भारतरत्न, सर, नाईटहूड किताबांबद्दल काही ..........

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in काथ्याकूट
22 Jan 2008 - 5:21 pm
गाभा: 

नव्या वर्षाच्या प्रारंभाबरोबरच काही नव्या गोष्टींची चर्चा सूरू होते. पण आज मला एका वेगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करू वाटते ती म्हणजे वेगवेगळे पूरस्कार, ते मिळवणार्‍या व्यक्ती, त्यांचे निकष, समाजावर त्यांचा प्रभाव व समाजाला त्यांच्यापासून मिळणारी प्रेरणा व होणारा फायदा.........

गेल्या २-४ दिवसापासून "सचिन तेंडूलकरला" भविष्यात दिल्या जाणार्‍या "सर किंवा नाईटहूड" सन्मानाबद्दल मिडियात चर्चा चालू झाली आहे ....
मग यात हा पूरस्कार मिळवणार्‍या ईतिहासातिल व्यक्ती, त्यांचे कर्तूत्व, समाजावर त्यांचा प्रभाव यासारख्या अनेक गोष्टींवर काथ्याकूट झाला. मग "सचिन" त्यासाठी कसा योग्य आहे अथवा नाही हे ठरवण्यासाठी अनेक परिसंवाद झडले. मग यातून अजून एक सूर निघाला की सचिनने हा पूरस्कार स्वीकारू नये कारण हा पूरस्कार ब्रिटिष संघराज्यातिल देशात राहणार्‍या लोकांसाठी आहे, म्हणून स्वतंत्र भारतात राहणार्‍या सचिनने तो स्विकारू नये .....

[ अवांतर : दिलिपकूमारच्या "निशान-ऍ- पाकीस्तान" च्या वेळी हाच गदारोळ ऊडाला होता .............]

***ह्या लेखाचा महत्वाचा उद्देश म्हणजे "भारतरत्न" पूरस्काराच्या निमित्ताने ऊडालेला गदारोळ.***
* लालक्रिष्ण आडवाणींनी यावर्षी हा पूरस्कार " वाजपेईंना " दिला जावे असे एक विधान करून एका नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. यानिमिताने "वाजपेई" यांचे लहानपणापासून देशाला वाहून घेतलेले जिवन, त्यांनी केलेला त्याग, त्यांची जनमानसातिल प्रतिमा, लोकांवर प्रभाव, संघातील घडणीमुळे जपली गेलेली कठोर राष्ट्रनिष्ठा यासारख्या अनेक मुद्द्यांचा उहापोह झाला. काही "कट्टर भाजपा" वाल्यांनी " कॉग्रेस" सरकार वाजपेईंना हा पूरस्कार देणार नाही असे विधान करून नव्या वादाला तोंड फोडले, स्वता वाजपेईनी आपण या साठी योग्य उमेदवार नसल्याचे जाहीर केले. त्यातच ज्यांची " गल्लीभूषण" पूरस्कार सुध्धा मिळवण्याची लायकी नाही अशा अर्ध्या हळकूंडात पिवळ्या झालेल्या लोकांनी यावर दिलेली प्रतिक्रीया व त्यातून उडालेला गोंधळ अशी अनेक नाट्ये घडली ........

* त्यातच "बाळासाहेब ठाकर्‍यांचे" नाव या पूरस्काराच्या शर्यतीत आल्यामुळे या विषयाला नवे वळण मिळालेले आहे. जर कर्तूत्व, व्यासंग, धडाडी, देशनिष्ठा हे जर पूरस्काराचे निकष असतील तर यासाठी बाळासाहेंबांसारखी व्यक्ती आजच्या घडीला अख्ख्या देशात नाही. मी तर असे म्हणेन की यामुळे या पूरस्काराची शान वाढेल. [ बाळासाहेब हे भारतरत्न पूरस्कारापेक्षा मोठे आहेत असे मला म्हणायचे नाही.]
पण पून्हा एकदा त्यांची निर्भीड शैली व कट्टर हिंदूत्वाचा इतिहास हा यामार्गी अडथळा बनण्याची शक्यता आहे. तसे पाहता आयूष्यात स्वता एकही पद न स्वीकारणारे बाळासाहेब हा पूरस्कार स्वीकारणाची शक्यता कमीच आहे.
त्यांना त्यांची "हिंदूह्रिदयसम्राट" ही उपाधी कोठल्याही पूरस्कारपेक्षा मोठी व प्रिय वाटत असल्यास त्यात काही नवल नाही.......

काही वर्षापूर्वी "अमिताभला" हा पूरस्कार द्यावा अशी कोणीतर गूंडी सोडून दिली होती..................

या निमित्ताने असे पूरस्कार कोणाला मिळावेत [ राजकारणी, शास्त्रज्ञ, समाजसेवक, कलाकार, अभिनेते की आणखी कोणी ???] , पूरस्कारांचे निकष, निवडीची पध्दत यासारख्या अनेक मुद्द्यांचा उहापोह "मिपा" च्या मंचावर व्हावा अशी माझी ईच्छा आहे ...........

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

22 Jan 2008 - 5:52 pm | विसोबा खेचर

या निमित्ताने असे पूरस्कार कोणाला मिळावेत [ राजकारणी, शास्त्रज्ञ, समाजसेवक, कलाकार, अभिनेते की आणखी कोणी ???] , पूरस्कारांचे निकष, निवडीची पध्दत यासारख्या अनेक मुद्द्यांचा उहापोह "मिपा" च्या मंचावर व्हावा अशी माझी ईच्छा आहे ...........

स्वरभास्कर, पद्मविभूषण पंडित भीमसेन गुरुराज जोशी यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालाच पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे!

आमच्या अण्णांनी खर्‍या अर्थाने हिंदुस्थानी अभिजात संगीत अक्षरश: त्रिखंडात पोहोचवले.

१९५२ साली सवाई गंधर्व महोत्सव सुरू करून, त्यात भारतातल्या उत्तमोत्तम गवयांची/गायिकांची गाणी करून गेली पन्नासहून अधिक वर्ष भारतीय रसिकांना अखंड स्वरस्नान घडवले! १९५२ साली लावलेल्या या रोपट्याचा वेलू आज गगनावेरी गेला आहे हे सांगणे न लगे!

'स्वरभास्कर' ही उपाधी खरोखरंच ज्यांना शोभून दिसावी असे अण्णांचे व्यक्तिगत गायन आणि सवाई गंधर्व संगीत महोत्सव हे हिंदुस्थानी अभिजात संगीतात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावे असे मानाचे पान आणि त्यात आमच्या अण्णांचे अनन्यसाधारण योगदान, हे निकष माझ्या मते अण्णांना 'भारतरत्न' हा पुरस्कार देण्यास पुरेसे आहेत!

भारतीय अभिजात संगीताच्या या अध्वर्यूला माझा मानाचा मुजरा!

अण्णांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाल्याचे ज्या दिवशी जाहीर होईल त्या दिवशी माझ्या घरी दिवाळी असेल!!

आपला,
(कट्टर भीमसेनभक्त) तात्या अभ्यंकर.

चतुरंग's picture

22 Jan 2008 - 7:17 pm | चतुरंग

खरं तर या आधीच तो मिळायला हवा होता असं मला वाटतं.
आण्णांच्या शास्त्रीय संगीताबरोबरच 'अभंगवाणीने' सामान्य रसिकांना जे काही दिले आहे त्याची तुलना बसल्याजागी पंढरीची वारी घडवून आणण्याशीच होईल!
अभंगवाणीच्या त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्यक्ष विठोबा सुध्दा पंढरी सोडून ऐकायला येऊन बसत असेल!
ह्या 'सिध्द्स्वर' गानसूर्याला तो किताब देऊन, त्या किताबाची उंची लवकरात लवकर वाढावी हीच विठूचरणी प्रार्थना!!

चतुरंग

पिवळा डांबिस's picture

24 Jan 2008 - 12:38 am | पिवळा डांबिस

भीमसेन अण्णांची निवड उचित आहेच!

आणखी नांवे सुचवायची तर.....
मी बाबा आमटे यांचे नांव सुचवीन. बाबांच्या कार्याची माहिती या संकेतस्थळावर करुन देण्याची गरज नाही. त्यांचे नांव माहीत नसलेला मराठी माणूस असणार नाही.
इथे सुचवलेले सर्व लोक महान आहेतच परन्तू मला त्यांच्यात व बाबांमध्ये एक फरक जाणवतो की इतर सर्वांनी त्यांची कला, बुद्धि आपल्या उपजिविकेचे साधन म्हणून वापरली. त्यातून अर्थप्राप्तीहि केली (अर्थात त्यात गैर काहीही नाही) पण बाबांचे मोठेपण हे की त्यांनी भरपूर प्राप्ती असलेला वकिलीचा व्यवसाय सोडून महारोग्यांची सेवा केली. बाबांना भारतरत्न देण्याने त्या पुरस्काराचा सन्मान होईल.

(नम्र) पिवळा डांबिस

इनोबा म्हणे's picture

24 Jan 2008 - 12:44 am | इनोबा म्हणे

अगदी बरोबर,अशा निस्वार्थी लोकांना हा पुरस्कार मिळणे हा खरे तर त्या पुरस्काराचाच सम्मान म्हणायला हवा. बाबांच्या कार्यापासून नव्या पिढीला काही प्रेरणा मिळेल.

(बाबांचा भक्त) -इनोबा

चतुरंग's picture

24 Jan 2008 - 1:05 am | चतुरंग

बाबांचं नाव माझ्या डोळ्यांसमोर आलं नाही ह्याची मला लाज वाटते!

भीमण्णांइतकेच तेही ह्या पुरस्काराचे सार्थ मानकरी ठरु शकतात.

चतुरंग

सुनील's picture

23 Jan 2008 - 1:23 am | सुनील

मग यातून अजून एक सूर निघाला की सचिनने हा पूरस्कार स्वीकारू नये कारण हा पूरस्कार ब्रिटिष संघराज्यातिल देशात राहणार्‍या लोकांसाठी आहे, म्हणून स्वतंत्र भारतात राहणार्‍या सचिनने तो स्विकारू नये .....

हा पुरस्कार केवळ ब्रिटिश संघराज्यातील देशात (तुम्हाला युनायटेड किंगडम म्हणायचे आहे असे मी गृहित धरतो) राहणार्‍यांसाठीच आहे असे नाही. हा पुरस्कार जगातील कोणत्याही व्यक्तीस दिला जातो. राष्टकूलातील (कॉमनवेल्थ) देशांतील नागरीक, हा पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या नावापूर्वी (केवळ आडनावापूर्वी नव्हे), "सर" ही पदवी लावू शकतात. राष्ट्रकूलाबाहेरील नागरीक त्यांच्या संपूर्ण नावानंतर "O.B.E." अशी आद्याक्षरे लावू शकतात. OBE = Order of British Empire

न्यू यॉर्कचे माजी महापौर रुडॉल्फ गिलियानी यानींदेखील हा पुरस्कार स्वीकारला आहे.

सचिनला हा मिळाला तर त्यात गैर किंवा कमीपणाचे काहीही नाही.

यापूर्वी कधीही भारतरत्न या पुरस्काराची अशी जाहीर चर्चा झाली नव्हती. अडवानी यांनी एक अत्यंत क्षूद्र असे राजकारणच केले असे माझे स्पष्ट मत आहे! त्याची कारणे काहीही असोत.

गेल्या कित्येक वर्षात हा पुरस्कार दिला गेला नव्हता तेव्हा अजून काही वर्षे तो न दिल्याने काही फरक पडणार नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश's picture

23 Jan 2008 - 1:58 am | ऋषिकेश

सचिनला हा मिळाला तर त्यात गैर किंवा कमीपणाचे काहीही नाही.
सहमत!

यापूर्वी कधीही भारतरत्न या पुरस्काराची अशी जाहीर चर्चा झाली नव्हती. अडवानी यांनी एक अत्यंत क्षूद्र असे राजकारणच केले असे माझे स्पष्ट मत आहे! त्याची कारणे काहीही असोत.

अगदी सहमत!!

अभिज्ञ's picture

27 Jan 2008 - 3:43 pm | अभिज्ञ

मंला असे वाटते कि अडावाणी यानि जे काहि केले आहे ते अत्यन्त योग्य असेच आहे.
अन्यथा कोन्ग्रेस्स ने त्यन्च्या मर्जिमधल्या कोनला तरि हा पूरस्कार दिला असता.

पिवळा डांबिस's picture

24 Jan 2008 - 12:15 am | पिवळा डांबिस

यापूर्वी कधीही भारतरत्न या पुरस्काराची अशी जाहीर चर्चा झाली नव्हती. अडवानी यांनी एक अत्यंत क्षूद्र असे राजकारणच केले असे माझे स्पष्ट मत आहे! त्याची कारणे काहीही असोत.

नाहीतर काय! यालाच "म्हातारपणात चळ लागणे " असे म्हणतात!!
अगोदरच आदर बाळगण्याजोग्या संस्था हळुहळु कमी होत चालल्या आहेत.
अडवाणींकडुन यापेक्षा जास्त परिपक्वतेची अपेक्षा होती.
आणि निघाले आहेत पंतप्रधान व्हायला!!!

(संतप्त) पिवळा डांबिस

प्राजु's picture

23 Jan 2008 - 8:48 am | प्राजु

सचिनला हा मिळाला तर त्यात गैर किंवा कमीपणाचे काहीही नाही.

- मी ही सहमत..

यापूर्वी कधीही भारतरत्न या पुरस्काराची अशी जाहीर चर्चा झाली नव्हती. अडवानी यांनी एक अत्यंत क्षूद्र असे राजकारणच केले असे माझे स्पष्ट मत आहे! त्याची कारणे काहीही असोत.

खरंतर कोणत्याही राजकारणी (आजच्या) माणसाला हा पुरस्कार देऊ नये.

त्यापेक्षा तात्या म्हणतात तसे स्वर भासकारांना द्यावा. तेच अधिकारी आहेत याचे.

- प्राजु

"त्यापेक्षा तात्या म्हणतात तसे स्वर भासकारांना द्यावा. तेच अधिकारी आहेत याचे."
आम्ही सुध्धा हेच म्हणतो ......

पण हा पूरस्कार जर "संगीतमार्तंड पंडीत जसराज " यांना मिळाला तर तात्या म्हणतात त्याप्रमाणे आमच्याकडे दिवाळी, ईद आणि ख्रिसमस असा तिहेरी आनंदोत्तसव साजरा होईल ...........

सुधीर कांदळकर's picture

27 Jan 2008 - 4:00 pm | सुधीर कांदळकर

त्रिखंडात भारताचे झेंडे ऊंचावले आहेत? वाजपेयीचे जे काही कार्य आहे ते पक्षातीत वा निव्वळ देशासाठी नाही. केवळ सरकार पाडण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षनेते असतांना गोंधळ घालून त्यांनी संसदेचे किती तास फुकट घालवून भारताच्या सर्वजनिक पैशांची उधळपट्टी केली ते आठवा. तसेच अंमली पदार्थ ज्याच्याकडे सापडले म्हणजेच ज्याच्याविरूद्ध दखलपात्र गुन्हा दाखल आहे अशा मुलाबद्दल केवळ तो त्यांच्या पक्षाच्या राजकीय पुढा-याचा मुलगा म्हणून 'होते चूक कधी कधी' अशी टिप्पणी करणा-यांना मुळीच राष्ट्रीय पुरस्कार देऊं नये. पं. भीमसेनजीबद्दल मते योग्य आहेत.

सर हा किताब ब्रिटिश सरकार देते. भारतीय नागरिकाला किताब देणारे ब्रिटिश कोण लागून गेले. हा किताब सचीनने स्वीकारणे हा त्या किताबाचा बहुमान होईल. परंतु आपल्या देशाच्या सर्वभौमत्वाला ते धरून होणार नाही. तसा किताब द्यायचा झाल्यास ब्रिटिश सरकारने भारत सरकारची परवानगी घेतली पाहिजे. परंतु स्वतःला श्रेष्ठ समजणारे ब्रिटिश परस्पर एखाद्या व्यक्तीला तो देतात. हे बरोबर नाही. भारत सरकारची रीतसर परवानगी जर ब्रिटिश सरकारने मागितली आणि आपल्या संसदेने जर ती दिली तरच सचीनने तो पुरस्कार घेणे योग्य होईल.

छोटा डॉन's picture

29 Jan 2008 - 1:34 pm | छोटा डॉन

मिडियामध्ये व जनमानसात चललेल्या "भारतरत्न" पूरस्कारच्या चर्चेला सरकारने यावर्षी एकही "भारतरत्न " जाहीर न करून पूर्णविराम दिला आहे....
अंदाजे गेल्या ४-५ वर्षापासून हिंदूस्थानच्या जनतेला एकसुध्धा "भारतरत्न " सापडला नाही व यावर्षी सुध्धा ही प्रथा कायम राहिली याबद्दल अस्वस्थ वाटत आहे . खरच आजच्या काळात कोणीसुध्धा या पूरस्काराला लायक नाही का ही पूरस्कार देणारे सरकार योग्य व्यक्ती शोधायला नालायक ठरले ह्याची चर्चा होणे महत्वाचे आहे.....
यानिमित्ताने याविषयाचा घेतलेला मागोवा तुम्ही "दैनिक सामनाच्या दि. २८ च्या अग्रलेखात " वाचू शकता .....

अस्वस्थ आणि नाराज [ छोटा डॉन ]