's picture

5 Mar 2009 - 11:30 am | विनायक प्रभू

मी रोज सिमोल्लंघन करतो.
बोला मी सुस्कृत कि असंस्कृत.

नितिन थत्ते's picture

5 Mar 2009 - 11:30 am | नितिन थत्ते

संस्कृती आणि सुसंस्कृत या दोन शब्दांमधील साधर्म्यामुळे मराठमोळ्याला संभ्रम झालेला असावा.
म्हणजे शुभंकरोति म्हणणे, आईवडिलांना मान देणे या गोष्टी संस्कृतीचा भाग असल्या तरी ते पाळणे म्हणजे सुसंस्कृत असणे नव्हे. सुसंस्कृत असणे हे त्यापेक्षा बरेच जास्त आहे.

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

विनायक प्रभू's picture

5 Mar 2009 - 11:37 am | विनायक प्रभू

साहेब म्हणतात ते सर्व करुन (शुभं करोती, गीता पठण) आई बाबाना नमस्कार करणे वगैरे) करणारे मानवी 'कसाई' बघण्यात आयुष्य गेले.

मराठमोळा's picture

5 Mar 2009 - 11:47 am | मराठमोळा

मला तुम्हा सर्वांचे सर्व मुद्दे पटले. संस्कृतीबद्दल सर्वाना चांगलेच ज्ञान आहे. आणी मी सोडून सर्वजण सुसंस्कृत आहेत असे दिसते.
असो. मी संस्कृतीचा मास्तर म्हणुन हा लेख लिहिला नव्हता, तर फक्त माझे विचार मांडले होते. खरी संस्कृती काय हे ज्याचे त्यानेच ठरवावे असाच चर्चेचा सारांश. म्हणजे मुद्दे उघडपणे मांडले आणी "मराठमोळा" चा "मराठमोळ्या" झाला.. :)

चालु द्या...

आपला,
मुर्खसंस्कृत मराठमोळा

नितिन थत्ते's picture

5 Mar 2009 - 12:01 pm | नितिन थत्ते

तात्या तुम्ही शुद्धलेखनाला फाट्यावर मारता हे खरे. पण येथे शुद्ध लिहिल्यावरही लोक ओरडतायत.
'साधर्म्यामुळे मराठमोळ्याला संभ्रम' असे लिहिले तर मराठमोळा चे 'मराठमोळ्या' केले म्हणतायत. आम्ही घोड्यावर बसतो; घोडावर नाही. तात्या शुद्धलेखन फाट्यावर मारतात; फाटावर नाही.
मला तुम्हा सर्वांचे सर्व मुद्दे पटले.
म्हणजे चर्चा संपली काय?

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

मराठमोळा's picture

5 Mar 2009 - 12:16 pm | मराठमोळा

मीसुद्धा शुद्धलेखनाला फाट्यावरच मारतो. आणी मला मराठमोळ्याला शब्दाचा राग वगैरे आला असे नाही (आणी आला तरी काय... असे एक वाक्य प्रचलीत आहेच) वरील मुमुक्षु ने दिलेला प्रतिसाद वाचा. असे प्रतिसाद मला अपेक्षित होते. संस्कृतीची माझी व्याख्या चुकली असे तुम्हाला वाटले होते तर त्यावर प्रतिसाद अपेक्षित होता प्रतिक्रिया नव्हे. सर्वानी एकतर लेख त्यांच्यासाठी लिहिलेला किवा त्याना असंस्कृत आहे असे दाखावायला लिहिलेला आहे असे समजुन प्रतिक्रिया दिल्या. चर्चा मुद्देसुद आणी ज्ञान मिळेल अशी होणार असेल तर चालु ठेवायला अर्थ आहे असे मला वाटते. कोणाच्या भावना दुखावत असतील किवा चर्चेतुन डोक्याला ताप होत असेल तर ती बंद करणेच योग्य.

आपला,
साधाभोळा मराठमोळा

कवटी's picture

5 Mar 2009 - 12:21 pm | कवटी

कोणाच्या भावना दुखावत असतील किवा चर्चेतुन डोक्याला ताप होत असेल तर ती बंद करणेच योग्य.
अहो इथे कुणाच्याही डोक्याला ताप होत नाहिये उलट असल्या चर्चा हिरिरीने करण्यातच (आणि त्या वाचण्यातच)आम्हाला आनंद आहे.
तेंव्हा चालूद्या....

कवटी

नितिन थत्ते's picture

5 Mar 2009 - 12:29 pm | नितिन थत्ते

आमचे मराठी कच्चे आहे त्यामुळे 'प्रतिसाद अपेक्षित होता प्रतिक्रिया नव्हे' म्हणजे काय ते कळले नाही.

मला वाटते तुमचा लेख कोणीही वैयक्तिक टीका म्हणून घेतला नसावा. 'मी सुसंस्कृत.....' अशा माझ्या प्रतिक्रियेचाही मी काय करतो यापेक्षा सुसंस्कृत कोणाला म्हणावे याकडे लक्ष वेधणे हाच हेतू होता.

आज अनेक पालकांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना संस्कारवर्गात पाठवण्याचे फॅड आहे. या संस्कारवर्ग चालविणार्‍यांचे आणि त्या पालकांचेही 'चार श्लोक, रामरक्षा, अथर्वशीर्ष, गीतेतले एक दोन अध्याय पाठ झाले म्हणजे संस्कार झाले' असे मत दिसते. म्हणून सुसंस्कृत असणे याचे दर्शन घडवण्यासाठी तो विरोधाभास दाखवला होता.

बाकीच्या मिपाकरांनीही अशाच स्वरूपाचे प्रतिसाद दिले आहेत.
ऍडीजोशींचा दुसरा धागाही हेच सांगू पहात आहे.

तरी अजून काही नवे मुद्दे असतील तर चर्चा करायला हरकत नाहीच.

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

मराठमोळा's picture

5 Mar 2009 - 12:54 pm | मराठमोळा

'प्रतिसाद अपेक्षित होता प्रतिक्रिया नव्हे' याला इंग्रजी मधे असे म्हणेन की
Response was expected and not Reaction. there is a huge difference in both. be Responsive and not Reactive.

खर तर ह्या विषायावर चर्चा करण्यासाठी अमर्याद मुद्दे आहेत. खरी संस्कृती म्हणजे काय हे कोणी सांगु शकेल काय??
कोणी व्याख्या करु शकेल काय? किवा एका लेखात सर्व मुद्दे मांडु शकेल काय??

मिसंदीप's picture

5 Mar 2009 - 12:09 pm | मिसंदीप

मि.पा कर,
संस्कृती वरील हे अभिप्राय वाचुन अवाक झालो.
त्याच बरोबर इतिहास काळातील दाखले व त्यांचे या विषयाशी निगडीत असे स्पष्टीकरण वाचुन मि.पा करांच्या सखोल ज्ञानाची खात्री पटली.
हे नाजुक विषय हाताळण्याचे कसब आमच्याकडे नाही, त्या मुळे सर्व विद्वतचुडामणींचे लिखाण वाचण्यातच आम्ही धन्यता मानतो.

अमोल नागपूरकर's picture

5 Mar 2009 - 2:02 pm | अमोल नागपूरकर

संस्कृती ही प्रवाही असते. ती स्थळकाळानुरुप बदलत असते. काही जण देवपूजा, रोजचे मंत्रपठण , श्लोकपठण ,इत्यादी कर्मकान्ड म्हणजेच संस्कृती असे समजतात. ते चूक आहे.
संस्कृती बुडाली, कलियुग आले वगैरे ओरड अगदी महाभारतकालापासून चालत आली आहे.
एकच उदाहरण. एकेकाळी नऊवारी साडी म्हणजेच मराठी संस्कृती असे मानत. त्यामुळे पण्डिता रमाबाईन्नी जेव्हा पाचवारी साडी चे समर्थन केले तेव्हा त्याना खूप विरोध झाला. पण आज ते सर्वमान्य झाले आहे. आज आपण ज्या गोष्टीन्मुळे संस्कृती ढासळली असे म्हणतो तीचा उद्या आम जनतेने स्वीकार केल्यास तीच आपली संस्कृती होईल.

प्रकाश घाटपांडे's picture

5 Mar 2009 - 3:14 pm | प्रकाश घाटपांडे

संस्कृती बुडाली, कलियुग आले वगैरे ओरड अगदी महाभारतकालापासून चालत आली आहे.

अगदी सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

बाप्पा's picture

5 Mar 2009 - 3:03 pm | बाप्पा

मायला मराठमोळ्याला दोर लपेटुन विचारांच्या समुद्रात मंथन चालु आहे... =))
असुदेत.. संस्क्रुती काई कुणाच्या घरची पेंड नाईए. ती आपल्या पुर्वजांनीही जशी च्या तशी जपली असती तर आजही आपण गुहेत राहीलो अस्तो(कारण घरात राहणे आपल्या संस्क्रुतीत बसले नसते ;) ).. संस्क्रुती कायम स्थलकालपरत्वे बदलत आलेली आहे एव्हडे लक्शात घ्यावे. आणी तशानेच ती जिवंतदेखील राहील.

-- (सुसंस्क्रुत) बाप्पा लंबोदर.

अमोल नागपूरकर's picture

5 Mar 2009 - 3:11 pm | अमोल नागपूरकर

आपल्याला भूक लागलेली नसतानाही जेवणे ही विक्रूती , भूक लागल्यावर जेवणे ही प्रक्रूती आणि आपल्याला भूक लागलेली असतानाही आपल्या तोन्डचा घास इतर भुकेल्यांना देणे ही संस्कृती .

चिरोटा's picture

5 Mar 2009 - 3:51 pm | चिरोटा

वा नागपुरकर, विचार आवडला. ३०% भारतिय जनता जी एक् वेळ जेवते ती आपल्याबद्दल आणी सरकार बद्दल काय विचार करित असेल याचा अन्दाज आला.