गुगल रीडर

माझी दुनिया's picture
माझी दुनिया in काथ्याकूट
13 Feb 2009 - 1:29 pm
गाभा: 

मी फाफॉ न्याहळक वापरते. विविध ब्लॉग्ज आणि संकेतस्थळे वाचण्याकरता गुगल रीडरद्वारे फिड्सचा वापर करते. गेले ४-५ दिवस गुगल रीडर उघडतच नाहिये. कोणाला असा काही अनुभव आला आहे का ? गुगल च्या इतर सेवा मात्र व्यवस्थित काम करत आहेत.फाफॉ व्यतिरीक्त आयई ७, ऑपेरा आणि क्रोम अश्या सगळ्या न्याहळकामार्फत तपासणी केली. परंतु प्रश्न सुटला नाही.असे का होत असावे ?
तात्पुरती दुरुस्ती चालू असेल अश्या शंकेने मी पर्याय म्हणून सध्या गुगल रीडर चे मोबाईल करता चे व्हर्जन वापरत आहे. जे व्यवस्थित आणि पटकन उघडतं. पण त्यात आलेली कोणतीही पोस्ट टॅग करायची किंवा विरोपाद्वारे पाठवायची सोय नाही, जी मूळ गिगल रीडरमध्ये उपलब्ध आहे. शिवाय एखादे नविन सभासदत्व (सब्स्क्रिपशन ) घेणे, त्याची व्यवस्था पाहाणे इत्यादींकरता सोयीही नाहीत. कुणी याबाबत मार्गदर्शन करू शकेल का ? मुख्य म्हणजे गुगल रीडर उघडण्याच्या बाबातीत, गुगल रीडर वापरणार्‍या सगळ्यांना असाच अनुभव येतो आहे का ?

प्रतिक्रिया

तात्या विंचू's picture

13 Feb 2009 - 5:24 pm | तात्या विंचू

गुगल रीडर व्यवस्थित आहे...मला तरी काहीच अडचण नाही आली...