बटाट्याची गोड कचोरी

श्रीयुत संतोष जोशी's picture
श्रीयुत संतोष जोशी in पाककृती
1 Mar 2009 - 1:41 pm

साहित्य : १ नारळाचे खोबरं ; तूप ; काजू ; बेदाणे ; खसखस ; साखर १ वाटी ; मीठ.
बटाटे ७/८ ; आरारूट ५० ग्रा.; तळण्याकरिता तेल.
कृती :
बटाटे उकडून बाजूला ठेवावेत. थोडं खोबरं आणि खसखस मिक्सरमधे वाटून घ्यावी.( पाणी घालू नये)

सारण :
कढई मधे तूप गरम करुन त्यावर राहिलेले खोबरं थोडं भाजून घ्यावे .मग साखर घालावी.
मग त्यात काजू,बेदाणे घालून नंतर वाटलेले खोबरं खसखस घालावी. अगदी चिमूटभर मीठ घालून उतरवावे.
एका ताटात पसरून ठेवावे ( गार होण्यासाठी ).
बटाटे सोलून किसून घ्यावे त्यात थोडंस मीठ आणि आरारूट घालून चांगले मळून घ्यावे. कोरडं व्हायला पाहिजे.मग या बटाट्याची छोटी गोळी करून ती हातावर चेपून चपटी करून त्यात सारण भरून गोल कचोरीचा आकार द्यावा .
तेलात मंद आचेवर खरपूस तळून गरम गरमच खावी.याबरोबर नुसती दह्यातील दाण्याचं कूट आणि खोबरं घातलेली चटणी छान लागते. ( चवीपुरतं मीठ व साखर घालावी ).

http://www.flickr.com/photos/8211727@N08/3317915681/in/photostream/

http://www.flickr.com/photos/8211727@N08/3317915687/in/photostream/

http://www.flickr.com/photos/8211727@N08/3317915693/in/photostream/

प्रतिक्रिया

रेवती's picture

1 Mar 2009 - 6:46 pm | रेवती

ही कचोरी फारच चविष्ट असते.
त्याबरोबर तोंडीलावणे म्हणून गोड दही सुद्धा छान लागते.
फोटू दिसत नाहीये.

रेवती

प्राजु's picture

1 Mar 2009 - 11:32 pm | प्राजु

तो पब्लिक केलला नाहिये बहुतेक. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

गणपा's picture

2 Mar 2009 - 12:05 am | गणपा

आज पर्यंत अशी कचोरी दुकानातुन आणुनच खाल्ली आहे.
कृती बरीच सोप्पी दिसतेय.

आरारुट वगळता बाकी सगळ साहित्य आहे घरात.
आरारुटा ऐवजी मक्याच पीठ चालेल का हो जोशी भौ?

>(स्वगतः लेका हक्काचे गिनिपीग आहेत ना, जो होगा देखा जायेगा)

बाकी ते फोटो आमालबी दाखवा की राव, आस येकट येकट बघु नी खाउ ने ;)

संध्याकाळचा बेत पक्का.
-गणपा.

चकली's picture

2 Mar 2009 - 3:51 am | चकली

छान लागतात या कचोर्‍या!

चकली
http://chakali.blogspot.com

समिधा's picture

2 Mar 2009 - 4:23 am | समिधा

मी ह्या तिखटाच्या करते, पण गोड कधीच खाल्या नाहीयेत.
शितल कडुन खुप छान लागतात असं एकल आहे,आणि इथेही सगळ्यांनी सांगितल आहे. आता करुन बघेन.

समिधा's picture

2 Mar 2009 - 4:23 am | समिधा

मी ह्या तिखटाच्या करते, पण गोड कधीच खाल्या नाहीयेत.
शितल कडुन खुप छान लागतात असं एकल आहे,आणि इथेही सगळ्यांनी सांगितल आहे. आता करुन बघेन.

समिधा's picture

2 Mar 2009 - 4:23 am | समिधा

मी ह्या तिखटाच्या करते, पण गोड कधीच खाल्या नाहीयेत.
शितल कडुन खुप छान लागतात असं एकल आहे,आणि इथेही सगळ्यांनी सांगितल आहे. आता करुन बघेन.

समिधा's picture

2 Mar 2009 - 4:25 am | समिधा

चुकुन ३ वेळा प्रतिक्रिया प्रकाशित करा वर टिचकी मारली गेली.