टोरँट बद्दल माहिती हवी आहे.

माझी दुनिया's picture
माझी दुनिया in काथ्याकूट
19 Feb 2009 - 11:59 am
गाभा: 

महाजालावरच्या बर्‍याचश्या फाइल्स उतरवून घेताना टोरँट प्रणाली वापरली जाते, ती नेमकी काय आहे ? टोरँट प्रणाली वापरणारी अनेक ऍप्लिकेशन्स उपलब्ध आहेत, त्यातली विश्वासार्ह कोणती ? न्याहाळकामार्फत चे डाऊनलोडिंग आणि टोरँट्मार्फत चे यांत नेमका काय फरक आहे ?

प्रतिक्रिया

नीलकांत's picture

19 Feb 2009 - 12:24 pm | नीलकांत

टोरेंटप्रणाली ही फाईलशेअरींग प्रणाली आहे.
आंतरजालावरून एखादी फाईल उतरवून घ्यायची असल्यास एखाद्या सर्व्हरवरून ती उतरवून घ्यावी लागते. अश्यावेळी वेगावर परिणाम करणार्‍या अनेक बाबी आहेत. जसे की सर्व्हरची स्पिड, बॅन्डविड्थ आणि सर्व्हरवर असलेला ताण आदी...
अश्या वेळी एखादी फाईल अनेक वेगवेगळ्या जागी ठेवली आणि ती एकाच वेळी एक किंवा अनेक सर्व्हरवरून उचलली तर तुलनात्मक तिची गती वाढेल आणि काम लवकर होईल. ( हा झाला न्याहाळक आणि टोरंट डाऊनलोडींग मधला फरक)

हीच संकल्पना वापरून टोरंटप्रणाली कशी चालते ते बघुया.
एखादी फाईल अनेक लोकांच्या संगणकावर आहे आणि तिचा पत्ता एका टोरंट फाईल मध्ये ठेवलेला असेल. जेव्हा तुम्ही ती टोरंट फाईल डाऊनलोडींग ला लावता तेव्हा जेवढ्या लोकांच्या संगणकावर ती फाईल आहे आणि ते लोक ती फाईल अपलोड करण्यासाठी उपलब्ध करून देतात तेवढे लोक त्या फाईलचे सीडर असतात आणि जे लोक फक्त ती साईट डाऊनलोड करून घेतात ते लीचर असतात. अश्या वेळी जास्त सीडर असलेली फाईल जास्त वेगात उतरवता येते.
जेव्हा तुम्ही फाईल लीच करत असता तेव्हाच तुम्ही ती सीड सुध्दा करत असता. मात्र तुम्ही यावर बंधन घालू शकता.

टोरंट वापरतांना एक कायम लक्षात ठेवा की तुम्ही जी फाईल उतरवता आहात ती दुसर्‍या कूणातरीच्या संगणकावरून थेट उतरवून घेता आहात. त्यामुळे तुमचा ऍन्टीव्हायरस चांगला असावा हे सांगण्याची गरजच नाही.

ह्या प्रणालीद्वारे पायरसीचे प्रमाण प्रचंड आहे. अश्या साईट्सवर पोर्नोग्राफीक ऍड्स असतात त्यामुळे घरून शक्यतो उघडू नये.
म्युटोरंट नावाचा एक छान क्लायंट वापरता येईल. फायरफॉक्ससाठी एक ऍडऑन सुध्दा आहे.

नीलकांत

माझी दुनिया's picture

19 Feb 2009 - 12:46 pm | माझी दुनिया

फायरफॅक्स मधले ऍडऑन कोणते ?
____________
माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !
_____________
माझी दुनिया

केदार_जपान's picture

19 Feb 2009 - 12:25 pm | केदार_जपान

या वेब साइट वर आवश्यक ती सर्व माहिती आहे... येथे पहा... :)

विंजिनेर's picture

19 Feb 2009 - 12:25 pm | विंजिनेर

मधे कोणते चांगले कोणते वाईट हे ठरवणे अवघड आहे. बहुतेक सर्व उपलब्ध प्रणाल्या ह्या मुक्त स्त्रोत आहेत. त्यामुळे मुक्त स्त्रोत प्रणाली बद्दल जेव्हढी विश्वासर्हता असते तेव्हढी मिळायला हरकत नाही.
दुर्दैवाने ह्या प्रणाल्यांचा बेकायदेशीर माहिती गोळा करण्यासाठीच (चित्रपट/गाणी) जास्त उपयोग होतो. उबंटु लिनक्सच्या प्रसारणा सारखे काही अगदी थोडे सन्माननिय अपवाद याला आहेत.
ही प्रणाली कशी चालते ह्याची विकीपिडीया वर माहिती मिळेल.
मात्र पुन्हा एकदा सांगतो की प्रणाली ही कायदेशीर असली तरी त्याचा वापर जर बेकायदेशीर गोष्टींसाठी केला तर तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकाल.
त्या बद्दल इथे वाचा.

बाप्पा's picture

19 Feb 2009 - 2:16 pm | बाप्पा

टोरँट हे पीअर टु पीअर फाइल शेअरींग प्रणाली आहे. माफ करा मराठीत तंतोतंत भाषांतर नाही जमले मला. तर या प्रणाली च्या सहाय्याने मी (किंवा कुणीही) माझ्या जवळ असलेली कुठल्याही प्रकारची फाइल इतरांसोबत शेअर करु शकतो. मग ते MP3 गाणे असोत किंवा आणखी काही. इतर लोक माझ्या संगणकावरुन सरळ त्यांच्या संगणकावर ती फाईल उतरवु शकतात.

मुख्य म्हणजे मोठ्या आकाराच्या फाईल्स डाऊनलोड करण्यासाठी टोरेन्ट्स वापरले जातात

उदाहरणच द्यायचे झाले तर रॅपिडशेअर , ई-स्निप्स यासारख्या संकेतस्थळांवर मर्यादीत आकाराच्या फाईल्स डाऊनलोड करता येतात
शिवाय त्यांचे सदस्यत्व नसेन तर वाट पहावी लागते ते वेगळेच....

पण टोरेंट्स एकदम सोपे आणि एकदम सुलभ असे माध्यम आहे सर्व प्रकारच्या फाईल्स उतरवून घेण्यासाठी...
अगदी २ - ४ जी.बी. पण सलग डाऊनलोड करता येते....

www.utorrent.com/download.php येथून हे फ्री सॉफ्टवेअर उतरवून घेता येईल....

तसेच
खालील संकेतस्थळांवरुन .torrent फाईल डाऊनलोड करुन तुम्हाला हवे तेव्हा डाऊनलोड करता येते...
म्हणजे मला अग बाई अरेच्चा हा चित्रपट डाऊनलोड करायचा असेन तर त्या चित्रपटाची .torrent फाईल फक्त मला उतरवून घ्यावी लागते. मग रात्री केव्हाही मी प्रत्यक्ष चित्रपट उतरवून घेऊ शकतो.... थोडक्यात .torrent फाईल मधे मूळ फाईलचे लोकेशन सेट केलेले असते...

खालील प्रत्येक साईटवर सर्च पर्याय असतोच त्यामुळे आपल्याला हव्या त्या फाईल्स शोधता येतात ... :)

Top 10 Torrent Sites
1. Mininova
2. IsoHunt
3. The Pirate Bay
4. Torrentz
5. BTjunkie
6. TorrentSpy
7. TorrentPortal
8. GamesTorrents
9. TorrentReactor
10. BTmon
--------------------------------------------------------------------------------
Top 5 Newcomers
1. SumoTorrent
2. SeedPeer
3. Zoozle
4. Extratorrent
5. BitTorrent.am

इंटरनेटचे बिल वाढेल एवढेच :)
डाऊनलोडसाठी शुभेच्छा
- सागर

केळ्या's picture

21 Feb 2009 - 5:20 pm | केळ्या

मी बिट कॉमेट वापरतो.फक्त व्हायरसपासून सावध!

खादाड_बोका's picture

21 Feb 2009 - 10:08 pm | खादाड_बोका

मी ऍझ्युरस(Azureus - now called Vuze) वापरतो आहे ...खुप बढीया आहे..आणि आपोआप अपडेट होतो.