कचोरी (पाककृती सह फोटो.. )

मितालि's picture
मितालि in पाककृती
20 Feb 2009 - 5:35 pm

मी स्वत: बनवलेली कचोरी आणि चिन्चेची चटणी :-)

पाककृती:

साहित्यः
१ वाटी मैदा , २ चमचे तेल, मीठ, पाणी
१/२ वाटी उडीद डाळ, १ चमचा मिरचिपूड, १/२ चमचा धणेपूड,
१/२ चमचा आमचूर पावडर, १/२ चमचा हळद,१चमचा साखर, मीठ
मोहरी, जिरे, हिंग,१ चमचा बडिशेप आणि १/४ चमचा धणे
तळणासाठी तेल.

कृती:
१ वाटी मैद्या मधे २ चमचे तेल आणि चिमूटभर मीठ घालून मिक्स करून घ्या.
पाणी घालून मऊसर पीठ मला. हे पीठ पोळीच्या कणके पे़क्षा मऊ (लोण्यासारख..)
असायला हव. जर हाताला चिकटत असेल तर थोडे अजुन तेल घाला.

सारणसाठी, अर्धी वाटी उडीद डाळ घेऊन ती 4-5 तास भिजत ठेवा. नंतर डाळीतील
पाणी पूर्णपणे काढून टाका. डाळी मधे १ चमचा मिरचिपूड, १/२ चमचा धणेपूड,
१/२ चमचा आमचूर पावडर, १/२ चमचा हळद,१चमचा साखर आणि चवीनुसार मीठ
टाकून हे कोरडेच मिश्रण मिक्सर मधुन रवाळ वाटून घ्या. जास्त पेस्ट बनऊ नका.

एका नॉनस्टिक कढईत मोहरी, जिरे, हिंगची फोडणी तयार करा, त्यात १ चमचा बडिशेप
आणि १/४ चमचा धणे टाका. या फोडणीमधे डाळीचे मिश्रण मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे
परतून घ्या. सुरुवातीला हे मिश्रण चमच्याला चिकटेल.. पण जस जसे भाजले जाईल तस
तसे ते चमच्या पासुन सुटत जाईल. सारण नीट कोरडे व्हायला हवे नाहीतर काचोर्‍या मऊ
पडतील. दाण्याच्या कोरडया चटणी प्रमाणे दिसेल तयार झाले की.

सारण थंड झाले की काचोरी बनवायला घ्या. मैद्याचा लिंबाच्या आकारचा गोळा घेऊन
त्यात सारण भरा. मोदक जसे बनवतो त्या प्रमाणे. आता हा गोळा पोळपाटा वर ठेवा आणि
तळ हाताने दाब देऊन पुरीचा आकार द्या. जास्ता पातळ नका करू. साधारण १/२ सेंटिमीटर
जाडीची ही पुरी बनेल.पीठ मऊ असल्याने अगदी सहजतेने बनत जातील..
(लाटणी नाही वापरायची.. तिचे इतरही उपयोग असतात.. )

कढई मधे तळण्यसाठी तेल तापवा. तेल जास्त गरम किवा जास्ता थंड असता नये. मंद आचेवर
काचोर्‍या सोनेरी रंगावर तळुन घ्या.

चिन्चेची चटणी :
साहित्यः साखर, चिन्च, मिरचिपुड
कृती: साखरेत थोडे पाणी घालुन उकळ्त ठेवा. जरासा चिकट पाक बनला की त्यात १/४ चमचा
मिरचिपुड आणि चिन्चेचा कोळ घाला. आवश्यक असल्यास पाणी घाला. थोडा वेळ शिजवा.
झाली तयार चिन्चेची चटणी ....

;;)

प्रतिक्रिया

दशानन's picture

20 Feb 2009 - 5:38 pm | दशानन

ज ळ वा आ म्हा ला :)

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

मितालि's picture

20 Feb 2009 - 5:40 pm | मितालि

आज आता बनवलीय...

दशानन's picture

20 Feb 2009 - 5:41 pm | दशानन

ये जले पें नमक !

=))

सही !

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Feb 2009 - 5:48 pm | ब्रिटिश टिंग्या

लंचची वेळ झालीये!

मेलो! वारलो! खपलो! संपलो! नीजधामास गेलो! यमसदनास गेलो!निवर्तलो! :)

दशानन's picture

20 Feb 2009 - 5:52 pm | दशानन

अरे चारजणं यारं कोणी तरी... खांदा देऊ ह्याला टिंग्याला.... टिंग्या.. असे रोज मेलो मेलो नको करु... कधीतर तुझेच मित्र हितचिंतक तुला पोहचवतील संभाळून रे बाबा =))

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

विसोबा खेचर's picture

20 Feb 2009 - 6:03 pm | विसोबा खेचर

मेलो! वारलो! खपलो! संपलो! नीजधामास गेलो! यमसदनास गेलो!निवर्तलो!

हम्म! 'तात्या' घराण्याची तालीम चांगली घेतलेली दिसते.. असो! :)

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Feb 2009 - 2:24 am | llपुण्याचे पेशवेll

>>मेलो! वारलो! खपलो! संपलो! नीजधामास गेलो! यमसदनास गेलो!निवर्तलो!

मे लो ! वा र लो ! ख प लो ! सं प लो ! असेच म्हणतो

(तालीमबाज)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

मितालि's picture

20 Feb 2009 - 5:51 pm | मितालि

:)

;;)

विसोबा खेचर's picture

20 Feb 2009 - 5:54 pm | विसोबा खेचर

कचोरीचा फोटू जबराच!

निधन पावलो...!

तात्या.

दशानन's picture

20 Feb 2009 - 5:55 pm | दशानन

हाच प्रतिसाद ह्यांना पण

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

मितालि's picture

20 Feb 2009 - 5:59 pm | मितालि

सगळे का बरे मरतायत.. @)

दशानन's picture

20 Feb 2009 - 6:00 pm | दशानन

हे सगळे तुमच्या मुळे.. सकाळ पासून उपाशी पोटी / नाय तर बायको / स्वयपाकीने डब्यात कोंबलेले खाऊन आधीच जिव वैतागलेला असतो त्यात... असे सुंदर फोटो... माणसाचा जिव जाईल .. ना तर राहील व्हं !

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

मितालि's picture

20 Feb 2009 - 6:04 pm | मितालि

धन्यवाद...
8>

सागर's picture

20 Feb 2009 - 6:28 pm | सागर

सुंदर अप्रतिमच

मिताली
फोटो पाहून पाणी तर सुटलेच, पण आता स्वस्थ बसणे नाही....
फोटो सुंदर आहे
एवढी सुंदर कचोरी करणार्‍या तुम्हीही छानच असाल..... (स्वभावाने बरं का वाचकहो.... नाहीतर गरीबावर तुटून पडाल ;))
माझी बायको पण सुरेख कचोर्‍या करते... आता या विक-एन्ड्ला तिला कचोर्‍या करायचा त्रास देतो... :)

(कचोरीप्रेमी आणि कचोरीच्या अतिसेवनाने झालेलो पोटू..... )सागर

गीत's picture

20 Feb 2009 - 6:36 pm | गीत

एवढी छान कचोरी केलीत, रेसिपी हवी आहे, शिकायला आवडेल :)

मितालि's picture

20 Feb 2009 - 6:44 pm | मितालि

दोन दिवस सुट्टी आहे.. तेव्हा लिहुन देते.. ठीक आहे??

मितालि's picture

20 Feb 2009 - 6:40 pm | मितालि

तुमचि बायको म्हणेल या पोरीने कचोरी चे फोटो टाकुन माझ्या मागे कटकट लावली..:)

गीत's picture

20 Feb 2009 - 6:45 pm | गीत

गीता टाईप करता आल नाही , त्याच गीत झाल :D

ही प्रतिक्रिया माझ्याकरिता आहे बहुतेक :)

(अवांतरः गीताजी की गीत.... नाव बदलता येते ना .. माझे खाते मधून बदला...)

सागर's picture

20 Feb 2009 - 6:47 pm | सागर

हा हा हा
खरे आहे मितालीजी .... पण आवडेल तिला ते करायला... माझ्या खुशीसाठी ती नक्की करेन...

मी पण प्रयत्न करतो बायकोच्या कचोर्‍यांचा फोटो काढायचा....
धन्यवाद
सागर

मितालि's picture

20 Feb 2009 - 6:51 pm | मितालि

अग गीता ते मी सागर ला लिहिलेल..

मितालि's picture

20 Feb 2009 - 6:51 pm | मितालि

अग गीता ते मी सागर ला लिहिलेल..

रेवती's picture

20 Feb 2009 - 6:52 pm | रेवती

फोटू छानच आहेत ....पण कृती चढवा की!
काही दिवसांपूर्वी फक्त पाकृ दिसायच्या फोटू नव्हते.
आता पाकृ नाहीत पण फोटो आहेत.
काय म्हणावं आता?
पाकृ व फोटू दोन्ही असेल तरच चढवावेत असा कायदा करायला हवा...
म्हणजे आम्हाला त्याचा फायदा होईल.;)
(ह.घ्या.)
रेवती

मितालि's picture

20 Feb 2009 - 6:58 pm | मितालि

फोटो पण काढुन टाकू का?????????

मितालि's picture

20 Feb 2009 - 6:59 pm | मितालि

:?

संदीप चित्रे's picture

20 Feb 2009 - 6:59 pm | संदीप चित्रे

फारच मस्त दिसतायत फोटो...
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

प्राजु's picture

20 Feb 2009 - 7:08 pm | प्राजु

मिताली,
तुला काही वाटतं का?? :) अगं सकाळी सकाळी अशी जळवतेस काय हे फोटो दाखवून. (. ह. घे.) :)
जरा रेसिपी द्यावी नाहीतर.. अख्खा मिपा परिवार घेऊन, तुझा पत्ता शोधून कचोरी करायला लाऊ तुला. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मितालि's picture

20 Feb 2009 - 7:12 pm | मितालि

या या.. सगळे या..

सागर's picture

20 Feb 2009 - 7:17 pm | सागर

कुठे येऊ?

पत्ता द्या

कचोरीसाठी कुठेही यायला तयार आहे मी :)

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Feb 2009 - 7:18 pm | ब्रिटिश टिंग्या

मी तिथे ५ खाईन अन् १०-१२ बांधुन नेईन म्हणतो ;)

मितालि's picture

20 Feb 2009 - 7:20 pm | मितालि

रूप महल प्रेम गलि खोली नम्बर ४२०..

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Feb 2009 - 7:22 pm | ब्रिटिश टिंग्या

जा!

आणि येताना माझ्यासाठी पार्सल घेउन ये ;)

तुमचा पार्सल चा बेत रद्द करावा लागणार आहे....

कारण मी दुसरा पर्याय शोधला आहे .... हा हा हा :))
रेसिपीची वाट पाहणे जास्त योग्य

शितल's picture

21 Feb 2009 - 5:21 am | शितल

=))
काय टिंग्या जा ना रे त्या पत्यावर आणी मला ही २ पार्सल कचोरी घेऊन ये. ;)

मिताली,
कचोरीचा फोटो केवळ जिवघेणा आहे.
तुला शिक्षा म्हणजे तु लवकरात लवकर त्याची रेसिपी येथे द्यावी. :)
न दिल्यास जगाच्या कानाकोपर्‍यातील सर्व मिपाकरांना करून खाऊ घालावी लागेल. ;) टिंग्या सोडुन कारण त्याला पार्सल हवे आहे. ;)

मितालि's picture

20 Feb 2009 - 7:22 pm | मितालि

फक्त ६ बनवलेल्या.. ४ शिल्लक आहेत..

सागर's picture

20 Feb 2009 - 7:27 pm | सागर

"प्रेम गलि " शोधेपर्यंत एक तरी शिल्लक राहीन का ? :) (प्रेमात माणूस आंधळा होतो.... प्रेमगली सापडल्यावर कचोरीकडे कोण बघेन ;) )

प्रेमगली... कोणते शहर, कोणते राज्य, कोणता देश,,,,, (अजूनतरी कोणता ग्रह म्हणायची वेळ नाही आली ;))

त्यापेक्षा तुम्ही रेसिपीच द्या.... म्हणजे बायकोला सांगतो....
ते जास्त सोपे ...नाही का ?

मितालि's picture

20 Feb 2009 - 7:30 pm | मितालि

ठिक आहे..

लिखाळ's picture

20 Feb 2009 - 8:42 pm | लिखाळ

फोटोतील पदार्थ फार सुंदर !
या सुंदर पदार्थाचा सुंदर फोटो !

पाकृ लिहा लिवकर..वाट पाहतोय :)
-- लिखाळ.

भडकमकर मास्तर's picture

20 Feb 2009 - 11:42 pm | भडकमकर मास्तर

अहाहा..
बरोबर ती लालसर पारदर्शक चटणी...
उ त्त म ...

... घरची कचोरी स्वीट मार्ट मधल्या कचोरीसारखी किंवा त्यापेक्षा भारी होत असणार...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चकली's picture

21 Feb 2009 - 2:26 am | चकली

कसल्या भारी दिसतायेत कचोर्‍या !! पाकृ कुठेय !

चकली
http://chakali.blogspot.com

सुचेल तसं's picture

21 Feb 2009 - 6:49 am | सुचेल तसं

पहिल्या फोटोत सहा कचोर्‍या आणि दुसर्‍या फोटोत एकच... तुम्ही एकटीने पाच कचोर्‍या खाल्ल्या की काय?

तू माझ्याशी चांगलं वागलास की मी तुझ्याशी चांगलं वागतो,
तू माझ्याशी वाकडं वागलास की मी तुझ्याशी वाकडं वागतो,
मग माझं म्हणून काय असतं?
-श्याम मनोहर

मितालि's picture

21 Feb 2009 - 12:49 pm | मितालि

एक कचोरीचा सोलो फोटो काढला.. :) तिच म्हणाली तसे की माझा एकटी चा वेगळा फोटो काढ..

किरण जोशी's picture

21 Feb 2009 - 8:05 am | किरण जोशी

आजचा मेनू काय?

मितालि's picture

21 Feb 2009 - 12:47 pm | मितालि

आजचा मेनू खरवस.. माझा सर्वात आवडता पदार्थ.. सही बनलाय..

दशानन's picture

21 Feb 2009 - 1:09 pm | दशानन

फोटो देण्याआधी जरा वॉर्निंग देत जा... नाय तर दोनचार मिपावरील गचकतील ... पाप तुमच्या डोक्यावर नको

=))

Brains x Beauty x Availability = Constant.
This constant is always zero.
सत्य वचन :D

रेवती's picture

21 Feb 2009 - 5:41 pm | रेवती

ग्रेट आहे पाकृ!
करून बघीन, कळवीन.
पाकृ टाकल्याबद्दल धन्यवाद!
रेवती

मीनल's picture

21 Feb 2009 - 7:06 pm | मीनल

शेगाव, अमरावती,खामगावची ची कचोरी थेट अश्शीच दिसते.
मस्तच लागते.
तळलेल्य हिरच्या मिरच्याही छान लागतात सोबत.

मीनल.

प्राजु's picture

21 Feb 2009 - 9:13 pm | प्राजु

बहुतेक उद्याच होतील कचोर्‍या माझ्याकडे.
धन्यवाद मिताली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

खादाड_बोका's picture

21 Feb 2009 - 9:57 pm | खादाड_बोका

फोटो देण्याआधी जरा वॉर्निंग देत जा... नाय तर दोनचार मिपावरील गचकतील ... पाप तुमच्या डोक्यावर नको
=)) =))

मला तर स्वप्नातही भुक लागते....कचोरीखोर बोका