कालिंगण घालन भीजील तांदला पोळे( कलिंगड घालुन भिजवलेल्या तांदळाची घावने)

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in पाककृती
24 Feb 2009 - 4:10 pm

माझ्या घरातले मागच्या जन्मी मी फार मोठे पुण्य केल्याचा निर्वाळा देतात. " नशिबवान आहेस हो, एवढी सुगरण बायको मिळाली " वगैरे वगैरे.
तुम्ही किती वाजता जाणार आहात हॉस्पिटल मधे.
कलिंगड घालुन भिजवलेल्या तांदळाची घावने केली आहेत. लगेच पोचवा काकुना. गरम गरम खातील -बायको.
देवा शपथ सांगतो मला जेंव्हा जेंव्हा बायकोशी भांडावेसे वाटते तेंव्हा ह्या पाकृ ची आठवण काढतो. सगळे भांडण पोटातच विरते.
आणि ही घावने खाताना नेहेमीची चटणी सोडून 'चिकन' 'सुंगटे' किंवा 'पापलेट चे कालवण मिळाले तर मग काय बोलुच नका. ''गुलाम" व्हायची तयारी.
साहित्य- सुमारे १४ घावनांसाठी (४ जणाना पुरतात)
अर्धा किलो -कोलम तांदुळ एक लिटर पाण्यात रात्री भिजवावा.
कलिंगड खाउन झाल्यावर सालीवर जो पांढरा भाग असतो त्याचे छोटे तुकडे, किसलेले खोबरे.
पीठ वाटताना वेगळे पाणी घेउ नये. भीजवलेल्या पाण्याचा उपयोग करावा.
मिक्सर मधे पीठ वाटताना भिजलेल्या तांदळाबरोबर कलींगडाचे तुकडे आणि थोडे किसलेले खोबरे टाकावे. पीठ हाताला तांदुळ लागणार नाही एवढे वाटावे. प्रमाण १०% किसलेले खोबरे, १०% कलिंगडाचे तुकडे ८०% भिजलेला तांदुळ.
हे झाले पीठ तयार.
खरी कलाकृती तर नंतर.
घावने न करपता, न तुकडे होता अक्खी निखळावीत म्हणुन घ्यायची काळजी.
तवा अगदी स्वच्छ असावा. तवा पुर्ण गरम झाल्याशिवाय पीठ घालु नये. तव्यावर नारळाच्या चोथीने तेल नीट पसरावे. घावन परतताना दुसर्‍या बाजुने नविन लोणी लावल्यास उत्तम सुगंध.
चटणी : जरा आले, मीर्चीचा सढळ हस्ताने प्रयोग केल्यास घावनांची चव वाढाते.

प्रतिक्रिया

दशानन's picture

24 Feb 2009 - 4:12 pm | दशानन

<:P फोटु कुठ हाय मास्तर :''(

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

टारझन's picture

24 Feb 2009 - 9:29 pm | टारझन

तवा अगदी स्वच्छ असावा. तवा पुर्ण गरम झाल्याशिवाय पीठ घालु नये. तव्यावर नारळाच्या चोथीने तेल नीट पसरावे. घावन परतताना दुसर्‍या बाजुने नविन लोणी लावल्यास उत्तम सुगंध.

च्यायला ... ह्या मास्तर नी चांगलं लिवलंय की क्रिप्ट टाकलाय परत ? णको तिथे णको ते संदर्भ लागले

विनायक प्रभू's picture

25 Feb 2009 - 4:46 pm | विनायक प्रभू

एका गरीब सालस निरुपद्रवी मास्तर च्या साध्यासुध्या सुचनेचे काय काय अर्थ काढतात कोण जाणे.

अवलिया's picture

25 Feb 2009 - 4:48 pm | अवलिया

हिस्ट्रीशीटर

--अवलिया

विनायक प्रभू's picture

25 Feb 2009 - 4:51 pm | विनायक प्रभू

कायच कल्ले नाय वो

अवलिया's picture

25 Feb 2009 - 4:53 pm | अवलिया

चला आम्हाला पण जमले की... किरपटिक

--अवलिया

दशानन's picture

25 Feb 2009 - 4:55 pm | दशानन

:D

दशानन's picture

25 Feb 2009 - 4:52 pm | दशानन

बरोबर आहे मास्तर तुमचं !

लोकं उगाच तुम्ही हसलात तरी क्रिप्टीक हुडकत बसणार.... ;)

विनायक प्रभू's picture

25 Feb 2009 - 4:56 pm | विनायक प्रभू

घावन निखळताना तवा गरम असावा ह्यात काय क्रिप्टी़क आहे बॉ?

दशानन's picture

25 Feb 2009 - 4:59 pm | दशानन

=))

राहु दे मास्तर... आधीच काही जण मला मिपावर पागल समजत आहे... आता माझ्याच ऑफिस मधील लोकपण आता तेच समजत आहेत

अवलिया's picture

24 Feb 2009 - 4:16 pm | अवलिया

फटु कुठ हाय? फटु कुठ हाय? फटु कुठ हाय? फटु कुठ हाय? फटु कुठ हाय? फटु कुठ हाय? फटु कुठ हाय? फटु कुठ हाय? फटु कुठ हाय? फटु कुठ हाय? फटु कुठ हाय? फटु कुठ हाय? फटु ........... ........................... .............फटु कुठ हाय?

फ....टु... कु....ठ...हा.....य?

(हुश्श!!!!)

--अवलिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Feb 2009 - 8:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

फटु कुठ हाय?
फटू (बिल्ला नं. ५७५) हा मिपावरचा एक आय.डी. आहे. अलिकडे बर्‍याच दिवसात सदर सभासद मिपावर दिसले नाहीत, ही गोष्ट खरी आहे.

तुम्हाला (राजे+नाना) "फोटो कुठे हाय/आहे?" विचारायचं असेल तर, कुणाचा फोटो तेही नीट सांगा.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

विनायक प्रभू's picture

24 Feb 2009 - 4:20 pm | विनायक प्रभू

मुद्दाम टाकला नाय.
त्या निमित्ताने तरी घरी याल.

दशानन's picture

24 Feb 2009 - 4:24 pm | दशानन

तयारी करा येतो.... =P~ खाण्यासाठी दिल्ली से मुंबई.. दुर नहीं !

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

विनायक प्रभू's picture

24 Feb 2009 - 4:25 pm | विनायक प्रभू

अवलिया धडा घ्या हॉ.

अवलिया's picture

24 Feb 2009 - 4:27 pm | अवलिया

हल्ली वयोमानामुळे तिरपे झालेले प्रतिसाद नीट वाचता येत नाहीत.

--अवलिया

दशानन's picture

24 Feb 2009 - 4:30 pm | दशानन

म्हाता-या!

वाचता येत नाही की.... येणे नाही आहे :?

अवलिया's picture

24 Feb 2009 - 4:33 pm | अवलिया

आता कुठले येणे जाणे....
त्याचे कधीही येईल बोलावणे....

हरी ओम हरी ओम हरी ओम

--अवलिया

संजय अभ्यंकर's picture

24 Feb 2009 - 4:20 pm | संजय अभ्यंकर

बायकोच्या जोडीने उपहारगृह काढले असतेत तर ठाण्यातले शेट्टी हवालदिल झाले असते.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

विनायक प्रभू's picture

24 Feb 2009 - 6:52 pm | विनायक प्रभू

जबाबदारीतुन मोकळा झालो की तोच विचार आहे.

सुप्रिया's picture

24 Feb 2009 - 4:49 pm | सुप्रिया

पाक्रु आणि वर्णन मस्तच. पण सुकं खोबरं घालायचं की नारळ?

विनायक प्रभू's picture

24 Feb 2009 - 4:51 pm | विनायक प्रभू

काहीही चालते.
जर मलईवाला नारळाचे तुकडे टाकले तर अजुन चांगले.

धमाल मुलगा's picture

24 Feb 2009 - 5:04 pm | धमाल मुलगा

अरे आज काय रेशिपी डे आहे का??????????????????

बाकी, गुर्जी तुम्ही काही म्हणा, पण पा.कृ.पेक्षा त्यातला मुख्य संदेश (क्रिप्टीक ?) मला कल्लां :)

हीच आहे सुखी संसाराची गुरुकिल्ली! काय बरोबर की नाही?

अवांतरः शेवटच्या ठळक सुचनेमध्ये काहीतरी क्रिप्टीक आहे असं मला राहुन राहुन का वाट्टंय बरं?

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

छोटा डॉन's picture

24 Feb 2009 - 5:11 pm | छोटा डॉन

हीच आहे सुखी संसाराची गुरुकिल्ली! काय बरोबर की नाही?
अवांतरः शेवटच्या ठळक सुचनेमध्ये काहीतरी क्रिप्टीक आहे असं मला राहुन राहुन का वाट्टंय बरं?

बरं झालं...
आमचा व्यनी करायचा त्रास आणि कष्ट दोन्हीही वाचले, तुम्हाला व्यनी करा असा हुकुम होता.
असो.

आजच्या पाकॄ दिनात आणखी एका खणखणीत पाकॄचे स्वागत.
चालु द्यात ...

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

लिखाळ's picture

24 Feb 2009 - 5:05 pm | लिखाळ

वेगळी पाकृ.. संधी येताच करुन पाहिन ..
-- लिखाळ.

स्मिता श्रीपाद's picture

24 Feb 2009 - 5:52 pm | स्मिता श्रीपाद

घावन परतताना दुसर्‍या बाजुने नविन लोणी लावल्यास उत्तम सुगंध

लोणी लावल्यामुळे चुरुचुरु वाजणार्‍या घावनांचा आवाज आणि वास आला ;-)

मस्त पाकॄ..

फोटो दाखवा की प्लीज :-)

-स्मिता

शोनू's picture

24 Feb 2009 - 6:30 pm | शोनू

आमच्या घरी कलिंगडाच्या दिवसात हा प्रकार इतक्यांदा व्हायचा की आम्ही भावंडं याला 'उंदराचं विष' म्हणायचो. घर, अन घरचे लोक सोडून दूर गेल्यावर देखील हा प्रकार काही 'मिस' करत नाही मी.
सुरनळी, सांदण, खोट्टे यांची आठवण जरूर येते, पण हे डोसे अजुनही नकोरे बाबा!

लहानपणची मजेशीर आठवण ताजी झाली वाचून...

रेवती's picture

24 Feb 2009 - 7:06 pm | रेवती

छान! वेगळीच पाकृ आहे. कधी ऐकली नव्हती.
करून बघायला हवी.
फोटूची कसर वर्णनाने भरून निघाली.
कोलम तांदूळ माझ्या इथे मिळेल की नाही सांगता येत नाही.
बासमती किंवा उकडा तांदूळ वापरला तर चालेल का?

रेवती

विनायक प्रभू's picture

24 Feb 2009 - 7:58 pm | विनायक प्रभू

साधा जाडा तांदुळ पण चालेल
बासमती बद्दल सांगता येणार नाही.
उकडा तांदुळ वापरायला कोकणी आतडे असायला हवे.

रेवती's picture

24 Feb 2009 - 8:37 pm | रेवती

अच्छा, मग सोना मसूरी तांदूळ वापरीन.

रेवती

शंकरराव's picture

24 Feb 2009 - 7:16 pm | शंकरराव

जोरदार ...
फोटूची कसर वर्णनाने भरून निघाली.
हेच म्हणतो.

शंकरराव

शितल's picture

24 Feb 2009 - 8:05 pm | शितल

सर,
ही पाककृती करून बघायला हवी, कोकणी असल्याने घावन हे विक पॉईन्ट मध्ये मोडते.
आणी तुम्ही सांगितल्या प्रमाणे नारळाच्या किशीने तेल लावणे ते वाचुन तर आजीची आठवण आली. :)

यशोधरा's picture

24 Feb 2009 - 9:00 pm | यशोधरा

घरी होते हे :) उकडा तांदूळ कुठे मिळेल? :(

मुक्ता's picture

24 Feb 2009 - 9:23 pm | मुक्ता

हे पीठ आंबवावे लागत नाही काय?

../मुक्ता

प्राजु's picture

24 Feb 2009 - 11:06 pm | प्राजु

अखेर काकूंच्या खजान्यातून एक रत्न विप्रंनी आणलं बाहेर..!
वर्णन आणि रेसिपी दोन्ही खास.
मास्तर, असंच सारस्वती कुटुंबात मी, नारळ आणि गूळ घालून केलेली धिरडी खाल्ली आहेत. तांदूळ वाटतानाच त्यात गूळ, नारळ आणि वेलची घालतात बहुधा.
आपणांस माहीती असल्यास प्रकाश (घाटपांडे सर नव्हे) टाकावा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

24 Feb 2009 - 11:15 pm | चतुरंग

कल्पनेतल्या चवीत आणि खरपूस, खमंग, चुरचुरणार्‍या घावनाच्या आठवणीत न्हाऊन निघालो!
विप्रकाका, काकूंसाठी आमचे पेश्शल धन्यवाद पोचवा!! :)

चतुरंग

चकली's picture

25 Feb 2009 - 7:06 am | चकली

वेगळी रेसिपी आहे...छान वाटतेय
चकली
http://chakali.blogspot.com

चित्रा's picture

25 Feb 2009 - 9:28 am | चित्रा

आवडली कृती. आता कलिंगडे आणायला हवीत.