आलु टिक्की / समोसा चाट

सुक्या's picture
सुक्या in पाककृती
21 Feb 2009 - 1:33 pm

समोसा साठी भाजी:

साहित्य:
३ मध्यम आकाराचे बटाटे
३/४ हिरव्या मिरच्या
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा जिरे / मोहरी
बारीक कापलेली कोथिंबीर
फ़ोडणीपुरते तेल
कृती :
बटाटे मायक्रोवेव्ह मधे किंवा पाण्यात उकडुन छोट्या आकारात डाइस करुन घ्या. कढईत तेल घेउन त्यात जिरे, मोहरी बारीक कापलेल्या मिरच्या टाकुन परतवा. त्यावर धने पावडर घालुन कापलेले बटाटे घालुन फ़ोडणी देउन घ्या. ५ मिनीटे परतवुन उतरवुन घ्या.


********************
समोसा:

१ वाटी मैदा पाण्यात मळुन घ्या. एकजीव झाल्यावर एका ओल्या कापडात गुंडाळुन ३० मिनिटे मुरु द्या. वर बनवलेली बटाट्याची भाजी घालुन समोसे बनवुन घ्या.


********************
छोले भाजी:

साहित्य:
१ वाटी छोले
१ कांदा बारीक चिरलेला
२ टमाटे
१ चमचा छोले मसाला
१ चमचा लाल मिरची
१ चमचा लिंबाचा रस
चवीपुरते मिठ. फ़ोडणीसाठी तेल,
१ चमचा अद्रक लसुन पेस्ट.

कृती :
आदल्या रात्री छोले भिजवुन ठेवा. प्रेशर कुकर मधे एक शिट्टी देउन शिजवुन घ्या. एका पातेल्यात तेल गरम करुन त्यात मोहरी, जिरं, हिंग, हळद, तमालपत्र, अद्रक लसुन पेस्ट घालून फोडणी द्यावी. यात लाल मिरची व छोले मसाला घालुन चांगले परतुन घ्यावे आता या मिश्रणात छोले आणी बारीक कापलेले टमाटे टाकुन उकळी येउ द्यावी. चांगली उकळी आल्यावर वरुन कोथिंबीर भुरभुरा.


********************

बनवलेले समोसे तेलात तळुन घ्या. चाट मधे जास्त बटाटे हवे असतील तर आलु टिक्की करुन घ्यावी. बटाटे कमी हवे असतील तर कचोरीही चालेल.

चिंचेच्या पेस्ट मधे गुळाचे पाणी घालुन आंबटगोड चटणी बनवुन घ्या.

एका वाटीत दही घेउन त्यात पुदीना पावडर किंवा पाणीपुरी मसाला घालुन फ़ेटुन घ्यावे. गरज वाटल्यास थोडे पाणी घालुन पातळ करुन घ्या.

एका ताटलीत समोसे कुसकरुन घ्या त्यावर छोलेची भाजी टाका.

वर बनवलेली चिंचेची आंबटगोड चटणी टाका, एक चमचा दही टाका. वरुन चाट मसाला , शेव , कोथिंबीर भुरभुरा.

बास .. अजुन काही नाही .. चेपा ..
:D

प्रतिक्रिया

मितालि's picture

21 Feb 2009 - 1:37 pm | मितालि

अप्रतिम !! फोटो छान आलेयत.. चवीलाही छान असेल नक्की...

परिकथेतील राजकुमार's picture

21 Feb 2009 - 1:49 pm | परिकथेतील राजकुमार

जियो मेरे लाल !
ज ह ब र्‍या !
आजच हा उपदव्याप करुन बघतो !

º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य

सहज's picture

21 Feb 2009 - 2:18 pm | सहज

सुक्या, सुकड्या, सुकूटल्या रे काय झकास फोटो टाकले आहेस.

:-)

सुप्रिया's picture

21 Feb 2009 - 4:26 pm | सुप्रिया

वाचून आणि मुख्यतः बघून तोंडाला पाणी सुटले. ही माझी आवडती डीश आहे. बर्याचदा ऑफिसमध्ये आम्ही मागवतो.
पाक्रु. बद्द्ल अनेक धन्यवाद. आता घरीही करता येईल.

रश्मी's picture

21 Feb 2009 - 2:55 pm | रश्मी

वा काय अप्रतिम फोटो आहे. पहीला फोटो पाहुनच भुक लागली.समोसा चाट खुपच छान लागतो.खुपच छान आणि सोपि पाककृती दिली आहे.

विसोबा खेचर's picture

21 Feb 2009 - 3:41 pm | विसोबा खेचर

पाकृ आणि फोटू जबरा....! मानलं बॉस!

मरतेवेळी 'आलु टिक्की / समोसा चाट' हेच शब्द तात्यासाहेबांच्या तोंडी होते..! :)

तात्या.

प्राची's picture

21 Feb 2009 - 3:59 pm | प्राची

तात्या आपल्याला सारखं सारखं मरायचा कंटाळा नाही का हो येत? ~X( (यमराज थकले (|: तरी तुम्ही थकायचे नाहीत)
मिपावरच्या भावी पाककृतींसाठी जगा की १००० वर्षं..... :)

बाकी समोसा चाट तर एकदम favourite...

प्राजु's picture

21 Feb 2009 - 10:14 pm | प्राजु

सगळे आतापर्यंतचे पदार्थ करून तात्यांचं तेरावं घालून टाकू..
म्हणजे पुढच्या पदार्थांमध्ये निदान.. वारलो, मेलो.. संपलो.. अशा प्रतिक्रिया येणार नाहीत.
ना रहेगा बास.. ना बजेगी बासूरी..
कसे??? (हलकेच घ्या..) :)

समोसा चाट.. भन्नाट. फोटो जीवघेणे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

छोटा डॉन's picture

21 Feb 2009 - 4:00 pm | छोटा डॉन

>>मरतेवेळी 'आलु टिक्की / समोसा चाट' हेच शब्द तात्यासाहेबांच्या तोंडी होते..!
=)) =))
तात्या, आता पाककॄतींवरच्या फोटोंना पाहुन दिलेल्या प्रतिक्रीयांचे "पेटंट" घ्यायला हवे तुम्ही.
अगदी अफाट प्रतिक्रीया असतात एकेक ...
पुढेमागे आपण एखादे "पुस्तक छापुन" टाकु, काय ?

बाकी कसलेही "समोसायुक्त" आयटम्स आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
मस्त फोटो +पाकॄ ...!!!

------
( पुस्तकांचा प्रकाशक ) छोटा डॉन माजगावकर
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

लिखाळ's picture

21 Feb 2009 - 4:03 pm | लिखाळ

>>मरतेवेळी 'आलु टिक्की / समोसा चाट' हेच शब्द तात्यासाहेबांच्या तोंडी होते..!<<
तात्या, आता पाककॄतींवरच्या फोटोंना पाहुन दिलेल्या प्रतिक्रीयांचे "पेटंट" घ्यायला हवे तुम्ही.
अगदी अफाट प्रतिक्रीया असतात एकेक ...

डॉन्याशी एकदम सहमत आहे .. तात्यांच्या मेलो..वारलो या प्रतिक्रिया मजेदार आहेत :)

पाकृ लै भारी आहे .. लवकरच करुन पाहावी म्हणतो :)
-- लिखाळ.

वृषाली's picture

21 Feb 2009 - 3:53 pm | वृषाली

शेवटचा फोटो फार छान दिसतोय.

विंजिनेर's picture

21 Feb 2009 - 3:55 pm | विंजिनेर

मिपा मालकांचा अति लाळस्त्रावाने बळी.
घातपाताचा संशय. पोलिसांच्या तपासाची चक्रे सुरू.
चाट-पाकृ.-कार सुक्या प्रमुख संशयित(चटणीकार मितालि/जिलेबी कार रामची आई/हुमणकार पेठकरकाका ह्यांचाही ह्यात हात असण्याची शक्यता).
मिपाकरांना मदतीचे आवाहन

--
अक्षरास हासू नये

सुक्या's picture

22 Feb 2009 - 4:10 am | सुक्या

चोर सोडुन सन्याशाला फाशी? मिपा वर एकापेक्षा एक पाककला निपुण लोक असताना अर्धी पाकक्रुती नावावर असणार्‍या सुक्या वर संशय? कलीयुग रे बाबा घोर कलीयुग.
बाकी आमच्या घरी पोलीस तपासाला आले तर मिपावराच्या भारी भारी पाकृ करुन खाउ घालतो. लगेच आपलं नाव संशयीतांच्या यादीतुन कटाप होतं की नाही ते बगा.

बाकी प्रतीक्रियेबद्द्ल धन्स.

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

खादाड_बोका's picture

21 Feb 2009 - 9:43 pm | खादाड_बोका

मिपा मालकांचा अति लाळस्त्रावाने बळी.
घातपाताचा संशय. पोलिसांच्या तपासाची चक्रे सुरू.
चाट-पाकृ.-कार सुक्या प्रमुख संशयित(चटणीकार मितालि/जिलेबी कार रामची आई/हुमणकार पेठकरकाका ह्यांचाही ह्यात हात असण्याची शक्यता).
मिपाकरांना मदतीचे आवाहन...... =)) =))

मला तर स्वप्नातही भुक लागते....

शितल's picture

21 Feb 2009 - 10:20 pm | शितल

त्या डिशच्या आजु बाजुची फरशी पुसायला टिंग्या येतेच असेल. ;)
बाकी फोटो मस्तच. :)

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Feb 2009 - 7:51 pm | ब्रिटिश टिंग्या

ती फरशी वेगळ्या पाककृतीतील्....इथली नव्हे!

अवांतर : समोसा चाट १ लंबर!

मृदुला's picture

22 Feb 2009 - 1:58 am | मृदुला

सचित्र पाककृती आवडली. सामोशाचे आवरण कुरकुरीत करण्यासाठी काय करावे?

रेवती's picture

26 Feb 2009 - 9:07 pm | रेवती

कोरडा असतानाच मैद्याला डालडा किंवा शॉर्टनींग हाताने व्यवस्थीत चोळून घ्यावे.
मैद्याचा साधारण मुटका होईपर्यंत डालडा (शॉर्टनींग) लावावे व नंतर पाण्याने मैदा भिजवावा.
अश्यानं सामोश्याची पारी खुसखुशीत होते.

रेवती

सुक्या's picture

22 Feb 2009 - 4:21 am | सुक्या

प्रतीक्रिया देणार्‍या / न देणार्‍यांना सर्वांना धन्यवाद. खरं तर कुठलीही चाट दिसली की आमच्या खिशाला चाट लागतेच :-) बायकोबरोबर बाहेर गेलो की नियम असल्यासारखा चाट / पानीपुरि खाउनच घरी यायचो. आजकाल इथे सहजासहजी मिळत नाही. तेव्हा घरीच बनवतो. पाककलेतलं कांदा, टोमॅटो कापणे आणी बायकोने बनवलेली पाकृ खाणे याशिवाय मला काहीही येत नाही. अगदी ही पाकृ सुध्दा आमच्या अर्धांगानेच बनवली. आमचं आपलं कांदा काप, समोसा तळ वगेरे वगेरे.

कटोरी चाट म्हणुन एक खुप सुंदर चाट्प्रकार आहे. कुणाला त्याची रेसिपी माहीत आहे काय? दिल्यास पुर्व दिशेला तोंड करुन पहील्या कटोरी चाट चा नैवेद्य दाखवला जाइल. :-)

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

चकली's picture

22 Feb 2009 - 4:45 am | चकली

मस्त फोटो आहेत. फोटो पाहुनच भुक लागली...आज समोसा चाट खाणारच!

चकली
http://chakali.blogspot.com

स्वाती२'s picture

26 Feb 2009 - 7:44 pm | स्वाती२

मस्त फोटो ! फोटो पाहून माझा लेक पाघळलाच. या शनीवारी समोसा चाट.

रेवती's picture

26 Feb 2009 - 7:49 pm | रेवती

फारच त्रासदायक फोटू आहेत बुवा!
करावे म्हणते आता हे चाट.... काय करणार, इलाज नाही.;)

रेवती

सूर्य's picture

26 Feb 2009 - 9:00 pm | सूर्य

समोसा माझा फार आवडता पदार्थ आहे.
सुक्या रावांनी फार मस्त पाककृती दिली आहे.

- सूर्य.