साहित्यः-
१. २०० ग्रॅम पनिर
२. २ कांदे बारिक चिरलेले
३. १ टोमॅटो बारिक चिरलेला
४. १ मिरची बारिक चिरलेली
५. १ चमचा धने-जीरे पावडर
६ अर्धा चमचा गरम मसाला
७. १ चमचा तिखट
८. १ चमचा आल-लसूण पेस्ट
९. तेल, मिठ, हळद
१०. पाव चमचा साखर
११. कोथिंबीर
११. १ चमचा बटर
१. पनिर गरम पाण्यात घालावे व मऊ झाल्यावर कूस्करुन घ्यावे.
२.कढईत तेल गरम करुन त्यात आल-लसूण पेस्ट व कांदा घालून परतावे
३. कांदा गुलाबी झाल्यावर बारिक चिरलेली मिरची, धने-जीरे पावडर, हळद, गरम मसाला व तिखट घालून परतावे .
४. बारिक चिरलेले टोमॅटो, साखर व मिठ घालून परतावे व त्यात कुस्करलेले पनिर घालुन पुन्हा परतावे व झाकण ठेवून एक वाफ आणावी.
५. गॅस बंद करावा व बटर घालावे.
६. कोथिंबीर घालावी व डीश serve करावी.
प्रतिक्रिया
6 Feb 2009 - 11:43 pm | शंकरराव
फोटो दिसत नाही बरका...
बाकी रेसेपी लैच भारी हाये , आवडती अयट्म डिश :-)
धन्यवाद
6 Feb 2009 - 11:50 pm | रेवती
मला आवडते ही भूर्जी.
फोटू असता तर मज्जा आली असती.
काहीतरी गडबड होतीये वाटतं, फोटू चढवूनही दिसत नाहीये.
रेवती
7 Feb 2009 - 1:12 pm | मदनबाण
फोटू दिसत न्हाय !!! :(
(पनिर पाकृ प्रेमी)
मदनबाण.....
:) ...रत तेये ताचवा ही टेलउ लाम्हातु व्वा.
7 Feb 2009 - 4:21 pm | शाल्मली
सोपी आणि छान पाकृ.
आवडली.
फोटो असता तर अजून मजा आली असती.
--शाल्मली.
7 Feb 2009 - 11:17 pm | शितल
पाककृती मी अजुन केली नाही कधी ,करून जरूर पाहिन. :)
8 Feb 2009 - 2:29 am | प्राजु
सह्ही!
फोटो का दिसत नाही?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/