गाभा:
इन्किलाब नामक भारतीय उर्दु वृत्तपत्राची हेडलाईन काय आहे माहित आहे?
"हिंदुस्तानी मुसलमानोंकी धूम. ए आर रहमान और रसूल पोकुटी को ऑस्कर अवॉर्ड."
म्हणजे अवॉर्ड मुसलमानांना मिळाले.
जेव्हा बिन्द्राला सुवर्णपदक मिळाले तेव्हा कुणी अशी बातमी दिली का की हिंदूंचा पराक्रम वगैरे?
प्रतिक्रिया
24 Feb 2009 - 9:36 am | सखाराम_गटणे™
असल्या फालतु बातम्यांकडे दुर्लक्ष करणेच योग्य
----
तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
24 Feb 2009 - 10:03 am | मराठी_माणूस
असल्या फालतु बातम्यांकडे दुर्लक्ष करणेच योग्य
म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकवतो ही म्हण आठवली
24 Feb 2009 - 3:43 pm | विसोबा खेचर
म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकवतो ही म्हण आठवली
हेच बोल्तो..
तात्या.
24 Feb 2009 - 3:17 pm | रम्या
आजच्याच मटामधील बातमी नुसार ए. आर रेहमान यांच मूळ नाव ए. एस. राजकुमार आणि हे हिंदू आहेत. सुफी संगीत आणि तत्वज्ञानाने प्रभावित झाल्याने त्यांनी कधी तरी ए. आर. रेहेमान (अल्ला रख्खा रेहमान) या नावाने संगीत देण्यास सुरवात केली.
आता या माहीतीने ए. आर रेहमान यांच्या प्रतिभेवर काही परिणाम होत नसला तरी त्या उर्दू वॄत्तपत्राच्या संपादकाच्या कानाखाली गणपती काढल्याचं समाधान होतंय.
आम्ही येथे पडीक असतो!
25 Feb 2009 - 3:18 am | llपुण्याचे पेशवेll
ह्म्म्म्म. खरे आहे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
24 Feb 2009 - 3:52 pm | विशाल कुलकर्णी
रहमान मुळचा हिंदु असला तरी त्याने विधीवत मुस्लीम धर्म स्विकारलेला आहे. अर्थात त्यामुळे फारसा फरक पडत नाहीना.
त्याने त्याची प्रतिभा काही कमी - जास्त होत नाही.
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
24 Feb 2009 - 9:46 pm | हुप्प्या
एकीकडे उर्दु ही केवळ मुस्लिमांची भाषा नव्हे तर ती एक भारतीय भाषा आहे असे दावे करायचे आणि दुसरीकडे असली कोती बातमी द्यायची हा दुटप्पीपणा आहे.
मराठी पेपरात एखाद्या मराठी माणसाने पराक्रम केला म्हणून कौतुक करणे, राष्ट्रीय पातळीवरील पेपरात एखाद्या भारतीय माणसाचे भारतीय म्हणून कौतुक करणे हे समजू शकतो.
मशिदीत भाषण करताना एखाद्या मुल्ला मौलवीने अमका एखाद्या मुसलमानाचे मुसलमान म्हणून कौतुक करणेही समजू शकतो. पण उर्दू ही निव्वळ मुस्लिमांची भाषा नाही हा विचार करून बिगरमुस्लिमांचा विचार करून अशी बातमी दिली नसती तर बरे झाले असते. पण एवढा विचार करतो कोण?
ह्याच वर्तमानपत्रात जेव्हा मालेगावच्या बॉम्बस्फोटावर काही लिहिले जाते तेव्हा "हिंदू दहशतवादी" असा उल्लेख हमखास होतो. मात्र २६/११ च्या उल्लेखात "मुस्लिम दहशतवादी" असा उल्लेख कधी नसतो.
हा दुटप्पीपणा, नीचपणा आहे.
24 Feb 2009 - 10:01 pm | दवबिन्दु
तुम्हाला ऊर्दु वाचता येत का? मला पण ऊर्दु वाचायला शिकायचं आहे. कसं शिकायचं?
25 Feb 2009 - 9:37 am | हुप्प्या
मला उर्दु बर्यापैकी वाचता येते. मी अगदी एकटयाने कुणाच्या मदतीशिवाय हळूहळू शिकलो. अलिकडेच शिकलो (ही कोटी नाही!) आपल्याला उर्दू भाषा बर्यापैकी कळते त्यामुळे लिपी शिकणे तितके अवघड नाही असा माझा अनुभव आहे. सुरवातीला खूप अडखळायचो पण नंतर सवयीने जमले.
मराठी लोकांना उर्दू लिपी शिकवायला एक वेब पेज बनवायचा विचार आहे. बघू जमते का.
25 Feb 2009 - 2:52 pm | अभिरत भिरभि-या
मला पण ऊर्दु वाचायला शिकायचं आहे. कसं शिकायचं?
भारत सरकारच्या उर्दू कौन्सिलने काढलेले उर्दू लिपीवरचे पुस्तक अतिशय सुंदर आहे. परदेशी लेखकांची (निदान जितकी मी चाळली ती सारी) पुस्तके त्यापुढे चिंधी वाटली.
उर्दू कौन्सिल भारतातल्या अनेक शहरात उर्दूचा एका वर्षाचा डिप्लोमा कोर्स पुस्तक व शिकवणी सकट ३५०/- (माझ्या मेमरीप्रमाणे) इतक्या अत्यल्प खर्चात शिकवते. तुम्हाला कोर्स लावता आला नाही तरी उर्दूच्या पुस्तकांचा सेट घरी आणूण स्वतः शिकता येईल. या सेटमध्ये प्रारंभिक गद्यपद्य; लिपी (और क्या चाईये ?) सारे काही आहे.
आधिक माहितीसाठी ह्या सरकारी साईटी -
http://www.urducouncil.nic.in/
http://www.urducouncil.nic.in/dipurdu2009.htm
उर्दूच्या अलिफ बे (abc) साठी शुभेच्छा !!!
25 Feb 2009 - 10:05 am | वेताळ
ए.आर. रहमान मुळचा हिंदु आहे. त्याचे नाव ए.एस. दिलीप असे आहे. तामिळनाडु मध्ये अजुनही त्याचे मित्र त्याला दिलीप म्हणुननच बोलवतात. त्याचे वडिल एस. राजशेखर देखिल संगीतकार होते. त्यानी संगीतकार सलिल चौधरींबरोबर काम केले आहे.वडीलाच्या पश्चात त्याच्या आईला आलेल्या वाईट अनुभवामुळे त्यानी मुस्लिम धर्म स्विकारला आहे. पंरतु त्याने कधीच त्याचा बाऊ केला नाही.
उर्दु वर्तमानपत्राला रहमान बद्दल माहिती नसल्यामुळे त्यानी वरील मुर्खपणा केला असेल. मजेशीर गोष्ट म्हणजे मुस्लिम धर्मात आईला गौण स्थान असते. पण परवा पारितोषक स्विकारताना अल्लारखाने आपल्या आईला अल्लाच्या बरोबरीने बसवले. हे कट्टर मुस्लिम मान्य करतील काय?
जय हो...........
वेताळ
25 Feb 2009 - 11:34 am | सुनील
मुस्लिम धर्मात आईला गौण स्थान असते
हे खरे वाटत नाही.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
25 Feb 2009 - 1:59 pm | वाहीदा
मजेशीर गोष्ट म्हणजे मुस्लिम धर्मात आईला गौण स्थान असते. पण परवा पारितोषक स्विकारताना अल्लारखाने आपल्या आईला अल्लाच्या बरोबरीने बसवले. हे कट्टर मुस्लिम मान्य करतील काय?
कृपया ईतर धर्मांबध्दल माहीत नसेल तर ते माहीत करुन घ्यावे ! ईस्लाम मध्ये आई च्या पायाखाली जन्नत आहे असे म्हणतात म्हणजे, जी मुले आपल्या आई पाय मरे पर्यत सोडत नाही तिची मनोभावे सेवा करतात त्यांना स्वर्ग हा लाभतोच !
कयामत च्या दिवशी म्हणजे अंतीम न्याय निवाडा दिन प्रत्येक मखलुक (जीव )हा आपल्या आईच्या च नावाने ओळखला जाईल.. ईस्लाम मध्ये आईचे महत्व अनन्य साधारण आहे .हे कुठेले ही मुस्लिम मान्य करतील . बापाचे नाव हे फक्त या दुनियेसाठी (ईहलोक) अन त्या दुनियेत प्रत्येक जण आईच्याच नावाने ओळखले जाणार असे ईस्लाम मध्ये आहे
~
वाहीदा
»
25 Feb 2009 - 3:44 pm | शंकरराव
कृपया ईतर धर्मांबध्दल माहीत नसेल तर ते माहीत करुन घ्यावे ! ईस्लाम मध्ये आई च्या पायाखाली जन्नत आहे असे म्हणतात म्हणजे, जी मुले आपल्या आई पाय मरे पर्यत सोडत नाही तिची मनोभावे सेवा करतात त्यांना स्वर्ग हा लाभतोच !
कयामत च्या दिवशी म्हणजे अंतीम न्याय निवाडा दिन प्रत्येक मखलुक (जीव )हा आपल्या आईच्या च नावाने ओळखला जाईल.. ईस्लाम मध्ये आईचे महत्व अनन्य साधारण आहे .हे कुठेले ही मुस्लिम मान्य करतील . बापाचे नाव हे फक्त या दुनियेसाठी (ईहलोक) अन त्या दुनियेत प्रत्येक जण आईच्याच नावाने ओळखले जाणार असे ईस्लाम मध्ये आहे
पूर्ण सहमत आहे. मी हे वाचलेले आहे, अनेक सुफी कव्वाली गायकांनी हे गायले आहे.
विरोधाभास असा की आईवरुन शिव्या देणारे व भारत मातेला वंदन नाकारणारे हेच का ते ?.. मग जे महत्वाचे ते का विसरतात ?
असो मुठभर मथेफीरूं च्या वागण्याने धर्माचे तत्व नष्ट होत नाहीत. पण वाहीदा सारख्या जाणकारांनी जन जागरण करत रहावे.
शेवटी सैतानाचे घर अज्ञानात असते. सत्य व प्रेमा चे ज्ञानअम्रुत सर्वाना मिळावे जेने करून धर्मांधपणा व अज्ञान नष्ट होईल.
वंदे मातरम
शंकरराव
25 Feb 2009 - 1:37 pm | वाहीदा
मजेशीर गोष्ट म्हणजे मुस्लिम धर्मात आईला गौण स्थान असते. पण परवा पारितोषक स्विकारताना अल्लारखाने आपल्या आईला अल्लाच्या बरोबरीने बसवले. हे कट्टर मुस्लिम मान्य करतील काय?
कृपया ईतर धर्मांबध्दल माहीत नसेल तर ते माहीत करुन घ्यावे ! ईस्लाम मध्ये आई च्या पायाखाली जन्नत आहे असे म्हणतात म्हणजे, जी मुले आपल्या आई पाय मरे पर्यत सोडत नाही तिची मनोभावे सेवा करतात त्यांना सर्ग हा लाभतोच !
कयामत च्या दिवशी म्हणजे अंतीम न्याय निवाडा दिन प्रत्येक मखलुक (जीव )हा आपल्या आईच्या च नावाने ओळखला जाईल.. ईस्लाम मध्ये आईचे महत्व अनन्य साधारण आहे .हे कुठेले ही मुस्लिम मान्य करतील . बापाचे नाव हे फक्त या दुनियेसाठी (ईहलोक) अन दुनियेत प्रत्येक जण आईच्याच नावाने ओळखले जाणार असे ईस्लाम मध्ये आहे
~ वाहीदा
25 Feb 2009 - 1:58 pm | दशानन
>>>कृपया ईतर धर्मांबध्दल माहीत नसेल तर ते माहीत करुन घ्यावे !
सहमत.
अहो संपादक मंडळी...
जरा लक्ष द्या ...
कुणाच्या धर्मावर हा हल्ला नाही आहे का ?
Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero. सत्य वचन :D
25 Feb 2009 - 11:30 am | जयेश माधव
अरे बाबा॑नो,उर्दु ईन्क्लाब बद्दल काही लीहु नका रे!!
मी तीकडेच काम करतो.
जयेश माधव
26 Feb 2009 - 2:05 pm | सँडी
>>मात्र २६/११ च्या उल्लेखात "मुस्लिम दहशतवादी" असा उल्लेख कधी नसतो.
इथे फक्त दहशतवादी म्हट्ले तरी चालते.
>>"हिंदुस्तानी मुसलमानोंकी धूम. ए आर रहमान और रसूल पोकुटी को ऑस्कर अवॉर्ड."
इथे "हिंदुस्तानी" शब्द मह्त्वाचा वाट्तो...
26 Feb 2009 - 5:46 pm | आपलाभाउ
नमस्कार !
च्या मायला १५०५ मधे बाबरला भारतात पानिपत च्या लढाईस बोलवल नस्त तर हे मुसलमान या भारतात नस्तेच.
कुटलाहि धर्म वाईट नस्तो पन कुट्ला हि मुसलमान धर्म पालत नाहि , त्यामुळे
इन्किलाब नामक भारतीय उर्दु वृत्तपत्राची हेडलाईन काय आहे माहित आहे?
"हिंदुस्तानी मुसलमानोंकी धूम. ए आर रहमान और रसूल पोकुटी को ऑस्कर अवॉर्ड."
असल्या न्युज येतात.
हे आमच मत आहे.
जय हिन्द!