दोन दिवसांपूर्वी याहु संकेतस्थळावर पहिल्याच पानावर झळकणारया बातम्यांमध्ये एका न्युजवाहिनीने टाटा नॅनोच्या आगामी आगमनाची बातमी दाखवली. जगातील सगळ्यात स्वस्त कार म्हणून ज्या कारने नाव नावलौकिक मिळवला त्या कारची जमेची बाजू मांडण्यापेक्षा त्यात किती असुविधा आहेत याच्यावरच भर देण्यात आला. शेतकरी लोकाना जागेसाठी मिळालेला कमी मोबदला व त्यामुळे केलेली निदर्शने आणि या सगळ्यांचा नेनो च्या बाजारातील आगमनावरचा विलंब या सगळ्या गोष्टींचा विशेष उल्लेख आहे.
कारचा आकार किती लहान आहे हे अगदी "How many people you can squeeze into car ?" अशा संवादातून खिल्ली उडवली आहे.
सुरक्षिततेच्या बाबतीत कारमध्ये किती बाबींमध्ये सुधारणा आवश्यक आहे याची यादीच वाचून दाखवली आहे .. उ.दा. पाठीमागील सीट-बेल्ट्स , बॉडी मेटल शीट, एअर बॅग्स ई.
एकूण ही कार अमेरिकेत आयात कशी होऊ शकणार नाही याच गोष्टीवर विनाकारण भर दिला आहे.
केवळ एक लाखात कार तयार करून इतक्या मोठ्या प्रमाणात (3000/महिना ) उत्पादन करण्याची क्षमता पूर्ण जगात फक्त भारतात आहे अशी बातमी सांगायला याना कदाचित कमीपणा वाटला असावा....
प्रतिक्रिया
2 Mar 2009 - 10:57 am | केदार_जपान
आपण उल्लेख केलेली न्यूज वाहिनी कोणती ते काही माहित नाही, पण जर आपली भारतिय असेल याची शक्यता जास्त वाटते...
आणी भारतिय न्यूज वाहिन्या यात एकदम तरबेज आहेत.... :(
पण खरे सांगायचे तर, इकडे जपानी लोकांना एकंदरितच टाटा बद्दल नितांत आदर आहे आणि १ लाखा मधे नॅनो कार या प्रोजेक्ट बद्दल ची सविस्तर माहिती त्या लोकांना असुन्..त्याना त्याचे खरोखर कौतुक आहे..
जापनी लोक कार च्या मार्केट मधे खूप आघाडीवर आहेत्..आणी खरे सांगयचे तर, भारताचे मार्केट आपल्या हाततुन जाते कि काय अशी एक पुसट्शी भिती त्याना वाटत आहे...या वरुनच नॅनो किती चांगली आहे हे सिद्ध होते..
-----------------
केदार जोशी
2 Mar 2009 - 12:19 pm | नरेश_
केदार यांच्याशी १०१ % सहमत आहे.
बाकी एक लाखात काय काय म्हणून सुविधा देणार ? ज्यांना वर उल्लेखलेल्या पंचतारांकीत सुविधा हव्या असतील (ए.बी.एस., पॉवर स्टिअरिंग, पॉवर विन्डोज, ए.सी. ,
एअर बॅग्ज इ.)तर त्यासाठी जास्त पैसे मोजायची तयारी ठेवावी. आणि हो जगात अशी कोणती कार आहे जी १ लाखांत एअर बॅगसह येते , ते जरा या वृत्तवाहिनीने सांगितले तर बरे होईल.
टाटा नॅनो ही एका भारतीयाने -भारतीयांसाठी बनवलेली - भारतीय कार आहे. पाश्चात्यांनी आमची चिंता सोडावी.
सही /-
भारतीय बोली - भारतीय बाणा.
2 Mar 2009 - 1:11 pm | मदनबाण
ही कार बाजारात आल्यावर दुचाकी बनवणार्या कंपन्यांची काय भूमिका असेल याचा सध्या विचार करतोय!!! जर १ लाखात कार मिळणार असेल तर दुचाकी वाहनांच्या किंमती उतरतील काय ? रिसेल च्या गाड्या(४चाकी) कोणी घेइल काय ?
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
2 Mar 2009 - 1:55 pm | छोटा डॉन
आता हा माझा विषय आहे म्हणुन विस्तारात थोडी मते मांडतो ...
त्याआधी एक कबुल करतो की "शेतकरी लोकाना जागेसाठी मिळालेला कमी मोबदला व त्यामुळे केलेली निदर्शने आणि या सगळ्यांचा नेनो च्या बाजारातील आगमनावरचा विलंब" ह्या गोष्टींचा कारच्या क्वालिटीशी संबंध नाही त्यामुळे हे विषय चर्चेला घेणे हे सुपारीबाज पत्रकारितेचे लक्षण आहे ...
असो.
१. पाठीमागील सीट-बेल्ट्स , बॉडी मेटल शीट, एअर बॅग्स :
ह्या बाबीशी सहमत आहे. ह्या गोष्टी हव्याच आहेत.भारतात जरी आवश्यक अजुन वापरत नसले तरी "सीट बेल्ट आणि एअर बॅग्ग्स" ह्या गोष्टी मी ह्या क्षेत्रातला माणुस आहे ह्या अनुभवाच्या जोरावर अत्यावश्यक आहेत असे ठामपणाने सांगेन ..
अहो साधी रिक्षाने धडक दिली तर जो जर्क बसेल त्याला पुरुन उरण्यास जी खणखणीत स्टील बॉडी हवी त्या लेव्हलाला "नॅनो" उतरत नाही. शिवाय जर बॉडी व्यवस्थीत मजबुत नसेल तर आतल्या "सस्पेंशन व कंफर्ट" वर सुद्धा बंधने येतात व त्याचे परिणाम आपल्याला वापरात जरुर दिसुन येतील ...
हे सर्व अगदीच थर्डक्लास आहे असे नाही पण ज्या पातळीचे हवे तसे नाही ...
परदेशाचे म्हणाल तर जिथे १५०+ किमी/तास ह्यापेक्षा वेगाने जाणार्या गाड्यात जर सीट बेल्त + एअरबॅग्स नसणे म्हणजे स्वतःहुन तिरडीवर जाऊन बसणे आहे.
शिवाय ह्या स्पीडला कारचे चासी किती टिकाव धरते ही बाबही महत्वाची ...
२. मायलेज :
जरी टाटाने सर्वात कमी ऑईल खाणारी कार असे दावे केले असले तरी इतर भागात वापरलेल्या मटेरियलची क्वालिती, क्लास , त्याचा ऑपरेशनमध्ये उपयोग , होणारे घर्षण आणि त्यामुळे पर्यायाने होणारा अतिरीक्त उर्जेचा वापर ह्यामुळे कार कितपत "बेस्ट मायलेज" देईल अशी शंका आहे.
३. सर्व्हिंसिंग :
वर सांगितल्याप्रमाणे वापरलेले मटेरियल हे "अत्युच्च व अत्यावश्यक दर्जाचे" नसल्याने आपल्याला वारंवार मेकॅनिकची वारी करावी लागनार हे निश्चित ...
४. प्रदुषण :
नॅनो कार ही सध्या असणारे व पुढच्या १० वर्षात येणारे सर्व प्रदुषण मानक ( जगभरातले ) व्यवस्थीत पुर्ण करणारी कार असा दावा करते.
हा विभाग अतिशय खर्चीक असतो.
मुख्यता प्रदुषण ही बाब "फ्युएल इंजेक्शन सिस्टीम, मफलर, कार्ब्युरेटर, सीआरडीआय, एजीआर" ह्या सर्व व इंजिनच्या इतर बाबींचा एकत्रित परिणाम असते.
वरील स्पेअर पार्ट अथवा तंत्रज्ञान बनवणार्या सप्लायर कंपन्या ह्या मर्यादीत असल्याने त्यांची जवळजवळ मोनोपॉली आहे व ही उत्पादने अत्यंत महाग आहेत. अशा परिस्थीती टाटाने ह्या गोष्टी "स्वस्तात" मॅनेज केल्या तरी कशा ? व त्या ही आहे त्या "क्वालिटीच्या" ???
बाकी भारतातील गाड्यांच्या प्रदुषणाच्या चाचणीबद्दल सध्या बोलणे अप्रस्तुत आहे पण हे इतके सहज आणि स्वस्त शक्य नाही असे सांगेन.
५. ड्रायव्हिंग आणि स्पेस कंफर्ट :
अर्थातच पावर स्टिअरिंग, ऑटोमॅटिक गिअर बॉक्स, अत्याधुनीक इंजिन मॅनेजमेंट सिस्टीम नसल्याने कार चालवणे हे इतके "सुलभ" काम नसेल.
परदेशात जर पाठवणार असाल आणि ह्या गोष्टी कारमध्ये नसतील तर जोडे पडतील ...
शिवाय वर सांगितल्याप्रमाणे चासी म्हणावी इतकी मजबुत नसल्याने "सस्पेंशन आणि कंफर्ट" वर बरीच बंधने येतात, त्यामुळे प्रवाशांना कितपत आराम मिळेल हे पहाणे मनोरंजक ठरेल ...
आजकाल व्हॉल्वो अथवा तत्सम तंत्रज्ञानावरच्या अतिशय आरामदायक कार वापरणार्यांना ही "सफर" कितपत आरामदायी आहे हे पहाणे मजेशीर आहे.
असो.
बाकी सवडीने व अजुन विस्ताराने ...
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
2 Mar 2009 - 2:00 pm | पिवळा डांबिस
"सत्यं ब्रूयात, प्रियं ब्रूयात,
न ब्रूयात सत्यंअप्रियं ||
आता खा जोडे!!!!!
:)))))))))))))))))))))
2 Mar 2009 - 2:03 pm | छोटा डॉन
आम्ही फक्त "तांत्रिक मुद्दे" मांडले, त्यावर कोणी वाद घालणार असेल तर अवश्य यावे.
मात्र भारतीय १ लाखाची कार आहे म्हणुन ती सर्वश्रेष्ठ असुन ती उद्या प्युजोट अथवा लुंबार्गिनीच्या १ करोडच्या कारचे मार्केट खाईल असे विधान करत असेल तर मात्र वाद रंजक होईल ;)
------
( तांत्रिक ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
2 Mar 2009 - 2:11 pm | छोटा डॉन
वर मी मांडलेल्या सर्व गोष्टी ह्या "१ लाख किंमत असणार्या बेसीक मॉडेल" च्या तुलनेत व संबंधीत आहेत.
जास्त पैसे दिल्यास अजुन बरेच काही कारमध्ये बसवता येईल पण त्याची किंमत मात्र "गरिबांच्या कार" एवढी राहणार नाही उलट सध्या बाजारात उपलब्ध असणार्या स्वतः टाटांच्या व इतर उत्पादकांच्या लो कॉस्ट व्हर्शनच्या जवळपास येईल ..
मग करा बॉ विचार ...
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
2 Mar 2009 - 2:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
डानराव (का फानराव), १ लाखात तिरडी म्हणजे फार महाग आहे का?
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
2 Mar 2009 - 2:17 pm | छोटा डॉन
अहो पुण्यातल्या रस्त्यांच्या व वाहतुकीच्या कॄपेने तुम्ही फार तर १०-२० किमी/तास ह्या वेगाने गाडी मारु शकाल ...
मग कशाला घाबरताय ?
शिवाय दर ३ मिनीटाला ब्रेक मारणार असाल तर कशाला शॉट लागेल ?
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
2 Mar 2009 - 3:33 pm | मैत्र
नॅनो येऊ द्या की बाजारात. मग रिव्ह्यु करायला तज्ञ लोकांचा पाऊस पडेल.
तेव्हा खरंच काय मटेरिअल वापरलं आहे ते कळेलच.
१. सस्पेंशन आणि कम्फर्ट - मारुती ८०० / अल्टो आणि टोयोटा करोला किंवा उतरत्या भाजणीने होंडा सिटी ह्युंडाई ऍक्सेंट गेला बाजार मारुती स्विफ्ट याशी तरी तुलना होईल का? त्यामुळे ज्या गरजेसाठी आणि सेक्टर साठी (कस्टमर/मार्केट सेगमेंट (मराठी?)) नॅनो बनवली आहे त्याचा विचार करता एअर बॅग्ज हव्यात का? भारतात किती गाड्यांना अगदी प्रिमियम क्लास मध्ये सुद्धा एअर बॅग्ज आहेत? सीट बेल्ट तर आता भारतात सुद्धासर्वत्र बंधनकारक होत आहेत मग त्याशिवाय गाडी विकण्याची परवानगी मिळेल का हा प्रश्नच आहे.
२. दर्जामुळे होणारे घर्षण आणि त्यामुळे होणारे लॉसेस हे खरं आहे. पण जेवढ्या छोट्या इंजिनाची गाडी अजून बनवलीच गेली नाही आहे. त्यामुळे सीसी व बी एच पी चा विचार करता तिचं मायलेज हे थोडंसं बरं असणार आहेच. हे टाटांचं सोयीस्कर मार्केटिंग आहे.
३. सर्व्हिसिंग - हे काही फारसं पटलं नाही. पण टाटा मोटर्सचं प्रत्येक यशस्वी उत्पादन हे सुरुवातीच्या काळात ( लाँच) अत्यंत फेल गेलेले आहे. त्यामुळे हा प्रयोग ही ट्रायल एरर पद्धतीने हळूहळू सुधारत जाईल असं वाटतं :)
४. प्रदुषण - हा विचार करण्या सारखा मुद्दा आहे. फ्युएल सिस्टम्सचा आणि त्यामुळे येणार्या खर्चिक भागांचा विचार करता हे अवघड आहेच. पण जोवर गाडी बाजारात येऊन त्याच्या दर्जाची व सिस्टम डिझाईन ची माहिती मिळत नाही तोवर काहीच विधान करता येणार नाही.
५. पॉवर स्टिअरिंग सोडता इतर कुठल्या गोष्टिमुळे कार चालवणं सुलभ होणार नाही?
नॅनो परदेशात विकण्याच्या दर्जाची आहे असं कुठे म्हटल्याचं वाचलं नाही. इतक्या स्वस्तातली गाडी ही या दर्जाची नसावी.
किंमत कमी ठेवण्यामागे काही अर्थकारणाचा मोठा वाटा आहे -
१. सप्लाय चेन - एका जागेत सर्व भाग बनतील किंवा येतील. अगदी ट्रकच्या फेर्या सुद्धा किती लागतील व किती पैसा आपल्याच प्लँट मधल्या वाहतुकीत वाचवता येईल इतका विचार करून कमी केलेली कॉस्ट.
२. बांधून घेतलेले सप्लायर्स व त्यातून कमी केलेली किंमत. कमिटेड खरेदी च्या जोरावर भाग पुरवणार्यांकडून कमी किंमतीत खरेदी.
३. असंख्य सरकारी फायदे. गुजरात सरकारने दिलेले जास्तीचे फायदे सोडता प्रचंड टॅक्स बेनिफिट्स.
४. लक्झरीच्या गोष्टींना फाटा - पंधरा वर्षापूर्वीची मारुती व आजच्या छोट्या गाड्या यात जो फरक आहे त्या गोष्टी कमी. रंग, मेटॅलिक, बंपर्स, दिवे, डॅशबोर्ड मधल्या सोयी व सुविधा अशा अनेक गोष्टी बाजूला ठेवल्या आहेत.
अगदी मूळ मॉडेल हे सुमारे १.२ ते १.३ पर्यंत येईल. व एसी, पॉवर स्टिअरिंग इ> सोयी जशा वाढत जातील तशी किंमत वाढत जाईल. मूलभूत डिझाईन, इंजिन व गिअर बॉक्स चं डिझाईन व दर्जा यावर बरंच काही यश अवलंबून राहील.
या बाबींपेक्षाही शेकडो नॅनो रस्त्यावर आल्यावर एक दोन वर्षात वाहतुकीची जी काही भयाण अवस्था होईल त्याचा विचार मला प्रचंड अस्वस्थ करतो आहे.
2 Mar 2009 - 9:24 pm | नितिन थत्ते
नॅनोचे इंजिन ६००-६५० सी सी चे आहे. त्यावर ए. सी., पॉवर स्टेरिंग वगैरे कोठून येणार.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
3 Mar 2009 - 1:46 am | हरकाम्या
महाराज आपणही " छोटा डॉन " नामक प्राण्याच्या वंशातले दिसता.
आपण वाहतुकीची फारच काळ्जी करता राव .सध्या परदेशी गाड्या येताना आपले रस्ते
घेउन येतात का ? मी तरी अजुन मर्सिडीजने आपल्या बरोबर आणलेला रस्ता पाहिला नाही.
कदाचित ऑडीने रस्ता आणलेला असावा.
आपण फारच काळजी करता बुवा.चिंता करु नका राव उगीच खंगत जाल .
2 Mar 2009 - 1:59 pm | अमृतांजन
नॅनो ही बजाजच्या रिक्षापेक्षा स्वस्त पडेल त्यामुळे त्यांची जागा नॅनो घेतील असे वाटते.
ज्यांना बायको आणि दोन मुले घेउन दुचाकीवरुन जावे लागते त्यांना हा एक चांगला पर्याय आहे. त्या याहुच्या मुर्ख बातमीदाराला हे वास्तव माहीत नसावे.
2 Mar 2009 - 2:54 pm | अमोल खरे
मस्त लेख आहे. तुझी मास्टरी खूप आहे रे ह्या क्षेत्रात. माझा ह्या विषयात काही अभ्यास नाही. पण टाटा समुहाने नॅनो बनवतान ह्या सर्व गोष्टींचा विचार केला असेल असे वाटते. कार मार्केट मध्ये आल्यावर गोष्टी क्लिअर होतीलच.
आणखीन एक : नॅनो घेणा-यांकडे लोक कोणत्या नजरेने बघतील ते सुद्धा महत्वाचे आहे. आजही एखादयाने मारूती ८०० घेतल्यावर लोक त्या माणसाकडे " गाडी ची हौस तर आहे पण परवडत नाही म्हणून ८०० घेतली" असे म्हणतात. नॅनो बद्दल काय म्हणतील कोण जाणे.
2 Mar 2009 - 3:18 pm | शेखर
>>आणखीन एक : नॅनो घेणा-यांकडे लोक कोणत्या नजरेने बघतील ते सुद्धा महत्वाचे आहे. आजही एखादयाने मारूती ८०० घेतल्यावर लोक त्या माणसाकडे " गाडी ची हौस तर आहे पण परवडत नाही म्हणून ८०० घेतली" असे म्हणतात. नॅनो बद्दल काय म्हणतील कोण जाणे.
अशा लोकांना फाट्यावर मारावे. लोक काय पैसे देणार आहेत का मारूती ८०० का नॅनो घ्यायला?
शेखर
2 Mar 2009 - 3:24 pm | अमोल खरे
सहमत.
3 Mar 2009 - 1:52 am | हरकाम्या
शेखर भाऊ " या बाबतीत तुमच आमच जमल " बर का.
अशा लोकांबाबत " गेले टोकावर " हीच भूमिका योग्य.
2 Mar 2009 - 3:16 pm | छोटा डॉन
>>पण टाटा समुहाने नॅनो बनवतान ह्या सर्व गोष्टींचा विचार केला असेल असे वाटते.
+१,
अतिशय महत्वाचे वाक्य आहे हे ...
कारण ह्याच वेळी "जी एम व टोयोटा" सारख्या जायंट्सनी एवढ्या कमी किमतीत "चांगली कार" बनणे शक्य नाही असे सांगुन ही १ लाखाची योजना फेटाळली होती. त्यांच्या अत्यावशय्क सुविधांसगटच्या कमीत कमी किमती २.२५ ते २.४५ लाखांच्या आसपास होत्या व ते ही त्यांच्या नेहमीच्या क्वालिटीशी तडजोड करुन ...
बजाजचा पार्टनर "रेनॉल्ड्स" म्हणतात की १ लाख रु. किंमत हे अविश्वसनीय व अयोग्य आहे.
फोक्सवॅगन आणि होंडाने सुद्धा ह्यात मारले पण "१ लाख" ही किंमत कसल्याही प्रकारे गाठणे अशक्य असल्याने त्यांनी "सध्यातरी व तात्पुरते" हे प्रोजेक्ट्स बंद केले आहेत ...
आता जर टाटाने विचार केला असेल तर विक्रीपश्चात २-३ वर्षातले पर्फॉरमन्सचे आकडे सर्व काही सांगुन जातील ...
तोवर तरी "लाख-सव्वा लाखाची मुठ" ही झाकलेली राहिल ह्यात वाद नाही...
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
2 Mar 2009 - 3:37 pm | अमोल खरे
तुझी मेजर कॉस्ट जाहिरात, डिलर्स चे कमिशन ह्यात वाढते. काही सेकंदाच्या जाहिराती साठी काही लाख रुपये मोजावे लागतात व ती जाहिरात दिवसातून अनेक वेळा रिपिट करावी लागते. जर टाटा ने ह्या दोन गोष्टी टाळल्या ( जसे- प्रेस कॉन्फरन्स मध्ये घोषणा करणे.......( जाहिरात नको........सर्व लोकांना कळले कि नॅनो कधी येणार ते ) व स्टेट बँकेत अर्ज स्विकारणे. ( डिलर चे कमिशन वाचले. ) तर थोडासा प्रॉफिट कमी करुन व सेल्स वाढवुन नफा कमवता येईल असे वाटते.
कळेलच काय होते ते. तो पर्यंत नॅनो न घेणे श्रेयस्कर असे माझे वैयक्तिक मत आहे.
3 Mar 2009 - 1:55 am | हरकाम्या
अमोलभाऊ आपण फारच विचार करता राव.
2 Mar 2009 - 9:24 pm | प्रकाश घाटपांडे
नॅनो विषयी चाणक्य ने सुरु केलेली चर्चा आपल्याला इथे पहाता येईल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
3 Mar 2009 - 1:34 am | हरकाम्या
मला ह्या छोटा डॉन नामक प्राण्याच्या बुध्दीची कीव करावीशी वाट्ते . हा प्राणी टी वी.
अजिबात पाहत नसावा असे वाट्ते. कारण रतन टाटांनी सर्व शंकांचे निरसन अतिशय
उत्तमपणे केले होते त्यावेळी हा प्राणी काहीतरी वेगळेच पहात असला पाहिजे.
3 Mar 2009 - 7:08 am | छोटा डॉन
हरकाम्या नावाच्या प्राण्याची ... सॉरी सॉरी .. पोर्याची मलासुद्धा कीव करावीशी वाटते.
माझ्या किंवा इतर कुणाच्याही "तांत्रिक मुद्द्यांचे" उत्तर न देता आपण व्यक्तीगत आणि वैयक्तीक पिंका टाकुन आपली बौद्धिक दिवाळखोरी जाहीर केलीत. बाकी आपल्यासारख्या "काही वेळासाठी" उगवणार्या टिकाकारांविषयी आम्हाला नेहमीच गंमत वाटत आली आहे, कारण एकतर समोरासमोर मुद्द्यांवर उत्तर द्यायची ताकद नाही अथवा वाद घालण्याची हिंमत नाही, मग करा असले पालथे धंदे, काय बरोबर ना ?
असो. आता जास्त बोलत नाही ...
समजा असे गॄहीत धरु की मी टीव्ही पहात नाही अथवा काहीच बाहेरचे वाचत नाही व काल्पनिक माहिती देतो.
मग आता आपण "विश्वसर्हनीय आणि पक्की माहिती" देण्याही कॄपा कराल काय ? का नुसत्या अशाच मतांच्या पिंका टाकत राहणार ?
बाकी बाबे आपण सदोहरण स्पष्ट केल्या व मला पटल्या तर मी माझी विधाने मागे घेईन. मी "ह्याच क्षेत्रातला" असल्याने मला पटणे हे महत्वाचेच आहे. येऊ द्या मग ...
------
( भेकड बौद्धिक दिवाळखोरांना एंजॉय करणारा ) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
3 Mar 2009 - 3:24 pm | बाप्पा
डोन भाउ जाउदेतना.... पण टाटा हे नॅनो अशा लोकांसाठी आणत आहेत जे दुचाकी वापरतात आणी ज्यांचे कार घेण्याचे स्वप्न आहे. म्हणुन या कार मधे आपण इतर सोयींचा विचार न करणेच योग्य. ज्यांना पॉवर स्टेअरींग व इतर गोष्टी हव्या आहेत त्यांना भरपुर पर्याय उपलब्ध आहेत बाजारात...
-- बाप्पा लंबोदर.
3 Mar 2009 - 3:27 pm | छोटा डॉन
>>पण टाटा हे नॅनो अशा लोकांसाठी आणत आहेत जे दुचाकी वापरतात आणी ज्यांचे कार घेण्याचे स्वप्न आहे. म्हणुन या कार मधे आपण इतर सोयींचा विचार न करणेच योग्य.
+१.
अगदी बरोबर व विनाअट मान्य ...
आमचे हेच म्हणणे आहे ...
ही "गरिबांची कार" आहे व त्याने बर्याच जणांचे स्वप्न पुर्ण होणार आहे हे नक्की व त्याचे आम्हाला कौतुक आहे.
पण ह्यामुळे बाकीच्यांचे मार्केट डाऊन होईल, परदेशात हीट होईल ह्या भितीने कारस्थान करुन टिका केली जाते वगैरे फालतु वक्तव्यांना आम्ही विरोध करतो.
बाकी आम्हाला टाटा व नॅनोचे कौतुक आणि अभिमान आहेच ...
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
3 Mar 2009 - 9:27 pm | टायबेरीअस
जे लिहिले आहे ते खरेच आहे. टाटा ना निर्यात करायची असेल तर वेगळे माडेल आणावे लागेल बाजारात.. सगळे फिचर्स असलेले..
4 Mar 2009 - 6:42 am | विद्याधर३१
जिनिव्हा मोटर शो मध्ये टाटांनी नवी नॅनो युरोपा प्रदर्शित केली.
हा पहा प्रेस रीलीज.
Tata Nano Europa, for future launch in international markets,
displayed at 79th Geneva Motor Show
Tata Motors today presented at the 79th Geneva Motor Show the Tata Nano Europa, intended for a future launch in select international markets. The company has also displayed the Tata Prima, a concept luxury sedan, and the Tata Indica Vista EV, an electric vehicle based on the award-winning new generation Tata Indica Vista.
Speaking on the occasion at the Geneva Motor Show, Mr. Ratan N. Tata, Chairman of Tata Sons and Tata Motors, said, “In India, the Nano will be launched on March 23, and the cars will be on display at company dealerships from the first week of April. The Nano has also generated wide interest in developed countries, since its unveiling in Delhi and its presentation here last year. We are delighted to present the Nano Europa for future launch in such markets. The Indica Vista EV represents the work of Tata Motors on alternate technologies, while the Prima is an iteration of a luxury sedan we will introduce. They together signify the ongoing evolution in our cars.”
Tata Nano Europa
With a length of 3.29 metres and width of 1.58 metres, the Tata Nano Europa continues to be stylishly petite but surprises with its spacious interior and generous leg space. The slightly longer wheelbase of 2.28 metres combines excellent space and manoeuvrability, further improving on the benchmark standard set by the Tata Nano. The enhanced spaciousness is complemented by redesigned interiors, marked by smooth curves and a high tech yet gentle feel.
To meet the driving needs of its target customers, the Tata Nano Europa will be powered by a 3-cylinder sporty all-aluminium MPFI engine matched with a 5-speed automatic transmission, and electric power steering. The gasoline engine will be class-leading, providing high fuel efficiency and low CO2 emission of less than 100 gm / km meeting the twin goals of being environmentally friendly and stylish – just like the Tata Nano.
The Tata Nano Europa meets all safety regulations. In addition to the all sheet-metal body, its energy absorbing design, use of advanced restraint systems, ABS, ESP and Air Bags will enhance passenger safety.
Just like the Tata Nano, the Tata Nano Europa incorporates exterior compactness with interior comfort and seeks to provide motorists the pleasure and utility of personal mobility combined with affordability and environment-friendliness, in a world where smaller, fuel-efficient cars are emerging as a preferred choice