रामराम मि.पा.कर मंडळी,
दररोज आंतरजाळावर वावरतांना आताशा त्याच त्याच संकेतस्थळांना भेटी देण्याचे माझे प्रमाण वाढलेले आहे.
(अभिमानाने सांगतो की "त्याच त्याच" संकेतस्थळांत मि.पा. व माझ्या इतर व्यावसाईक संकेतस्थळांचा (अभ्यासासाठी लागणार्या) समावेश नाही).
तरी पण साधारण सतत "त्याच त्याच" संकेतस्थळांना भेटी देवून माहीती/ ज्ञानात साधारण एकसूरीपणा येतो आहे असे जाणवते आहे. काहीतरी नवीन, बुद्धीला चालना देणारे पाहीजे असे वाटू लागले आहे.
ह्यावर उपाय म्हणजे आपल्यासारखे ज्ञानी लोक.
आपल्याला माहीत असणार्या काही महत्वाच्या संकेतस्थळांची माहीती आणि त्यांचे धागे या ठिकाणी द्यावेत हि नम्र विनंती.
यात आपणाला आवडणार्या व सर्व लेखनविषय व लेखनप्रकारच्या श्रेणीतील संकेतस्थळांचा समावेश असु द्या. आपल्या मि.पा. वर सर्व तर्हेचे, लहान मोठे, सान-थोर, ज्ञानी-(माझ्यासारखे अज्ञानी), स्त्री-पुरूष आहेत. म्हणून सर्व समावेशक संकेतस्थळे आलीत तर बरे. (अश्लील, राजकीय, व्यावसाइक, धार्मीक वाद, निव्वळ वाद होतील असे संकेतस्थळे नकोत. यात सर्व तर्हेच्या लोकांच्या आवडीनिवडी ध्यानात घेवुन लिहीले आहे.)
मला माहीत असलेले काही चांगली संकेतस्थळे:- (अद्ययावत करत राहील)
--------------------------------------------------------------------------------------------------
http://www.copernic.com/ : माहिती शोधकाचे शोधक
http://boingboing.net/ : चांगली अनुदिनी
http://www.yolinux.com/TUTORIALS/ : लिनक्स बद्दल माहिती
http://www.medindia.net/ : आरोग्यविषयक माहिती (आजार, रोग, औषधे आदी.)
http://ceo.maharashtra.gov.in/ : महाराष्ट्राची अद्ययावत मतदार यादी (यात "Online Search Electoral Roll " या दुव्यावर टिचकी मारा व आपले नाव शोधा.)
http://www.webhealthcentre.com/ : आरोग्यविषयक माहिती (आजार, रोग, औषधे आदी.)
http://www.tnhealth.org/chat.htm : तामीळनाडू शासनाची आरोग्यविषयक चर्चा सं.स्थळ. (माहिती साठी आपले-परके करणे सोडून द्यावे.) यात आपण आपल्या आरोग्यविषयक शंका थेट डॉक्टरांना विचारू शकतात.
http://www.tpub.com/content/construction/index.htm : सिव्हील ईंजिनीयरींग / प्र्याक्टिकल माहीती.
प्रतिक्रिया
25 Feb 2009 - 9:38 pm | कलंत्री
आपली कल्पना उत्तमच आहे.
विकी, चर्चा करत राहणारे मनोगत, उपक्रम इत्यादी संकेत स्थळे, मराठीवर्ल्ड.कॉम इत्यादींचा समावेश व्हायला हवा.
मराठीशाळेच्या संबंधीकोणते स्थळ असल्यास सूचवणे ( स्थळ सूचवणे याचा खरा अर्थ आज समजला हेही नसे थोडके.)
अश्लिल स्थळाला आपला विरोध का आहे हे मला समजले नाही. असो. आपण ही सर्व स्थळे पाहिल्यानंतरचे मत म्हणुन आपला आदर राखला पाहिजे. ( हलके घ्या).
25 Feb 2009 - 11:31 pm | इनोबा म्हणे
मला ही नाही कळाले. गांधीवादी पुस्तके वाचून आणि लोकांना चार शहाणपणाच्या गोष्टी सांगून कंटाळा आला की, आम्ही ही अंमळ विरंगूळा म्हणून 'तसल्या' सायटी शोधत असतो.
अवांतरः कलंत्रीसाहेब हे 'अश्लिल' काय असतं हो?
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
26 Feb 2009 - 11:10 am | पाषाणभेद
"आपल्या मि.पा. वर सर्व तर्हेचे, लहान मोठे, सान-थोर, ज्ञानी-(माझ्यासारखे अज्ञानी), स्त्री-पुरूष आहेत. म्हणून सर्व समावेशक संकेतस्थळे आलीत तर बरे. "
-( सणकी )पाषाणभेद
25 Feb 2009 - 11:40 pm | विकास
>>>महाराष्ट्राची अद्ययावत मतदार यादी (यात "Online Search Electoral Roll " या दुव्यावर टिचकी मारा व आपले नाव शोधा.)
फारच छान सेवा आहे ही! सरकारचे आभार! आत्ताच आपण सांगितलेल्या दुव्यावर टिचकी मारली तर लगेच पुढचे पान आले, जेथे लिहीले होते: Service Unavailable :-(
काय योगायोग आहे... मराठीत शासन या शब्दाचा अर्थ सरकार असा होतो आणि शिक्षा असाही होतो!
26 Feb 2009 - 11:12 am | पाषाणभेद
महाराष्ट्राची अद्ययावत मतदार यादी - Online Search Electoral Roll
हे स्थ्ळ परत परत बघत रहा. एखादे दिवशी चालू दिसेल.
-( सणकी )पाषाणभेद
26 Feb 2009 - 11:21 am | ढ
मायईमॅगझिन्स.कॉम इथे पुष्कळ मराठी मासिके वाचनासाठी उपलब्ध आहेत.
आत्ता ही सेवा फुकट आहे. साधारण एक महिन्यानंतर काही वर्गणी भरावी लागणार आहे.
26 Feb 2009 - 6:32 pm | ढ
जसराजजी, मल्लिकार्जुन मन्सूर साहेब,किशोरीताई आमोणकर, बडे गुलाम अली खाँ साहेब आणि इतर बरंच काही
ऐकण्यासारखं आहे इथं
28 Apr 2021 - 3:57 pm | मुक्त विहारि
Youtube जिंदाबाद
28 Apr 2021 - 4:04 pm | गॉडजिला
एकदम मस्त पॉडकास्ट आहे. ते ही चकटफु.