मटार-पालक पराठे

समिधा's picture
समिधा in पाककृती
3 Mar 2009 - 4:39 am


साहित्य :
मटार २ वाट्या
पालक २ वाट्या
आल १ पेरा एवढं
लसुण ४ पाकळ्या
मिरची /तिखट आवडीनुसार
मीठ चविनुसार
कणिक अंदाजे
तांदुळाचे पिठ ४ चमचे
पिठ मळुन घेण्यासाठी तेल ( हे थोड नेहमी पेक्षा जास्ती लागेल)

पराठे बनविण्यासाठी १ प्लास्टिक पिशवी.

कृती:
प्रथम उकळलेल्या पाण्यात मटार ५ मिनिटे ठेउन काढून घ्या.
नंतर त्याच पाण्यात पालक ठेउन २-३ मिनीटांनी काढा.
मिक्सर मध्ये मटार, पालक, आल, लसुण, मिरची एकत्र करुन थोडे पाणी घालुन काढून घ्या. ( साधारण १/२ वाटी पाणी लागते)
तयार मिश्रणात तांदुळाचे पिठ, आणि थोडी कणिक घाला ( सैलसर मळुन घ्या)
मळलेले मिश्रण पुरणपोळीच्या कणके प्रमाणे हवे. त्या साठी तेल थोड जास्ती लागेल.
एका प्लास्टिक पिशवी वर पराठा थापुन घ्या.
तव्यावर दोन्ही बाजुने तेल्/तुप सोडुन भाजुन घ्या.
कोणत्याही चटणी /सॉस बरोबर गरमच खावा.

अवांतर : ज्यांना लाटता येत नाही त्यांना पण करता येईल.

प्रतिक्रिया

रेवती's picture

3 Mar 2009 - 4:52 am | रेवती

फारच छान रंग आलाय!
फोटू मस्त!
मटार + पालक पराठे कधी केले नव्हते.
केल्यावर कळवीनच.

रेवती

भाग्यश्री's picture

3 Mar 2009 - 5:15 am | भाग्यश्री

काय रंग आलाय!! आहा!! नक्की करणार.. !

http://bhagyashreee.blogspot.com/

शितल's picture

3 Mar 2009 - 5:29 am | शितल

समिधा,
पराठे कसले मस्त दिसत आहेत..
नक्की करून पाहिन. :)

समिधा's picture

3 Mar 2009 - 5:39 am | समिधा

तिघीजणी करुन नक्की कळवा. मुलांनाही रंगा मुळे खायला आवडतील.

विंजिनेर's picture

3 Mar 2009 - 6:47 am | विंजिनेर

रंगसंगती फारच छान जमली आहे.

जनहितार्थ याचिका: प्रति मिपा प्रशासन,
आमच्या सारख्या सामान्य आणि पाककलेत ढ असणार्‍या लोकांना असे उत्तमोत्तम, तोंडाला पाणी सुटवणारे पदार्थ वारंवार (नुसतेच)पाहून घेरी येते. सबब, ह्या तमाम मिपाकर सुगरणींना महिन्याला एक(च) पाकृ सादर करण्याचे बंधन घालावे आणि उर्वरित मिपाकरांचे दृष्टी-सुखाच्या अतिरेकापासून बचाव केल्याबद्दल दुवे घेउन जावेत.

प्राजु's picture

3 Mar 2009 - 9:05 am | प्राजु

मस्त रंग आहे पराठ्यांचा.
चला.. आणखी एक रेसिपी मिळाली लेकच्या डब्यासाठी.
धन्यवाद समिधा.

समिधा, तू एक किड्स स्पेश्शल रेसिपीज असा पाककृती संग्रह का काढत नाहिस. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

समिधा's picture

3 Mar 2009 - 11:50 pm | समिधा

तू एक किड्स स्पेश्शल रेसिपीज असा पाककृती संग्रह का काढत नाहिस
अग तुझ्या सारख्या मैत्रिणींची मदत होणार असेल तर नक्की काढते. ;)

पक्या's picture

3 Mar 2009 - 9:12 am | पक्या

छान दिसतायेत पराठे.

मी मागे एका मित्राच्या घरी मटार चे पराठे खाल्ले होते. पण त्यात पालक नव्हता. त्यांनी त्यात भिजवलेली मुगाची डाळ जाडी भरडी वाटून घातली होती. मटार मात्र शिजवून घेऊन बारीक वाटलेला होता. बा़की आल लसूण तिखट मीठ होतेच. फक्त कणकेमध्ये हे मिश्रण मिक्स करण्याऐवजी पुरणपोळीसारखे कणकेच्या पुरीत हे मिश्रण भरून मग पराठा लाटून ते भाजले होते. या पध्दतीने पण छान लागतात मटारचे पराठे.

विसोबा खेचर's picture

3 Mar 2009 - 10:17 am | विसोबा खेचर

आय सी यू च्या बाहेर येऊन आता काहीच होप्स नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मटार-पालक पराठ्यांचे जीवघेणे फोटो पाहात एक्साईट झाल्यामुळेच त्यांच्या जीवावर बेतलं असं डॉक्टरांनी निदान केलं असून सर्व जवळच्या नातेवाईकांना बोलावून घायला सांगितलं आहे. तात्यांची प्राणज्योत आता केव्हाही मालवेल असं डॉक्टर म्हणतात..!

ऍन्ड हिअर कम्स द बॅड न्यूज...

तात्या गेले! मटार-पालक पराठ्यांनीच अखेर बळी घेतला! :)

समिधा's picture

3 Mar 2009 - 11:53 pm | समिधा

तात्या असा साऱखा तुमचा बळी जायला लागला तर कसं होईल, अजुन आमच्या सगळ्या मैत्रिणींच्या कितीतरी पाकृ. यायच्या आहेत. :)

जागु's picture

3 Mar 2009 - 10:59 am | जागु

समिधा छानच दिसताहेत ग पराठे. मी बटाटा पालक पराठे करते पण एवढा छान रंग येत नाही. आता मटार टाकुन पण करुन बघेन.

गणपा's picture

3 Mar 2009 - 2:03 pm | गणपा

एकदम खतरनाक फोटु. \_/ भर =P~ गळली.

चकली's picture

3 Mar 2009 - 8:53 pm | चकली

चविष्ट ..फोटो मस्तच !!

चकली
http://chakali.blogspot.com

मृण्मयी's picture

3 Mar 2009 - 9:19 pm | मृण्मयी

सुंदर हिरव्या रंगाचे पराठे. रिकाम्या पोटी बघायला नको होते. :(

शाल्मली's picture

3 Mar 2009 - 11:00 pm | शाल्मली

मस्त!
फोटोतील रंगसंगती लै भारी दिसत्ये.
पाकृही भारीच. :)

--शाल्मली.

मिना भास्कर's picture

4 Mar 2009 - 12:32 am | मिना भास्कर

:) समिधा रंग खुपच सुंदर दिसतो आहे. तशी मी काही सुग्रण नाही , पण काही वेळा पदार्थ बघून खाण्याची इच्छा होते ना तसे झाले हा फोटो पाहील्यावर, आत्ता नक्कीच करून बघते , सोपे ही आहेत.

अनुजा's picture

4 Mar 2009 - 2:05 am | अनुजा

छानच दिसतायत.... करुन पाहीन...

सुनील's picture

4 Mar 2009 - 8:28 am | सुनील

नुसत्या पालकाचे पराठे खाल्ले होते. आता त्यात मटार घातल्यामुळे अधिक भरपेट होतील, यात शंका नाही. फोटो तर लाजवाब!!

बाकी तात्यांचा कितवा पुनर्जन्म?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.