या घडीला पुण्यात घर घेणे कितपत उचित आहे, गुंतवणूक म्हणून आणि गरज म्हणून?
गेल्या ३-४ महिन्यांमध्ये सदनिकांचे भाव काही प्रमाणात कमी झाले आहेत. अजून कमी होण्याची शक्यता आहे का?
अंडर कंस्ट्रक्शन (ताबा: ६महिने ते-१ वर्ष) घर घेणे योग्य की रेडी पझेशन?
मी पिंपळे सौदागर, कात्रज्-आंबेगाव, बाणेर, पाषाण, बावधन इ ठिकाणी अनेक प्रोजेक्ट्स ना भेटी दिल्या आहेत, देत आहे. चांगल्या (निदान तसे वाटणार्या) प्रोजेक्ट्सचे भाव २५०० प्रति स्क्वे. फूट च्या वरच आहेत. याखाली कीमती कमी करण्यास बिल्डर लोक तयार दिसत नाहीत. बाणेर, बावधन मध्ये तर किंमती अजूनही आकाशातच आहेत.
नवीन घर घेतांना काय काय काळज्या घ्याव्यात तसेच आपणास आलेले अनुभव येथे सांगावेत ही विनंती. बिल्डर लोकांबद्दल, बांधकामाबद्दल आणि एकूणच नवीन घराबद्दल आपणास आलेले चांगले वाईट अनुभव माझ्यासारख्या गृहसंशोधकांना नक्कीच मार्गदर्शन करतील.
प्रतिक्रिया
3 Mar 2009 - 4:41 pm | धमाल मुलगा
सगळेजण एकत्र येऊन 'भाव फारसे कमी करायचे नाहीत' असं ठरवून बसले आहेत अशी वंदता ऐकुन आहे.
थोडे दिवस थांबा, सगळे प्रकल्प पडीक रहायला लागले आणि गुंतवणूकीचा परतावा मुळीच न मिळण्याची शाश्वती झाली, की मग धडाधड बॅनर्स लाऊन विकायला लागतील कमी किंमतीत.
अजुन खरा झटका ह्यांनी खाल्लेला नाहीय्ये म्हणुन ह्या गमजा चालु आहेत. मुंबईत मध्यंतरी ठाण्यात ४ खोल्यांचा फ्लॅट घेतला तर दोन खोल्यांचा फ्लॅट भिवंडी फुकट अशा काहीश्या बातम्या ऐकल्या होत्या. कळेल...लवकरच कळेल ह्या बिल्डरांना.
तुर्त पुण्यामध्ये फ्लॅट घेणे लांबणीवर टाकावे असे माझे वैयक्तिक मत आहे.
सध्या बँकाही ७०-८०% पलिकडे कर्ज देत नाहीत. एकुणच थोडे थांबून पहावे.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
3 Mar 2009 - 5:07 pm | झेल्या
मलाही असेच वाटते.
अजून काही दिवसांत १०-१५ % करेक्शन होईल अशी अपेक्षा आहे.
पण थोडी जरी मागणी वाढली तरी हे लोक तासातासाला (अक्षरशः) किमती वाढवतात.
व्याजदर कमी झाल्यामुळे मागणी वाढेल व परत किमती आकाशात....असे होण्याची भीती वाटत आहे. व ही रॅली काही काळ अशीच चालेल असेही वाटते.
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
3 Mar 2009 - 6:29 pm | धमाल मुलगा
व्याजदर कमी करुन सोबतच बँका जोखीम कशी वाढवतील? कदाचित कर्जाची मर्यादा मालमत्तेच्या ६०% वर घसरवली तर कितीजण कमी व्याजदराचा फायदा घेऊनही घरं घेऊ शकतील?
सोबतच बर्याच नोकरदारांच्या जाणार्या नोकर्या/कमी होणारे पगार ह्याबाबतच्या जोखमीचे उपाय म्हणुन आत्तापर्यंत सढळ हाताने मिळणारी कर्जं तितक्या सोप्या पध्दतीत मिळणे अवघड दिसते. बरीच कागदपत्रं, जामिन, तारण (कदाचित विकत घेऊ घातलेल्या घराव्यतिरिक्त इतर) काही जमा-ठेव ह्यासारखे उपाय बँका योजु लागतील अशी एक अटकळ आहे.
काय नाना, बरोबर बोलतोय का हो मी?
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
3 Mar 2009 - 8:01 pm | अवलिया
अगदी बरोबर
--अवलिया
3 Mar 2009 - 4:47 pm | मनिष
गुंतवणूक म्हणून घेत असाल तर सध्या अजिबात घेऊ नका. गरज म्हणून घेत असाल आणि ६-८ महिने थांबता येत असेल तर थांबा. भाव नक्कीच अजून खाली येतील -- आत्ता बिल्डर्नी नुसते नाममात्र कमी केलेत. बाकी सूचनांबद्द्ल - एक वेगळाच आणि सविस्तर लेख होईल, पण एका वाक्यात सांगायचे झाल्यास, स्क्वे. फूट मागे ५०-१०० रुपये जास्त दिले तरी चालतील पण दर्जेदार्/विश्वासू बिल्डर कडून घर घ्या - येणारे कित्येक वर्षे स्वतःलाच दुवा द्याल.
3 Mar 2009 - 5:12 pm | झेल्या
>>स्क्वे. फूट मागे ५०-१०० रुपये जास्त दिले तरी चालतील पण दर्जेदार्/विश्वासू बिल्डर कडून घर घ्या
अगदी मान्य.
मुळात दर्जेदार आणि विश्वासू हे ठरवणेच अवघड होऊन बसले आहे. केवळ त्या बिल्डरच्या आधीच्या प्रोजेक्ट्सवरून विश्वासार्हता ठरवता येत नाही. सध्या किमती नाममात्र कमी करून क्वालिटीत काट मारून ते त्यांचा नफा उकळणारंच!
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
3 Mar 2009 - 4:51 pm | सुनील
कुणाला ठाण्यात भाड्याने घर हवं असेल तर मला कळवा.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
3 Mar 2009 - 4:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नक्की कोणता राजकीय नेता ते आठवत नाही, पण जेवढं आठवतंय त्याप्रमाणे, पुणे युवा भाजपच्या एका नेत्याने बाणेर भागात बॅनर्स लावले होते:
घरांच्या किंमती अजूनही कमी होतील तेव्हा थांबा; इतक्यात घर विकत घेऊ नका.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
3 Mar 2009 - 4:59 pm | महेश हतोळकर
दबावतंत्र वापरायला सुरुवात झालेली आहे. सावध रहा. भूलथापांना बळी पडू नका. वाट पहा.
3 Mar 2009 - 5:13 pm | अवलिया
माझ्या म्हाता-याचे ऐकाल तर कितीही चांगली स्कीम आली तरी अजुन दोन वर्षे घर घेवु नका.
आणि हो... कर्ज काढुन तर अजिबात घेवु नका.
खुप पस्तावाल.
जास्ती बोलत नाही... हल्ली दम लागतो बोलतांना.
--अवलिया
3 Mar 2009 - 5:17 pm | दशानन
म्याबी हेच म्हणतो आहे.
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
3 Mar 2009 - 5:33 pm | झेल्या
आपल्या प्रतिसादाची तर मी आवर्जून वाट पाहत होतो.
धन्यवाद.
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
3 Mar 2009 - 5:44 pm | विनायक प्रभू
मिपावर एकापेक्षा एक भारी म्हातारे आहेत.
म्हातार्याला दम लागतो पण खरे बोलतो.
3 Mar 2009 - 5:46 pm | दशानन
तुम्हि पितामह ;)
अवघे १७५ आयुष्मान तुमचे =))
3 Mar 2009 - 5:25 pm | झेल्या
वृत्तपत्रांतील अशा बातम्यांतून किंवा न्यूज चॅनेल्स वरील चर्चांमधून ग्राहकांच्या मानसिकतेवर व त्या अनुशंगाने मार्केट वर नक्कीच मोठा परिणाम होत असणार!
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.