मिपाकरांसाठी काही उपयुक्त पुस्तकं

आम्हि's picture
आम्हि in काथ्याकूट
19 Feb 2009 - 12:23 am
गाभा: 

आपल्यातील बरेच जण वेगवेगळी पुस्तके वाचत असाल. अनेक पुस्तंकं वाचली असता एखादे छान वाटते. आपल्या वाचनात आलेली आम्हा सर्व मीपाकरांना उपयुक्त अशी पुस्तके ह्या धाग्यात नमूद करावी व सर्वांना उत्तमोत्तम वाचनाचा आस्वाद द्यावा. खालील काही पुस्तकं सर्वांनी जरूर वाचावी. क्रुपया काहीतरी उपयुक्त संदेश देतील अशी पुस्तकेच लिहावीत ही नम्र विनंती. मी वाचलेली काही उत्तम व उपयुक्त पुस्तकं खालील प्रमाणे:

१. who moved my cheese- Spencer Johnson.
आयुश्यात होणार्या अनेक बदलांना कसे सामोरे जावे व आयुश्यात अत्ता आपल्याला खूप आवडत असणार्या गोष्टी कायम तश्याच राहणार नाहीत त्या बदलतील व आपणही अश्या बदलांसाठी सतत तयार असले पाहिजे ह्या वास्तवाची एका छोत्याश्या गोष्टीच्या माद्यमातून आठवण करून देणारे सुंदर पुस्तक.

२.The present- Spencer Johnson
भूतकाळातून शिका, वर्तमानात पूर्ण लक्ष केंद्रित करा व भविष्या करता कायम नियोजन करा (आपले काम नियोजनबद्ध पणे करा) हे तथ्य मांडणारे व गोष्ट संपेपर्यंत आपल्याला खिळवून ठेवणारे छान पुस्तक. पुस्तक वाचल्यावर, पूर्ण एकाग्रतेने केलेले आपलेही काम किती उच्च दर्ज्याचे होते ह्याची जाणीव झाली/होते. पण आपल्याकडून व्यवस्थीत न झालेले काम बहुतांश वेळा आपण पूर्ण एकाग्रतेने केलेले नसते अशी नक्की जाणीव होइल.

३.Think and Grow rich- Nepolean Hill
विचारांमुळे श्रीमंतीपर्यंत कसे पोहोचू शकता नव्हे आपले विचारच आपल्याला श्रीमंत (आर्थिक द्रुश्ट्या) बनवू शकतात हे सोदाहरण पटवून देणारे अभ्यासपूर्ण पुस्तक.

४. Idli Orchid Aani Me- Vitthal Kamat
लिखाणातील साधेपणाची कमाल मर्यादा गाठणारे ,सोप्या भाशेत स्वानुभवातून "सतत काम करणे हेच यशस्वी व्यवसायासाठीचे खरे आवश्यक तत्व आहे" हे वास्तव कथन करून वाचकाला शेवटपर्यंत गच्च धरून ठेवणारे इन्ट्रेस्टींग पुस्तक.

५. Rich Dad Poor Dad- Robert Kiyosaki
हे वाचल्यावरच (चार्टर्ड अकाउंटंट असूनही) 'अर्थ' ह्या शब्दाचा खरा अर्थ मला कळाला (असे वाटते आहे).

६. राजा शिवछत्रपती- बाबासाहेब पुरंदरे.
सर्व प्रकारची टेंशन्स क्षणात नाहीशी करणारे अप्रतीम पुस्तक. कधीहि तणावाखाली असाल तर हे पुस्तक हातात घ्या व कोणतेही पान उघडून वाचायला सुरुवात करा, महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी केलेले अतर्क्य पराक्रम व साहस वाचल्यावर आपल्याला असलेले ताण व धोके खिसगणतीतही बसत नाहीत ह्याची जाणीव होइल आणि क्षणार्धात तणावमुक्त व्हाल.पुढील कामांसाठी नव्या उमेदीने उभे रहाल.

७.Wise otherwise- Mrs.Murthy
वाचन सुरु आहे.

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

19 Feb 2009 - 12:41 am | मुक्तसुनीत

या धाग्याबद्दल आभारी आहे. तुम्ही दिलेल्या पुस्तकांपैकी काही पुस्तके वाचली आहेत. त्यातील गुणांबद्दल अंशतः सहमत आहे. या पुस्तकांबद्दल तक्रार करायचीच तर अशी की अशा प्रकारच्या पुस्तकांमधे गोष्टी जरूरीपेक्षा जास्त सोप्या केलेल्या असतात की काय ? प्रासादिकता हा गुण महत्त्वाचा आहेच ; पण आपला विचार लोकांपर्यंत परिणामकारकरीत्या पोचवताना , आपल्या विचारांच्याबाहेरही काही गोष्टी ध्यानात घ्यायला हव्यात असे ही पुस्तके फार खुलेपणी सांगत नाहीत.

पण , "सेल्फ्-हेल्प" अशा स्वरूपाच्या , प्रॅक्टीकल माहितीच्या पुस्तकांचे स्वतःचे असे एक स्थान आहे. पुन्हा एकदा , या धाग्याबाबत आभार.

आनंदयात्री's picture

19 Feb 2009 - 2:15 pm | आनंदयात्री

>>त्यातील गुणांबद्दल अंशतः सहमत आहे.
>>या पुस्तकांबद्दल तक्रार करायचीच तर अशी की अशा प्रकारच्या पुस्तकांमधे गोष्टी जरूरीपेक्षा जास्त सोप्या केलेल्या असतात की काय ?

मुसुरावांशी सहमत आहे. त्यांनी सेल्फ हेल्प पुस्तके म्हटले आहे.. आम्ही त्यांना अक्कल शिकवणारी पुस्तके म्हणतो. वाचवले जात नाहीत.

विजुभाऊ's picture

19 Feb 2009 - 7:54 pm | विजुभाऊ

मॅजीक ऑफ थिन्किन्ग बीग.
हे मराठीतही उपलब्ध आहे

आम्हि's picture

20 Feb 2009 - 8:53 am | आम्हि

हो . ह्याचा उल्लेख राहिलाच होता करायचा.

श्रेया's picture

21 Feb 2009 - 12:37 pm | श्रेया

लेखकाचे नाव द्यावे

आम्हि's picture

21 Feb 2009 - 4:53 pm | आम्हि

Magic of Thinking Big -David Schwartz

प्राची's picture

19 Feb 2009 - 2:11 pm | प्राची

सुधा मुर्तींची सर्वच पुस्तके वाचनीय आहेत,त्यातून नेहमीच काहितरी नवीन शिकायला मिळते.स्वतःला एक उत्तम माणूस म्हणून घडवण्यासाठी ही पुस्तके जरूर वाचावीत.सुधा मुर्तींनी त्यांना आलेले अनुभव छोट्या छोट्या गोष्टींच्या स्वरूपात सांगितले आहेत.त्यांची काही पुस्तके:
1.The Magic Drum and Other Stories
2.Mahashweta
3.Dollar Bahu
4.Wise and Otherwise
5.The Old Man and His God
6.How I Taught My Grandmother to Read and Other Stories
7.Gently Falls The Bakula
8.अस्तित्त्व

वीणा गवाणकर यांचे 'एक होता कार्व्हर' हेसुद्धा प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक आहे.

विजुभाऊ's picture

19 Feb 2009 - 7:55 pm | विजुभाऊ

सुधा मूर्तींची पुस्तके एकदा वाचायला बरी वाटतात.
पण नन्तर सर्व पुस्तकात तोच तोच पणा येतो.
एक पुस्तक वाचले तर नन्तरची पुस्तके प्रेडीक्ट करता येतात

श्रेया's picture

26 Feb 2009 - 12:52 pm | श्रेया

मराठी अनुवाद आहे का ?

प्रभाकर पेठकर's picture

19 Feb 2009 - 4:22 pm | प्रभाकर पेठकर

राजा शिवछत्रपती- बाबासाहेब पुरंदरे.
पुस्तक वाचनिय (आणि संग्रहणीयही) आहे. पण बाबासाहेब पुरंदरे शिवाजी महाराजांना देवत्व बहाल करून लिहीतात. त्यापेक्षा ना. स. इनामदारांची पुस्तके जास्त भावतात. बाबासाहेबांच्या पुस्तकात प्रत्येक घटनेचे पान न् पान वर्णन आणि तिथि, वार, वेळ ह्याचे अचुक वर्णन आपल्याला पुस्तकाला खिळवून ठेवते.

फॉर हिअर, ऑर टू गो. अपर्णा वेलणकर, मेहता पब्लिशिंग हाऊस हे पुस्तकही वाचनिय आहे.

दारूने प्रश्न सुटत नाहीत, पण दुधाने तरी कुठे सुटतात?

स्वातीदेव's picture

20 Feb 2009 - 12:13 am | स्वातीदेव

चांगला धागा आहे.
Rich Dad Poor Dad, एक होता कार्व्हर, मी पण वाचले आहेत. चांगली पुस्तके आहेत ही.

श्रेया's picture

21 Feb 2009 - 12:33 pm | श्रेया

आपण दिलेल्या पुस्तकाचे मराठी अनुवाद आहे काय ?

मराठीतून इंग्रजी असा प्रवास कधी सुरु होणार आहे? मराठीतही अनेक नामांकित लेखक असताना मराठीतील पुस्तके इंग्रजीत असा प्रवास कधी सुरु होईल?

कमीत कमी इतर भारतीय भाषेततरी ही पुस्तके जावीत.

आम्हि's picture

21 Feb 2009 - 4:00 pm | आम्हि

खरच चांगला विचार आहे. घ्यायचे का एखादे पुस्तक इंग्रजीत अनुवादित करायला?

विंजिनेर's picture

21 Feb 2009 - 4:11 pm | विंजिनेर

तेंडुलकरांसारख्या दिग्गजांची नाटके इतर भाषांमधे गेली आहेत की('सखाराम बाईंडर', 'घाशीराम कोतवाल' आणि 'शांतता..' तर नक्कीच, 'गिधाडे' सांगता येत नाही).
झालंच तर, सावंतांच्या 'राधेय' ची पण अनेक भाषांतरे झाली आहेत.
इतरही काही असतील. पण दुर्दैवाने हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच.

--
अक्षरास हासू नये

सातारकर's picture

26 Feb 2009 - 3:52 pm | सातारकर

ह्या वरच्या यादीत पुरुष देखील येत का?

अजय भागवत's picture

21 Feb 2009 - 8:21 pm | अजय भागवत

सी के प्रल्हाद ह्यांचे "द न्यु एज ऑफ इनोव्हेशन" हे मला अलिकडे आवडलेले एक पुस्तक.
मध्यंतरी सायकॉलजी वरची पुस्तके वाचायचा कल वाढला होता तेव्हा आवडलेले पण फारसे न समजलेले पुस्तक- "कॉग्निशन इन द वाइल्ड" हचिन्स.

शुभान्कर's picture

21 Feb 2009 - 10:23 pm | शुभान्कर

ह.मो.मराठे. -बाल़कांड्,पोहरा
रविन्द्र पिंगे-सर्वोत्तम
तोतोचान
सध्या एवढीच.
अजून बरीच आहेत.
बाकी नंतर

त्रास's picture

26 Feb 2009 - 3:45 pm | त्रास

ब्लिंक वाचा माल्कम ग्लडवेल चे