नेहमी प्रमाणे लालूंनी भारतीय रेल्वेला फायदा करुन दिला आहे. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर मेल एक्स्प्रेसच्या प्रवास भाड्यात २ % कपात केली आहे . लोकलचे भाडे १ रु स्वस्त होणार आहे. ही एक आनंदाची गोष्ट. लालूंचे त्यासाठी अभिनंदन !!
सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे लालूंनी मुंबई- जबलपूर गरिबरथ अलाहाबाद पर्यंत एक्स्टेंड करण्याची घोषणा केली त्यावेळी लक्षत आले की मागच्या वर्षीच्या बजेट मध्ये घोषीत केलेली मुंबई- जबलपूर ही गाडी अजून सुरुच झालेली नाही ! धन्य ते आपले लाडके लालू !!
मुंबई- गोरखपूर आणि मुंबई - वाराणसी रोजची गाडी चालू करुन मुंबईवरचा युपी , बिहारी टक्का कमी होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली आहे. बाकी रेल्वेला सगळ्यात जास्त महसूल देणार्या मुंबईच्या तोंडाला पाने पुसण्यास लालू परत एकदा यशस्वी झाले आहेत.
ठाणे- पनवेल लोकलच्या नियमीत फेर्या, पनवेल - कर्जत नवीन मार्गवर नियमीत वाहतुक, हार्बर लाईन वर १२ डब्यांच्या गाड्या, बोरीवली -विरार करांसाठी नवीन गाड्या या प्रवाशांच्या मागण्याबाबत लालूंनी फारसा विचार केलेला दिसत नाही.
मात्र भारतीय रेल्वे फायद्यात आणण्यात परत एकदा लालूजी यशस्वी झाले आहेत.
यापुढे सरकार कुणाचे ही आले तरी रेल्वे मंत्री लालू प्रसाद व्हावेत या त्यांना शुभेच्छा !!!
(लोकल प्रवासी ) अमोल
प्रतिक्रिया
13 Feb 2009 - 5:05 pm | तिमा
लई हुरळून जाऊ नगं ! लालु सादा गडी न्हाई. तो जाऊन दुसरा कोनी येईल तवा कळंल ह्यानी काय घान केलीये ते. रेल्वेची सर्वी प्रापर्टी विकून प्राफिट मधे आनलीये असं एकून हाय्!
13 Feb 2009 - 5:06 pm | ब्रिटिश टिंग्या
आमच्या पुण्याला काही मिळालं का हो?
13 Feb 2009 - 5:13 pm | अमोल केळकर
परत एकदा भैय्यांच्या सोईसाठी
पुणे - पाटना ४ दिवसांएवजी दररोज
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
13 Feb 2009 - 10:43 pm | मदनबाण
सहमत...
भैय्यांच्या सोईसाठी :--
धनाबाद (झारखंड)- कोल्हापुर.
जे मुंबई - ठाण्याचे झाले तेच पुणे-कोल्हापुरचे होणार !!! @)
मदनबाण.....
देवाचे मूर्तिमंत स्वरुप म्हणजे आई.
13 Feb 2009 - 5:20 pm | झेल्या
मुंबईला तरी ठेंगा मिळालाय असं मटा (पत्र नव्हे मित्र) म्हणतोय.
पुण्यालाही बहुतेक तेच मिळाले असणार्...असो.
पुणे-मुंबई लोकल्स सुरु झाल्या तर लोकांची सोय होईल आणि व्होल्व्हो किंवा तत्सम महागड्या खाजगी बस सेवांना चांगला पर्याय उपलब्ध होईल असे वाटते.
पुण्यातल्या मेट्रोचे नंतर काय झाले कुणास ठाऊक! (आहे का?)
-झेल्या
थांबला असाल तर चालायला लागा,
चालत असाल तर पळायला लागा,
पळत असाल तर थांबा.
13 Feb 2009 - 5:56 pm | ब्रिटिश टिंग्या
पुणे-मुंबई लोकल्स :O
ह्यांचा खरचं असा काही प्लॅन आहे की काय :?
13 Feb 2009 - 6:02 pm | अमोल केळकर
लोणावळा - कर्जत चालू झाली तरी चालेल :D
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
13 Feb 2009 - 6:04 pm | ब्रिटिश टिंग्या
लोणावळा - कर्जत कदाचित सुरु होईल्.....पण कर्जत - लोणावळा अवघड वाटते ;)
लोकलला ३ इंजिनं लावायला लागतील ;)
13 Feb 2009 - 6:06 pm | सुनील
लोकलला एक इंजिन लावावे लागेल, घाट चढायला!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
13 Feb 2009 - 5:06 pm | घाशीराम कोतवाल १.२
ठाणे- पनवेल लोकलच्या नियमीत फेर्या I)
या गोष्टीला अजुन एक वर्ष लागेल
पनवेल - कर्जत नवीन मार्गवर नियमीत वाहतुक :SS
मोठा विनोद हा मार्ग प्रवासी वाहतुकिसाठी सुरक्षीत नाहि असे रेल्वे अधीकारी सांगतात ...
हार्बर लाईन वर १२ डब्यांच्या गाड्या =))
आम्हा बापुड्या हार्बर लाईन वाल्याची हि ईच्छा पुर्ण व्हायला अजुन ७ ते ८ वर्षे लागतील किवा त्यापेक्षा जास्त
बोरीवली -विरार करांसाठी नवीन गाड्या 8>
ही तर गेल्या वर्षीचीच घोषणा आहे
एकंदरीत काय तर मुंबईच्या कोणत्याही रेल्वे कामांकरीता पैसा द्यायचा नाहि अथवा अशी काम करायला घ्यायची ती १० ते १२ वर्षे पुर्ण होणार नाहि ~X( 8> :H :W
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.
13 Feb 2009 - 5:17 pm | अमोल केळकर
पनवेल - कर्जत नवीन मार्गवर नियमीत वाहतुक
मोठा विनोद हा मार्ग प्रवासी वाहतुकिसाठी सुरक्षीत नाहि असे रेल्वे अधीकारी सांगतात ...
पण सध्या या मार्गावर मनमाड - पुणे - मनमाड इंटरसिटी धावते
उपेक्षीत हार्बर लाईन वाला
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
13 Feb 2009 - 5:51 pm | शशिधर केळकर
अमोल भाऊ
तुमचा रेल्वे चा अभ्यास दांडगा दिसतो.
मागेही पुण्याच्या गाड्यांचे धावते प्रक्षेपण तुम्ही मस्त पैकी केले होते.
काहीतरी सामाजिक संस्थेमधे वगैरे जरूर भाग घ्या - तुमच्या ज्ञानाचा छान उपयोग होईल लोकाना!
13 Feb 2009 - 10:18 pm | विनायक पाचलग
आमी पाहिले तर कोठे मुंबैवर अन्याय असे लिवले होते तर कोठे लालु आणि बालु यांच्यातल जोक कॅसेट आडकल्याप्रमाणे पुन्हा पुन्हा दाखवत होते असो आम्हाला खरतर बघायची काही गरज न्हवती पण यातले खरोकर किती अस्तित्वात येणार आणि कधी असा प्रश्न आहेच लवकरच आचारसंहिता चालु होइल ना
त्याचा काही फरक पडतो का
जाण्कारानी खुलासा करावा
प्रणाम