जिनोम व आरोग्य

अमृतांजन's picture
अमृतांजन in काथ्याकूट
2 Mar 2009 - 8:59 am
गाभा: 

काल जिनोमवर चाललेले संशोधन आणि त्याचा वैज्ञानिकांनी जोडलेला आरोग्याशी संबंध ह्या बद्दल एक डॉक्युमेंटरी पाहिली. त्यात सांगितल्याप्रमाणे मानवाला भविष्यात त्याला होऊ शकणारे गंभीर विकार जिनोमच्या तक्त्यावरुन सहज समजु शकतील.

सध्या जेव्ह्ढी माहिती जिनोम बद्दल आहे, त्यावरुन असे निश्चित्पणे सांगता येते की, ती व्यक्ति कशी असेल, तसेच शरीरयष्टी, दिसणे, आनुवांशिकतेतुन येणारा प्रगतपणा, बुद्धी (स्मरणशक्ती), ई. ही स्पष्टपणे (ओळखता) सांगता येते.

मला वाटते की, हे संशोधन आणखी पुढे गेल्यावर असे समजेल की, मानवात ३६ गुण असतात जे मोजले की, त्याचा जिनोम बाहेरुनच पाहता येतो.

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

3 Mar 2009 - 5:46 pm | शैलेन्द्र

"काल जिनोमवर चाललेले संशोधन आणि त्याचा वैज्ञानिकांनी जोडलेला आरोग्याशी संबंध ह्या बद्दल एक डॉक्युमेंटरी पाहिली."
डॉक्युमेंटरीत काहि गोष्टी ओवर सिंपलिफाइड करुन सांगतात हो,

"त्यात सांगितल्याप्रमाणे मानवाला भविष्यात त्याला होऊ शकणारे गंभीर विकार जिनोमच्या तक्त्यावरुन सहज समजु शकतील. "
सगळ्या जीन्सचा विवक्षीत मांडणी केलेला समुह म्हणजे जिनोम. तो थोडासा आई वडीलांवरुन काढता येतो, पण खरी रीअरेंजमेंट जीवपेशी तयार झाल्यावर लक्षात येते.

"सध्या जेव्ह्ढी माहिती जिनोम बद्दल आहे, त्यावरुन असे निश्चित्पणे सांगता येते की, ती व्यक्ति कशी असेल, तसेच शरीरयष्टी, दिसणे, आनुवांशिकतेतुन येणारा प्रगतपणा, बुद्धी (स्मरणशक्ती), ई. ही स्पष्टपणे (ओळखता) सांगता येते."

अस काहीही निश्चित्पणे सांगता येत नाही. जिन्स असणे हा केवल एक भाग झाला. त्याचे सगळे सप्रेसर्स आणि स्टिम्युलेटर्स अजुन माहित नाही. शरीरयष्टी, दिसणे या गोष्टी बर्‍याचदा पर्यावरण सापेक्षही असतात. आनुवांशिकतेतुन येणारा प्रगतपणा, बुद्धी (स्मरणशक्ती), ई. ही स्पष्टपणे कधीही सांगता येत नाही.

शैलेन्द्र's picture

3 Mar 2009 - 5:49 pm | शैलेन्द्र

"मला वाटते की, हे संशोधन आणखी पुढे गेल्यावर असे समजेल की, मानवात ३६ गुण असतात जे मोजले की, त्याचा जिनोम बाहेरुनच पाहता येतो."
हे ग्रह तार्‍यांचे गुण कि व्यक्तीचे? बाकी फीनोटाइपवरुन जिनोटाइप नक्कि सांगता येतो.