भारतीय संगीत आणि ऑस्कर

रामोजी's picture
रामोजी in काथ्याकूट
1 Mar 2009 - 3:06 am
गाभा: 

रेहमान ला ऑस्कर मिळाल्यानंतर तात्या एकाहून एक सुंदर गाण्यांचे दुवे देत आहे. परंतू ऑस्कर ला मारलेली कोपरखळी मात्र खटकते. आपली गाणी परदेशी लोकांना आवडतीलच आसे नाही. रेहमान ला ऑस्कर मिळालेल्या गाण्या पेक्षा ही ऑस्कर न मिळालेल्या लगान ची गाणी अधीक चांगली होती. ऑस्कर ही काही परमोच्य दाद नाही. खुद्द लतादिदी व आशाताइं नि ही रेहमान चे ऑस्कर बद्धल अभिनंदन केले आहेच.

प्रतिक्रिया

भाग्यश्री's picture

1 Mar 2009 - 6:20 am | भाग्यश्री

माझ्या मनात अगदी हेच आलं!
सुंदर गाण्यांचा निरपेक्षपणे आस्वाद घ्यायचा सोडून, प्रत्येक ठीकाणी टीका, कोपरखळ्या अगदी नको वाटतात तात्या!
मी तुम्हाला खरडच करणार होते, पण हा धागा दिसला म्हणून इथे लिहीले..

(तसंही लिहून काहीही फरक पडणार नाहीए हेही माहीतीय म्हणा!
तुमची मतं तुम्ही बर्‍याचदा बदलत नाहीत..
म्हणून जाऊदे ! )

http://bhagyashreee.blogspot.com/

खरा डॉन's picture

1 Mar 2009 - 9:16 am | खरा डॉन

जाऊदे म्हणत प्रतिसाद दिलातच! असो...!

विसोबा खेचर's picture

1 Mar 2009 - 7:19 am | विसोबा खेचर

आपली गाणी परदेशी लोकांना आवडतीलच आसे नाही.

मुळात परदेशी लोकांनी आपल्या गाण्यांबद्दल काही बोलूच नये. किंवा एक वेळ बोलले तरी चालतील कारण गाणं ऐकून त्यावर बरंवाईट वैयक्तिक मत प्रदर्शित करण्याचा त्यांचा हक्क एक वेळ नाकारता येणार नाही. परंतु त्याचं मोल ठरवून त्याला ऑस्करसारखा पुरस्कार द्यायचा किंवा नाही हे ठरवायच्या फंदात पडू नये. सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, दिग्दर्शन यासारखे अनेक अन्य विभाग आहेत जिथे गोर्‍या लोकांना आपल्यापेक्षा कितीतरी अधिक गती आहे. त्या बाबतीत त्यांचा अधिकार नाकारताच येणार नाही.. परंतु संगीत? हा हा हा!

रेहमान ला ऑस्कर मिळालेल्या गाण्या पेक्षा ही ऑस्कर न मिळालेल्या लगान ची गाणी अधीक चांगली होती.

रेहमानची अनेक गाणी चांगली आहेत. परंतु मिलेनियम मधल्या ज्या गाण्यांला ऑस्कर मिळाला तो कोणत्या सांगितिक निकषावर दिला गेला??

खुद्द लतादिदी व आशाताइं नि ही रेहमान चे ऑस्कर बद्धल अभिनंदन केले आहेच.

लतादीदी, आशाताई तर दिग्गजच आहेत, परंतु माझ्यासारखा सामान्य रसिकही रेहमानचा चाहता आहे.. परंतु प्रस्तूत चर्चेत माझा रेहमानवर कोणताच आकस नाही. माझा मुद्दा आहे तो गोर्‍या लोकांनी आता भारतीय चित्रपटातील संगीत क्षेत्रातही लुडबुड करण्याला!

भाग्यश्री,

तसंही लिहून काहीही फरक पडणार नाहीए हेही माहीतीय म्हणा!
तुमची मतं तुम्ही बर्‍याचदा बदलत नाहीत..
म्हणून जाऊदे !

यू सेड इट! :)

असो,

छान धागा. बाकी चालू द्या... :)

आपला,
(संगीतात फारशी गती नसलेला एक ढ विद्यार्थी) तात्या.

भाग्यश्री's picture

1 Mar 2009 - 8:02 am | भाग्यश्री

यू सेड इट!>>>

ह्म्म! :) :)

बाकी, स्लमडॉगवरच्या चर्चेचा कंटाळा आलाय म्हणून अजुन काही लिहीत नाही.. !
रेहमानला ऑस्कर मिळाले याचा आनंद.. :)

http://bhagyashreee.blogspot.com/

सुनील's picture

1 Mar 2009 - 8:29 am | सुनील

परंतु मिलेनियम मधल्या ज्या गाण्यांला ऑस्कर मिळाला तो कोणत्या सांगितिक निकषावर दिला गेला??
तात्या, चित्रपटसंगीतासाठीचा ऑस्कर पुरस्कार हा फक्त त्या वर्षी निर्माण झालेल्या हॉलीवूडपटांपुरताच मर्यादित असतो. आता २००८ साली निर्माण झालेल्या हॉलीवूडपटां मिळून इन-मिन ३-४ गाणीच तर होती (त्यातील २ तर केवळ स्लमडॉग मधील, कारण सहसा इंग्लीश चित्रपटात गाणीच नसतात!). आता ह्या जेमतेम ३-४ गाण्यांत "जय हो" सरस होते, हे निश्चित!

माझा मुद्दा आहे तो गोर्‍या लोकांनी आता भारतीय चित्रपटातील संगीत क्षेत्रातही लुडबुड करण्याला!
पण तात्या स्लमडॉग हा भारतीय चित्रपट नाहीच आहे मुळी!!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

1 Mar 2009 - 8:32 am | विसोबा खेचर

पण तात्या स्लमडॉग हा भारतीय चित्रपट नाहीच आहे मुळी!!!

मग आपण मिशीला कोकम लावून 'तूप' 'तूप', 'ऑस्कर..!' 'ऑस्कर..!' असं म्हणत स्वत:च्या कुल्यांभोवती मोराचे पिसारे लावून का नाचतो आहोत? :)

छ्या..!

आपला,
तात्या बर्वा, रत्नांग्री.

सुनील's picture

1 Mar 2009 - 8:34 am | सुनील

कारण ए आर रेहमान ह भारतीय आहे म्हणून. शिंपल.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

देवदत्त's picture

1 Mar 2009 - 12:01 pm | देवदत्त

सुनीलरावांशी सहमत.

त्या हॉलीवूडपटांत ए आर रहमानचे गाणे सरस ठरले हेच काय ते कारण असेल, आणि मलाही फक्त ए आर रहमानला पारितोषिक मिळाले ह्याचाच आनंद वाटतो.
इतरवेळीही भारतीय मूळ असलेल्या पण अनिवासी (किंवा इतर देशांचे नागरिक असलेल्या) माणसांना काहीतरी पारितोषिक किंवा मोठे पद मिळाल्यावर आपण आनंद वाटत फिरतो, त्यापेक्षा हे नक्कीच कौतुकास्पद आहे असे मानतो.

विसोबा खेचर's picture

1 Mar 2009 - 12:07 pm | विसोबा खेचर

आणि मलाही फक्त ए आर रहमानला पारितोषिक मिळाले ह्याचाच आनंद वाटतो.

अहो पण रेहमानला सांगितिक पारितोषक द्यायला ते गोरे कोण लागून गेले आहेत? त्यांनी ऑस्कर दिलं म्हणून रेहमान मोठा आहे की काय?

तात्या.

देवदत्त's picture

1 Mar 2009 - 5:45 pm | देवदत्त

नाही हो तात्या...
मी ह्या प्रकरणाला वेगळ्या दृष्टीने बघत लिहिले आहे. रेहमानला पारितोषिक दिले ते त्यांच्या सिनेमाला संगीत दिले म्हणून. मग त्याने अभारतीय (?) इंग्रजी गाण्यालाही संगीत दिले असते तरी मला तेच वाटले असते.
ऑस्कर दिला म्हणून रहमान मोठा होत नाही, किंवा न मिळाले असते तरी लहान नसता झाला. तो त्याच्या स्थानावरच आहे. :)

बाकी, ह्या चर्चेत पुन्हा प्रतिसाद लिहिणार नव्हतो. पण तात्यांनी प्रश्न विचारले म्हणून पुन्हा माझे मत लिहिले :)

रामोजी's picture

1 Mar 2009 - 1:56 pm | रामोजी

माझा मुद्दा आहे तो गोर्‍या लोकांनी आता भारतीय चित्रपटातील संगीत क्षेत्रातही लुडबुड करण्याला!

हि लुड्बुड नाही तात्या. त्यांच्या स्पर्धेत जे चित्रपट आले त्यावर त्यांनी निर्णय दिला.
कदाचीत भारतिय संगीतकाराला आणि गाण्याला मिळालेला हा पहिला ऑस्कर असल्यामुळे, आ़जवरच्या सर्व भारतीय गाण्यांन मधून निवड करुन हा पुरस्कार दिला गेला अशी गल्लत होत आहे. 'जय हो' काहि महिन्यांनंतर विस्मर्णात जाइल, पण चांगली गाणि कायम स्मरणात राहतिल, हाच खरा पुरस्कार आहे.

रामदास's picture

1 Mar 2009 - 8:05 am | रामदास

देवगडात एखादा माड तिरका वाढतो तर तो तसाच वाढतो.काय तात्या बरोबर ना?

विसोबा खेचर's picture

1 Mar 2009 - 8:19 am | विसोबा खेचर

अहो रामदासभावजी, माड तिरका वगैरे वाढायचा प्रश्न नाही. माझा मुद्दा चुकीचा आहे का ते सांगा. आम दुनियेसारखाच मीदेखील रेहमान या प्रतिभावंत माणसाचा फ्यॅन आहे. त्याचं दिल है छोटासा हे माझं अत्यंत आवडतं गाणं. मिपाच्या मुखपृष्ठावरही त्य गाण्याबद्दल केव्हातरी लिहीन. मुद्दा तो नाही.

पण साले हे गोरे लोक कोण लागून गेले भारतीयांना संगीत क्षेत्रातले पुरस्कार देणारे?!

असो..

आपला,
(वेडझवा कोकणी) तात्या.

सुनील's picture

1 Mar 2009 - 8:21 am | सुनील

देवगडात एखादा माड तिरका वाढतो तर तो तसाच वाढतो.काय तात्या बरोबर ना?
=))

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अजय भागवत's picture

1 Mar 2009 - 8:49 am | अजय भागवत

अमेरिकेत मार्केटींग कसे चालते ते अभ्यासण्यासाठी दोन पुस्तके नक्की वाचा- लोगो-नो लोगो आणि विच डॉक्टर.
आपल्याला जर असे वाटत असेल की [आणि ते आहे], ऑस्करच्या मानांकनाच्या गुणवत्तेच्या मापदंडापेक्षा आपले संगीत चांगले आहे तर भारतियांनी त्यापेक्षा भव्यदिव्य असा पुरस्कार व सोहळा आयोजित करुन जगाला दिपवले पाहिजे असे वाटते. सध्या ती आघाडी त्यांनी घेतली आहे असेच मी म्हणेन.

आनंद घारे's picture

1 Mar 2009 - 9:08 am | आनंद घारे

नोबेल पुरस्कार आणि तो मिळवणारे तसेच स्वीकारणारे गुरुदेव रविन्द्रनाथ टागोर व सी.व्ही.रामन तसेच मॅगसेसे पुरस्कार ज्यांना मागील वर्षी मिळाला ते डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदाकिनी आमटे यांच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचे आहे? त्यांना दिलेला सन्मानसुद्धा भिकार्‍यांपुढे टाकलेले तुकडे या श्रेणीत येतात काय?
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

1 Mar 2009 - 9:28 am | विसोबा खेचर

त्यांना दिलेला सन्मानसुद्धा भिकार्‍यांपुढे टाकलेले तुकडे या श्रेणीत येतात काय?

आनंदराव, कदाचित आपल्याला माझा मुद्दा नीटसा समजलेला दिसत नाही. मी फक्त भारतीय संगीत, भारतीय चित्रपट संगीत या विषयाशी निगडीतच भाष्य केले आहे. त्याकरता आम्हाला गोर्‍यांनी पुरस्कार देण्याची गरज नाही, देऊ नयेत.

छ्या..! आले मोठे आम्हाला सांगितिक पुरस्कार देणारे फोकलिचे!

असो..

तात्या.

प्रमोद देव's picture

1 Mar 2009 - 10:21 am | प्रमोद देव

ऑस्कर पुरस्कार मिळाला ते गाणे 'जय हो' मुद्दामहून ऐकले आणि लक्षात आले की नेहमीचा रहमान स्पर्ष त्या गाण्याला नाहीये. साधे गल्लीतले कोणतेही पारितोषिक मिळण्याच्या लायकीचेही ते गाणे मला तरी वाटले नाही.(हे केवळ माझेच मत नाही तर जिच्याशी एरवी क्वचितच एकमत होऊ शकते अशा माझ्या सद्याच्या पिढीतील 'रहमान पंखा' मुलीनेही त्यावर शिक्कामोर्तब केलेय.)
मग तरीही ह्या गाण्याला ऑस्कर का मिळाले?
तर मला असे वाटते की त्या गाण्यात वापरलेला पाश्चात्त्य ठेका हे असावे(म्हणजे हे बक्षीस भारतीय संगीतासाठी नव्हेच). तसेच सुनील म्हणतात त्याप्रमाणे त्या गटातील मर्यादित स्पर्धा हेही कारण असावे आणि इतरत्र काही तज्ञ लोक जे म्हणताहेत की मंदीमुळे त्रस्त झालेल्या अमेरिकनांचा भारतीय बाजारपेठेवर असलेला डोळा...तर तेही असण्याची दाट शक्यता आहे.
एकूण काय? ऑस्कर मिळाले म्हणून रहमानला आनंद होणे स्वाभाविक आहे आणि त्याबद्दल एक भारतीय म्हणून त्याचे अभिनंदन जरूर केले पाहिजे. पण हा भारतीय संगीताचा गौरव आहे असे समजणार्‍या तथाकथित लोकांबद्दल काही न बोललेलंच बरं!

विसोबा खेचर's picture

1 Mar 2009 - 10:40 am | विसोबा खेचर

पण हा भारतीय संगीताचा गौरव आहे असे समजणार्‍या तथाकथित लोकांबद्दल काही न बोललेलंच बरं!

धन्यवाद प्रमोदकाका..:)

साला, बोललो की तात्या बोलतो म्हणतात! तात्याचं थोबाड तेवढं वाईट ठरतं प्रत्येक वेळेस! :)

असो, लौकरच या गाण्याबद्दल मिपावर लिहायचा विचार आहे! अर्थात, या गाण्याला तुमचं ते काय म्हणतात ते ऑस्कर मात्र मिळालेलं नाहीये बर्र का! :)

लेखाचं शीर्षक असेल,

दरशन देवो शंकर महादेव..!

आपला,
(भारतीय संगीताचा कडवा, अभिमानी, दुराभिमानी पुरस्कर्ता!) तात्या.

विसोबा खेचर's picture

1 Mar 2009 - 10:51 am | विसोबा खेचर

ऑस्कर न मिळालेल्या (!) या गाण्यावरदेखील लौकरच दोन शब्द लिहायचा विचार आहे..!

तात्याला आता लेखणी सरसावली पाहिजे. पण साला टाईमच भेटत नाय!

तात्या.

मराठी_माणूस's picture

1 Mar 2009 - 10:36 am | मराठी_माणूस
विसोबा खेचर's picture

1 Mar 2009 - 10:44 am | विसोबा खेचर

तू दिलेल्या दुव्याबद्दल धन्यवाद रे मराठी माणसा!

पण 'जय हो' ला पुरस्कार लाभला कारण त्याला 'स्लमडॉग'चे कोंदण गवसले. गुलजार यांच्या शब्दकळेबद्दल काय बोलावे? अनेक तरल भावस्पशीर् कवितांबरोबरच 'चड्डी पहन के फूल खिला है' हे 'जंगलबुक'चे शीर्षकगीत रचण्यापर्यंत प्रतिभेचे उंच झोके घेणाऱ्या गुलजारनाही 'स्लमडॉग'च्याच आधाराने जागतिक पातळीवर जावे लागावे, याला काय म्हणावे?

त्या लेखातील वरील ओळी खासच!

साला, बोललो की तात्या बोलतो म्हणतात..!

आपला,
(संगितिक पुरस्कारांकरता गोर्‍यांचा दारातला भिकारी!) तात्या.

मराठी_माणूस's picture

1 Mar 2009 - 12:35 pm | मराठी_माणूस

ह्याच लेखाच्या शेवटी त्यानी एक आणखीन एक विदारक सत्या मांडले आहे ते असे

नोबेल पुरस्कार विजेते भारतीय वंशाचे साहित्यिक विचारवंत व्ही. एस. नायपॉल यांनी म्हटले होते की, भारतीयांना आपल्या यशाची खात्री पटवण्यासाठी पाश्चिमात्यांचे प्रशस्तिपत्र लागते.

विकास's picture

2 Mar 2009 - 8:20 am | विकास

नोबेल पुरस्कार विजेते भारतीय वंशाचे साहित्यिक विचारवंत व्ही. एस. नायपॉल यांनी म्हटले होते की, भारतीयांना आपल्या यशाची खात्री पटवण्यासाठी पाश्चिमात्यांचे प्रशस्तिपत्र लागते.

यात "नोबेल पुरस्कार विजेते भारतीय वंशाचे साहित्यिक..." म्हणण्याऐवजी "सुप्रसिद्ध लेखक आणि भारतीय वंशाचे थोर साहित्यिक..." असे म्हणले असते तर स्वतःचे विचार मांडताना त्याचे महत्व ठासून सांगितल्यासारखे वाटले असते ;)

मराठी_माणूस's picture

2 Mar 2009 - 8:26 am | मराठी_माणूस

मुद्दा लक्षात घ्या

विकास's picture

2 Mar 2009 - 8:41 am | विकास

मुद्दा लक्षात घ्या

तेच तर म्हणतोय! बक्षिस हे बक्षिस असते, त्याला गोरी काळी कातड्यांमधे कशाला बघायला हवे? त्यात आपल्याला उगाचच न्यूनगंड आहे असे वाटू शकते... एक एका वर्षातील एका देशात प्रसिद्ध झालेल्या गाण्यांच्या तुलनेमधे एका गाण्याचा संगीताला आणि कवीला बक्षिस मिळाले... ते देखील त्यांच्या इच्छेने तो चित्रपट हा त्या स्पर्धेत असताना. तसे काय मला त्या "जय हो" पेक्षा "ओम शांती ओम" मधील काही संगीत जास्त ऐकण्यासारखे वाटले :-) पण त्याचा काय संबंध अगदी एकाच वर्षातील असून देखील?

आता प्रश्न "भारतीयांना आपल्या यशाची खात्री पटवण्यासाठी पाश्चिमात्यांचे प्रशस्तिपत्र लागते. " हे वाक्य बरोबर आहे का चा असेल तर विचार करा... स्वामी विवेकानंदांचे जर सर्वधर्मपरीषदेत कौतुक झाले नसते तर आज त्यांचे नाव अथवा त्यांच्या गुरूंचे नाव ऐकले असते का? त्याचा अर्थ ते (अमेरिकेत जाण्या) आधीपण कमी नव्हते आणि नंतर ही अर्थातच कमी नव्हते. पण त्यांनी जे कर्तुत्व दाखवले त्यामुळे त्यांचे नाव झाले आणि लोकं ते काय म्हणाले ते अजुनही वाचत बसलेत...

मराठी_माणूस's picture

2 Mar 2009 - 9:33 am | मराठी_माणूस

आता प्रश्न "भारतीयांना आपल्या यशाची खात्री पटवण्यासाठी पाश्चिमात्यांचे प्रशस्तिपत्र लागते. " हे वाक्य बरोबर आहे का चा असेल तर विचार करा... स्वामी विवेकानंदांचे जर सर्वधर्मपरीषदेत कौतुक झाले नसते तर आज त्यांचे नाव अथवा त्यांच्या गुरूंचे नाव ऐकले असते का? त्याचा अर्थ ते (अमेरिकेत जाण्या) आधीपण कमी नव्हते आणि नंतर ही अर्थातच कमी नव्हते. पण त्यांनी जे कर्तुत्व दाखवले त्यामुळे त्यांचे नाव झाले आणि लोकं ते काय म्हणाले ते अजुनही वाचत बसलेत...

ह्यातुन 'पाश्चिमात्यांचे प्रशस्तिपत्र लागते' हेच सुचवायचे आहे असे वाटते. अर्थात ज्याना तशी गरज वाटत असेल त्यानी वाट बघायला हरकत नाही. आम्ही मात्र मदन मोहन, सलील चौधरी, बर्मन पीता पुत्र, हृदयनाथ, लता , आशा ह्यांच्या कलेचा अस्वाद घेतो आणि संत तुकाराम , रामदास वाचतो.

विसोबा खेचर's picture

2 Mar 2009 - 9:35 am | विसोबा खेचर

आम्ही मात्र मदन मोहन, सलील चौधरी, बर्मन पीता पुत्र, हृदयनाथ, लता , आशा ह्यांच्या कलेचा अस्वाद घेतो आणि संत तुकाराम , रामदास वाचतो.

वा! सुंदर प्रतिसाद...

आपला,
(भारतीय) तात्या.

विकास's picture

2 Mar 2009 - 9:55 am | विकास

विवेकानंदांनी आणि फॉर दॅट मॅटर रेहमान, गुलझार यांनी काही प्रशस्तीपत्रक मिळवण्यासाठी केले नाही तर त्यांच्या कर्तुत्वाने त्यांची प्रशस्ती केली गेली. हं, आता "जय हो" या गाण्यासंदर्भात आंधळ्यात काणा राजा, वासरात लंगडी गाय शहाणी असे नक्कीच झाले... पण तो काही या दोघांचा दोष नाही.

एक मात्र नक्की परदेशात जेंव्हा चढाओढीत बक्षिस मिळते तेंव्हा त्यात ती मिळवणारी व्यक्ती नक्कीच स्वदेशाचे (या संदर्भात भारताचे) चांगले/सन्मान्य प्रतिनिधित्व करते आणि त्याचा नक्कीच आनंद होतो आणि तो निर्भेळ आनंद मानण्यात काहीच चूक नाही.

>>>
आम्ही मात्र मदन मोहन, सलील चौधरी, बर्मन पीता पुत्र, हृदयनाथ, लता , आशा ह्यांच्या कलेचा अस्वाद घेतो आणि संत तुकाराम , रामदास वाचतो.
<<<

आम्ही कलेचा कला म्हणून आस्वाद घेतो, बालकवींनी म्हणल्याप्रमाणे - "सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे, चैतन्याच्या गोडकोवळ्या उन्हात हिंडावे" असेच काहीसे...

बाकी तुकारामांनी आम्हाला म्हणायला शिकवले की "हे विश्वची माझे घर" आणि रामदास तर चक्क भिक्षाघेण्यासंदर्भात लिहीताना म्हणतात -

(दशक १४, समास दुसरा. भिक्षानिरूपण )

नित्य नूतन हिंडावें| उदंड देशाटण करावें | तरीच भिक्षा मागतां बरवें| श्लाघ्यवाणें || ८||
अखंड भिक्षेच अभ्यास| तयास वाटेना परदेश | जिकडे तिकडे स्वदेश| भुवनत्रैं || ९||

आपला

सज्जनगडवरचा "विकास"

विसोबा खेचर's picture

2 Mar 2009 - 10:02 am | विसोबा खेचर

विकासभावजी,

एक सांगा. 'मी हाय कोली..' या गाण्याचं परिक्षण/रसग्रहण तुमचे ते ऑस्करचे सांगितिक तज्ञ करतील काय? त्यांचं ऍनालिसिस मी वाचण्यास उत्सुक आहे! :)

छ्या..! आले मोठे आमच्या संगीताला ऑस्कर देणारे! :)

आपला,
तात्या वेसावकर.

विकास's picture

2 Mar 2009 - 10:06 am | विकास

>>>एक सांगा. 'मी हाय कोली..' या गाण्याचं परिक्षण/रसग्रहण तुमचे ते ऑस्करचे सांगितिक तज्ञ करतील काय? त्यांचं ऍनालिसिस मी वाचण्यास उत्सुक आहे!

अहो तात्या, ते गाणे ऑस्करच्या नियमाप्रमाणे, एखाद्या हॉलीवूड मधे प्रदर्शित होणार्‍या चित्रपटात घाला. १०० नाही १०००% खात्री देतो त्या ठेक्यावर नाचत त्याला सगळ्यांची मते पडतील. आणि हो मी त्यांना सांगितिक तज्ञ म्हणत नाही, निव्वळ परीक्षक म्हणतो :-)

सुनील's picture

2 Mar 2009 - 11:03 am | सुनील

छ्या..! आले मोठे आमच्या संगीताला ऑस्कर देणारे!
तात्या त्यांनी आमच्या संगीताला पुरस्कार दिलाय हा गैरसमज काढून टाका. गोष्टी बर्‍याच स्वच्छ दिसतील. त्यांनी त्यांच्या चित्रपटातील एका गाण्याला पुरस्कार दिला आहे ज्याचे संगीत एका भारतीयाचे होते, एवढेच काय ते!!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विंजिनेर's picture

1 Mar 2009 - 12:45 pm | विंजिनेर

मी संगीत क्षेत्रातले नव्हे पण बल्लवक्षेत्रातले असेच उदाहरण देतो.
इशिलॉं तारांकन हा जगातला समस्त हाटेलांचा अत्यंत प्रतिष्ठेचा मानदंड मानण्यात येतो. ह्याचे परिक्षक तुमच्या हाटेलाचे परिक्षण करायला स्वतःहूनच(त्यांना योग्य वाटले तर आणि न सांगता) येतात. ज्या-त्या हाटेलाचे परिक्षण करून १,२ किंवा ३ तारांकित मानांकन देण्यात येते. हे मानांकन तुमच्या हाटेलात मिळणार्‍या खाद्यपदार्थाचा दर्जा (चव, रूप, रंग स्वाद इ.), सेवेची पातळी(अदब, तप्तरता इ.) आणि सभोवतालचा परिसर ह्या निकषांवर आधारित असते. परिक्षा अत्यंत खडतर असते. उदा. ५५००पैकी फक्त ९८ना प्रथम तारांकित दर्जा,११ ना द्वितीय मानांकन तर केवळ ३ ना तृतीय मानांकन मिळाले होते.
तर सांगायची गोष्ट अशी की ह्या संस्थेचे परिक्षक एकदा टोक्यो शहरातल्या एका काईसेकी रेस्तोरां मधे गेले. (इथे जपानी बल्लवशास्त्राची खडतर विद्या म्हणून पूजा केली जाते. उदरम् भरणम् हा दुय्यम हेतू) त्या परिक्षकांनी ह्या जपानीदृष्टीने प्रतिष्ठेच्या जागेला कुठलाच दर्जा दिला नाही!
त्यावर जपानी लोकांची प्रतिक्रिया होती की हे कोण फ्रेंच टिकोजीराव आमच्या बल्लवशास्त्राचा दर्जा ठरवणार? त्यांनी काहीही सांगितले तरीही ते आमच्या(म्हणजे जपान्यांच्या) दृष्टीने केवळ हास्यास्पद आहे. त्यांचे तारांकन म्हणजे फारफार तर "फ्रेंचांना समजलेले जपानी बल्लवशास्त्र" एव्हढेच महत्व होईल.

विसोबा खेचर's picture

1 Mar 2009 - 1:06 pm | विसोबा खेचर

ह्याचे परिक्षक तुमच्या हाटेलाचे परिक्षण करायला स्वतःहूनच(त्यांना योग्य वाटले तर आणि न सांगता) येतात. ज्या-त्या हाटेलाचे परिक्षण करून १,२ किंवा ३ तारांकित मानांकन देण्यात येते. हे मानांकन तुमच्या हाटेलात मिळणार्‍या खाद्यपदार्थाचा दर्जा (चव, रूप, रंग स्वाद इ.),

अरे वा! एखाददा हे परिक्षक आमच्या समर्थ भोजनालयात आले पाहिजेत आणि त्यांनी माशाची आमटी किंवा कुर्ल्यांचं कालवण खाल्लं पाहिजे! आपल्याला अजून स्वयंपाकातला स्व देखील कळलेला नाही हे त्यांना लगेच कळेल आणि बापडे त्या कुर्ल्यांवर ताव मारून बोटं चाटत चाटत अपल्या मायदेशी चालते होतील! :)

सेवेची पातळी(अदब, तप्तरता इ.)

हा हा हा! समर्थ भोजनालयात "अरे संज्या, लौकर आण रे लेका, जाम भूक लागली आहे!" असं ओरडून सांगितलं की संज्या माझ्यावर उलट ओरडतो,

"काय रे तात्या? अरे घाईलाही थोडा वेळ लागतो रे! जीव चाल्ला की काय तुझा? थांब जरा, टाईम लागेल!" :)

अर्थात, त्या खाणावळीतील आपुलकी त्या कडक इस्त्रीतल्या टाय लावलेल्या परिक्षकांना काय कळणार म्हणा! त्यांना बापड्यांना काय माहीत खाणावळ संस्कृती आणि त्यातील आपुलकी?! कीव वाटते बिचार्‍यांची!

छ्या..! निघाले लेकाचे अदबीचं अन् तत्परतेचं सर्टिफिकिट द्यायला! :)

साल्यांना एकवार लखनौला बिर्याणी खायला किंवा इंदौरला रबडी खायला नेले पाहिजेत! 'चव' म्हणजे काय आणि ती कशाशी खातात हे त्यांना कळेल!

आम्हा भारतीयांना गाण्याबद्दल आणि खाण्याबद्दल कुणी शिकवू नये हेच खरं! आम्ही साला दुनियेला फाट्यावर मारतो या दोन बाबतीत!

अरे लेको आधी झकासपैकी बटाटावडा करून दाखवा आणि मग द्या तुमची ती सर्टिपिकिटं! ठेवू टांगून भिंतीवर! :)

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Mar 2009 - 3:17 pm | बिपिन कार्यकर्ते

तुमच्या इशिलॉ वरून अजून एक आठवलं... मध्यंतरी मुंबई ही अतिशय रूड सिटी आहे असा कौल दिला होता या पाश्चिमात्यांनी. कारण काय तर मुंबईचे लोक 'थँक यू' वगैरे म्हणत नाहीत असं काहिसं....

=))

कुठलेही निकष हे असे बिन्डोकपणे लावले की मग असला काही तरी मूर्खपणा होतो.

बिपिन कार्यकर्ते

लिखाळ's picture

1 Mar 2009 - 6:16 pm | लिखाळ

>>त्यांचे तारांकन म्हणजे फारफार तर "फ्रेंचांना समजलेले जपानी बल्लवशास्त्र" एव्हढेच महत्व होईल.<<
वाहवा .. भारी !
-- लिखाळ.

"मला उमजलेला रहमान .." या नावाचे ऍक्याडमीचे एक पुस्तक येणार बाजारात आता...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

1 Mar 2009 - 1:09 pm | विसोबा खेचर

हा हा हा!

आणि आम्ही लगेच ते पुस्तक 'ऍक्याडमीने आमच्या रेहमानवर पुस्तक छापलं हो..' असं म्हणत डोक्यावर घेऊन नाचायला लागू लगेच! :)

आपला,
(लाचार) तात्या.

नाना बेरके's picture

1 Mar 2009 - 2:47 pm | नाना बेरके

तात्या तुमची मते १००% पटतात. काहींना नाही पटंत.

पण मला वाटते " ते नाही बोलंत, त्यांच्या पोटातले पाद्र्याचे पाव बोलताहेत".

अनामिका's picture

1 Mar 2009 - 3:40 pm | अनामिका

तात्या!
तुमच्या मताशी सहमत!
हॉलीवुड व बॉलीवुड यांच्या होऊ घातलेल्या युतीची ही नांदी आहे.
अस आपल माझ मत.
या आधी देखिल अनेक हिंदी चित्रपट ऑस्करच्या नामावलीत आले होते पण त्यांचे काय झाले हे सर्वांस ज्ञात आहेच्............या चित्रपटाचे दिग्दर्शक ,निर्माते मंडळी जर गोर्‍या कातडीची नसती व कदाचित भारतिय असती तर कुणी पत्रास ठेवली असती का आपली?फार पुर्वी भारतीय चित्रपटाला ऑस्कर हा पुरस्कार मिळाला आहे अस इतिहास सांगतो .पण गेल्या काही वर्षांपासुन आपण फक्त भोज्जा करुनच परतत होतो.
परवा रेहमानला ऑस्कर जाहीर झाल्यानंतर एका वृत्तवाहिनी वर आशाजींची प्रतिक्रिया घेत होते ..........अचानक वृत्तनिवेदकाने रेहमानची तुलना आरडी यांच्याशी करण्याचा बालिशपणा केला .आशाजी बहुदा थेट प्रक्षेपण होते म्हणुन जास्त काही बोलल्या नाहीत त्यावर .समक्ष ती व्यक्ती असती तर तिचे काय झाले असते त्याची कल्पना न केलेलीच बरी.................. :?
मला देखिल जय हो हे गाणे फारसे काही श्रवणीय वगैरे वाटले नाही.
फक्त रेहमान व गुलजार यांना ऑस्कर मिळाला हिच काय ती आनंदाची बाब.
"अनामिका"

विसोबा खेचर's picture

1 Mar 2009 - 4:59 pm | विसोबा खेचर

अचानक वृत्तनिवेदकाने रेहमानची तुलना आरडी यांच्याशी करण्याचा बालिशपणा केला .

हा हा हा!

तसा रेहमान मलादेखील आवडतो परंतु त्याची पंचमदांशी तुलना??

रेहमान जिथे संपतो तिथे आमचे पंचमदा सुरू होतात हे बहुतेक त्या निवेदिकेला माहीत नसावं! :)

आपला,
(पंचमप्रेमी) तात्या.

वजीर's picture

2 Mar 2009 - 1:24 am | वजीर

रेहमान जिथे संपतो तिथे आमचे पंचमदा सुरू होतात हे बहुतेक त्या निवेदिकेला माहीत नसावं!

हे काही पटले नाही तात्या. रेहमान त्याच्याजागी श्रेष्ठ पंचमदा त्याच्या जागी. तुमच्या सारख्या संगीतातल्या जाणकाराने तरी असली विधाने करु नयेत.

-वजीर

विसोबा खेचर's picture

2 Mar 2009 - 2:10 am | विसोबा खेचर

हे काही पटले नाही तात्या.

प्रत्येकाची मतं! मी आपल्या मताचा आदर करतो...!

आपला,
(पंचमभक्त) तात्या.

वजीर's picture

2 Mar 2009 - 2:25 am | वजीर

(पंचमभक्त) तात्या.

हो पण शिवा का इन्साफ, मंझील मंझील, जमाने को दिखाना है असल्या चित्रपटात टूकार गाणी आणि संगित पण आरडीनेच दिले आहे. तेव्हा तुलना करण्यात काय हशील इतकेच सांगायचेच होते.

भाग्यश्री's picture

2 Mar 2009 - 4:34 am | भाग्यश्री

ते काय आहे, सुरेश भट आणि गदिमा यांची तुलना नाही करायची, दोघंही महान..
पण तोच फॉर्म्युला रेहमान आणि आरडी यांना नाही लागू होत... का ते तात्यांनाच माहीत !
वजीर वेळ घालवू नका या वादात.. व्याकरण, भाषाशुद्धी या लिस्टमधे आता रेहमानला ऑस्कर हेही आलं आहे, असं म्हणून सोडून द्यावे!
शेवटी तात्या सरपंच आहेत.. ते जे लिहीतील,त्यांना जे वाटतंय तोच मजकूर आपल्याला दिसेल!

http://bhagyashreee.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

2 Mar 2009 - 7:30 am | विसोबा खेचर

पण तोच फॉर्म्युला रेहमान आणि आरडी यांना नाही लागू होत... का ते तात्यांनाच माहीत !

काय संबंध माझा? मी तुलना केलेली नाही. ती अन्य कुंणी केली आहे. मी फक्त माझे मत दिले आहे आणि त्यावर ठाम आहे. बाकी, मल संगीतातले फारसे काही कळत नसल्यामुळे माझ्या मताला महत्व द्यायचे अथवा नाही हे ज्याने त्याने ठरवावे! माझ्यापुरता हा विषय संपला आहे..

शेवटी तात्या सरपंच आहेत.. ते जे लिहीतील,त्यांना जे वाटतंय तोच मजकूर आपल्याला दिसेल!

अर्थातच! इथे अन्य कुणाला काही लिहावंसं वाटलं तर त्यालाही माझी बंदी नसते. मग मला जे वाटलं तेच मी लिहिणार ना?? बरं ते वाचायची कुणावरही सक्ति नाही!

तात्या.

विसोबा खेचर's picture

2 Mar 2009 - 7:30 am | विसोबा खेचर

तेव्हा तुलना करण्यात काय हशील इतकेच सांगायचेच होते.

मी तुलना केलेली नाही. ती अन्य कुंणी केली आहे. मी फक्त माझे मत दिले आहे आणि त्यावर ठाम आहे. बाकी, मल संगीतातले फारसे काही कळत नसल्यामुळे माझ्या मताला महत्व द्यायचे अथवा नाही हे ज्याने त्याने ठरवावे! माझ्यापुरता हा विषय संपला आहे..

तात्या.

सातारकर's picture

2 Mar 2009 - 11:07 am | सातारकर

आपल्याला आपल्या गोष्टी त्यांच्या नजरेतून पाहायची काही गरज नाही हे सांगणारा वह्राड्मधील एक प्रसंग

वह्राड निघालय लंडनला मधे
वह्राड लंडनला पोचल्यावर मंडळी जेवायला बसतात आणि काटे चमचे बघून यंकटरावला विचारतात ह्यानी कसं खायच ? तेंव्हा यंकटराव म्हणतो "त्यांनी आपल्यासाठी त्यांच सोडल का? न्हाइ, मग हाणा कुस्करु कुस्करु"

बाकी मेकॉले काही अंशी तरी यशस्वी झाला असे नक्कीच म्हणू शकतो. मेकॉले म्हणतो;

It is impossible for us, with our limited means, to attempt to educate the body of the people. We must at present do our best to form a class who may be interpreters between us and the millions whom we govern; a class of persons, Indian in blood and colour, but English in taste, in opinions, in morals, and in intellect. To that class we may leave it to refine the vernacular dialects of the country, to enrich those dialects with terms of science borrowed from the Western nomenclature, and to render them by degrees fit vehicles for conveying knowledge to the great mass of the population.

सातारकर
जात-धर्म न मानणाय्रा लोकांचा एक पंथ स्थापन करायचा आहे, येताय ?

मराठी_माणूस's picture

2 Mar 2009 - 11:12 am | मराठी_माणूस

बाकी मेकॉले काही अंशी तरी यशस्वी झाला असे नक्कीच म्हणू शकतो

हे बाकी खरे , त्यांची तळी उचलुन धरणारे पाहीले की हे लक्षात येते.

मैत्र's picture

2 Mar 2009 - 2:14 pm | मैत्र

झोपलेल्याला उठवता येतं ... झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही.

पुरस्कार हा इंग्रजी चित्रपटाला आहे ते फक्त गेल्या वर्षात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठीच आहे.
योगायोगाने एका ब्रिटिश माणसाने हॉलीवूड मध्ये एक चित्रपट बनवला जो भारतीय पार्श्वभूमी वर आहे. त्यात संगीत व कला क्षेत्रात निर्विवाद पणे गुणवंत असलेल्या दोघांना आणि एका प्रतिभावान तंत्रज्ञाला मिळाला.
याचा भारतातील सर्व लोकसंगीत, गेल्या पन्नास साठ वर्षात हिंदी मराठी चित्रपट संगीतातले जे दिग्गज होऊन गेले त्यांच्या सर्वोत्तम कलाकृतींचा दुरान्वायाने संबंध नाही.
हे म्हणजे या वर्षी तेरी ओर ला सर्वोत्तम पुरस्कार मिळाल्यावर लता आशाचे मास्टरपीस यापेक्षा प्रचंड उत्तम होते म्हणण्यासारखं आहे.
रेहमान, गुलजार, पोकुट्टी यांच्या वैयक्तिक प्रतिभेला मिळालेली आंतरराष्ट्रिय स्तरावरची दाद आहे दिलेल्या कॅटॅगरी साठी.

हां ... याला भारतीय संगीताचा किंवा कलेचा सन्मान म्हणणं हेही तितकंच मूर्खपणाचं आहे. हे अगदी खरं की भारतीय संगीत व इतर कला या एका पुरस्कारापेक्षा लक्ष पटीने समर्थ आणि उच्च आहे.

बाकी प्रत्येकाची मतं! आणि मिपाकरांनी दुसर्‍याच्या मतांचा आदर केलाच पाहिजे ...!

विसोबा खेचर's picture

2 Mar 2009 - 2:30 pm | विसोबा खेचर

रेहमान भारतीय आहे आणि कुठल्याही भारतीय व्यक्तिला निदान संगीत क्षेत्राकरता तरी कोणत्याही परदेशी पुरस्काराची आवश्यकता नाही! त्यांनी आमच्या माणसाला संगीत क्षेत्राकरता पुरस्कार द्यावा ही त्यांची लायकी नाही आणि आमची माणसं किंवा आमचं संगीत कुठल्याही परदेशी पुरस्काराचं मौताज नाही..!

असो.. बाकी प्रत्येकाची मतं!

तात्या.

रेहमान गुलजार पोकुट्टी यांनी त्या चित्रपटासाठी काम केलं ते नेहमीच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून आणि त्यांच्या उपजत आणि घडवलेल्या प्रतिभेनुसार ते चांगलं केलं. ते करताना याला ऑस्कर मिळावं किंवा मिळेल असा विचार नसावा बहुधा.
हा योगायोग आहे की तिघांना एकदम ऑस्कर मिळालं किंवा जसं काही जण म्हणत आहेत त्याप्रमाणे अमेरिकन किंवा पाश्चात्य भांडवलशाहीचं कारस्थान आहे भारताची बाजारपेठ मिळवण्याचं.
या वर्षाची चांगली कलाकृती म्हणून तो चित्रपट स्पर्धेत गेला आणि त्यांनी चक्क आठ पुरस्कार मिळवले.
यात कोण कोणत्या पुरस्कारासाठी मोहताज होतं किंवा हे नसते मिळाले म्हणून कोण लहान ठरणार होतं किंवा प्रचंड मोठे झाले आहेत? ...........

अवांतर: त्यांनी आमच्या माणसाला संगीत क्षेत्राकरता पुरस्कार द्यावा ही त्यांची लायकी नाही
असं का?

विसोबा खेचर's picture

2 Mar 2009 - 4:43 pm | विसोबा खेचर

किंवा जसं काही जण म्हणत आहेत त्याप्रमाणे अमेरिकन किंवा पाश्चात्य भांडवलशाहीचं कारस्थान आहे भारताची बाजारपेठ मिळवण्याचं.

सहमत आहे...

अवांतर: त्यांनी आमच्या माणसाला संगीत क्षेत्राकरता पुरस्कार द्यावा ही त्यांची लायकी नाही
असं का?

हे आमचं वैयक्तिक मत आहे..

आपला,
(अमेरिकाद्वेष्टा) तात्या.