कधी ही, किती ही , कुठे ही भुक लागल्यावर हमखास पोट भरणारा पण सगळ्यात कठीण (करायला. खायला नाही) पदार्थ.
त्यामुळे हे गाईड समस्त मिपाकरां ना समर्पीत.
(कुठे ही अश्या साठी की आत्त्ताच आलेल्या बातमी नुसार मिपाकर केवळ पृथीतलावर न्हवे तर पार वैकुंठापर्यंत पसरलेले आहेत.)
कच्चा माल :
४ ब्रेड स्लाइस. १ काकडी, १ टोमॅटो, १ मोठा उकडलेला बटाटा, १ कांदा , लोणी / बटर , बीट (असल्यास / आवडत असल्यास) , हिरवी चटणी (हीची पाकृ. पुढच्या वेळी.), मीठ/चाट मसाला.
यत्ता पयली :
ब्रेडच्या कडा कापून टाका.
यत्ता दुसरी :
ब्रेडच्या स्लाईसला सढळ हस्ते लोणी / बटर चोपडा.
यत्ता तिसरी:
ब्रेडच्या स्लाईसला चटणी फासा.
यत्ता चौथी:
लोणी/चटणी फासलेल्या ब्रेडवर काकड्या अंथरा आणि वरुन किंचीत मीठ /चाट मसाला भुरभुरा.
यत्ता पाचवी:
काकडीवर टोमॅटोचा थर लावा वरुन किंचीत मीठ /चाट मसाला भुरभुरा.
यत्ता सहावी :
टोमॅटोवर उक्डलेल्या बटाट्याच्या चकत्यांचा थर लावा व वरुन किंचीत मीठ /चाट मसाला भुरभुरा.
यत्ता सातवी:
उकडलेल्या बटाट्याच्या चकत्यांवर कांद्याच्या चकत्या रचा. (लै कांदा टाकुनका राव. काय व्हइल ते सांगाया नग.)
यत्ता आठवी:
तर असे एका वर एक थर रचुन झाले किंवा तुमच्या घरातल्या सगळ्या भाज्या संपल्या की मग वरुन परत एक ब्रेड ची लोणी/चटणी फासलेली स्लाइस उपडी ठेवा.
यत्ता नउवी:
साधारण तोंडात एका वेळी एक मावेल इतक्या आकारचे तुकडे करा.
यत्ता मॅट्री़क:
राव वाट कसली पहता आता उचला नी टाका तोंडात. जय हो.....
प्रतिक्रिया
2 Mar 2009 - 4:26 am | भाग्यश्री
वाह सही आहे एकदम!!
मी यात सढळ हस्ते कोथिंबीर्/पुदीना चटणी आणि मेयॉनिज टाकते... अफ्फ्लातून लागतं ते सँडविच!!
http://bhagyashreee.blogspot.com/
2 Mar 2009 - 5:12 am | पक्या
सचित्र कृती छान.
चटणी लावून झाल्यावर २-३ लेट्युसच्या पानावर भाज्यांच्या चकत्या ठेवायच्या आणि दुसरी स्लाईस ठेवण्यापूर्वी केचप , मेयॉनिझ घालायचे किंवा भाज्यांवर पातळ चीज स्लाईस ठेवायची ...फार छान लागते. चीज स्लाईस ठेवताना कांद्याच्या चकत्या १-२ थेंब तेलात भाजूण घेणे आणि ब्रेड टोस्ट करून घेणे. त्या उष्णतेमुळे चीज थोडे पाघळल्यासारखे होते.
2 Mar 2009 - 9:34 am | संदीप चित्रे
पुण्याला किंवा मुंबईला मिळणार्या सँडविचेसची आठवण झाली.
2 Mar 2009 - 9:39 am | विसोबा खेचर
ही चित्र पाहून त्रास सहन न झाल्यामुळे तात्यांनी स्वत:लाच गळफास लावून घेतला आणि आत्महत्या केली!
"माझ्या दहाव्याला भाताच्या पिंडाऐवजी गणपाने केलेली सँडविचं ठेवलीत तरच मी पिंड नेईन..!"
अशी चिठ्ठी पोलिसांना तात्यांच्या खिशात सापडली! :)
2 Mar 2009 - 1:37 pm | गणपा
आरं तात्या मर्त्यलोक ते परलोक सिझनल पास काढला की काय? ;)
2 Mar 2009 - 10:56 am | सुनील
चटणीची डिटेल पाकृ मिळाल्याशिवाय प्रतिक्रिया देणे शक्य नाही!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
2 Mar 2009 - 1:43 pm | गणपा
प्रतिक्रिया देणार्या / पाककृती वाचणार्या सर्वांचे आभार..
- गण्या.
2 Mar 2009 - 1:47 pm | पिवळा डांबिस
पण त्यात उकडलेल्या अंड्यांचे स्लाईसेस पण ठेवून बघा.....
झकास लागतात!!!!!!
:)
2 Mar 2009 - 7:27 pm | विजुभाऊ
सॅन्ड ऍन्ड वीच फोर ममीज अशी ही एक पाक क्रूती मागे कोणीतरी टाकली होती त्याची आठवण झाली
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
2 Mar 2009 - 3:11 pm | जागु
हे सॅण्डविच टोस्ट करुन पण छान लागतात. कमी मिठ घालुन चाट मसाला टाकुन पण छान लागतात. ह्यात अजुन गाजर, बिट पण घालु शकता.
2 Mar 2009 - 3:41 pm | गणपा
लेट्युस, गाजर, बिट , भोपळी मिरची हा कच्चामाल घरात न्हवता. त्यामुळे असलेल्या वस्तुंवर निभावुन नेल.
मी टोस्ट सॅण्डविच साठी बटाट्याची भाजी वापरतो.
ते पण एकदम झक्कास लागत.
2 Mar 2009 - 3:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सँडविच आवडलंच पण आम्ही परदेशी खाद्यप्रकार खात नाही. ;-) (ह.घ्याच)
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
2 Mar 2009 - 4:27 pm | सुनील
भारतासारख्या खाद्यपदार्थांची पंढरी असलेल्या देशात सँडविचसारखे परदेशी खाद्यप्रकारांचे मार्केटींग करणार्या प्रवृत्तींचा आम्ही निषेध करतो!! आलेत मोठे आम्हाला खाद्यपदार्थ शिकवायला!!
जेथे सँडविचेस संपतात तिथे वडापाव सुरू होतात!!!
(अस्सल भारतीय) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
2 Mar 2009 - 7:07 pm | लवंगी
म्हणजे निषेध करायचा कि चटणीची क्रुती मागायची ते. वडापावला पर्याय नाही याबाबत एकदम सहमत..
बाकी गणपाभाऊ सँडविच एकदम जबराट..
2 Mar 2009 - 8:03 pm | गणपा
सुनील भौ,
आम्ही खाण्याच्या बाबतीत आपले-परके असा भेद मानत नाही.
वडापाव सँडविच आप-आपल्या जागी श्रेष्ठ आहेत.
वडापाव ला (करायला) वेळ जास्त लागतो.
मी सँडविचची पाकृ. दिली याचा अर्थ वडापावला कमी लेखतो आसा काढू ने ही इनंती.
एक शंका : वाढदिवस साजरा करताना केक कापता की वडा :?
2 Mar 2009 - 9:01 pm | सुनील
गणपाशेठ, हा टोला तुम्हाला नव्हता हो!!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
3 Mar 2009 - 12:16 am | विसोबा खेचर
गणपाशेठ, हा टोला तुम्हाला नव्हता हो!!!
हा हा हा! सुनीलला वाटलं की तात्याविंचू बिळातनं बाहेर येईल आणि काहीतरी प्रतिक्रिया देईल. पण झालं भलतंच. आमचा गणपाच बिचारा फसला मधल्यामध्ये! ;)
गणपाला अजून राजकारण कळत नाही. कधी काहीच न बोलता अनुल्लेखाने मारावं, कधी बोलावं याचं तंत्र त्याला अजून कळलेलं नाही. बेटा अजून तरबेज नाही झाला..! :)
बाकी सुनीलराव, आपला प्रतिसाद आवडला! आमची ष्टाईल छान उचलली आहे तुम्ही! शिवाय, आपली स्वत:ची लेखणी म्हणजे तर काय, प्रश्नच नाही बॉ! :)
असो, चालू द्या...! :)
आपला,
(आंतरजालीय धुरंधर!) शरदतात्या पवार!
3 Mar 2009 - 12:28 am | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =)) =)) =))
गणप्या या पुढे प्रतिक्रिया टाकताना एकदा कन्सल्ट करत जा.... ;)
बिपिन कार्यकर्ते
3 Mar 2009 - 12:59 am | गणपा
बिपीन शिकवणी लावावी म्हणतो :B
-(अभ्यासु ) गण्या.
2 Mar 2009 - 4:36 pm | ब्रिटिश टिंग्या
सचित्र पाकृ पाहुन पांथस्थाची आठवण झाली!
आजकाल कुठे असतो तो? दिसत नाय मिपावर!
2 Mar 2009 - 7:45 pm | वेताळ
पांथस्थ कुठे आहे? काही नवीन पाकृ आजकाल दिसली नाही. बाकी सन्डवीच झक्कास झाले आहे.चटणी मसली तरी भाज्या घालुन खायला मजा येते.पोटु लई झ्याक.
वेताळ
2 Mar 2009 - 4:50 pm | रेवती
भारीच दिसतायत फोटू!
दुसर्याला असा त्रास देणं बरं नव्हे!
त्यापेक्षा सगळ्यांना घरी बोलवा खादाडीसाठी आणि तुमच्या मित्रांना कामाला लावा.
तसही त्यांनी तुम्हाला गडी म्हटल्याचा सूड उगवायचा आहे ना!
रेवती
2 Mar 2009 - 11:25 pm | प्राजु
मस्तच फोटो.
यात ब्रेड ला लोणी आणि थोडं क्रिम चीज लावून आणि सगळ्या भाज्यांच्या वरती थोडं छेडर चीज घालून ग्रील केलं तर एकदम फंडू लागतं.
पनिनी ग्रील माझं सगळ्यात फेव्हरीट आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 Mar 2009 - 1:43 am | शरदिनी
सेंडविच खूप छान आहे..
धन्यवाद
8 Mar 2009 - 2:44 pm | क्रान्ति
पाय-यापाय-यांनी [शुद्ध मराठीत याला स्टेप बाय स्टेप असे काहीसे म्हणत असावेत] पाकृ शिकवायची पद्धत आवडली. पाकृ पण आवडली. प्रत्येक पायरीचा फोटो पाहून करण्यात आणि खाण्यातही खूप मजा आली.
क्रान्ति
16 Mar 2009 - 12:37 pm | पर्नल नेने मराठे
मी ह्यामधे भेळेची शेव भुरभुरवते..
चुचु
16 Mar 2009 - 1:03 pm | मदनबाण
गणपाराव आपले सचित्र मार्गदर्शन आवडले... :)
(रशियन सॅन्डवीच हादडणारा)
मदनबाण.....
"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.
16 Mar 2009 - 1:25 pm | गणपा
सर्व रसिक खवय्यांचे आभार.
16 Mar 2009 - 8:53 pm | डी एन कुल
ज्ञानदा
तुम्ही लोक चीझ विसर्लत कि राव.......!!!!
चीझ टकून मस्त टोस्ट करायच काय भारी लागेल!!!!