रोज पुडिंग

मिंटी's picture
मिंटी in पाककृती
26 Feb 2009 - 3:05 pm

रोज पुडिंग अर्थात गुलकंद वापरुन केलेलं पुडिंग. ही मुळतः एक अमेरीकन डिश आहे.
आयुर्वेदानुसार गुलकंद उन्हाळ्यात गर्मीपासुन होण्यार्‍या त्रासावर आणि ऍसिडीटीवर एक उत्तम आहे.....

साहित्य :

२ कप दुध
४ टेबलस्पून पाणी
१ टेबलस्पून प्लेन जिलेटीन
१ टेबलस्पून रुह अफ्झा किंवा डाबर रोज सिरप ( हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलु शकता )
२ टेबलस्पून गुलकंद ( हे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलु शकता )

कृती :

१. पाणी गरम करुन घ्यावे. एका कप मध्ये जिलेटीन पावडर घेऊन त्यावर गरम पाणी घालुन जिलेटीन पुर्णपणे विरघळेपर्यंत हलवुन घ्या.
२. दुध उकळवुन घ्या आणि त्यात सगळं साहित्य घालुन व्यवस्थीत हलवुन घ्या.
३. हे मिश्रण सर्विंग बाऊल मधे काढुन घ्या.
४. हे मिश्रण साधारण एक तासासाठी फ्रिज मधे सेट करायला ठेवा.
५. सेट झाल्यावर गार सर्व करा.

प्रतिक्रिया

दशानन's picture

26 Feb 2009 - 3:07 pm | दशानन

छान !

नाव वाचल्यावर मला वाटलं मिंटी आता कसल्या पुड्या सोडायला लागली =))

टारझन's picture

27 Feb 2009 - 1:41 am | टारझन

उकळलो , शिजलो , करपलो ,,, तळलो ... कुकरलो ...

मिंटे .. ह्या रैवारी अल्पोपाहाराला घरी येतोय ..

२ बादल्या दुध
४ बादल्या पाणी
१ बादली प्लेन जिलेटीन
१ बादली रुह अफ्झा किंवा डाबर रोज सिरप
२ टिंप गुलकंद

ह्या गोष्टी तयार ठेवा

- अल्पोपाहारी)टारू डाएटर

प्राजु's picture

27 Feb 2009 - 1:51 am | प्राजु

बादल्यांनी काय होणार?? तू सरळ बॅरल्स मागव.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

27 Feb 2009 - 2:21 am | टारझन

णको णको ... इतकं जास्त खाल्लं तर पुण्हा बोलावणार णाही ती मला ... आपलं थोडंसंच णावाला म्हणून खातो .. त्यातंच गोडी असते ...

- (सर्वचापी) टारू

चतुरंग's picture

27 Feb 2009 - 2:00 am | चतुरंग

आणि गोठ्यात उभा करुन गव्हाणीत पुडींग ओतून खायला उभा करा टारुला!! ;)

(वळू)चतुरंग

मिंटी's picture

27 Feb 2009 - 10:34 am | मिंटी

मिंटे .. ह्या रैवारी अल्पोपाहाराला घरी येतोय ..

ये ना नक्की ये..... यु आर मोस्ट वेलकम... :)

शेखर's picture

26 Feb 2009 - 3:08 pm | शेखर

बघुन खपलो..... :)

अश्विनि३३७९'s picture

26 Feb 2009 - 3:08 pm | अश्विनि३३७९

आजच करून बघिन .. फोटो अप्रतिम ...

मृगनयनी's picture

26 Feb 2009 - 3:10 pm | मृगनयनी

सुपर्ब!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

मिन्टे... सही ग्गं!... एकदम मस्त आणि सोप्पी पा. कृ. टाकल्याबद्दल धन्यवाद!
फोटो... लाजवाब!!!
फोटो पाहून मला परत भूक लागली गं!

:) :) :)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

गणपा's picture

26 Feb 2009 - 8:25 pm | गणपा

+१
हेच म्हणतो.
टंकायचा त्रास वाचवल्य बद्द्ल मृगनयनी चे आभार.

--गणपा

मृगनयनी's picture

26 Feb 2009 - 3:10 pm | मृगनयनी

सुपर्ब!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

मिन्टे... सही ग्गं!... एकदम मस्त आणि सोप्पी पा. कृ. टाकल्याबद्दल धन्यवाद!
फोटो... लाजवाब!!!
फोटो पाहून मला परत भूक लागली गं!

:) :) :)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

मृगनयनी's picture

26 Feb 2009 - 3:11 pm | मृगनयनी

सुपर्ब!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

मिन्टे... सही ग्गं!... एकदम मस्त आणि सोप्पी पा. कृ. टाकल्याबद्दल धन्यवाद!
फोटो... लाजवाब!!!
फोटो पाहून मला परत भूक लागली गं!

:) :) :)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

अभिष्टा's picture

26 Feb 2009 - 4:14 pm | अभिष्टा

मृगे, तुला तिनदा भूक लागली तरी पुडींग एकच आहे.
---------------------------------
आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.

मिंटी's picture

26 Feb 2009 - 4:17 pm | मिंटी

मृगे, तुला तिनदा भूक लागली तरी पुडींग एकच आहे.

=))

विसोबा खेचर's picture

26 Feb 2009 - 5:03 pm | विसोबा खेचर

तात्यांनी पुडींगचा शेवटचा चमचा खाल्ला आणि त्या रिकाम्या बाऊलच्या शेजारीच त्यांना समाधानी चिरनिद्रा लागली! :)

लव्हली पाकृ..!

तात्या.

दशानन's picture

26 Feb 2009 - 5:06 pm | दशानन

=))

तात्या कितीदा मरणार... हे पाककृतीवाले तुम्हाला पोहचवल्या शिवाय काय थंड बसणार नाहीत वाटतं !

=))

रेवती's picture

26 Feb 2009 - 5:34 pm | रेवती

वेगळ्याच पाकृबद्दल धन्यवाद!
फोटूवरून कल्पना येतीये की पदार्थ छान असणार.
रेवती

प्राजु's picture

27 Feb 2009 - 1:24 am | प्राजु

लग्गेच हा प्रयोग घरी होणार आता.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

रेवती's picture

27 Feb 2009 - 3:54 am | रेवती

अगं प्राजु,
आता आली का पंचाइत?
माझ्या इथे चायनीय दुकानात मिळणारा गुलकंद पाकिस्तानातून बनून आला आहे.
काय करू गं?;)
भारतात गेल्यावर अमृताकडेच जाऊन खाऊया.

रेवती

प्राजु's picture

27 Feb 2009 - 5:23 am | प्राजु

आमच्या पटेलात तर... भारतातलाच मिळतो बॉ...!
तुझ्या समस्येवर उपाय.. कनेक्टीकटची वारी करणे आणि जाता जाता पटेलातून घेऊन जाणे .

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मिंटी's picture

27 Feb 2009 - 10:35 am | मिंटी

भारतात गेल्यावर अमृताकडेच जाऊन खाऊया.

कधी येतेस बोल ?

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Feb 2009 - 5:47 pm | ब्रिटिश टिंग्या

सही दिसतयं.....

माझ्या मते रोझ पुडिंगवर सजावटीकरीता १-२ गुलाबाच्या पाकळ्या असतात आणि पुडिंगला फिकट गुलाबी रंग येण्याकरिता थोडासा खाण्याचा रंगदेखील वापरतात.....

मिंटी's picture

26 Feb 2009 - 6:06 pm | मिंटी

बरोबर आहे.... पण मला गुलाब मिळाला नाही रे सजवटीकरता..... आणि शक्यतो यात मी रंग वापरत नाही कारण रोज सीरप मुळे असाही त्याला छान रंग येतो..... अजुन रंग हवा असल्यास सीरप जास्त टाकता येईल किंवा तु म्हणतोयस तसं रंग पण टाकता येईल :)

चित्रा's picture

26 Feb 2009 - 6:29 pm | चित्रा

छान दिसते आहे. पाककृती छान.

शितल's picture

26 Feb 2009 - 7:12 pm | शितल

फोटो मस्त ग.
:)

सूर्य's picture

26 Feb 2009 - 8:50 pm | सूर्य

नेहमी फोटोंची मेजवानी, तर आज पाककृतीची मेजवानी आहे मिंटीकडुन :)
फोटो बघुन तोंडाला पाणी सुटले आहे.

- सूर्य.

टिउ's picture

26 Feb 2009 - 9:43 pm | टिउ

अवांतरः रोज रोज पुडींग खाउन कंटाळा नाही येणार का?

समिधा's picture

27 Feb 2009 - 1:30 am | समिधा

मी कधीच पुडिंग केल नाहीये, पण आता नक्की करुन बघेन. फोटो पण मस्त.

सहज's picture

27 Feb 2009 - 8:58 am | सहज

रोज खाउन पाहीले पाहीजे असे. :-)

आवडले.

स्मिता श्रीपाद's picture

27 Feb 2009 - 10:58 am | स्मिता श्रीपाद

खुप छान दिसत आहे..मी नक्की करणार....
धन्यवाद :-)

प्लेन जिलेटीन हा पदार्थ भारतात कुठे मिळतो....?
किराणामालाच्या दुकानात मिळेल का?

अनुजा's picture

28 Feb 2009 - 10:28 am | अनुजा

मस्तच! ! करुन बघायला हवे.... रोज सिरप , गुलकंद आमच्याकडच्या दुकानात मिळतेय का बघते........

वेलदोडा's picture

3 Mar 2009 - 3:09 pm | वेलदोडा

पाककृती छान वाटतिये. फोटो पण मस्त.

एक शंका - मध्यंतरी कोणाकडून समजले की जिलेटीन हिंदूंनी (गायीला पवित्र / पूजनीय वगैरे मानत असाल तर ) खाऊ नये कारण ते गायीच्या हाडातील कोलॅजन पासून बनवतात. ह्याबद्द्ल कोणाला खात्री शीर माहिती आहे का?

मृण्मयी's picture

3 Mar 2009 - 9:09 pm | मृण्मयी

खास उन्हाळ्यासाठी मस्त गोड पदार्थ!

वेलदोडा, इथे बघा : http://en.wikipedia.org/wiki/Gelatin

वेलदोडा's picture

5 Mar 2009 - 7:57 am | वेलदोडा

>>वेलदोडा, इथे बघा : http://en.wikipedia.org/wiki/Gelatin

हो मी ही आधी वाचले आहे. प्राण्यांच्या हाडांमधील कोलॅजन पासून जिलेटीन बनवतात ते माहित आहे. पण कोणते प्राणी? त्यात गायीचाही वापर असतो काय? ह्याबद्द्ल खात्रीशीर माहिती हवी होती.