आवशीचा घो ह्या बजटच्या ;)

दशानन's picture
दशानन in काथ्याकूट
16 Feb 2009 - 2:39 pm
गाभा: 

अरे कोणी बजेट व्यवस्थीत बघीतले आहे काय ???

नाय पहील्या पंधरा मिनिटातच मला चक्कर आली व मार्केटचा हार्ट फेल !

  • शेतकऱ्यांना सात टक्के व्याजदराने तीन लाखांपर्यॅंतचे कर्ज मिळणार
  • मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये मध्ये दोन आयआयटी स्थापन करणार
  • शैक्षणिक कर्ज योजनेचे पुनर्विलोकन
  • सन २०१० पर्यंत सहा नव्या आयआयएम सुरु करणार
  • दोन नवीन पेन्शन योजनांची घोषणा
  • कृषी क्षेत्रासाठी २५ राज्यांसाठी १३,५०० कोटी रुपयांचे पॅकेज
  • सर्व शिक्षा अभियानासाठी १३, १०० कोटी रुपये
  • कच्चा तेलाच्या किंमती भरमसाठ वाढल्यानंतरही जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती चालू आर्थिक वर्षात नाजूक
  • भारत वेगाने विकसित होणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश
  • निर्यात दरात गेल्या नऊ महिन्यांपासून घट
  • वित्तीय आणि महसुली तुटीत घट
  • गेल्या चार वर्षांत कृषी क्षेत्रातील गुंतवणूक ३०० टक्‍क्‍यांनी वाढविली
  • रोजगार निर्मितीच्या योजनांचा विस्तार
  • सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या व्यवसायात ८४ टक्‍क्‍यांनी वाढ
  • अपेक्षित कर उत्पनात ६० हजार कोटी रुपयांनी घट
  • शालेय माध्यान्ह भोजन योजनेसाठी आठ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद
  • देशात एक कोटी २० लाख रोजगारनिर्मितीचे लक्ष्य
  • धान्य, खते आणि पेट्रोलियम पदार्थांवरील अनुदानात वाढ
  • संरक्षण विषयक तरतुदीत १,४१,७०३ कोटींनी वाढ

हे सोडलं तर काहीच नाही ! सामान्यासांठी... मार्केटसाठी काहीच नाही !

च्यामायला मार्केट आपलं पुर्ण जोर लावून वर येतं होतं .. मोठी मोठी वादळातून देखील परत ९५०० चा आकडा दिसत होता परत खाली उडी मारली मार्केट -३५० आली !

असे कानावर आलं की बजेट च्या भाषणावेळी दोन मंत्री चक्कर येऊन पडले .... ;)

प्रतिक्रिया

अवलिया's picture

16 Feb 2009 - 2:42 pm | अवलिया

निवडणुक जवळ आली राजे !

--अवलिया

सुनील's picture

16 Feb 2009 - 2:46 pm | सुनील

हे तात्पुरते बजेट आहे. एकदा एप्रिल-मे मध्ये निवडणूका होऊन नवे सरकार आले की संपूर्ण बजेट सादर केले जाईल. तोवर धीर धरा!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दशानन's picture

16 Feb 2009 - 2:49 pm | दशानन

काय सांगता.... :O

म्हणजे अजून पिच्चर बाकी है !

:S

#:S चला मी निघतो हिमालयात आता.... टाटा ~X(

:) Keep Smiling !!!!!!
It Is The Second
Best Thing U Can Do
With Your Lips! ;)

अवलिया's picture

16 Feb 2009 - 2:50 pm | अवलिया

थांब थांब मला पण येवु दे रे...

--अवलिया

सुक्या's picture

16 Feb 2009 - 10:50 pm | सुक्या

मी पण येतो राजे.
आता तिथंच मोक्ष मिळेल.

(हिमालयात घर शोधणारा) सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

पिवळा डांबिस's picture

17 Feb 2009 - 11:13 pm | पिवळा डांबिस

हिमालयात मासळी गावत नाय म्हणून....
नायतर मी पण आलो असतो तुमच्यासोबत....
:(
आमाला बहुतेक अंदमानात आश्रम उभारायला लागणार....

सुनील's picture

16 Feb 2009 - 3:00 pm | सुनील

सद्य सरकारच्या शपथविधी प्रसंगाचे वेळी शेअर बाजार मुद्दमहून कोसळवण्यात आला होता. हे खरे काय?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अवलिया's picture

16 Feb 2009 - 3:02 pm | अवलिया

सरकारचे शेअर बाजारावर की शेअर बाजाराचे सरकारवर नियंत्रण असते? या प्रश्नाचे उत्तर शोधा.. तुम्हाला तुमचे उत्तर मिळेल.

--अवलिया

दशानन's picture

16 Feb 2009 - 3:05 pm | दशानन

=))

एकाच चड्डी मध्ये पाय घालतात हे माहीत आहे बॉ !

सुनील's picture

16 Feb 2009 - 3:06 pm | सुनील

कुठल्या सरकारचे? नुकत्याच निवडून आलेल्या की नुकत्याच पडलेल्या?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

झेल्या's picture

16 Feb 2009 - 3:08 pm | झेल्या

>>भारत वेगाने विकसित होणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश
>>सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या व्यवसायात ८४ टक्‍क्‍यांनी वाढ

यावरून सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे शेयर्स वधारतील असा अंदाज आपण बांधू शकतो का?

बजेटचा मार्केटवर इतका परिणाम होण्याची काय कारणे आहेत?

या वेळेला कोणत्या कंपन्या शॉर्ट टर्म गुंतवणुकीसाठी उपयुक्त आहेत?

टेक्निकल ऍनालिसिस म्हणजे काय आणि तो कसा करतात?

(माझ्यासाठी हे क्षेत्र नवीन असल्यामुळे कदाचित हे प्रश्न बाळबोध वाटतील...)

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

दशानन's picture

16 Feb 2009 - 3:12 pm | दशानन

:O) मार्केट मध्ये येणार ?

:)] कोणाला तरी व्यवस्थीत विचारुन या.

[( स्वतःच्या बुध्दी वर तुम्ही मार्केट मध्ये येत असाल तर छान !

L) तुमच्या कडे १लाख रुपये असतील तर १०००० च गुंतवा

:B डोळसं पणे मार्केट व्यवस्थीत पहा समजा

:X लालच जास्त करु नका

:^o खोटं स्वप्न पाहू नका

:SS जास्त घाबरणे पण चांगले नाही

=)) पैसे गेल्यावर वेड्याचा झटका पण येतो.. त्यामुळे सावध रहा

>:) सल्ला चांगल्याच माणसाकडुन ह्या... !

#o पैसे गेल्यावर त्रास करुन घेऊ नका

O:) सर्वच गेले तर नाना, मी व माझ्या साईडची एक सीट तुमच्यासाठी पण मोकळी... हिमालयात जायला :D

अवलिया's picture

16 Feb 2009 - 3:17 pm | अवलिया

योग्य सल्ला

>:)

--अवलिया

झेल्या's picture

16 Feb 2009 - 3:29 pm | झेल्या

=))

विनोदी आणि उपयुक्त सूचनांबद्दल आभार... :)

>>सल्ला चांगल्याच माणसाकडुन ह्या... !
अवलियांकडून आणि तुमच्याकडून घ्यावा म्हणतो...

फंडामेंटल आणि टेक्निकल ऍनालिसिस हे खरच प्रत्यक्षात उपयुक्त ठरतात का?
आणि या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी आपण काही मार्गदर्शन कराल का?

-झेल्या

थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.

दशानन's picture

16 Feb 2009 - 5:23 pm | दशानन

फंडामेंटल आणि टेक्निकल ऍनालिसिस

=))

खाली सरांनी उत्तर दिले आहे बघा !

त्यांच क्रिप्टिक कळाले की पार पडलात समजा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Feb 2009 - 5:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>:)

शितल's picture

17 Feb 2009 - 3:49 am | शितल

>>सर्वच गेले तर नाना, मी व माझ्या साईडची एक सीट तुमच्यासाठी पण मोकळी... हिमालयात जायला
=))

विनायक प्रभू's picture

16 Feb 2009 - 3:51 pm | विनायक प्रभू

इन्वेस्ट करायला पैसे नाहीत. घेणार्‍याला 'इन' आणि माझे गुंतवणार्‍याचे 'वेस्ट'

दशानन's picture

16 Feb 2009 - 3:53 pm | दशानन

=))

ह्याला म्हणतात उच्च प्रतिचा प्रतिसाद !

विनायक प्रभू's picture

16 Feb 2009 - 3:56 pm | विनायक प्रभू

टेक्निकल अनॅलिसिस म्हणजे बॅलन्स शीट च ना?
अरे हट.
राजुने नाही का बॅलन्स आपल्या कडे ठेवला. आणि लोकांना 'शिट्ट" आणि 'शिट' दिली.

विनायक प्रभू's picture

16 Feb 2009 - 3:58 pm | विनायक प्रभू

फंडामेंटल वाचायचे पेपरात. ते वाचुन 'गंडायचे' आणि नंतर मेंटल व्हायचे.

दशानन's picture

16 Feb 2009 - 4:05 pm | दशानन

=))

खुसपट's picture

16 Feb 2009 - 10:59 pm | खुसपट

बजेट हे तुमच्या दृष्टीने नक्की काय आहे ? शेअरबाजार वर उचलण्याची क्रेन ? या देशातल्या ९५% जनतेला शेअरबाजार म्हणजे काय ? हे माहीत सुद्धा नाही. ५०% लोकांकडे गुंतवणूक करण्याएवढी बचतच नसते. नशिबाने चार पैसे हाताशी असणारा नवश्रीमंत सधन मध्यमवर्ग लॉटरी किंवा पत्त्याचा जुगार खेळतात तसा शेअरबाजारात पैसा टाकतात, गुंतवणूक असं त्याला समजतात. त्यामागे विचार नसतो. उरलेले ४५% जमीन , सोने-चांदी नाहीतर व्यापारी गाळा खरेदी करतात, ते त्याचा भाव १५-२० वर्षे कधीच पाहत नाहीत, ते अशिक्षित असले तरीही ! हा सर्व बहुजन समाज नाहीतर व्यापारीवर्ग असतो. पढीक विद्वत्ता फक्त मध्यमवर्गाकडेच असते.

कृपया राग नसावा. (खुसपट)

दशानन's picture

17 Feb 2009 - 6:32 am | दशानन

+१ सहमत.

तुम्ही म्हणता ते ठीक असेल ही.. ह्म्म्म नाही १००% ठि़क आहे, पण शेयर मार्केट हा देशाच्या ह्दयाचा पंप आहे असे मी तरी समजतो.. मार्केट आजारी तर देश पण आजारी... बाकी चालू द्या... ;)

* तुमच्या नावात घोळ आहे पण तुमच्या बुध्दीत नाही हे पाहून आनंद झाला.

दशानन's picture

17 Feb 2009 - 2:35 pm | दशानन

बजेट इफेक्ट आज पण चालूच मार्केट -३०० =))

संसेक्स आठ हजारच्या खाली !!!!

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

हुल्लालाला हु हुल्लालाला हु हुल्लालाला हु हुल्लालाला हु

झिंगालाला हुं झिंगालाला हुं झिंगालाला हुं झिंगालाला हुं

एक महिन्या आधीच शिमगा आला रे आला !!!

=))

अवलिया's picture

17 Feb 2009 - 2:47 pm | अवलिया

आठ की नउ?

अवांतर - आताच येवढा नाचु नकोस.. ताकद शिल्लक राहु दे ...मंदिचे कमीतकमी ५ ते १८ वर्षे आपल्याला काढावी लागणार आहेत.

--अवलिया

दशानन's picture

17 Feb 2009 - 2:50 pm | दशानन

आठच्या रेंज मध्ये आला ;)

८९९३ वर !

शेअरबाजार हा त्या बाजारात किती पैसा आणि तो कोण ओतत आहे , यावर वर-खाली नाचत असतो / नाचवला जातो. शेअरब्रोकर हा स्वतःच्या आर्थिक लाभासाठी , तसेच मुख्यतः औद्योगिक घराण्यांच्या गुंतवणूकीचे व्यवहार कायदेशिरपणे करून देण्याचे काम करत असतो. किरकोळ गुंतवणूकदारांचे पैसे वापरून म्हणजे मधून मधून त्यांना नुकसानीत नेवून खर्‍या मालकांचा फायदा करून देण्याचे काम तो मालकांच्या इशार्‍यानुसार संघटीतपणे इतरांबरोबर शेअरबाजार वर किंवा खाली नेताना स्वतःचा फायदा राखून करत असतो. माझा शेअरबाजाराचा ४० वर्षांचा ' आतला ' अनुभव आहे त्यावरून सांगतो आहे. युनिट ट्रस्टची २००१ मधली दिवाळखोरी ही या बाजारनीतीचे उत्तम उदाहरण आहे. असो. पुढच्यास ठेच लागली तरीही मागचा शहाणा होतोच असे नाही, पुढच्याला मागचा माणूस मूर्ख किंवा आंधळा समजतो एवढेच. आपले डोके गहाण न ठेवणे हे अधिक महत्वाचे.अधिक काय लिहावे ?

( अज्ञ ) खुसपटराव

मनिष's picture

17 Feb 2009 - 3:37 pm | मनिष

नाना - मंदीची ५ ते १८ वर्षे???
मारता का राव?