गदीमा आणि सुरेश भट

रामोजी's picture
रामोजी in काथ्याकूट
28 Feb 2009 - 11:46 pm
गाभा: 

ग दि माडगूळकर आणि सुरेश भट हे दोघेही महान कवी. त्यांची तुलना करणे हे फारच कठीण आहे. तरी देखील गदिमा अधिक श्रेष्ठ वाटतात. भटांनी अनेक उत्तम गझला, भावगीते आपल्याला दिली तर गदीमांनी अनेक विविध काव्यप्रकार दिले..लावणी, भावगीते, अभंग, गीतरामायण इत्यादि. भटांच्या कवीता त्यांचि महान प्रतीभा दर्शवतात, तर गदिमांचे काव्य वाचून वाटते कि अरे किती सोपे शब्द आहेत. ह्या दोन महान व्यक्तिंच्या काव्यशैली चा अभ्यास हा एखाद्या शोधनिबंधाचा विषय आहे.

प्रतिक्रिया

अनामिका's picture

1 Mar 2009 - 12:59 am | अनामिका

काही काही माणसे फक्त एखादे ईश्वरी कार्य पुर्णत्वास नेण्यास जन्म घेतात त्यांच्या पैकीच "गदिमा". गदिमांनी गीतरामायण रचुन आणि सुधिर फडके यांनी त्या गीतांना स्वर्गीय संगीताचा स्वरसाज चढवुन प्रभु श्रीरामाचे चरित्र अजरामर केले..........
सुरेश भटांबद्दल काय बोलावे?त्यांच्या लेखणीतुन जन्मास आलेला एक एक शब्द म्हणजे जिवंत लेण्यासारखा आहे .मानवी आयुष्यातल्या कुठल्या भावनेला भटांनी स्पर्श केला नाही व शब्दात बांधले नाही असे नाही.
अश्या अष्टपैलू लेखकांची व कवींची मायमराठी मधे कमतरता नाही पण तरीही या द्वयींचे स्थान मात्र धृवबाळासारखे अढळ आहे हे मात्र नक्की.
"अनामिका"

विकास's picture

1 Mar 2009 - 9:27 am | विकास

गदीमा आणि सुरेश भटांची तुलना करणे म्हणजे ऍपल आणि ऑरेंज यांची तुलना करणे असे वाटते (हा विशेष करून अमेरिकन वाक्प्रचार आहे म्हणून इंग्रजीच शब्द ठेवलेत).

कदाचीत एकच तुलना करायची झाल्यास साहीत्यसंपदा किती आहे याची करता येईल आणि त्यात गदीमा बरेच वरच्या पातळीवर ठरतील. तरी देखील अशी तुलना करणे मला यथोचीत वाटत नाही.

आणि हो, सध्या मिपावरील मुखपृष्ठावरील गाण्यांच्या विविध ओळखींमधे जे शेवटी ध्रुवपदासारखे येते तसे येथे पण म्हणता येईलः "आजकाल ग्रॅमी, गोल्डन ग्लोब, ऑस्कर कुणालाही मिळतात. तशी न मिळण्याची समानता या दोन महान कवींमधे आहे आणि तरी देखील ते महानच आहेत" :-)

हो आहेतच.

त्यांची तुलना करणे हे फारच कठीण आहे.

मग करावी कशाला?

दोघेही महान आहेत इतके पुरेसे आहे.

तिमा's picture

1 Mar 2009 - 9:58 pm | तिमा

अगदी बरोबर! असेच काही लोक लता व आशा यांची तुलना करायला बघतात. तुलना होऊच शकत नाही. दोघीही आपापल्या परीने "ऑल टाईम ग्रेट" अहेत.