गाभा:
नुकताच इथे सुशीलने मांडलेला आवडत्या संपादकांचा कौल रद्द केला आहे.
मिपाचे सगळेच संपादक मिपाकरता सारखेच महत्वाचे आहेत, त्यात डावं-उजवं, लहान-मोठं असं कुणीच नाही! सबब, हा कौल अनाठायी ठरवला गेला असून रद्द करण्यात येत आहे..
सुशीलराव, पुन्हा इथे मिपावर येऊन काड्या घालण्याआधी आम्हाला जरा विचारत जा, अन्यथा आपली मेहनत फुकट जाईल! :)
आपला,
(संपादकांचा ऋणी) तात्या.
प्रतिक्रिया
15 Feb 2009 - 7:50 am | दशानन
अशी कौल तथा दोन ओळीचे महत्वपुर्ण काथ्याकुट ह्यावर काही तरी बंधन असावेच, काही दिवसापासून पाहतो आहे नवीन आलेल्या काही (?) सदस्यांना जुन्या जाणत्या सदस्यांपेक्षा जास्त माहीती आहे ;)
तुमच्या ह्या कृतीला आमचे पुर्ण अनुमोदन.
बाकी अनाठायी वाटत असलेले फालतु लेख सुध्दा नष्ट करा.. ही विनंती.
एक उपाय सांगतो आहे... फक्त सल्ला आहे करावा न करावा हे तुमच्या हाती आहे.
ज्या सदस्याचे ५ पेक्षा जास्त लेखन उडवले जाते (एका आठवड्यामध्ये) त्याला कमीत कमी १ महीना तरी नवीन लेख करता येऊ नये.
ज्या सदस्याचे १५ पेक्षा जास्त प्रतिसाद उडवले गेले आहेत (एका आठवड्यामध्ये) त्याला पण वरील नियम.
व ज्या सदस्याचे नेहमीच लेखन उडवावे लागते त्यांचा आयपी मिपा साठी बॅन व आयडी सुध्दा.
बघा कसे वाटते माझे विचार.
:) Keep Smiling !!!!!!
It Is The Second
Best Thing U Can Do
With Your Lips! ;)
15 Feb 2009 - 8:17 am | विसोबा खेचर
ज्या सदस्याचे ५ पेक्षा जास्त लेखन उडवले जाते (एका आठवड्यामध्ये) त्याला कमीत कमी १ महीना तरी नवीन लेख करता येऊ नये. ज्या सदस्याचे १५ पेक्षा जास्त प्रतिसाद उडवले गेले आहेत (एका आठवड्यामध्ये) त्याला पण वरील नियम.
सूचनेकरता धन्यवाद..
परंतु इतके सगळे मोजमाप करायला आम्हाला वेळ नाही. आम्ही ऐनवेळेस निर्णय घेऊन मोकळे होत असतो..! :)
तात्या.
15 Feb 2009 - 8:19 am | दशानन
फैसला ऑन द स्पॉट.... ;)
15 Feb 2009 - 8:21 am | टारझन
जरासं ... "आम्ही णिर्णय घ्यायला समर्थ आहोत .. धागे उडवताणा कारणे देण्यास आम्ही बांधील णाही ".. असं वाचलं
हलकेच घ्याहो भौ लोक्स
15 Feb 2009 - 8:15 am | घाटावरचे भट
म्हणजे सगळ्यात मोठे संपादक तात्या, असंच ना? ;)
15 Feb 2009 - 8:39 am | अवलिया
मिपाचे सगळेच संपादक मिपाकरता सारखेच महत्वाचे आहेत, त्यात डावं-उजवं, लहान-मोठं असं कुणीच नाही!
अगदी !! अगदी !!
सहमत
--अवलिया
15 Feb 2009 - 7:42 pm | कलंत्री
पूर्वी एकदा एकाने आपल्या मित्राला आपल्या घरी जेवायला बोलावले. जेवणाच्या गप्पा मारता त्याने आपल्या आर्थिक विवंचनेबद्दलही सांगितले. हे ऐकताच त्या अभ्यागताने ज्या घरातच जेवत होता त्या घराच्या लाकडाचे प्रमाण किती असावे आणि किती किमत येईल असा विचार आणि संवाद करायला सुरवात केली.
काही वेळेस काही लोक नकळतच जाणता अजाणता तेथील लोकात दुरावा निर्माण करण्याचे कार्य सुरु करतात.
आपल्या लेखाने लोक जोडले जातील की नकळतच दुरावा निर्माण होईल इतका विचार प्रत्येकानेच करायला हवा.
15 Feb 2009 - 9:21 pm | विसोबा खेचर
चिता करू नका कलंत्रीसाहेब, हे संस्थळकंटक जिथे संपतात तिथे तात्या सुरू होतो..! :)
15 Feb 2009 - 9:49 pm | कलंत्री
तात्या तुम्ही सर्वांना पुरुन उराल याची खात्री आहे. पण कोठेतरी हे प्रकार ( जाणता-अजाणता थांबले पाहिजे.).
मराठी भारुड ही प्रभूंचे विडंबन वाचून मनात शल्य निर्माण झाले की मराठीसाठी आपण काही करणार आहोत का असेच पायात पाय घालून एकमेकांना पाडण्याचा आनंद घेणार आहोत.