न्याय

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
21 Feb 2009 - 5:26 pm
गाभा: 

काय हो सर, ह्याला न्याय म्हणायचा का?
माझ्याच एक विद्यार्थ्याने विचारलेला प्रश्न. मी उत्तर देउ शकलो नाही. बघा तुमच्याकडे असेल तर.
अजुनही संपर्कात असलेला माझा विद्यार्थी. लग्न होउन १० वर्ष झालेली. दोन मुले. मोठी मुलगी आठ वर्षाची. लहान मुलगा ४ वर्षाचा.
बायको सहकारी बॅकेत काम करते. हा मेंटेनन्स इंजिनियर असल्यामुळे सतत टुरवर. एवढा एक त्रास सोडला तर सुखाचा संसार.
४ महिन्यापुर्वी बायको आजारी पडली. युरीन इनेफक्शन्चे निदान झाले. ४ दिवस हॉस्पिटल मधे राहुन बरी झाली. परत एका महिन्यानंतर तोच त्रास. सर्व प्रकारच्या तपासण्या झाल्या. सर्वायकल बायॉप्सी पण झाली. अँटीबायॉटीक्सचे कोर्स पुर्ण झाले. पण जखम काही बरी होईना. मग एका प्रसिद्ध 'गायनॅक' डॉक्टरांकडे सल्ला घेण्यात आला. दादरच्या फार मोठ्या हॉस्पिटल मधे पुन्हा सुरुवातीपासुन सर्व तपासण्या परत झाल्या. सर्व रीपोर्ट्स तयार झाले. संध्याकाळी ६.३० वाजता डॉक्टरांनी भेटायला बोलवले.
डॉक्टरांनी सर्व प्रथम नवर्‍याला एकटेच कंसल्टींग रुम मधे बोलवले.
"तुमचे बाहेर काही संबंध आहेत का"? डॉक्टर
"अजिबात नाही" नवरा
"नक्की का? असेल तर सांगा. म्हणजे निदानाला मदत होईल. तुम्ही सारखे टुर वर असता म्हणुन विचारतो" डॉक्टर
" जे नाही ते नाही" नवरा
"एक काम करा एच आय वी टेस्ट करुन घ्या. ती एक तपासणी राहीली आहे." डॉक्टरांनी सल्ला दीला.
"माझी की बायकोची"नवर्‍याने शांतपणे विचारले.
"अर्थात पेशंटची" डॉक्टर
एच्.आय.वी -पीसीआर टेस्ट करायचे ठरले. सुमारे २२०० रुपयाची फोडणी.
नंतर बायकोला वेगळे ला परत तपासणी साठी बोलवले. १५ मिनिटांनी बायको बाहेर आली. चेहेर्‍यावरचा रंग उडालेला.
घरी जाताना गाडीत स्मशान शांतता. तरी सुद्धा नवर्‍याने धीर करुन चौकशी केली.
"तुमचे काही बाहेर संबंध नाहीत ना" बायको
"शक्यच नाही, तुझ्याशिवाय कुणाचा विचार पण शिवला नाही गेल्या १० वर्षात. बाहेर असताना आठवण आली ,एकटेपणा वाटला तर बॅगेतला फोटो बघतो तुझा मुलांबरोबरचा."नवरा
"तुम्हाला माझ्यावर संशय आहे का? बायको
"ही सगळी चर्चा आपण टेस्टचा रीपोर्ट आल्यावर करु. तोपर्यंत काहीही झाले नाही असे समज. मी पण करुन घेणार आहे टेस्ट"नवरा
टेस्ट झाली. रीपोर्ट आला. टेस्ट निगेटीव. दोघेही निरपराध असल्याचा निर्वाळा मिळाला.
नंतर असे लक्षात आले की बायकोला दीलेल्या अँटिबायॉटीक्सला ती रेझिस्टंट होती. त्यामुळे आजार बरा होत नव्हता. सर्व काही सुरळीत झाले.
नवर्‍याने थोड्या दिवसाने बायकोकडे विचारणा केली.
नवरा बाहेर असताना तुमचे इतर काही संबंध आहेत का असा प्रश्न डॉक्टरनी बायकोला विचारला नव्हता. ह्या सर्व प्रकारात 'पुरुष'
दोषी असे डॉक्टरानी गृहीत धरले होते.
हा न्याय आहे का?
मला माहीत नाही.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

21 Feb 2009 - 5:39 pm | अवलिया

हा न्याय आहे का?

यामधे पुरुषाला बाहेरील संबंधाबद्दल विचारले. स्त्रीला तसे काही विचारले नाही.
पण टेस्ट स्त्रीची आधी करायला सांगितली, पुरुषाने स्वतःहुन केली.
स्त्रीला त्रास होता, त्यामुळे तिचीच टेस्ट केली पण केवळ तोंडी माहितीवर आधारुन निर्णय घेतला नाही.
मात्र पुरुषाला काही त्रास त्यावेळेस नव्हता, त्यामुळे त्याला केवळ तोंडीच माहिती विचारली.
ह्या सर्व प्रकारात 'पुरुष' दोषी असे डॉक्टरानी गृहीत धरले होते हे जे आपण म्हटले ते चुक आहे असे वाटते. कारण मग पुरूषाची पण टेस्ट लगेच सांगितली असती. पण ही टेस्ट पुरुषाने आपणहुन केली आहे.

त्यामुळे मला तरी यात खटकण्यासारखे काय आहे हे कळले नाही. समजावुन सांगा.. मान्य करेल.

तरी पण या कथेत शेवट गोड झाला, आनंद आहे.

--अवलिया

विनायक प्रभू's picture

21 Feb 2009 - 7:15 pm | विनायक प्रभू

संक्रामक रोगात दोन्ही बाजुनी चौकशी महत्वाची असते.
जरा चौकशी केल्यावर कळाले की फक्त पुरुषाला जबाबदार धरण्याची फॅशन च आहे ह्या समस्येत.

अवलिया's picture

21 Feb 2009 - 7:21 pm | अवलिया

फॅशन आहे म्हटल्यावर प्रश्न मिटला... फॅशन चुकिच्याच गोष्टींच्या असतात ब-याच वेळेस

--अवलिया

नीधप's picture

22 Feb 2009 - 11:52 am | नीधप

इथे सहमत.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

विसोबा खेचर's picture

21 Feb 2009 - 5:48 pm | विसोबा खेचर

डॉक्टरांची वागणूक सर्वांकरता समान हवी असे वाटते..

तात्या.

विनायक प्रभू's picture

21 Feb 2009 - 5:52 pm | विनायक प्रभू

आपल्यावर आळ नको म्हणुन नवर्‍याने स्वःत टेस्ट करुन आपले निरपराधीत्व सिद्ध केले. मला तरी वाटते की प्रश्न बायकोला पण विचारायला हवा होता.
अर्थात मी आधी म्हट्ल्याप्रमाणे हा न्याय की अन्याय ह्या बाबत माझे मत मी ह्या क्षेत्रातील इतर मीत्रांकडे चौकशी करुन मांडीन.

नीधप's picture

22 Feb 2009 - 11:56 am | नीधप

डॉक्टरने त्याच्या अनुभवावरून विचारले नसेल कशावरून?
टूरवर जाणारे अनेक नवरे बाहेरून येऊन ही भेट बायकोला देतात असं त्यांचं स्टॅटिस्टिक्स सांगत असेल तर?
त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी विचारले. हे जर अपमानास्पद वाटले असेल त्याला तर मग कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जाताना सुरक्षारक्षकांनी तपासणे, मेटल डिटेक्टरच्या दारातून जावे लागणे हे ही अपमानास्पद वाटत असेल त्याला.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

विनायक प्रभू's picture

22 Feb 2009 - 3:55 pm | विनायक प्रभू

वैद्यकिय क्षेत्रात योग्य निदानासाठी ' शक्यता वजावट' पद्धत वापरतात.(Elimination of possibility)
अशा परिस्थीतीत फक्त पुरुषाला प्रष्न विचारणे मला तरी अयोग्य वाटाते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Feb 2009 - 7:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुरूष आणि स्त्रियांची लैंगिक मानसिकता वेगवेगळी असल्यामुळे कदाचित डॉक्टरांनी हा प्रश्न प्रथम पुरूषाला विचारला असावा. डॉक्टरांनी प्रश्न प्रथम पुरूषाला विचारण्याचं कारण दिलेलं आहेच, शिवाय या स्त्रीला घर आणि मुलं सांभाळायला लागतात, तिच्यावर मोठी जबाबदारी आहे. तेव्हा मलातरी डॉक्टरने हा प्रश्न प्रथम पुरूषाला विचारण्यात काही फार मोठा अन्याय दिसत नाही.

जर दोघांचीही एच.आय.व्ही. टेस्ट पॉझिटीव्ह आली असती, तर हा न्याय्य-अन्याय्यचा प्रश्न असाच पडला असता का?

अदिती

विनायक प्रभू's picture

21 Feb 2009 - 7:10 pm | विनायक प्रभू

घर आणि मुले जबाबदारी आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टीवीटी चा संबंध नाही कळाला.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Feb 2009 - 7:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जास्त जबाबदारी असताना एक्स्ट्राकरीक्युलर ऍक्टीव्हीटीज कमी होतील/होणारच नाहीत, असा अंदाज!

अदिती

विनायक प्रभू's picture

21 Feb 2009 - 7:16 pm | विनायक प्रभू

आता ह्याला मी काय म्हणावे.

अवलिया's picture

21 Feb 2009 - 7:18 pm | अवलिया

जोक ऑफ द मिलेनियम
अभिनंदन :)

--अवलिया

टारझन's picture

22 Feb 2009 - 12:09 pm | टारझन

=)) =)) =)) =)) =)) =))
णाणांसारखेच हसतो ...

आणि ह्याला स्त्रीयांवरील जेनेरिक विधाण म्हणावे काय ? काही दिवसांपुर्वी स्त्रियांच्या ड्रायव्हिंग स्किल्स च्या जेनेरीक स्टेटमेंट वरून उडालेला भडक्याची आठवण झाली ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Feb 2009 - 12:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझा अंदाज करण्याच्या सांख्यिकीमधे साम्पल साईझ एक आहे! :-)

अवांतर विचार/प्रश्न: बाहेरख्यालीपणाची सांख्यिकी कोणाकडे आहे का; म्हणजे त्यातलं स्त्री-पुरूष असं वर्गीकरण!

अदिती

अवलिया's picture

22 Feb 2009 - 12:17 pm | अवलिया

माझा अंदाज करण्याच्या सांख्यिकीमधे साम्पल साईझ एक आहे!
अपवादाने नियम सिद्ध

अवांतर विचार/प्रश्न: बाहेरख्यालीपणाची सांख्यिकी कोणाकडे आहे का; म्हणजे त्यातलं स्त्री-पुरूष असं वर्गीकरण!
माझ्या मते बाहेरख्यालीपणा करायला दोघेही लागतात.
हल्ली नवी काही पद्धत असेल तर माहीत नाही.
आम्ही पारंपारीक :)

--अवलिया

दशानन's picture

22 Feb 2009 - 12:44 pm | दशानन

:)

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Feb 2009 - 1:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या मते बाहेरख्यालीपणा करायला दोघेही लागतात.
अर्थात, पण दोघंही 'अप्रामाणिक' असण्याची गरज नाही.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

शैलेन्द्र's picture

22 Feb 2009 - 2:27 pm | शैलेन्द्र

बरोबर,

काहीजन पोटाशी प्रामाणिक असतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Feb 2009 - 2:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मागे एक भारतीय अभियंता अफगाणिस्तानात मारला गेला. त्याला सरकारी भरपाई मिळाल्यावर लक्षात आलं की त्याला दोन बायका आहेत, एक जी आई-वडिलांबरोबर रहायची आणि दुसरी दुसर्‍या शहरात रहाणारी. या दुसर्‍या बायकोला मात्र दुसरा नवरा नाही आणि आपल्या एकमेव नवर्‍याची आपण एकमेव बायको नाही हेही माहित नाही.
(न्यायालयाने दोघींना समान रक्कम विभागून दिली, असं आठवतंय.)
या उदाहरणात अप्रामाणिक कोण-कोण आणि त्यांची सांख्यिकी काय?

असो. हा मुद्दा फार अवांतर होत आहे, त्यामुळे असो.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

विनायक प्रभू's picture

22 Feb 2009 - 4:11 pm | विनायक प्रभू

मला माहीत असलेली सांख्यिकी ६५:३५ (पुरुषःस्त्री)

अवलिया's picture

22 Feb 2009 - 4:15 pm | अवलिया

अर्धवट माहिती देवु नका, ६५-३५ हे प्रमाण कसे काढले?
सर्व लोकसंख्या धरली असेल तर अशा लोकांचे एकुण लोकसंख्येशी असलेले गुणोत्तर किती?
वरती दिलेली ६५-३५ हे प्रमाण वेगळे असण्याची शक्यता किती?

प्रश्नांची उत्तरे ओपन फोरमवर देण्यासारखी नसतील तर व्यनी करा.

--अवलिया

विनायक प्रभू's picture

22 Feb 2009 - 4:20 pm | विनायक प्रभू

वरील माहीती अर्धवट नाही. माझ्यासमोर आलेल्या केसेस मधील. हा १९९६ सालचा विदा आहे. दहा वर्षात वाढ का कमी हे तुम्हीच ठरवा. डेमोग्राफी प्रमाणे संख्येत बदल अधिक उणे होण्याची शक्यता १० ते १५% म्हणजे ५५:४५

अवलिया's picture

22 Feb 2009 - 4:23 pm | अवलिया

तरीही एक प्रश्न बाकीच ....

सर्व लोकसंख्या धरली असेल तर अशा लोकांचे एकुण लोकसंख्येशी असलेले गुणोत्तर किती?

--अवलिया

विनायक प्रभू's picture

22 Feb 2009 - 4:38 pm | विनायक प्रभू

लोक्संख्येत बाहेरख्याली पणा आणि लोक्संख्येचे (अव) गुणोत्तर मी कसे काय सांगु बॉ?

टारझन's picture

22 Feb 2009 - 5:47 pm | टारझन

=)) =)) =)) =)) =)) =))
णाणांसारखेच हसतो ...

आणि ह्याला स्त्रीयांवरील जेनेरिक विधाण म्हणावे काय ? काही दिवसांपुर्वी स्त्रियांच्या ड्रायव्हिंग स्किल्स च्या जेनेरीक स्टेटमेंट वरून उडालेला भडक्याची आठवण झाली ?

विसोबा खेचर's picture

21 Feb 2009 - 10:49 pm | विसोबा खेचर

जास्त जबाबदारी असताना एक्स्ट्राकरीक्युलर ऍक्टीव्हीटीज कमी होतील/होणारच नाहीत, असा अंदाज

हा हा हा! अंमळ मजेशीर विधान! :)

आपला,
(एक्स्ट्रा करिक्यूलर) तात्या.

परिकथेतील राजकुमार's picture

22 Feb 2009 - 1:13 pm | परिकथेतील राजकुमार

>>जास्त जबाबदारी असताना एक्स्ट्राकरीक्युलर ऍक्टीव्हीटीज कमी होतील/होणारच नाहीत, असा अंदाज!
== काहि लोक जबाबदारीला एक्स्ट्राकरीक्युलर ऍक्टीव्हीटी मानतात आणी एक्स्ट्राकरीक्युलर ऍक्टीव्हीटी ला जबाबदारी ! या लोकांपुढे सगळे अंदाज बोंबलायला हरकत नाही ;)

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

अजय भागवत's picture

22 Feb 2009 - 8:44 pm | अजय भागवत

कदाचित् हे वरील चर्चेला प्रत्यक्ष काहीही संबंध नसलेले उत्तर असु शकेल, पण विनायक सरांनी दिलेल्या प्रसंग चित्रणावरुन मला हे लिहावेसे वाटते.

जेव्हा एखादी व्यक्ति अनिश्चिततेच्या प्रभावाखाली असतांना निर्णय घेते (पेचात पडलेले डॉक्टर), त्यावेळी घेतलेला निर्णय त्याव्यक्तिच्या एकंदरीत अपेक्षा (एक्स्पेक्टेशन) वर बेतलेला असतो. वरील प्रसंगातील डॉक्टरच नव्हे तर कोणीही अशा स्वरुपाचा निर्णय घेउ शकतो. [अशा निर्णयाला शुद्ध मराठीत आपण बायस्ड डिसीशन असे म्हणतो].
अशा स्वरुपाचे निर्णय अधिक खोलवर जाउन पाहिले असता ते अशा उपप्रकारात येतात-
१. गृहीत धरलेली शक्यता (पर्सिव्ह्ड प्रोबॅबिलिटी): म्हणजे एखादी शक्यता "असे असण्याची" किंवा "असे नसण्याची" गृहीत धरलेली असते
२. गृहीत धरलेले निर्णयाचे परिणाम (पर्सिव्ह्ड कॉन्सिक्वेन्स ऑफ अ डिसीजन): ठरलेला निर्णय घेतला तर अमक ढमुक परिणाम होतील असे गृहीत धरलेले असते मग त्यातल्या त्यात कमी दाहक परिणाम असलेला निर्णय घेण्याकडे कल असतो

आणखीही एक उपप्रकार आहे पण तो वरील चर्चेशी संबंधीत नाही.

कदाचित वरील माहीतीवरुन आपल्याला पडलेल्या प्रश्नाची उकल व्हायला मदत होईल असे वाटले म्हणून वरील माहीती दिली.

अजय भागवत's picture

22 Feb 2009 - 8:44 pm | अजय भागवत

कदाचित् हे वरील चर्चेला प्रत्यक्ष काहीही संबंध नसलेले उत्तर असु शकेल, पण विनायक सरांनी दिलेल्या प्रसंग चित्रणावरुन मला हे लिहावेसे वाटते.

जेव्हा एखादी व्यक्ति अनिश्चिततेच्या प्रभावाखाली असतांना निर्णय घेते (पेचात पडलेले डॉक्टर), त्यावेळी घेतलेला निर्णय त्याव्यक्तिच्या एकंदरीत अपेक्षा (एक्स्पेक्टेशन) वर बेतलेला असतो. वरील प्रसंगातील डॉक्टरच नव्हे तर कोणीही अशा स्वरुपाचा निर्णय घेउ शकतो. [अशा निर्णयाला शुद्ध मराठीत आपण बायस्ड डिसीशन असे म्हणतो].
अशा स्वरुपाचे निर्णय अधिक खोलवर जाउन पाहिले असता ते अशा उपप्रकारात येतात-
१. गृहीत धरलेली शक्यता (पर्सिव्ह्ड प्रोबॅबिलिटी): म्हणजे एखादी शक्यता "असे असण्याची" किंवा "असे नसण्याची" गृहीत धरलेली असते
२. गृहीत धरलेले निर्णयाचे परिणाम (पर्सिव्ह्ड कॉन्सिक्वेन्स ऑफ अ डिसीजन): ठरलेला निर्णय घेतला तर अमक ढमुक परिणाम होतील असे गृहीत धरलेले असते मग त्यातल्या त्यात कमी दाहक परिणाम असलेला निर्णय घेण्याकडे कल असतो

आणखीही एक उपप्रकार आहे पण तो वरील चर्चेशी संबंधीत नाही.

कदाचित वरील माहीतीवरुन आपल्याला पडलेल्या प्रश्नाची उकल व्हायला मदत होईल असे वाटले म्हणून वरील माहीती दिली.

नाटक्या's picture

23 Feb 2009 - 1:15 pm | नाटक्या

अशा निर्णयाला शुद्ध मराठीत आपण बायस्ड डिसीशन असे म्हणतो

शुद्ध मराठीत????? =)) =)) :T :T :O :O :O

पाषाणभेद's picture

23 Feb 2009 - 5:12 pm | पाषाणभेद

"बाहेर असताना आठवण आली ,एकटेपणा वाटला तर बॅगेतला फोटो बघतो तुझा मुलांबरोबरचा."नवरा
नवर्‍याचे विधान फारच भावूक आहेत.

शेवट गोड झाला हे महत्वाचे.
-( सणकी )पाषाणभेद