हल्लीच मिसळपावावर काही सदस्यांच्या अशा लक्षात आले आहे की येथे प्रकाशित झालेले काही लेखन त्यांनी पूर्वी वाचलेले होते. (एक दुवा.) यावर सरपंचांनी धोरणाचे सूतोवाच केले.
(सरपंचांचे धोरण) ते धोरण चोख असले, नैतिक असले, तरी त्याच्या अंमलबजावणीविषयी मनात प्रश्न उभा राहातो.
मिसळपावकर क्षक्ष आणि मायबोलीकर यय दोघेही एकच असू शकतात ही कल्पना मनात चमकून गेली. आता त्यांच्या अन्य प्रतिसादांत दोघांची लेखनशैली एकच की वेगळी, वेगळी असल्यास तो प्रतिभेचा भाग आहे काय? हे प्रश्न आले, तरी त्यांच्या उत्तराने हा प्रश्न सुटत नाही, की वाङ्मयावर मालकीहक्क सांगू शकणार्या एकाच व्यक्तीची ती दोन टोपणनावे आहेत की नाहीत?
आंतर्जालावरचे टोपणनावाखाली वावरणारे व्यक्तिमत्त्व आणि हक्क-कर्तव्ये असलेली कायदेशीर व्यक्ती यांचे नाते काय? हा विषय मिपावर अधूनमधून ओझरता उल्लेखात आला आहे, पण त्यावर साधकबाधक विचारपूर्वक चर्चा झालेली नाही. याविषयी लोकांचे मत जाणून घ्यायला नक्की आवडेल. या चर्चेचा मला काहीतरी उपयोग होईल, असे वाटते. मला काहीही उपयोग नाही करून घेता आला, तरी ही चर्चा मिसळपाव संकेतस्थळास उपयुक्तच ठरावी.
प्रतिक्रिया
21 Jan 2008 - 9:53 pm | सुनील
एकच व्यक्ती दोन विभिन्न संकेतस्थळांवर वेगवेगळ्या नावांनी वावरणे सहज शक्य आहे (किंबहुना, एकच व्यक्ती एकाच संकेतस्थळावरदेखील वेगवेगळ्या नावाने वावरते, हे वास्तव तूर्तास दूर ठेवू!).
अशा वेळेस एक करता येईल, की, त्या व्यक्तीस पूर्वप्रसिद्धी असे डिस्क्लेमर देण्यास भाग पाडता येईल.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
21 Jan 2008 - 10:06 pm | इनोबा म्हणे
सुन्याशी सहमत,
या प्रकारे साहित्य प्रसिद्ध झाले असल्यास मानहानी टाळण्याकरीता लेखकाने स्वतःच ती काळजी घ्यायला हवी. प्रश्न असा आहे की जर ते साहित्य उचललेले असल्यास व नविन लेखकाने पुर्वीचा लेखक आपणच आहे असा दावा केल्यास,ते साहित्यचौर्य कसे ओळखावे?
साहित्यचौर्य रोखण्याकरीता क्रिएटीव कॉमन्स या परवान्याचा उपयोग होईल का?
22 Jan 2008 - 7:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
साहित्य चोरणे याला फार मोठी परंपरा आहे, असे वाटते. :) पण,असे प्रकार रोखण्यासाठी काय केले पाहिजे
हा प्रश्न मात्र कठीणच आहे. टोपण नावाने लिहिणा-याने पुर्वप्रसिद्धीचा उल्लेख केला पाहिजे. पण,उचललेल्या लेखनाबाबत काही नियम आहेत, जसे संशोधनात आपण पुर्वसुरींच्या मताचा परामर्ष घेतो. पण, निव्वळ चालूगिरीच्या बाबतीत काय करु शकतो हे मात्र काही माहित नाही बॊ..........!!! उदाहरणार्थ :- रौशनीच्या आंतरजालावरील लेखनाच्या प्रिन्ट काढून जर मी लेखक म्हणुन माझे नाव टाकले तर ? कायदा काय म्हणतो.........आणि त्याचा लेखक काय कार्यवाही करु शकतो त्याची माहिती कोणी देईल काय ?
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
22 Jan 2008 - 8:39 pm | विसोबा खेचर
उदाहरणार्थ :- रौशनीच्या आंतरजालावरील लेखनाच्या प्रिन्ट काढून जर मी लेखक म्हणुन माझे नाव टाकले तर ? कायदा काय म्हणतो.........आणि त्याचा लेखक काय कार्यवाही करु शकतो त्याची माहिती कोणी देईल काय ?
ओ बिरुटेशेठ, अहो माझी रौशनी अजून लिहून पूर्ण होऊ द्या की! मग ढापा अगदी जरूर!! :))
( ह घ्या )
असो, माझ्यापुरतं बोलायचं तर आम्ही पडलो साला फकीर माणूस. आमचं लेखन कुणी ढापलं तर ढापू दे तिच्यायला!
आमचं लेखन कुणी ढापलं आणि स्वत:चं म्हणून छापलं तर आमचं लेखन कुणाला ढापावंसं वाटण्याइतपत तरी बरं आहे, एवढंच आम्ही समाधान मानू! बाकी, खुदा सब देख रहा है.
तात्या मिपात नाही, तात्या नाही मनोगती
तात्या चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई!
एवढं म्हणून आम्ही गप्प बसू... :)
काय बिरुटेशेठ, खरं की नाही?
आपलाच,
तात्या.
23 Jan 2008 - 12:18 pm | बिपिन कार्यकर्ते
आवडलं...
बिपिन.
22 Jan 2008 - 9:39 pm | विद्याधर३१
कारण तात्यान्ची ऱोशनी
ओर्कुटवर प्रसिध्द झाली आहे.
विद्याधर
22 Jan 2008 - 10:04 pm | विसोबा खेचर
अरे वा! कोण आहे तो साहित्यचोर? आम्हाला तरी कळू द्या! :)
27 Jan 2008 - 3:20 pm | सुधीर कांदळकर
"हा चोरीचा माल आहे" असे लेबल नसते. तसेच सरपंच अथवा प्रशासक यांना अंतर्ज्ञान नाही. त्यामुळे ते प्रेषकाचेच आहे असे गृहीत धरणे क्रमप्राप्त आहे. सरपंचांनी प्रत्येक सदराबरोबर ते स्वतःचेच असल्याबद्दल प्रेषकाचे एक प्रतिज्ञापत्र घ्यावे. तरीहि चोरी झालीच तर मिपा त्याबद्दल जबाबदार राहणार नाही. चोरी आढळल्यास त्या सदस्यावर कायम बहिष्कार टाकावा. शक्य असल्यास कायदेशीर कार्यवाही करून पोलिसांचा ससेमिरा मागे लावून द्यावा.