शाल्मली आणी रामची आई यांच्या मसालेभात आणि जिलेबी बरोबरच पानाच्या डाव्या बाजुची शोभा वाढवायला कश्या वाटतील...
साहित्य :
डाळीचे पीठ १ वाटी
ताक १ वाटी
पाणी १ वाटी
मीठ चविनुसार
तिखट चविनुसार
मैदा १ चमचा
सारणा साठी साहित्य :
ओल खोबर १ वाटी
कोथिंबिर आवडीप्रमाणे
मीठ चविनुसार
लिंबाचा रस १ चमचा
साखर चविनुसार
आणि मोहरी, हिंग्,हळद घालुन केलेली फोडणी (फोडणी पहिल्यांदा करुन गार होऊ द्यावी. )
कृती :
प्रथम ओल खोबर ,कोथिंबिर,मीठ,साखर, लिंबाचा रस एकत्र करुन व्यवस्थित मिसळुन ठेवावे.
नंतर एका पातेल्यात डाळीचे पीठ ,मैदा ,ताक, पाणी ,तिखट,मीठ घालुन मिश्रण हाताने एकत्र करावे.
(मिश्रणात गाठी राहु देऊ नयेत. )
तयार मिश्रण मंद आचेवर शिजत ठेवावे.
पिठ भांड्यापासुन सुटु लागले की त्यावर झाकण ठेऊन १-१ मिनीटाने २ वाफा काढाव्यात
तयार मिश्रण ताटाला दोन्ही बाजुने पातळ पसरुन घ्यावे.
त्यावर तयार सारण, आणी गार झालेली फोडणी व्यवस्थित घालावी.
त्यावर सुरीने उभ्या चीरा पाडुन गोल गुंडाळ्या कराव्यात.
टिपः
झाकण ठेऊन वाफ काढताना पीठ खालुन करपण्याची भीती असेल तर शिजत आलेले मिश्रण कुकर च्या भांड्यात काढून कुकर मध्ये शिट्टी न लावता ३ मिनीटे
वाफवावे.
प्रतिक्रिया
18 Feb 2009 - 3:51 am | रेवती
आज काय सगळ्यांनी मेजवानी द्यायचा बेत केलाय की काय?
फोटू मस्त! पाककृतीला शोभा आली.:)
हा प्रकार भारीच आहे पण मला थोडा सराव करावा लागेल असे वाटते.
पीठ गरम असतानाच पटकन् ताटांना लावणे जमायला हवे.
रेवती
18 Feb 2009 - 4:38 am | बेसनलाडू
तोंडाला पाणी सुटले; खायला हव्या आता!
(हावरट)बेसनलाडू
18 Feb 2009 - 5:23 am | सहज
शोभा अप्रतिम वाढवलीत हो!
सुरळीच्या वड्या. =P~
18 Feb 2009 - 5:27 am | विसोबा खेचर
ओहोहो! सु,व.चा फोटू पाहून इतका एक्साईट झालो की पक्षाघाताचा झटका येऊन जमीनीवर कोसळलो आणि देवाघरी गेलो..!
अतिशय सुरेख फोटू..!
पिठल्यच्या वड्या ही आमची अत्यंत आवडती पाकृ..
समिधावैनी, आपण अत्यंत सुगरण आणि निगुतीने स्वयंपाक करणार्या गृहिणी आहात हेच वरील फोटू सिद्ध करत आहे..
जोरदार शुभेच्छा आणि आपण अश्याच उत्तमोत्तम पाकृ फोटूसहीत मिपावर लिहाव्यात हे कळकळीचे आवाहन..
तात्या.
18 Feb 2009 - 5:46 am | खादाड_बोका
सकाळ पासुन एका पेक्षा एक छान छान पाकक्रुत्या पाहुन तर मन बेभान झाले आहे. तात्यांनी त्या लज्जतदार शाकाहारी थाळीचा फोटो टाकुन माझ्या सारख्या परदेशात राहणार्यांची पुर्ण वाट लावली.
मग त्यानंतर शाल्मली आणी रामची आई यांच्या मसालेभात आणि जिलेबी, आणी आता समिधाताईंच्या "सुरळीच्या वड्या". त्यातल्या त्यात बायको पोर भारतात. किती या बापड्याला सहन करावे लागेल. बायकोला फोन करुन लवकर बोलवावे लागेल वाटते. हे म्हणजे अत्याचाराचा कळस आहे...
सध्या ब्रेड व पिझ्झा खाऊन जगणारा बोका... ~X( ~X(
18 Feb 2009 - 7:54 am | प्राजु
समिधा ताई,
मी १ वाटी बेसन, १ वाटी ताक, आणि २ वाट्या पाणी घेते. एकूण ४ वाट्या अशा करते. आणि छोटा चमचा मैदा घालते.
पण आपण १-१-१ असे प्रमाण दिलेले आहे. अशाही करून बघेन. कुकरची कल्पना आवडली. :)
माझ्या सुपिक डोक्यात एकदा आलं आणि मी खोबर्याच्या सारणा ऐवजी, पनीर खिसून, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारिक चिरून त्यात मीठ, थोडी साखर आणि लिंबाचा रस.. असं सारण करून पाहिलं. तेही बरं लागलं. खोबर्याच्या सारणा इतकं अप्रतिम नाही.
मी फोडणीत थोडे तीळही घालते. ते तळले गेले की, खमंग होतात आणि मस्त लागतात.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Feb 2009 - 8:41 am | चकली
सर्व टिप्स छान आहेत.
चकली
http://chakali.blogspot.com
18 Feb 2009 - 8:20 am | सुनील
सद्या मिपावर शाकाहारी मेजवानी सुरू आहे. जिलेब्या काय, मसालेभात काय आणि आता सुरळीच्या वड्या काय!!
सुंदर फोटो आणि पाकृदेखिल.
अवांतर - सुरळीच्या वडीला गुजरातीत खांडवी म्हणतात. तर आमच्याकडे रव्यापासून बनविलेल्या गोड वड्यांना खांडवी म्हणतात.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
18 Feb 2009 - 8:39 am | वल्लरी
समिधा ताई,
सुरळीच्या वडया करायला खुप कठीण वाटतात मला..पण खायला आवडतात..
आता प्रयत्न करेन घरी बनवण्याचा नक्की... :)
---वल्लरी
21 Feb 2009 - 3:52 am | समिधा
अग तुला फार टेन्शन येत असेल तर सुरवातीला मुगाच्या डाळीच्या पिठाच्या बनव म्हणजे त्या बिघडण्याची शक्यता जवळ जवळ नसतेच.
18 Feb 2009 - 8:45 am | चकली
जिलेब्या , मसालेभात आणि सुरळीच्या वड्या....
आता पुढे काय मेजवानी आहे त्याची वाट बघतेय!
चकली
आजची रेसिपी - टोमॅटो चटणी
18 Feb 2009 - 1:40 pm | शारंगरव
एक सुंदर पदार्थ, खूपच छान आणि सोप्या प्रकारे सांगितला आहे तुम्हि. प्रथेप्रमाणे छायाचित्र उत्तमच. :)
18 Feb 2009 - 2:07 pm | जागु
वा फोटो पाहुन पाणि सुटल तोंडाला.
मी पण करते. पण मी मैदा नाही घालत. कुकर मध्ये मला पण ट्राय करायच्या आहेत.
21 Feb 2009 - 3:48 am | समिधा
अग वड्या करताना त्या तुटु नयेत म्हणुन त्यात चमचा भर मैदा घालते.
जर पिठ जुन असेल तर त्या वड्या कधी कधी बिघडु शकतात.
18 Feb 2009 - 10:44 pm | शितल
समिधा,
फोटो आणी पाककृती मस्तच ग.
अजुन केल्या नाहीत पण नक्की करून पाहिन, प्राजुही मस्त करते. :)
18 Feb 2009 - 11:04 pm | प्राजु
अजुन केल्या नाहीत पण नक्की करून पाहिन, प्राजुही मस्त करते.
शितल, सकाळ पासून भेटलं नाही वाटतं कोणी!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Feb 2009 - 11:21 pm | शितल
>>शितल, सकाळ पासून भेटलं नाही वाटतं कोणी!!!
तुच भेटलीस ;)
अग तु सुरळीच्या वड्या करत नाहीस.. बर मग आमच्या घरी केलेल्या नक्कीच जगदीशने केल्या असतील. :)
18 Feb 2009 - 11:50 pm | प्राजु
पण त्या "मस्त" म्हणजे जरा अतिशयोक्तीच वाटते गं.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Feb 2009 - 11:09 pm | समिधा
तु खुप छान पदार्थ करतेस अस समजल आहे.
19 Feb 2009 - 12:02 am | चतुरंग
मसालेभात, जिलेबी यांना अजून मी प्रतिक्रिया दिलेली नाहीये, तिकडे जाणार तोच माझी गाठ सुरळीच्या वड्यांशी पडली!!
लाजवाब!! तलम, पातळ वड्यांमधून डोकावणारे कोथिंबीर, खोबरे अम्म्म्म्म्म्..एकदम उचलून तोंडात टाकावीशी वाटते आहे!!
(खुद के साथ बातां : रंगा, आज स्वयंपाकघरात जरा मदत कर बरं का, नुसता बसू नकोस मिपामिपा खेळत, कदाचित बोनस म्हणून ह्या वड्यांचा विचार होऊ शकेल! ;) )
चतुरंग
19 Feb 2009 - 12:18 am | शितल
>>>(खुद के साथ बातां : रंगा, आज स्वयंपाकघरात जरा मदत कर बरं का, नुसता बसू नकोस मिपामिपा खेळत, कदाचित बोनस म्हणून ह्या वड्यांचा विचार होऊ शकेल! )
रेवती,
मस्का मारत आहेत सांभाळुन. वजन काटा जवळ आणुन ठेव. ;)
19 Feb 2009 - 12:17 pm | समिधा
सगळ्यांना मनापासुन धन्यवाद. :)
21 Feb 2009 - 1:24 pm | आदित्यराजे
लै भारि
23 Feb 2009 - 9:18 pm | रामची आई
मस्त आहे!!
24 Feb 2009 - 1:54 am | चित्रा
सुरळीच्या वड्या कधीच केल्या नाहीत (नुसत्याच खाल्ल्या), पण लवकरच करून पहायला पाहिजेत असे वाटते आहे. :) वड्यांचे आवरण छान पातळ, पारदर्शक जवळजवळ असे दिसते आहे. छान फोटो.