साहित्य :
बुंदिच्या लाडवा एवढी चिंच
कांदा, लसुण, मिरची, कोथिंबिर बारिक चिरुन
फोडणिसाठी हिंग, हळद, जिर
चविपुरते मिठ आणि गुळ
कृती :
चिंचेमध्ये १ ते १/२ किंवा गरजे एवढे पाणी टाकुन खुळुन घ्यावी.
तेल गरम करुन त्यात हिंग, हळद आणि जिर्याची फोडणी द्यावी.
आता फोडणिवर चिंचेचे पाणी टाकावे व वरुन चिरलेले कांदा, लसुण, मिरची, कोथिंबीर टाकावी
नंतर चविपुरते मिठ व गुळ घलावे. फक्त वाफ येइपर्यंत गरम करावे. उकळी यायच्या आधी गॅस बंद करावा.
झाली तुमची चिंचेची कढी तयार.
सुचना : ह्या कढित जर आंबटपणा कमी आला असेल तर थोडे लिंब पिळावे. ही कढी नॉनव्हेज बरोबर पण छान लागते.
प्रतिक्रिया
18 Feb 2009 - 12:25 pm | समिधा
नविन प्रकार वाटला करुन बघेन. :)
18 Feb 2009 - 12:57 pm | अभिष्टा
१ ते १/२ काय? कप का? आणि कांदा, लसूण, मिरची फोडणीत नाही का टाकायची? करुन बघितली पाहिजे :-)
---------------------------------
जे जे मजसाठी उचित, तेचि तू देशील खचित
हे मात्र मी नक्की जाणित, नाही तकरार राघवा
18 Feb 2009 - 1:49 pm | जागु
१ ते १/२ काय?
चिंचेच पाणी
आणि लसुण, कांदा, मिरची फोडणीत नाही टाकायची त्याचि कच्चीच चव ह्या कढीत चांगली लागते आणि वासही छान येतो.
18 Feb 2009 - 1:50 pm | अभिष्टा
बरं बरं :-)
---------------------------------
आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.
18 Feb 2009 - 2:44 pm | नाटक्या
बोलाची कढी (आणि बोलाचा भात) माहीत होते, चिंचेची कढी हे प्रकरण जरा वेगळे वाटते आहे.
- नाटक्या
18 Feb 2009 - 2:49 pm | अभिष्टा
ती चिंचेच्या भाताबरोबर घ्यायची. यु नो ! टॅमरिंड करी विथ टॅमरिंड राईस. होक्कीनै गं जागू ;)
---------------------------------
आपण भगवंताला व त्याच्या सत्तेला सर्व व्यापताना पाहूही शकत नाही व ओळखूही शकत नाही. पण त्याचे 'नाम' उच्चारु शकतो व प्रेमाने जपू शकतो आणि 'त्याचे नाम' हेच त्याच्या सत्तेचे स्थूल स्वरुप आहे.
20 Feb 2009 - 1:36 pm | केदार_जपान
हा खूपच लवकर होणारा, सोपा प्रकार वाटत आहे... ;).आणि चमचमित सुद्धा.
आजच करतो!!
---------------
केदार जोशी
22 Feb 2009 - 4:52 pm | विसोबा खेचर
आम्ही बिगरफोटूच्या पाकृ वाचत नाही...
तात्या.
22 Feb 2009 - 6:02 pm | लवंगी
आम्ही पण हि कढी बनवतो.. थोड्या वेगळ्या प्रकारे. मी गुळाएवजी साखर घालते छोटा चमचा.. फोडणीला काळिमिरी ठेचून घालतो.
24 Feb 2009 - 9:47 am | मृगनयनी
जागु,
मस्त आहे गं.. ही चिन्चेची कढी!
:)
तुझ्याकडुन अजुन पा. कृ. साठी उत्सुक,
-
मृगनयनी.
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||