थीलापिया कालवण आणी पापलेट फ्राय

लवंगी's picture
लवंगी in पाककृती
22 Feb 2009 - 1:42 am

बाहेर भरपूर हिमवर्षाव चाललाय. थंडीने गारठून गेलेय सारं. अश्या वेळी गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर तिखट थीलापिया कालवण आणी पापलेट फ्रायची मजाच काहि और आहे..

या आजच्या बेताचे काही फोटो.

थीलापिया करी -

थीलापियाचे ( नसल्यास रावस किंवा सुरमई पण चालेल ) तुकडे हळद, मीठ, लाल मिरची पावडर लावून १०-१५ मिनीटे ठेवावे.
२ इंच आलं, १ गड्डा लसुण, १ छोटी जुडी कोथिंबिर, १/४ ताजा खवणलेला नारळ, ३-४ हिरव्या मिरच्या असे वाटण वाटून घ्यावे.
एका भांड्यात थीलापियाचे तुकडे, वाटण, थोडासा मालवणी मसला असे सगळे एकत्र करून घ्यावे. बोराएवढी चिंच कोळून घ्यावी.
चिंचेचे पाणी थीलापियात टाकावे. १० मिनीटे शीजवून एक दणदणीत उकळी आणावी.

वाफाळत्या भातावर सर्व करून सोबत कच्चा कांदा आवर्जून घ्यावा.

From Drop Box

From Drop Box

पापलेट फ्राय -

पापलेटच्या तुकड्यांना आल - लसुण - हिरवी मिरचीची पेस्ट, हळद, मीठ, लाल मिरची पावडर लावून १०-१५ मिनिटे ठेवावे.
तुकडे रवा किंवा तांदळाच्या पिठित घोळवून घ्यावे. तव्यावर गरम तेलात श्यालो फ्राय करून घ्यावेत.

From Drop Box

फिशकरी - भाताबरोबर ताव मारावा.. वाढत्या वजनाचा मुळीच विचार करू नये. जेवण झाल्यावर ताणून देणे अगदी जरूरी..

प्रतिक्रिया

सुक्या's picture

22 Feb 2009 - 4:46 am | सुक्या

एकदम झकास फोटो. रेसिपी पण टाका.

(यम यम यमी हे विंग्रजी यम यम यमी... भारतीय यमाने / यमीने / यमदुताने दुसरीकडे जावे :-) )

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

लवंगी's picture

22 Feb 2009 - 6:33 am | लवंगी

रेसिपी पण टाकली..

प्राजु's picture

22 Feb 2009 - 7:05 am | प्राजु

खासच. :)

आवांतर : आता तात्या कितव्यांदा "वारणार, संपणार अथवा यम सदनास पोहोचणार??" मोजा.... लागा कामाला.. :?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्राची's picture

22 Feb 2009 - 7:31 am | प्राची

तात्या,लवकर बोला,यमाला निमंत्रण द्यायचे का???? :-C

संदीप चित्रे's picture

22 Feb 2009 - 8:52 am | संदीप चित्रे

मस्त फोटु आणि रेसिपी.
(अवांतर -- रूबी ट्युसडे या रेस्टॉरंटमधला तिलापिया खाल्ला आहेस का लवंगी? खल्लास असतो.)

लवंगी's picture

22 Feb 2009 - 6:04 pm | लवंगी

पण आता नक्की पुढच्या वेळी जाईन तेंव्हा.

सुनील's picture

22 Feb 2009 - 11:09 am | सुनील

आजवर तिलापिया नेहेमी बाहेरच खाल्ला आहे. छान दिसतेय पाकृ आणि फोटो.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

गणपा's picture

22 Feb 2009 - 12:31 pm | गणपा

झक्कास.
रविवारी सकाळी सकाळी पहिल दर्शन कालवण आणि फ्राय. धन्य झालो. O:)
अगदी आईच्या हातच्यहा कालवणाची आठवण झाली आणि फोटू पाहून बादली भर लाळ गाळली. =P~

:)] अमेरिकेहुन इकडे पार्सल करता येते का ग?

लवंगी's picture

22 Feb 2009 - 6:08 pm | लवंगी

सगळे पदार्थ खाऊ घालते.

विसोबा खेचर's picture

22 Feb 2009 - 4:51 pm | विसोबा खेचर

शब्द नाहीत! वाचा गेली आणि मृत्यू आला! :)

जबरा पाककृती..!

लवंगी's picture

22 Feb 2009 - 6:09 pm | लवंगी

अहो असे पदार्थ खाण्यासाठी 'आप जिओ हजारो साल'

खादाड's picture

23 Feb 2009 - 7:34 pm | खादाड

एकदम सोप्पी पा.क्रु.
इथे नागपुरला गोड्या पाण्यातले मासे मिळतात त्याला खार्‍या पाण्यातल्या मास्यासारखा स्वाद नाहि येत पण .....

गोड्या पाण्यातल्या माश्यासाठी चिंच जरा जास्त वापरा.