गाभा:
नुकत्याच चालू असलेलया दोन धाग्यावरची अनिवासी-निवासींचे यादवी युद्ध, तावातावाची चर्चा, हिरीरीने मांडलेली मते पाहून अर्थातच मला राहवले नाही आणि म्हणालो की, चला आता वेळ आली आहे ती "लिष्ट" करण्याची.
आम्ही बापुड्यावाणे पहात राहिलो आणि वाटले थुत ह्या निवासी जगण्याला. आता निश्चय करायचाच आणि सुधारयचेच. पण सुरुवात कशी करावी कळेना हो. कराल तेव्ह्ढी मदत?- सांगाल मला मार्गदर्शक तत्वे?
[हे विरंगुळा म्हणून लिहिले आहे. ह्या धाग्याला कृपया प्रतिसाद देउ नका. वाचा आणि सोडून द्या]- तुमचा त्रास!
प्रतिक्रिया
19 Feb 2009 - 2:29 pm | पक्या
>>ह्या धाग्याला कृपया प्रतिसाद देउ नका
तुम्हाला 'या धाग्याला अवांतर फाटे फोडू नका' या अर्थी म्हणायचे आहे का? चक्क लेखक सांगतोय प्रतिसाद देऊ नका हे थोडे वेगळे वाटले.
19 Feb 2009 - 4:26 pm | त्रास
दोन्ही पार्ट्यांनी चिंतन करावे हा हेतू आहे.
(पहिले आंणि दुसरे चालू असताना) तिसरे महायुद्ध सुरु करायची ही प्रक्रिया नसावी म्हणून तसे लिहिले.
19 Feb 2009 - 3:06 pm | सायली पानसे
सुरुवात करते मी ... मला सुचेल तशी.....
१. डोक्यातुन सर्वात पहिल्यांदा हे काढा कि परदेशात राहिलो म्हणुन संस्क्रुती विसरलो...
किंबहुना परदेशात आल्यवरच आपल्या देशाची किंमत जास्त कळते...आणि संस्क्रुती जपण्याचा जिवापाड प्रयत्न केला जातो...
२. त्यांना चांगले म्हंटले म्हणून आपण वाईट नाहि होत हो...
आपला चांगलेपणा आहेच हो...पण जर सुधारता आल तर आपणच आणखिन वर जाउ ना...
३. देशा ल नावे ठेवणारे अनिवासीच असतात असा नाहि हो....ति एक मानसिकता आहे... तिथे देशी किन्वा अनिवासी हा मुद्दा नाहि.
देशात राहणारे हि देशाला नावे ठेवतातच .........अनिवासी भारतिय हातात बिसलरी चि बाट्ली घेउन फिरताना त्याला हजार नावे ठेवणरे स्वता बाहेर हॉटेलात गेल्यावर तेच पाणि ऑर्डर करतात.....ह्यामुळे हि एक मानसिकता आहे..... आणी ती देशी वा अनिवासी दोघां मधे असते.
तुम्हाला बाटली घेऊन जाणारे अनिवासी दिसतात पण रस्त्यावर विमानतळावर उतरताक्षणी पहिले घरच्या जवळ च्या लॉरीतुन पाणी पुरि खायला जाणारे दिसतात का? तेव्हा उच्चभ्रु देशि मंडळी शी तिथे काय पाणीपुरि खायचि किति घाण असते म्हणतात त्यांना तुम्हे हे सगळा सुनवता का?
सुधारणा करायची तर पहिले पुर्वग्रह काढणे आवश्यक आहे.
सगळ्यात पहीली सुधारणा
आपण सोडून सगळे वाईट हा विचार सोडा आणी दुसर्यांना नावे ठेवण्यापेक्शा काय शिकता येण्यासारखा आहे ते पहा.
बाकि सांगत जाईन वेळ मिळेल तसा.. आणी बाकिचे मिपावासी सॉरी मिपाअनिवासी पण सांगतिल कि.
दुसरा
19 Feb 2009 - 4:10 pm | नीधप
>>आपण सोडून सगळे वाईट हा विचार सोडा आणी दुसर्यांना नावे ठेवण्यापेक्शा काय शिकता येण्यासारखा आहे ते पहा.<<
हे दोन्ही बाजूला लागू पडते.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
19 Feb 2009 - 4:29 pm | विनायक प्रभू
पाणी उकळुन प्या. धुण्याच्या पद्धती बदला.