मावा केक

चित्रादेव's picture
चित्रादेव in पाककृती
27 Feb 2009 - 10:09 am

cake-step2cake-step-3cake-step-last

ओले सामानः
२०० ग्रम मावा(४०० ग्रम रिकोटा चीज पासून मावा बनवायची कृती आपल्या चकली ताईनी दिली आहे),
४०० ग्रम मिल्कमेड डब्बा,
१ कप कुठलेही वेज ऑइल,
१ कप दूध,
वरच सगळे एकत्र कमी आचेवर गरम करत ठेवावे एक उकळी येइपर्यन्त. हे सर्व गाळून घ्यायचे मगच कोरड्या सामानात मिक्स करा.

कोरडे सामानः
१ १/२ (दीड कप) मैदा,
१ चमचा बेकींग पॉवडर,
१ चमचा बेकींग सोडा,
१ चमचा वेलची पूड,
४-५ काड्या केसर,
१० काजू,
वरील कोरडे सामान चाळून घ्या दोन तीनदा. मग वेलची,काजू आणि केसर पूड टाका.
आता ओले आणि कोरडे सामान एकत्र करून फेटा एकाच दिशेने सरसरीत करा. १७५ डिग्री फॅरेनहाइट वर ३५ मिनीटे भाजा.

१ अंड्याचा फक्त पांढरे हे ऑपशनल आहे. आधी लिहायला विसरले पण फोटो टाकताना आठवले. पण हवे असल्यास एक अंडे पांढरे भरपूर फेटून सगळ्यात शेवटी मिक्स करावे.

चॉकलेट फ्रोस्टींगः
१ पॅकीट unsweetned dark चॉकलेट चिप्स,
१ कप दूध,
१ चमचा बटर,
१ चमचा मध.
वरील एकत्र करून वितळवून घ्यायचे डबल बॉइलर मध्ये. हे मिश्रण केक वर ओतून सजवायचे. उरलेल्या मिश्रणात स्ट्रोबेरी घोळवा.

मी आधी केक फ्रोस्टींग करून उरलेले वरून असेच टाकले. आणि बाकीच्यात स्ट्रॉबेरी घोळवून काढली.

प्रतिक्रिया

अश्विनि३३७९'s picture

27 Feb 2009 - 11:59 am | अश्विनि३३७९

छान लागेल शंकाच नाही .. लवकर फोटो ड्कवा ..

chikusi's picture

27 Feb 2009 - 12:50 pm | chikusi

छान!!

जागु's picture

27 Feb 2009 - 1:11 pm | जागु

छानच आहे केक फोटो टाकलात तर अजुन छान वाटल असत.

सुनील's picture

27 Feb 2009 - 2:30 pm | सुनील

मावा केक म्हटले की मला ग्रँट रोडच्या मेरवानची आठवण येते.

ही पाकृदेखिल चांगली वाटतेय. फक्त फोटो तेवढा टाका बौ!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

27 Feb 2009 - 3:08 pm | विसोबा खेचर

आम्ही बिनफोटूच्या पाकृंना प्रतिसाद देत नाही..क्षमस्व!

फोटू कसा डकवायचा हे शिकवायची गरज आहे.

अगदी सोपे आहे.

१) आधी तो फोटो फ्लिकरवर चढवा.
२) फ्लिकरवर फोटो चढवताना त्याला पब्लिक ऍक्सेस ठेवा
३) मग तो फोटो फ्लिकरवरच उघडा
४) फोटोवर राईट क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये जा
५) आणि त्यातील यू आर एल मिपाच्या छायाचित्र संपादकत डकवा..

खलास..

तात्या.

रेवती's picture

27 Feb 2009 - 5:34 pm | रेवती

किती दिवसांपासून ह्या पाकृच्या शोधात होते!
फोटू, फोटू, फोटू!;)
तयार चॉकलेट फ्रॉस्टींग घरात आहे ते वापरीन म्हणते!
बाकी मावा केक बिन फ्रॉस्टींगचाही छानच लागणार!

रेवती

प्राजु's picture

27 Feb 2009 - 8:28 pm | प्राजु

लवकर दावा.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चकली's picture

27 Feb 2009 - 10:04 pm | चकली

मावा केक ची रेसिपी छान. तू दिलेली माझ्या ब्लॉगची लिन्क चालत नाहिये, म्हणून इथे देतेय

http://chakali.blogspot.com/2008/10/how-to-make-khava-ricotta-cheese.html

चकली
http://chakali.blogspot.com

रेवती's picture

27 Feb 2009 - 10:09 pm | रेवती

चकलीताई तू ग्रेट आहेस!
काहीच्या काही सुंदर मिठाया बनवतेस की!
एकदम चाबूक!:)

रेवती

श्रेया's picture

2 Mar 2009 - 2:05 pm | श्रेया

चकली ताई

मला मांसाहारी रेसिप्स आणि गुलाबजामचे पिठ घरी बनवुन करन्याची पध्दत हवी आहे कुपया कळ्वा

चित्रादेव's picture

27 Feb 2009 - 11:02 pm | चित्रादेव

बर्‍याच भानगडी आहेत फोटो टाकायच्या. फ्लीकर वर काय नवीन खाते उघडायचे काय तात्यांनू? म्हणजे तोथून सुरुवात?

विसोबा खेचर's picture

27 Feb 2009 - 11:56 pm | विसोबा खेचर

फ्लीकर वर काय नवीन खाते उघडायचे काय तात्यांनू? म्हणजे तोथून सुरुवात?

नाही. याहूचाच आयडी आणि पासवर्ड फ्लिकरकरता चालतो..

परंतु आपाला याहूचाही अकाउंट नसेल तर मात्र मज्जाच मज्जा! :)

आपला,
शम्मीतात्या कपूर. :)

चित्रादेव's picture

28 Feb 2009 - 2:48 am | चित्रादेव

मी फोटो फ्लीकर वर टाकले आणि लिन्क इथे अपलोड करायचा प्रयत्ने केला पण काही दिसत नाही चित्र. ते साइझ किती टाकायची? आणि URL नक्की कुठली कॉपी करायची फ्लीकरवरची?
बेसीक मध्येच लोचा है इधर...
कोइ है माय का लाल मदद के लिये तैयार?

भाग्यश्री's picture

28 Feb 2009 - 5:08 am | भाग्यश्री

चित्राताई, तुम्ही फ्लिकरवर छायाचित्र अपलोड केले की वरच तुम्हाला ऑल साईझेस ही टॅब दिसेल.
त्यावर क्लिक केले, की जो साईझ हवाय तो सिलेक्ट करून खाली आलेलेली लिंक कॉपी पेस्ट करा!

http://bhagyashreee.blogspot.com/

समिधा's picture

28 Feb 2009 - 5:32 am | समिधा

चित्राताई, मस्त वाटतोय मावा केक. अता नक्की करुन बघेन.
पण मला सांगा की कोरडे सामान चाळले नाही तर चालत नाही का? मी भारतातुन येताना चाळण आणली नाही . :(
जर न चाळता जमत असेल तर सांगा ना? :)

चित्रादेव's picture

28 Feb 2009 - 6:37 am | चित्रादेव

भाग्यश्री,
ताई नको हो. अभी भी मै जवान हू. :)
धन्यवाद लिंक कशी अप्लोड कशी करायची ते सांगितले ते.

समीधा,
सामान चाळले की हवा मिसळली जाते आणि केक हलका होतो. :)

प्राजु's picture

28 Feb 2009 - 8:32 am | प्राजु

:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रकाश घाटपांडे's picture

1 Mar 2009 - 9:55 am | प्रकाश घाटपांडे

पुन्यात आल कि केक खायला भेटायचा. चहामदी पाव बुचकळुन खायला भेटायचा म्हनुन आमाल पुन लईच आवडायच. केकमदी अंड असल्याच कळ्ळ्यावर जरा चलबिचल झाली हुति.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

श्रेया's picture

2 Mar 2009 - 2:09 pm | श्रेया

मला शाहाकारी केकची रेसिपी हव्या आहेत ओवन नसल्यास कसे करावे हे हि द्या

रेवती's picture

2 Mar 2009 - 5:00 pm | रेवती

फोटू आवडला!
रेवती