आयपीएलच्या सामन्यांसाठी खेळाडूंची बोली झाली. आता सामन्यांच्या तयारीलाही सुरूवात झाली आहे. पण, गेल्यावर्षी खेळापेक्षा अधिक चर्चेत आलेल्या चिअर्सगल्सबाबातही तेवढीच उत्सुकता वाढली आहे. गेल्यावर्षी या 'गर्ल्स' नी जो धिंगाणा घालता होता तो 'पाहण्या' जोगाच होता. म्हणूनच चिअर्सगल्सवर बंदी घालण्याची मागणी जोर धरली होती. खेळामध्ये चिअर्सगर्ल्ससाखरे प्रकार असोत की नसोत हा वेगळा विषय.. पण, अशा सामन्यांमध्ये आपल्या प्रांताची-देशाची संस्कृतीही दाखवू शकतो हे नुकतेच श्रीलंकेने दाखवून दिले आहे.
श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या 20-20 सामन्यामध्ये भारताने बाजी मारली. भारताच्या खालच्या फळीतील खेळाडूंची खेळी पाहण्याजोगी होती . भारताने सामना जिंकला खरा पण, या आनंदापेक्षा या सामन्याच्या आयोजकांनी आपल्या कलाकरांना त्याठिकाणी बोलावून कलाप्रकार सादर करण्याची संधी दिली याचे अधिक कौतुक वाटले. हा सामना जेवढा स्मरणात राहिला तेवढेच या सामन्यामध्ये चित्तवेधक कलाप्रकार सादर करणारे कलाकारही.
भारतीय संस्कृतीचे पाश्चत्य लोक अनुकरण करत आहेत आणि आपणच आपली संस्कृती विसरतो आहोत. म्हणूनच यावर्षी होऊ घातलेल्या आयपीएल सामन्यांमध्ये संस्कृतीरक्षकांना आपली कला सादर करण्याची संधी दिली गेली पाहिजे तरच हे सामने ख-या अर्थाने 'रोमांचक' होतील.
प्रतिक्रिया
18 Feb 2009 - 2:12 pm | नितिन थत्ते
टी २० मध्ये हे प्रकार चालू आहेत म्हणून ठीक.
क्रिकेटच्या सामन्यात ही थेरं चालू झाली की आम्ही निषेध करू.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
18 Feb 2009 - 6:47 pm | तिमा
अहो, कसली आलीये उच्च संस्कृती ! संस्कृतीसंरक्षकांचे चाळे पहातोच आहोत ना आपण कर्नाटकात आणि नंतर व्हॅलेंटाईन डे ला ! जे लोक संस्कृती जपण्याचा आव आणतात ते तर खरे ढोंगी असतात. त्यांना सर्व मजा हवी असते पण कांगावा मात्र संस्कृती रक्षणाचा. त्यापेक्षा नव्याचे खुल्या मनाने स्वागत करणारे जास्त प्रामाणिक वाटतात. चिअरबाला नाचताना चालत नाहीत आणि हिंदी सिनेमातले उत्तान नाच आणि हिडिस हावभाव मोठ्या चवीने बघायला आवडतात. वारे उच्च संस्कृती !!!
19 Feb 2009 - 7:36 am | किरण जोशी
तुमचे म्हणणे मान्य,
पण, खुल्या मनाने (मनात नसणारे)मान्य केले तर आपण शस्त्रे गाळली असेच म्हणावे लागेल. चिअर्सगर्लचा मुद्दा असो वा व्हॅलेंटाईन डे चा.. हे सर्व टाकऊ असे माझेही म्हणणे नाही.. नव्याचे स्वागत खुल्या मनाने झालेच पाहिजे.. पण, जुने टिकवून... आपल्याला काय वाटते...?