साहित्य :
चांगल्या प्रतिचे आंबेमोहोर तांदूळ २०० ग्रा. ; साजूक तूप ; मेतकूट ; पापड ( पोह्यांचा )
कृती : तांदूळ स्वच्छ धुवून पंच्यावर पूर्ण एक दिवस वाळवून घ्या.
त्याची हाताने भरडून होईल इतपतच कणी करा.
साध्या भातास आपण दुप्पट पाणी ठेवतो, गुरगुट्या भातास चौपट पाणी लागते.
आधी पाणी उकळवत ठेवावे, उकळल्यावर त्यात तांदूळ घालावे आणि साधारणपणे मध्यम आचेवर ४० मिनिटे हा भात होण्यास लागतात.
भात होता होता त्यात चवीप्रमाणे मीठ व साजूक तूप घालावे.
भात उतरवल्यावर लगेच खाण्यास बसले पाहिजे.
बरोबर मेतकूट ; सायीचं अधमुरं दही ; आणि पोह्यांचा पापड नसेल तर मजा येणार नाही.
हा भात फक्त सकाळी ९.०० आत खाल्ला तरच याची मजा अनुभवता येईल.
कैरीचं ताजं लोणचं पण छान लागेल बरोबर खायला.
प्रतिक्रिया
13 Feb 2009 - 12:07 pm | स्नेहश्री
४ जानेवारीची परत एकदा आठवण करुन दिलीस.
परत कधी असा योग येणार?
तोंडास पाणी सुटले.........
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
13 Feb 2009 - 12:59 pm | अश्विनि३३७९
हा भात मातीच्या चुलीवर केला असेल तर अजुन उत्तम लागतो.
कोकणात सकाळची न्याहरी म्हणून ह भात खाल्ल जातो.
13 Feb 2009 - 5:08 pm | अनंत छंदी
@) बालपण आठवले.
14 Feb 2009 - 3:16 pm | पर्नल नेने मराठे
मला सुध्हा बालपण आठवले.
चुचु
13 Feb 2009 - 5:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भात माहिती होता. भातात 'गुरगुट्या' शब्द आला कुठून ?
म्हणजे त्याला 'गुरगुट्याच' का म्हणायचे असे माहिती म्हणून सहज विचारतो.
14 Feb 2009 - 8:29 am | श्रीयुत संतोष जोशी
मला पण नक्की माहिती नाही पण माझ्या आजीकडे चौकशी करून सांगतो.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
13 Feb 2009 - 5:47 pm | वाहीदा
गुरगुट्या भात खाल्ला की मि.पा वाले गुटगुटीत होणार :-)
धन्यवाद संतोष जोशी !
~ वाहीदा
13 Feb 2009 - 6:00 pm | सुनील
साधी-सोपी पाकृ. बाकी पापड हा पोह्याचाच. उडदाचे पापड चकणा म्हणूनच खावेत!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
13 Feb 2009 - 6:01 pm | अवलिया
फोटो?
भाताचा आणि भात खावुन तुम्ही कसे दिसतात तो पण...
--अवलिया
13 Feb 2009 - 6:18 pm | शंकरराव
+१
सहमत
13 Feb 2009 - 6:15 pm | रेवती
माझा अतिषय आवडता भात.
उद्याच करते . ह्याबरोबर लिंबाचे गोडे लोणचेही छान लागते.
हा भात फक्त सकाळी ९.०० आत खाल्ला तरच याची मजा अनुभवता येईल.
अगदी बरोबर बोललात!
रेवती
13 Feb 2009 - 6:20 pm | दशानन
छान कृती आहे व सोपी पण :? जमेल मला शक्यतो... उद्या जर अन्नविषबाधा झाली नाही व जिवंत राहीलो तर असा बनला हे पण लिहतो.
***
ह्या मुळे वजन वाढू शकते का ???
नाय मला वजन नाय वाढवायचं आहे.. उगाच काय तरी विचारायचं म्हणून श्यान इचारलं चालू द्या.... ;)
भिरभिर फिरलो उन्हातानात मी !
चकरा मारल्या अनंत मी !
तुला पाहण्यासाठी...
यमालाही थोपवलं मी !
पण आता बाय-बाय =))
13 Feb 2009 - 9:19 pm | प्राजु
आटवल भात असं म्हणतो.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Feb 2009 - 9:51 pm | अविनाशकुलकर्णी
आता क्रुति कळालि..
14 Feb 2009 - 6:54 am | विसोबा खेचर
पाकृ वाचून एकदम देवगडात गेलो!
केळीच्या पानावर मऊ गुरगुट्या भात, साजूक तूप, पोह्याचा पापड, लिंबाचं लोणचं!
संतोष, भाताचा फोटू पाहवतो आहेस ना?
खल्लास...
तात्या.
14 Feb 2009 - 8:37 am | llपुण्याचे पेशवेll
खरे आहे.
आणि भात जर कोकणातल्या लाल उकड्या तांदूळाचा असेल तर अधिकच उत्तम.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984