पाव वाटी सालीशिवाय मूग डाळ पाण्यात २ तास भिजवलेली,
एक वाटी आंबेमोहोर नाहीतर बासमती तांदूळ एक तास भिजवलेला,
१ वाटी किसलेला गूळ ,
२ वाट्या दूध,
२ चमचे किसलेले खोबरे आवडीनुसार,
२ वाटी कढतं पाणी,
चार चमचे देसी तूप,
लवंग २ काड्या,
एक मसाला वेलची,
एखादं काडी दालचीनी,
वेलची पूड,
केसर,
काजू,
बेदाणे दूधात मूरवून.
कृती: आधी मूगाचे आणि तांदूळाचे दोन्हींचे पाणी चांगले चाळणीत निथळून घ्यावे. पातेल्यात २ चमचे तूप घालून त्यात लवंग काड्या, थोडीसे केशर आणि मसाला वेलची घालून आता त्यात मूग आणि तांदूळ घालावे. आधी मस्त २ मिनीटे परतून झाले की त्यात कढतं पाणी घालावे(त्या आधी मसाला वेलची ,दालचीनी काढून टाकावी). भात व मूग पटकन शिजतात भिजवत ठेवल्याने. आता घोट्याने घोटत रहावे आणि एकजीव लगदा करावा. त्यातच गूळ टाकून मस्त घोटतच रहावे. हळू हळू उरलेले तूप सोडावे बाजू बाजूने. गूळ मस्त मूरला की(तूप सुटायला लागले की गूळ मूरला समजावे) मगच दूध टाकावे,आधीच जर टाकले तर दूध फाटते. मग पुन्हा घोटून वेलची पूड्,फुगलेले बेदाणे,उरलेले केशर्,काजू ,खोबरे लून पाहीजे तितकी घट्ट वा पातळ ठेवावी दूध घालून. खीर खूप आळते नंतर तेव्हा खूप घट्ट असू नये. मद्रासी देवळात अशी घट्ट झालेली ,फुगलेले बेदाणे घातलेली खीर प्रसादाला नेहमीच देतात. नेरूळच्या तिरुपती मध्ये तर बर्याचदा असते. बघा तुम्हाला सुद्धा आवडेलच.
प्रतिक्रिया
10 Feb 2009 - 7:44 am | सहज
ही खीर आवडली.
10 Feb 2009 - 8:10 am | वल्लरी
असेच म्हणते... :)
---वल्लरी
10 Feb 2009 - 8:27 am | विसोबा खेचर
कृपया पाककृतीचा फोटूही द्यावा...
आम्ही बिगरफोटूच्या पाकृ वाचत नाही! :)
तात्या.
10 Feb 2009 - 8:57 am | चित्रादेव
विसोबा भाऊ,
अहो ती खीर बनवायला सण वाराचे निमीत्त लागते. तेव्हा सण वार आले की बनवतो नी टाकतो फोटू. नाहीतरी तुम्ही स्वत खीर बनवून टाका की फोटू आणि सांगा आवडली का नाही खीर. :) हाय काय नी नाय काय.:)
12 Feb 2009 - 4:29 pm | चेतन०९
छान! जरुर करुन पहु.
12 Feb 2009 - 8:28 pm | प्राजु
आवडली. आज संकष्टी सोडण्यासाठी करावी का? :?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Feb 2009 - 9:07 pm | मन्जिरि
खिर आवडलि
14 Feb 2009 - 4:19 am | लवंगी
बनवणे मस्ट आहे..