"अबीर" बद्दल काही....

असिम's picture
असिम in काथ्याकूट
23 Feb 2009 - 1:02 pm
गाभा: 

"अबीर गुलाल उधळीत रंग...
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग"

"अबीर" या शब्दाचा नेमका अर्थ काय? व्युत्पत्ती बद्दल कुणी माहिती पुरवू शकेल का?

-असिम

प्रतिक्रिया

सायली पानसे's picture

23 Feb 2009 - 1:10 pm | सायली पानसे

अबीर म्हणजे जसे कुंकु गुलाल तसच एक पांढर्‍या रंगाची पावडर असते.....पुजे मधे त्याचा वापर होतो. अबीर गुलाल उधळले जातात.

अबीर काळ्या रंगाचे असते.

सायली पानसे's picture

23 Feb 2009 - 7:54 pm | सायली पानसे

गैरसमज दुर केल्या बद्दल धन्यवाद.
बुक्का काळा असतो हे नक्की माहित होत.
गूगल वर अशिहि माहिति मिळालि कि अबिर हि नैसर्गिक रंगची पावडर आहे आणि त्यात फुलांपासुन काढलेले रंग मिसळुन होळी साठी रंग बनवले जातात ... म्हणुन आपला मला वाटल कि अबीर पांढरा असावे.
असीम माझा प्रतिसाद काढुन टाकत आहे.

केशवराव's picture

23 Feb 2009 - 3:14 pm | केशवराव

सायली ताई तुम्ही अबीराच्या फोटोची निगेटिव्ह पाहीलेली दिसत्ये.

जागु's picture

23 Feb 2009 - 2:59 pm | जागु

अगदी बरोबर नरेश. अबिर हे काळ्या रंगाचे असते.

कवटी's picture

23 Feb 2009 - 3:24 pm | कवटी

अबिर हे काळ्या रंगाचे असते.
बुक्का म्हणजे काय? अबीर्-बुक्का असा शब्द प्रयोग ऐकला आहे. बुक्का पण काळा असतो. का अबीर म्हणजेच बुक्का?
कवटी

http://www.misalpav.com/user/765

केदार's picture

24 Feb 2009 - 12:24 am | केदार

बुक्का पण काळा असतो. का अबीर म्हणजेच बुक्का >> हो.

अभिष्टा's picture

24 Feb 2009 - 10:50 am | अभिष्टा

अबीर किंवा बुक्का हा वारकर्‍याच्या भाळी नेहमीच लावलेला असतो कारण बुक्का हे पांडुरंगाच्या चरणधुळीचे प्रतिक आहे.
---------------------------------
आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.

असिम's picture

27 Feb 2009 - 6:42 am | असिम

तुमच्या प्रतिक्रीयांसाठी धन्यवाद!
-असिम