निर्ल्लज्जपणा, हलकटपणा, मयताच्या टाळूवरचं लोणी खातील भडवे!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
12 Feb 2009 - 11:03 pm
गाभा: 

काही खाजगी कंपन्यांना म्हणे बाबा आमट्यांच्या आनंदवनाखाली कोळश्याच्या खाणी असल्याचा शोध लागला आहे. त्यांनी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राज्य सरकारशी संधान साधून आता तिथे कोळश्याच्या खाणी खणण्याचा पाताळयंत्री बेत आखला आहे..!

कालच ई-मराठी, की स्टार माझा यापैकी कुठल्याश्या वाहिनीवर ही संतापजनक बातमी पाहण्यात आली!

आमटे परिवाराचा या योजनेला अर्थातच ठाम विरोध आहे हेही दाखवण्यात आले!

६०-७० वर्षांपूर्वी एका ओसाड माळरानावर एक महामानव पोहोचला आणि त्याने तिथे नंदनवन उभं केलं, तेव्हा हे शोध लावणारे लोक कुठे गेले होते भोसडीचे??

पण आमच्या सरकारला त्याचे काही सोयरसुतक नाही! कोण बाबा आमटे? असतील ते मोठे त्यांच्या घरचे! आमच्या तुंबड्या भरल्या जात आहेत ना? मग झालं तर! आम्ही देऊ तिथे कोळश्याच्या खाणी खणायला परवानगी!

एका तपस्व्याचं, एका महामानवाचं आनंदवन बुलडोझरखाली चिरडायला आम्हाला जराही लाज-लज्जा-शरम वाटणार नाही!

असो..

आपला,
(बाबांचा भक्त) तात्या.

प्रतिक्रिया

नाटक्या's picture

12 Feb 2009 - 11:18 pm | नाटक्या

तात्या,

हा मात्र कळस आहे या सरकारच्या निर्लज्ज पणाचा. या भडव्यांना नागडे करून जोड्याने मारले पाहीजे...

संदीप चित्रे's picture

12 Feb 2009 - 11:20 pm | संदीप चित्रे

+१

घाशीराम कोतवाल १.२'s picture

13 Feb 2009 - 8:00 am | घाशीराम कोतवाल १.२

या भडव्यांना नागडे करून जोड्याने मारले पाहीजे...

तात्या या भडव्याना जोड्याने मारा नाहि तर कशाने हि आय*ले नाय सुधरणार यांना तर गोळ्या घाला
कुठे गेले होते हे सरकार जेव्हा या महामानवाने तिकडे नंदनवन उभारले स्वताचे आयुष्यज्या मानसाणे
आनंदवनासाठी वेचले तिथे हे अशी परवानगी नक्किच देतिल यांच्या बापाच काय जाते आहे परवानगी द्यायला
एकच करा गोळ्या घाला
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.

प्राजु's picture

12 Feb 2009 - 11:20 pm | प्राजु

महाराष्ट्र सरकार याला परवानगी नाकारेल असेच वाटते आहे. बघूया काय होतं ते..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पालवी's picture

12 Feb 2009 - 11:20 pm | पालवी

तात्या,
तुमचा सात्विक संताप अतिशय रास्त आहे.

रेवती's picture

12 Feb 2009 - 11:25 pm | रेवती

मला नाही वाटत सरकार परवानगी देइल म्हणून....
खाजगी कंपनीला काय हीच जागा सापडली पण.....
हे होता कामा नये.

रेवती

विसोबा खेचर's picture

12 Feb 2009 - 11:31 pm | विसोबा खेचर

मला नाही वाटत सरकार परवानगी देइल म्हणून....

मलाही नाही वाटत! पण मुळात सरकारने असा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव दाखलच करून घ्यायला नको होता! ज्या अर्थी त्याची 'बातमी' दाखवली गेली, आमटे परिवाराचा विरोध दाखवला गेला, त्या अर्थी वरच्या लेव्हलवरून हे बरंच पुढे रेटलेलं हे प्रकरण असणार! असा कुठलाही प्रस्ताव सरकारने मुळातच नाकारायला हवा होता!

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Feb 2009 - 1:37 am | बिपिन कार्यकर्ते

खरंच ही भयंकर बातमी आहे. हे कुठपर्यंत जाणार आहे काही कळत नाही.

निषेध निषेध निषेध!!!

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Feb 2009 - 8:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

खरोखर हा भयंकर प्रकार आहे. आनंदवनातून कोळसा उकरून काढतील आणि त्याने सबंध पृथ्वीचंही नुकसान करतील हे लोकं.
आनंदवन एका संताने सुरू केलं, आपण किमान तो ठेवा आहे तसा जपून ठेवला पाहिजे.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

सुक्या's picture

12 Feb 2009 - 11:27 pm | सुक्या

आपला उद्वेग समजला तात्या. साले हे हलकट लोक पैसा मिळवण्यासाठी नागवे हिंडतील. नफा / नुकसान ह्यापलीकडचे जग ह्या लोकांना माहीत नाही. आपले राज्यकर्तेही समोर टाकलेले हाड तोंडात धरुन शेपटी हलवतील ह्यांच्यापुढे.

मोठ्या त्यागातुन उभारलेल्या ह्या नंदनवनाची खाण होण्याला विरोध व्हायलाच हवा. नाहीतर महामानवाने केलेल्या तपश्चर्येचे आनी समाजाने झिडकारलेल्या लोकांच्या आयुष्याचे मातेरे व्हायला वेळ लागनार नाही.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

भास्कर केन्डे's picture

12 Feb 2009 - 11:28 pm | भास्कर केन्डे

आम जनतेची बाबा आमट्यांच्या कार्यावर असलेली श्रद्धा व त्यांच्या कामाबद्दलचा आदर यामुळे बाबांनी फुलवलेल्या नंदनवनावर बुलडोझर फिरवणे सरकारला शक्य होणार नाही असे वाटते. अर्थात आपल्या समाजाचे काही सांगता येत नाही. मूग गिळून गप्प बसलो नाही म्हणजे झाले.

आपला,
(आशावादी) भास्कर

भडकमकर मास्तर's picture

12 Feb 2009 - 11:32 pm | भडकमकर मास्तर

बातमी पाहिली नव्हती ..
हे वाचून संताप आला...
डाउ हाकलायला जसे आंदोलन उभारावे लागले तसेच आता गरजेचे आहे..
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

अविनाशकुलकर्णी's picture

13 Feb 2009 - 12:02 am | अविनाशकुलकर्णी

असे वाटते कि हि बातमी दाखवुन जन मानसाचि प्रतिकिया जाणुन घेतिल व खाजगी कंपनि व सरकार तो अंदाज घेवुन पुढे पाऊल टाकतिल..पण ह्या सा~याचा निषेध

टिउ's picture

13 Feb 2009 - 12:57 am | टिउ

सरकार परवानगी नाकारेल?

नर्मदा बचाओ आंदोलन विसरलात का? जमलंच तर ताडोबाच्या जंगलात जंगलतोड करुन कोळश्याची खाण चालु करण्याची परवानगी सरकारने कशी दिली ते सुद्धा वाचा...

आनंदवन, नर्मदा खोर्‍यातले विस्थापित, पर्यावरण...आम्हाला कसलीच पर्वा नाही. फक्त आमचे खिसे भरा, मग काय वाट्टेल ते करा असं आपल्या सरकारचं धोरण आहे.

केदार's picture

13 Feb 2009 - 2:00 am | केदार

मलाही परवानगी नाकारनार नाही असे वाटते. नंदनवनाचे आधी विस्थापण केले जाईल.

निषेध.

कोदरकर's picture

13 Feb 2009 - 6:37 am | कोदरकर

आपण जिवंत असे पर्यंत असे काही होवु द्यायचे नाही अशी खुणगाठ बांधु....

विसुनाना's picture

13 Feb 2009 - 11:02 am | विसुनाना

साने गुरुजींच्या (आता फारच गुळगुळीत वाटणार्‍या) भाषेत बोलायचं तर पैशासाठी स्वत:च्या आईचं हृदयही कापून विकणारे कसाब आहेत हे. महम्मद अजमल अमीर कसाबबद्दल जेवढी घृणा मला वाटते त्यापेक्षा जास्त घृणा ही बातमी वाचून राज्यकर्ते आणि उद्योगपती यांची आली.

आता या प्रकल्पाच्या बाजूने देशाची अनमोल संपत्ती, ऊर्जेची गरज इ.इ. दाखले देऊन आनंदवनाचे योग्य ते पुनर्वसन कसे केले जाईल ते सांगायला लंगोटीपत्रेही पुढे सरसावतील. काही बुद्धीवादी त्याला अनुमोदनही देतील. बघताबघता आनंदवन विस्थापनाचे आदेश येतील.

पुन्हा एक लढाई!! महामानवा, पृथ्वीतलावर दु:खितांचे आसू पुसण्यात तुझी हयात गेली. त्याची शिक्षा म्हणून आता स्वर्गातही तुला चैन पडू नये याची सोय आम्ही करंटे करत आहोत.

ह्या काँग्रेस सरकार च्यायला.... मुंबई तर विकून खाल्ली आहेच, आता महाराष्ट्र तरी का सोडतील?
तात्या, कृती काय करायची ते सांगा, आम्ही सगळे आहोत.
साला ही निवडणूक कधी आहे, ह्या भडव्या सरकार ला तिथेच उत्तेर दिले पाहीजे.
सर्व मिपा करांना विनंती, निवडणूकीला नक्की मतदान करा.(इतके तर आपण नक्कीच करू शकतो)

Dhananjay Borgaonkar's picture

13 Feb 2009 - 11:06 am | Dhananjay Borgaonkar

तात्या ही बातमी पोचवल्या बद्दल धन्यवाद. आपन चालु करुयात चलवल. मी येतो तुमच्या बरोबर.
आता आपनच कहि तरी केल पहिजे. नुस्त गप्प बसुन नाही चालनार.

श्रावण मोडक's picture

13 Feb 2009 - 11:48 am | श्रावण मोडक

"खरं तर कंपनी असो वा सरकार, दोघांचेही यात काहीही चुकीचे नाही. कारणं हवी आहेत?
१. देशाची प्रगती आणि विकास व्हावयाचा असेल तर उर्जेची नितांत गरज आहे. अगदी अमेरिकेबरोबरचा, फ्रान्सबरोबरचा अणूकरार केल्यानंतरही उर्जेची भारताची भूक कमी होणार नाही. ती पुरवायची असेल तर जल, औष्णीक, सौर, पवन अशा प्रत्येक मार्गाने मिळणारी उर्जा आपल्याला हवीच आहे. त्यामुळे कोळसा मिळत असेल तर तो हवाच आहे.
२. सरकार कॉंग्रेसचे असो वा भाजपचे, वा कोणत्याही पक्षाचे!!! उर्जेची गरज तर पक्षनिरपेक्ष आहे. त्यामुळे कोणा एका पक्षाला दोष देणे चुकीचे आहे. उर्जेची गरज पूर्ण करणे हे देशाचे धोरण आहे आणि त्यानुसारच सरकार निर्णय घेत असते.
३. देशातील नैसर्गिक साधनस्रोतांचा अधिक कार्यक्षम आणि प्रभावी उपयोग हा खासगी क्षेत्रातूनच होऊ शकतो यावर सरकारचा ठाम विश्वास आहे. पहा बरे, खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण (खाउजा) धोरण स्वीकारल्यानंतरच देशाची किती प्रगती झाली आहे ते. प्रगतीच्या त्या वाटचालीतलेच हे एक पाऊल आहे.
४. आणि तसेही खासगीकरणाच्या आधीच्या काळात सरकारनेही जागोजागच्या नैसर्गिक साधनस्रोतांचा उपयोग करून घेतला आहेच. त्यामुळे येथे आक्षेप कशाला आहे हेच समजत नाही.
५. एवीतेवी त्या आनंदवनातही आता प्रायोजकत्त्व आले आहेच म्हणे की. मग कशाला बाबांच्या नावाने गळे काढायचे आपण? काही गरज नाही त्याचीही.
६. विकास आणि प्रगती म्हटले की त्याग हा करावाच लागतो. आजवरची प्रगती ही कोणाच्या ना कोणाच्या त्यागातूनच आपल्या पदरी आली आहे हे विसरू नका. त्यामुळे येथेही आनंदनवनसारख्या संस्थेला त्याग करावा लागेल. त्या बदल्यात आपण दुसऱ्या आनंदवनाची उभारणी करूया.
७. आजदेखील तुमच्या-आमच्या घरी येऊन घरगड्याचे काम करणारे असेच कोठून तरी या ना त्या कारणाने उठून आलेले असतात. त्यांच्या या सेवा तुम्हाला मिळतात त्याच मुळी तुम्हीही या नैतीक भूमिकेचा थोडासा त्याग केल्यानेच. तो तुम्ही करता तेव्हा त्यांच्या सेवा घेऊ शकता आणि त्यांना त्यातून रोजगार मिळतो, त्यांची प्रगती होते. तो त्याग केला नसता तर तुम्हाला त्यांच्या सेवा घेणे मुश्कील झाले असते. तेव्हा त्याग हा करावाच लागतो, हे विसरून चालणार नाही. तो तुम्हीही करता, तुमच्या सुखासाठी ती मंडळीही करतात.
८. कोळशाची खाण काढल्याने आनंदवनाचे नुकसान होणार नाही याची खात्री असू द्या. महाराष्ट्र हे असे एकमेव पुरोगामी राज्य आहे जेथे प्रकल्पबाधितांसाठी पुनर्वसनाचे कायदेशीर धोरण आहे. त्या धोरणाचा लाभ इथेही दिला जाईल. हा कायदा आहे म्हणूनच तर या राज्यात कोयनेपासूनच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आपण आजही यशस्वीपणे करतो आहोत, हे विसरून कसे चालेल?
९. एक महत्त्वाची गोष्ट. या पृथ्वीवर काही नैसर्गिक साधनस्रोत अमर्याद नाहीत. माणसे अमर्याद आहेत. त्यामुळे मर्यादित साधनस्रोतांचा वेळीच वापर करणे महत्त्वाचे असते हा अर्थशास्त्राचा साधा नियम आहे. माणसे अमर्याद असल्याने उद्या दहा बाबा जन्माला येतील, त्यांच्या हातून अशी दहा आनंदवने उभी राहतील. पण आज त्या कोळशाची खाण झाली नाही तर ती कंपनी, आमचे सरकार उभे राहू शकणार नाही. ते रहावयाचे असेल, देश स्थिर ठेवायचा असेल, त्याची प्रगती साधावयाची असेल तर कोळशाची खाण होणे गरजेचेच आहे.
१०. आनंदनवनातील मुक्त कुष्ठरोग्यांचाही ही खाण झाल्याने फायदा होणार आहे. त्यांना त्या खाणीत रोजगार मिळेल. परिसरातील बेरोजगार जनतेलाही त्याचा लाभ होईल. आज आत्महत्या करण्याची वेळ विदर्भातील शेतकऱ्यांवर आली आहे हे विसरून चालणार नाही. त्याचे मूळ कारणही अशाच आर्थिक मामल्यात आहे. इथे खाण झाल्याने त्या हातांना रोजगार मिळेल.
आणि आत्तापुरते शेवटचे
११. आनंदवनाच्या खाली आम्हाला कोळसा सापडला म्हणून शिव्या कसल्या घालता? त्यातल्या आमच्या बुद्धिमत्तेचे कौतूक करा जरा तरी. तुम्हीच म्हणता ना, आनंदनवन हा हिरा आहे म्हणून. आता हिरा कोळशाच्या खाणीतूनच जन्माला येऊ शकतो, हे कळत नाही? मग तिथे आम्हाला कोळसे आढळले यात विशेष काय? आणि आता आढळले आहेत, तर ते वापरले पाहिजेतच की. त्यातून उर्जा मिळणार आहे. त्या उर्जेतून देशाची प्रगती होईल, त्या प्रगतीतूनच आपण कुष्ठरोग नामशेष करण्याकडे वाटचाल करणार आहोत आणि अशा आनंदवनांची गरजच राहणार नाही. इतकेही लक्षात येऊ नये?"
(संपादक - हा प्रतिसाद उपरोधिक आहे हे सांगण्याची वेळ दुर्दैवाने येते आहे पण एकामागे एक येऊन श्रावण मोडकांना धोपटू लागलेला आणि मूळ विषयापासून दूर जाऊ लागल्याचे पाहून सांगितल्याशिवाय रहावेना! :( )

सर्किट's picture

13 Feb 2009 - 11:53 am | सर्किट (not verified)

खरे आहे श्रावणजी आपले. देशाला उर्जेची गरज आहे. आणि त्यासाठी आनंदवन उठवण्याची गरज आहे. आपण एक करा, माझे वृद्ध आईवडिल तिथे राहतात. त्यांना विस्थापित कुठे करेल तुमचे सरकार, हे सांगा. म्हणजे पुढच्या भारतभेटीत कुठे जायचे ते कळेल. नव्हे, तुमच्या वृत्तपत्रात ते प्रकाशित करा, आम्ही वाचू आणि त्याप्रमाणे तिकीटाची सोय करू.

धन्यवाद.

-- सर्किट

श्रावण मोडक's picture

13 Feb 2009 - 12:06 pm | श्रावण मोडक

सर्किटराव,
संपूर्ण प्रतिसाद दोन मोठ्या अवतरणात वाचावा, ही नम्र विनंती.
तिकिटाच्या सोयीच्या यिंतेत पडण्यापेक्षा त्या लढ्याचे काही ठरत असेल तर उत्तम. तसे काही ठरले तर कळवा. ती बातमी प्रसिद्ध करणे हे केव्हाही आव़डेल. कुठं जायचं याची चिंता तुम्हीच आधी करू लागलात तर तो लढा सुरू होण्याआधीच संपलेला असेल. तसं होऊ देऊ नका, इतकंच सांगतो.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

13 Feb 2009 - 12:15 pm | घाशीराम कोतवाल १.२

उर्जेची गरज तर आहे ना
पण समजा तुमची जमीन आणी तुमचे घर ह्यावर जर असे झाले तर तुम्हाल कसे वाटेल
आणि सरकार ला जर खरच मदत करायची असेल तर आता पर्यन्त किति विस्तापितांचे पुर्नवसन व्यव्स्तीत केले ते दाखवा
अहो तारापुर अणुउर्जा प्रकल्पातील लोकांची अवस्था बघा जरा अजुन त्यांना नोकर्‍या नाहित नुकसान भरपाई नाहि मग बोला
विकास विकास
___________________________________________________
मुख्यकार्यकारी अधिकारी
भुर्जीपाव डॉट कॉम.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Feb 2009 - 12:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो भुर्जीपाव, "दोन अवतरणात वाचा" हा प्रतिसाद तुम्हाला समजला नाही आहे असं दिसतंय, असो.

सध्याच्या घडीला कोळशामुळेच एक तृतीयांश कार्बन डायॉक्साईड तयार होतो असं कालच वाचनात आलं (संदर्भः 'ग्रीन पीस'चं बुकलेट). कोळशाच्या खाणीत होणारे अपघात आणि कोळसा जाळल्यामुळे उद्भवणारे रोग यांच्यामुळे जगात ~काहीशे कोटी युरो दरवर्षी खर्च होतात असंही त्यांचं म्हणणं आहे. हे कारणही पुरेसं नाही का, इतर स्वच्छ पर्यायांचा विचार करण्यासाठी?

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

श्रावण मोडक's picture

13 Feb 2009 - 3:00 pm | श्रावण मोडक

आंधळ्यांच्या दुनियेत आरसे विकणे - कोळशासंबंधात तुम्ही जे लिहिले आहे ते त्या जातकुळीत जाऊन बसते.

खुसपट's picture

13 Feb 2009 - 10:16 pm | खुसपट

नेवेली लिग्नाईट येथील दगडी कोळशाच्या खाणीत २०० वर्षे पुरेल इतका कोळसा आहे, त्यातला १० ट्क्केसुद्धा कोळसा काढला गेलेला नाही. उर्जेची गरज आहेच, पण सौरउर्जा , पवनउर्जा इत्यादी साधनांचा पूर्ण क्षमतेने वापर केला तर आनंदवन येथील कोळश्याच्या मागे लागण्याची गरजच भासणार नाही.

पर्यायी आणि निरंतर उर्जेचा अभ्यासक (खुसपटराव )

महेंद्र's picture

13 Feb 2009 - 12:13 pm | महेंद्र

आनंद वनच काय पण वरोर्‍या जवळच्या सगळ्याच भागात कोळसा आहे. घुगुस कॉलरी जेंव्हा सुरु झाली १९८६ मधे तेंव्हा माझे तिथे जाणे होते कामाच्या निमित्याने. त्यापुर्वी तिथे फक्त नकोडा माइन्स होत्या . आणि त्या पण अडरग्राउंड. पण
१९८४ नंतर जो ओपन कास्ट माइन्स चा नवा ट्रेंड निर्माण झाला त्या नंतर घुग्गुस आणि जवळपासची सगळी गांवं पुनर्वासित केली गेली.

इव्हन वर्धा नदिच्या पात्राखाली पण भरपुर कोळसा आहे असा पण शोध लावण्यात आला होता. ओपन कास्ट माइन्स मुळे संपुर्ण भागातला वॉटर टेबल खाली गेला आहे. आणि चंद्रपुरला पण पाणि टंचाई चा सामना करावा लागतो आहे.

वरोर्या जवळच दहेगांव आणि एकारर्जुना ह्या भागातही कोळसा आहेका हे शोधणे सुरु आहे.

आनंद वनाशी मी अगदी लहानपणापासुन जोडल्या गेलो आहे. माझं आजोळ वरोरा , त्यामुळे आनंदवनात अगदी लहान अस्तांना पासुन जाणे व्हायचे. वरोर्‍यातलं बाबांचं घर माझ्या आजोळा शेजारिच होतं ( किल्ला शाळेजवळ) असो... विषयांतर होतंय..

आनंदवन हे एक संरक्षीत स्मारक म्हणुन घोषीत करावे तरच ते वाचेल, नाहीतर हे हलकट राजकारणी कधीही ते विकुन खायला कमी करणार नाहीत.

महेंद्र

प्राजु's picture

13 Feb 2009 - 9:46 pm | प्राजु

श्रावण मोडकांनी, दोन अवतरणात हा प्रतिसाद वाचा असं लिहिलेलं समजलं नाही का तुम्हाला? हा उपरोधात्मक किंवा उपहासात्मक प्रतिसाद आहे.. त्यामुळे वरचा तुमचा प्रतिसाद संपादित करावा ही विनंती..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विकास's picture

13 Feb 2009 - 9:52 pm | विकास

सर्व प्रथम असल्या खाणीस माझा पाठींबा नाही...पण आता या चर्चे संदर्भात प्रश्न: जर समजा हे आनंदवनाऐवजी दुसर्‍या कुठल्या जागी होत असले - मग ते एखादे कुठल्याही धर्माचे जनमान्य प्रार्थनास्थळ असोत (तिर्थेक्षेत्र, स्तुप, दिल्लीची जामा मशिद, गोव्याचे चर्च इत्यादी...) तरी असाच विरोध असेल का? तेच इतर कुठल्याही प्रसिद्ध अथवा श्रद्धास्थानांविषयी...नर्मदा बचाव आंदोलनासंदर्भात जेंव्हा मग स्थानीक जनता प्रचंड प्रमाणात विस्थापीत झाली त्याला असलेला विरोधपण योग्य होता का?

बाकी कोळसा कितीही उगाळला तरी काळाच... पण त्याचा उपयोग जेंव्हा उर्जानिर्मितीसाठी केला जातो तेंव्हा होणारे अदृश्य परीणाम हे एका आनंदवनावर होणार्‍या या (अनधिकृत नसेल कदाचीत पण) अनैतिक दृश्य आक्रमणापेक्षा जास्त असतात त्याबद्दल बोलायची तयारी आहे का? या संदर्भात फक्त एकच उदाहरण देतो:

खाजगी उद्योगांच्या पुढाकाराने कोकणासारख्या निसर्गसंपत्तीत कोळशाचा वापर करून औष्णीक प्रकल्प चालू करायचे चालले आहे. ऐकीव माहीतीप्रमाणे त्यात तयार होणारी उर्जा ही राष्ट्रीय ग्रीडमधे जाणार म्हणजे कोकण अंधारातच... पण त्याहूनही अधिक म्हणजे हा कोळसा तिसर्‍या/चौथ्या प्रतीचा आहे. तो मलेशिया का इंडोनेशियातून आयात करून समुद्रमार्गे येणार. कोळशाच्या खालच्या प्रतिमुळे त्यातून जास्त प्रदुषण होणार आहे त्यात भर म्हणून क्लिनकोल तंत्र अथवा अत्याधुनिक तंत्र वापरले जाणार का नाही या बाबतीत संदिग्धता आहे.

आज दिसताना काय दिसते, तर उर्जा निर्माण होणार पण काय सांगितले जात नाही अथवा दिसत नाही तर यातून तयार होणारे पार्‍याचे, सल्फरचे आणि इतर वायूंचे प्रदुषण तेथील जमीन दुषीत करून आंबा, काजू आणि इतर उत्पादनांवर परीणाम करू शकणार आहे. त्यातून तयार होणारे गरम पाणी जेंव्हा समुद्रात सोडले जाणार आहे तेंव्हा मच्छिमार व्यवसाय आणि माश्यांवर परीणाम होणार आहे...

पण हे सर्व आजच्या घडीस अदृश्य परीणाम असल्याने आणि त्यात बाबा आमटे अथवा तत्सम सन्मान्य व्यक्तींची जमिन, समाधी, कार्य वगैरेला बाधा नसल्याने मग "विकास" महत्वाचा होतो. आणि प्रदुषणाचे परीणाम, उद्योग, शेती वगैरेला आणि प्रकृतीस होणारी बाधा याबाबतीत "सोचना क्या जो भी होगा देखा जायेगा" असे म्हणता येते.

असो.

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Feb 2009 - 12:40 am | llपुण्याचे पेशवेll

विकासरावांशी सहमत आहे. थोडा विचार करावा लागेल.
पण हे सर्व आजच्या घडीस अदृश्य परीणाम असल्याने आणि त्यात बाबा आमटे अथवा तत्सम सन्मान्य व्यक्तींची जमिन, समाधी, कार्य वगैरेला बाधा नसल्याने मग "विकास" महत्वाचा होतो. आणि प्रदुषणाचे परीणाम, उद्योग, शेती वगैरेला आणि प्रकृतीस होणारी बाधा याबाबतीत "सोचना क्या जो भी होगा देखा जायेगा" असे म्हणता येते.
यातल्या वाक्यावाक्याशी सहमत.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

रामोजी's picture

14 Feb 2009 - 12:14 am | रामोजी

मिपा वर शिव्या देण्याची स्पर्धा सुरु झाली आहे वाट्ते. तात्याने सुरुवात केली आहे..आपण मागे रहायला नको. नुस्त्या शिव्या दिल्या म्हणजे आपले काम झाले का ? किति जण जळ्जळीत प्रतीक्रीये च्या पुढे जाणार आहात ?नुस्ता उथळ पाण्याला खळखळाट !! बाबांनी कुणालाही शिव्या न देता अथक मेहनतीने आनंदवन उभे केले, ते एवढे सह्जासह्जी नक्कीच संपणार नाही.
आत्ताच मी एक बातमी वाचली कि ताजमहाला खाली सोन्याची मोठी खाण आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Feb 2009 - 3:11 am | llपुण्याचे पेशवेll

ताजमहालाखाली सोन्याची खाण आहे. चांगले आहे. पण सध्या देशाच्या विकासासाठी कोळशाचे महत्व अपरंपार आहे. कोळशामुळेच वीजनिर्मीती होऊ शकते. म्हणून तूर्तास ताज बाजूस राहूदे आधी बाबांचे नंदनवन उखडू, कसे? आणि तसे आमटे कुटुंबीय म्हणजे मराठी माणसेच. फार तर त्याना विरोधकांची फूस आहे आणि म्हणून ते महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येत आहेत असे म्हणून त्यांच्यावर आपली विकास प्रक्रिया सहजपणे लादता येईल.

(महाराष्ट्र डेव्हलपमेंट फोरम)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

:* संपादक - हा प्रतिसाद उपरोधिक आहे हे सांगण्याची वेळ दुर्दैवाने येते आहे पण एकामागे एक येऊन श्रावण मोडकांना धोपटू लागलेला आणि मूळ विषयापासून दूर जाऊ लागल्याचे पाहून सांगितल्याशिवाय रहावेना :* !

पहीले म्हणजे मी श्रावण मोडकांना ओळखत नाही. पण एक नक्की सांगतो की त्यांना बाबांच्या बद्दल माहीती फक्त वाचुन असावी. मी स्वतः बाबा बरोबर राहीलो आहे आणी त्यांचे काम जवळुन पाहीले आहे. मी कुश्ठरोग्यांनी तयार केलेली "ग्रिटींग कार्ड " घेवुन दुकानात जाउन विकायचो. ते कुश्ठरोग्यांनी तयार केलेली "ग्रिटींग कार्ड " आहेत म्हणुन काही दुकानदार महागात घ्यायचे नाहीत. कवडी मोल किम्मत मिळायची. मला स्वतः माहीत होते की त्या कुश्ठरोग्यांना ते ग्रीटीग कार्ड तयार करायला साधारण माणसांपेक्षा किती जास्त मेहेनत करावी लागायची. पण बाबांनीच त्यांना शिकवीले होते की आदर आणी स्वाभीमानाने जगायचे असेल तर, मेहेनती शिवाय दुसरा ऊपाय नाही.त्याचे ते आजही बाबांच्या पश्च्यात त्याचे पालन करतात.

येवढेच नाही तर डॉ. प्रकाश आमटेंच्या "लोकबिरादरी प्रकल्पांत" ऑषधी पोहोचवायचो. मी ह्या महान लोकांचे काम खुप जवळुन पाहीले आहे.
तेव्हा माझे एकच म्हणणे आहे की अश्या महान लोकांबद्दल न जाणता, फक्त तिथे कोळसा आहे म्हणुन "खाऊजा" आणी ऊर्जा ह्यांचा संदर्भ देवुन असे काहीही लिहाल तर लोकांकडुन तिखट प्रतीक्रिया तर मिळणारच.
आजही त्या कुश्ठरोग्यांना समाजात सामान्य दर्जा मिळत आहे का ?
किती लोक आजही कुश्ठरोग्यांच्या हातचे तयार झालेले जेवायास तयार आहे ? या घरी नौकरी द्यायला तयार आहेत.
येवढेच नाही तर किती लोक आजही कुश्ठरोग्यांच्या बाजुस बसुन नोकरी करावयास तयार आहेत ? म्हणे त्यांना नोकर्‍या मिळतील.

आज आनंदवना मुळे त्यांची अस्मीता टिकुन आहे. जर कोळश्याच्या नावाखाली त्यांना तेथुन ऊठवीले गेले तर, ते एक तर रस्त्यावर येतील, आणी कुठेतरी पड्लेले राहुन आपल्या मरणाची वाट पाहात राहतील.
कारण आपल्या सरकारमध्ये कोणत्याही पिडीतांचे पुनर्वसन करण्याची मनापासुन ईछ्या नाही. मोवाड, लातुर अशी बरीचशी ऊदाहरणे ताजी आहेत.
तेव्हा ते जसे आहेत तसेच त्याना तेथेच राहु द्या..... ~X( ~X(

बाबा भक्त....

सर्किट's picture

14 Feb 2009 - 4:56 am | सर्किट (not verified)

खादाड_बोका, आपल्याशी आनंदवनाविषयी बोलायला आवडेल. व्यनि पाठवा. धन्यवाद.

-- सर्किट

श्रावण मोडक's picture

14 Feb 2009 - 2:32 pm | श्रावण मोडक

संपादक,
स. न.
माझ्या प्रतिसादातील उपरोध न समजल्याने त्यावर तिखट प्रतिक्रिया आल्या. प्रतिसादातील उपरोध समजून घेणाऱ्यांप्रमाणेच हा तिखटपणा दाखवून मला (शाब्दीक) धोपटणाऱ्यांचेही आपण स्वागत करूया. त्याचे कारण ज्याही तिखट प्रतिक्रिया आल्या त्या आनंदवन उठवण्याच्या संभाव्यतेलाही विरोध करणाऱ्याच आहेत. असा तिखटपणा जागा व्हावा हाच तर त्या अवतरणे न टाकलेल्या प्रतिसादाचा हेतू होता आणि आहेही.
मला धोपटणे वगैरे क्षणभर बाजूला ठेवूया कारण ते मला लागूच होत नाही. त्यात मांडलेले मुद्दे गेली अठरा वर्षे मीही निरनिराळ्या निमित्ताने मांडत आलो आहे आणि त्या मुद्याच्या टीकाकारांकडून झोडपून घेत आलो आहे.
तेव्हा या मुद्यावर सांगोपांग चर्चा मला पडणाऱ्या शाब्दीक मारातून झाली तरी ती होऊ द्यावी. त्याचे योग्य विश्लेषण मी नंतर करेनच.
अर्थातच यात मिपाच्या धोरणाचा पूर्ण आदर माझ्यासह सर्वांनीच केला पाहिजे हे नक्की.
१. बाबांविषयीची माझी माहिती वाचनातूनच आलेली आहे. कारण वाचन हा माहितीचा एक महत्त्वाचा स्रोत मानला जातो. यापलीकडे या वैयक्तिक मुद्यावर मला अधिक खुलासे करावयाचे नाहीत. कारण चर्चा माझ्या या क्षेत्रातील सहभागाविषयीची नसून आनंदवन, कोळसा खाण, विस्थापन, पुनर्वसन याविषयीची आहे. अर्थात, एक चर्चिक म्हणून माझ्या अधिकाराचा मुद्दा सहभागाच्या आधारे कोणाला उपस्थित करावयाचा असल्यास जरूर करावा. त्याचे उत्तर मिळेल. पण त्याआधी जालावरची माझी वाटचाल थोडी तपासून घ्यावी.
२. "खाऊजा" हे त्या धोरणाचे नावच मुळात मुद्दाम उपरोधाने पाडले आहे हे या चर्चेत उतरणाऱ्या प्रत्येकाने ध्यानी घेणे आवश्यक आहे. इंग्रजीत त्या धोरणाला एलपीजी (लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन) म्हणतात. तो क्रम मराठीत बदलून "खाऊजा" करण्यात आले आहे. हा सगळा मुद्दा एका व्यापक धोरणाचा भाग बनूनच आपल्यासमोर येतो आहे. आज आनंदनवन, काल आदिवासी, परवा सह्याद्रीतले कास्तकार, त्याआधी असेच इतर काही हाच काय तो त्यातला भेद (उदाहरणे परिचयासाठी सोपी म्हणून एवढीच घेतली आहेत. यादी मोठी आहे). असे म्हणणे फारसे चांगले नाही, तरीही सांगतो अणूकरारानंतरच्या काही प्रकल्पांचा वेध आत्तापासूनच घेतो आहे. त्यातल्या विस्थापनाचा मुद्दाही त्या-त्यावेळी आपण चर्चेला घेत राहणार आहोत, याची खात्री आहे मला.
३. सरकार आणि पुनर्वसन या मुद्यांचा येथील इतरांइतका नसला तरी माझा बरा अभ्यास आहे. कोयनेचे पुनर्वसन आजही पूर्ण झालेले नाही हे मी मूळ प्रतिसादातच सूचीत केले आहे. बाकी अलीकडच्या प्रकल्पांचे न बोललेलेच बरे.
४. सर्किटरावांनी त्यांच्या आई-वडिलांचा मुद्दा उपस्थित केला तेव्हाच मी प्रतिसाद अवतरणात वाचण्याची सूचना केली होती. मी स्वतः अवतरणे टाकलेली नाहीत, कारण मला त्यांची आवश्यकता वाटली नाही.
५. सर्किटरावांच्या आई-वडिलांपुरता हा मुद्दा मी मर्यादित मानत नाही. त्यांनाही तो तसा अभिप्रेत नाही हेही पक्के समजते. त्यामुळेच त्यांनाही लिहिताना मी थोड्या तिखटपणेच तिकिटाची सोय वगैरे मुद्यांचा उल्लेख केला आहे. त्यामागेही, हा मुद्दा अगदी वैयक्तिक पातळीवरही त्यांच्या जगण्याशी थेट संबंधित असल्याने, त्यांच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. तसे झाले असेल तर मी दिलगीर आहे. पण माझी विनंती आहे की, सर्किटरावांनी या मुद्याचा अधिक व्यापकच विचार करावा.
६. विकास यांनी एका मूलभूत मुद्याला हात घातला आहे. आज आनंदवन म्हणून आपण कडाडून विरोध करायला कळफलक बडवतो आहोत. कारण तेथे बाबांची पुण्याई आहे. विरोधाची ही भूमिका तर्कसुसंगत ठेवावयाची झाली तर ती इतरत्रही न्यावी लागते. मग त्या स्वरूपाचा विचार करताना विस्थापनाशिवाय विकास हेच सूत्र स्वीकारण्याची गरज असते. नर्मदेचे धरण व्हावे, कोयनेचे व्हावे कारण तेथील विकास महत्त्वाचा कारण विस्थापन सामान्यांचे, आनंदनवन मात्र उठू नये कारण तेथे बाबांची पुण्याई असे करून चालत नसते. आनंदवन तेथील कुष्ठमुक्तांमुळेही उठता कामा नये अशी भूमिका हवी आहे.
व्यक्तीशः माझा आनंदनवन उठण्याला तसाच विरोध आहे जसा तो इतरत्रही असेल.
७. ही चर्चा नुसतीच करून भागणार नाही. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पुनर्वसन धोरणाचा सर्वांनीच एकदा अभ्यास करावा. त्यावर देण्यात आलेली टीकाटिप्पणीही वाचून घ्यावी. जालावर हे सारे उपलब्ध आहे. धोरण कसे ठरते वगैरे त्यातून कळून येईल.
८. आज आनंदवन, कारण ते जात्यात आहे. आपण सुपात आहोत. हे असंच असतं. हात-पाय पोळायला लागले की तेवढ्यापुरता इलाज करायचा आणि 'सोचना क्या' म्हणत बसायचं. विकास म्हणतात ते असं अगदी योग्य ठरतं.
पुढचे चार दिवस जिथला रस्ताच मुळी गावं उठवण्यासाठी झाला आहे अशा ठिकाणी असेन. त्यामुळे लगेच चर्चेत येणे शक्य नाही. परतल्यावर मात्र जरूर येईन.
श्रावण

विसोबा खेचर's picture

16 Feb 2009 - 7:09 am | विसोबा खेचर

मोडक महाराज,

विस्तृत खुलाश्याबद्दल आभारी आहे..

तात्या.

सर्किट's picture

18 Feb 2009 - 11:17 pm | सर्किट (not verified)

श्री. मोडक,

व्यापक विचाराबद्दलचा आपला सल्ला मान्य आहे. पुनर्वसनाची पाळी जेव्हा आप्तांवर येते, तेव्हा व्यापक विचार करणे जरा कठीणच जाते. पण प्रयत्न करेन. (अर्थात आपल्या "नसलेल्या अवतरणांमुळे" जरा गोंधळलो होतो. हेही आलेच.)

-- सर्किट

सालोमालो's picture

16 Feb 2009 - 11:32 am | सालोमालो

कल्पांत मांडिला मोठा। म्लेंच्छ, दैत्य बुडावया।
कैपक्ष घेतला देवी। 'आनंदवन'भूवनी॥

पूर्वी जे मारिले होते। तेचि आतां बळावले।
कोपला देव देवांचा। 'आनंदवन'भूवनी॥

स्वर्गीची लोटली जेथे। रामगंगा महानदि।
तीर्थासी तुळणा नाहि।''आनंदवन' भूवनी॥

बुडाले सर्वहि पापी। हिंदुस्थान बळावले।
अभक्तांचा क्षयो झाला। 'आनंदवन'भूवनी॥

हे होइल, नक्की होइल.

सालो