उर्जेचा वापर...

बाप्पा's picture
बाप्पा in काथ्याकूट
18 Feb 2009 - 5:07 pm
गाभा: 

उर्जेचा वापर...

सकाळी उदर भर न्याहारी केली, कार्यालयासाठी निघायला दुचाकीवर तंगडं झटकलं आणी प्रस्थान केले. वाटेत बचकभर वाहतुकदिवे आहेत तेथे थांबत थांबत एकदाचा कसाबसा कार्यालयाच्या इमारतीत पोहोचलो. कार्यालयाच्या वाहनतळामध्ये कसे बसे आमचे वाहन उभे केले आणि कामाच्या ठिकाणि जाण्याकरीता कुच केले. तेवढ्यात आमच्या इमारती मधील त्या भागातील उदवाहन (म्हणजे लिफ्ट हो!!) काम करीत नसल्याचे आमच्या लक्षात आले. कंपनीच्या प्रशासनाला शिव्या घालत आम्ही जिन्याने जाणेच योग्य समजले.

धापा टाकत जागेवर बसलो तेव्हा आमचा संगणक चालुच होता. तेव्हा मनात विचार आला कि हा संगणक काल पासुन विनाकारण चालु आहे. गरज नसतानाही इतकि उर्जा हकनाक वाया गेली. साधे उदवाहन बंद असेल तर केव्हडा जळफळाट होतो. त्यानंतर मात्र आम्ही उर्जेचा वापर योग्य पद्धतीने करायचे ठरवले आहे. आपणही या कार्यात सहभागी होउन हातभार लावाल असे स्वप्न उराशी बाळगुन आहोत आम्ही :)

त्यासाठी काहि सुचना आपल्या कडुनही येउदेत...

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

18 Feb 2009 - 5:27 pm | घाशीराम कोतवाल १.२

आपले कार्यालय घरापासुन जवळ असेल तर शक्यतो गाडी चा वापर करु नका
चालत जा जास्तित जास्त चाला त्याने आपले ह्यदय मजबुत होईल (शक्य नसल्यास सार्वजनीक वाहनाचा वापर करा)

घरात कमी दिव्यांचा वापर करा

जास्त TV VCD पाहु नका

कमीत कमी भ्रमणधव्नी वापरा

अन्न शिजवताना प्रेशर कुकरचा वापर करा ( स्वयपाकाचा गॅस वाचेल )

___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.

नितिन थत्ते's picture

18 Feb 2009 - 5:37 pm | नितिन थत्ते

१ पाणी गॅसवर तापवा/ गॅस गीझर लावा.
२ इन्व्हर्टर वापरू नका
३ पुण्याचे आहात. घरी ए सी लावला असेल तर तो काढून कूलर लावा

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

विकास's picture

18 Feb 2009 - 5:46 pm | विकास

या संदर्भात बरेच काही आहे जे सहज शक्य आहे. वेळे अभावी थोडक्यात काही मुद्दे:

करता येण्यासारख्या गोष्टी:

  1. काँप्युटर आणि त्याला लागून असलेली इतर साधने बंद करणे. हल्ली अशा काही एक्स्टेंशन कॉर्ड मिळतात की ज्याला उपकरणे लावली असता केवळ काँप्युटर बंद केला की इतर सर्व उपकरणे (प्रिंटर, फॅक्स, मॉनिटर इत्यादी) आपोआप बंद होतात.
  2. दिवसात सतत काँप्युटरचा वापर होत असल्यास त्यात स्क्रीनसेव्हर ऐवजी ब्लँक स्क्रीन काही मिनटात होईल अशी व्यवस्था करा. त्याने मॉनिटरचे आयुष्यपण वाढू शकते.
  3. सेलफोन वगैरे उपकरणे जेंव्हा चार्जर वरून काढाल तेंव्हा तो चार्जरपण बंद करा नाहीतर उर्जा जळतच राहते.
  4. एसी/कुलर चालू असल्यास खिडक्या/दारे बंद ठेवा.
  5. सोलार हिटींग वगैरे वापरता आले तर अवश्य वापरा. करसवलती पण मिळू शकतात.
  6. काँपॅक्ट फ्ल्युरोसंट बल्बज वापरा.

----

अजून आठवल्यास नंतर लिहीन.

करायला अवघड गोष्टः मिपावर कमी वेळ रहा. ;)

अमोल नागपूरकर's picture

18 Feb 2009 - 5:49 pm | अमोल नागपूरकर

१)तुम्हाला काम नसेल तेव्हा तुमचा पीसी /लैपटोप शट डाऊन करा. तसेच गरज नसेल तेव्हा दिवे, पंखे आनि इतर विजेची उपकरणे बन्द ठेवा.
२)तुमच्या एसी चे टेम्प सेटिन्ग २५ अंशान्वर ठेवा.
३) औफिसला जाताना कार पूलीन्ग चा उपयोग करा.
४) सी एफल दिव्यान्चा उपयोग करा.

नितिन थत्ते's picture

18 Feb 2009 - 6:26 pm | नितिन थत्ते

सी एफल दिव्यान्चा उपयोग करा

ही सूचना सगळीकडे सांगितली जाते. पण तुम्ही ट्यूबलाईट वापरत असाल तर त्याचा फार काही उपयोग नाही. हां मात्र ट्यूबला इलेक्ट्रॉनिक चोक लावऊन घ्या.
सामान्यतः खेडेगावात फिलॅमेंट बल्ब लावण्याची पद्धत असते तेथे सी एफ एल ने फरक पडतो.

खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

अमोल नागपूरकर's picture

18 Feb 2009 - 5:52 pm | अमोल नागपूरकर

ऊर्ज बचतीचे अनेक उपाय Buerau of Energy Efficiency च्या तसेच इतरही साइट्सवर दिलेले आहेत.
१. फ्रिजमधून एकदम गॅस (का गैस?)वर किंवा गॅसवरुन फ्रिजमधे असं करु नका. पदार्थ रूम टेंपरेचरला आल्यावर मग गॅसवर किंवा फ्रिजमधे ठेवा.
२. मायक्रोवेव्ह अव्हनमधे पदार्थ गरम करण्यापेक्षा गॅस वापरा.
३. लिफ्टऐवजी शक्यतो जिनेच वापरा. शरीरासाठीही ते चांगलंच.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Feb 2009 - 6:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

http://www.misalpav.com/node/5189#comment-76303

हा धागा आणि तिथे मीही असाच प्रतिसाद दिला होता. :-)

अदिती