आयडिया सारेगम शेवटची घंटा..

महेंद्र's picture
महेंद्र in काथ्याकूट
5 Feb 2009 - 5:07 pm
गाभा: 

त्वरा करा.. वेळ संपत आली आहे आपल्या आवडत्या लिल चॅम्प ला व्होट करण्याची. मित्रहो, क्रुपया व्होटींग लाइन्स बंद होण्यापुर्वी आपले व्होट रजिस्टर करा..
इथे ब्लॉगवर.. काही खरडलंय या विषयावर.. बघा पटतंय का..
http://tinyurl.com/cyf74d

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

5 Feb 2009 - 5:36 pm | विसोबा खेचर

आम्हाला सगळ्याच मुलांचे गाणे आवडते त्यामुळे आम्ही कुणा एकाला मत देऊ शकत नाही आणि असे कुठलेही मतदान करायची आमची पद्धतही नाही.

आम्हाला संगीतातले फारसे काही कळत नाही तरीही एक श्रोता म्हणून जर कुणी आमचे व्यक्तिगत मत विचारले तर ते आर्या आंबेकर या मुलीकरता असेल. त्या सर्व मुलांच्यात आर्या आंबेकर आम्हाला अधिक उजवी वाटते..

असो,

सर्व स्पर्धकांना शुभेच्छा..

तात्या.

सूर्य's picture

5 Feb 2009 - 6:53 pm | सूर्य

मस्त.. सहमत.

- सूर्य.

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Feb 2009 - 6:54 pm | बिपिन कार्यकर्ते

आपण ब्वॉ, तात्याच्या कंपूत. :) सॉलिड गाते आर्या. पण मला प्रथमेश पण आवडतो. अर्थात दोघांत डावं उजवं करण्याची अक्कल नाहिच्चे.

बिपिन कार्यकर्ते

मैत्र's picture

5 Feb 2009 - 10:10 pm | मैत्र

प्रथमेश सगळ्यात सही आहे. पण आर्या जास्त आवडते. फार सुंदर आवाज दिला आहे देवाने आणि अतिशय सहजतेने गाते. प्लेबॅक साठी उत्तम आवाज. शिवकल्याण राजा मध्ये अप्रतिम गायली.

दिगम्भा's picture

6 Feb 2009 - 3:02 pm | दिगम्भा

- दिगम्भा

एस.एम.एस. करून मत देण्याचा मी पुरस्कार करत नाही.
बाकी सगळीच मुले मस्त गात आहेत अगदी.
निकाल १००% परिक्षकांच्याच मतांवरून लागावा, असे माझे मत आहे.

धमाल मुलगा's picture

5 Feb 2009 - 5:54 pm | धमाल मुलगा

दादा,
झाईरातींचा फ्लेक्स बोर्ड शोधताय का तुम्ही?

::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

महेंद्र's picture

5 Feb 2009 - 6:12 pm | महेंद्र

आंतर्जालिय टोली युध्द?? कर्क वृत्ती मराठि माणुस..मस्त आहे शब्द. पण ह्याचा अर्थ काय हो??

मी काही ब्लॉग्ज वर एकाच Champ
ला प्रमोट करणारे आणि मत देण्याचे अव्हान करणारे लेख वाचले. तेंव्हा एक मराठी श्रोता म्हणुन किंवा एक गाण्यांवर आणि सगळ्याच लिल चम्प वर प्रेम करणारा एक संगित प्रेमी म्हणउन हा लेख लिहिलाय. पुणेकर म्हणतात आर्याला मत द्या, तसेच काहिसं मत आहे लातुरकरांचं!

धमाल मुलगा's picture

5 Feb 2009 - 6:23 pm | धमाल मुलगा

आंतर्जालिय टोली युध्द?? कर्क वृत्ती मराठि माणुस..मस्त आहे शब्द. पण ह्याचा अर्थ काय हो??

कळेल हळुहळु :) मराठी माणुस खेकड्यासारखा असतो म्हणतात ना, म्हणुन. फार काही नाही, ती माझी स्वाक्षरी आहे सध्याची.

मी काही ब्लॉग्ज वर एकाच Champ
ला प्रमोट करणारे आणि मत देण्याचे अव्हान करणारे लेख वाचले. तेंव्हा एक मराठी श्रोता म्हणुन किंवा एक गाण्यांवर आणि सगळ्याच लिल चम्प वर प्रेम करणारा एक संगित प्रेमी म्हणउन हा लेख लिहिलाय. पुणेकर म्हणतात आर्याला मत द्या, तसेच काहिसं मत आहे लातुरकरांचं!

सहमत आहे.
मी गंमत करतोय हे लक्षात घ्या :)

::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::

अरुण वडुलेकर's picture

6 Feb 2009 - 12:02 pm | अरुण वडुलेकर

आम्हाला संगीतातले फारसे काही कळत नाही ?????????

याला म्हणतात खरा विनय.

जीयो !

मराठी_माणूस's picture

6 Feb 2009 - 12:20 pm | मराठी_माणूस

प्रथमेश. अफलातुन तयारी.

मानसी मनोजजोशी's picture

6 Feb 2009 - 4:09 pm | मानसी मनोजजोशी

सगळेच उत्तम
प्रथमेश ग्रेट आहे , आर्या गोड आहे
रोहित म्हणजे सळसळता उत्साह तर कार्तिकी पहाटेचा अभंग आहे
मूग्धा तर सा रे ग म प ची जान आहे
निर्णय देण जिथे परिक्षकांना कठिण वाटतय तर आपण काय ठरवणार?

मानसी मनोजजोशी's picture

6 Feb 2009 - 4:09 pm | मानसी मनोजजोशी

सगळेच उत्तम
प्रथमेश ग्रेट आहे , आर्या गोड आहे
रोहित म्हणजे सळसळता उत्साह तर कार्तिकी पहाटेचा अभंग आहे
मूग्धा तर सा रे ग म प ची जान आहे
निर्णय देण जिथे परिक्षकांना कठिण वाटतय तर आपण काय ठरवणार?

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Feb 2009 - 9:08 pm | llपुण्याचे पेशवेll

आपले मत तर प्रथमेश आणि मुग्धाला. :)

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

बबलु's picture

7 Feb 2009 - 1:24 pm | बबलु

मागच्या महिन्यात भारतात व्हेकेशन ला गेलो होतो तेव्हा प्रथमच या लिटिलचँप कार्यक्रमाचे ७-८ एपिसोड पाहिले.
आपलं मत आर्याला. सहीच गाते ती. आशाचं "पान खाए सैंय्या" तर काय गायलंय तिनं !! अफलातून.

....बबलु

महेंद्र's picture

8 Feb 2009 - 2:08 pm | महेंद्र

मानसी,
मस्त लिहिलंय..

प्रथमेश ग्रेट आहे , आर्या गोड आहे
रोहित म्हणजे सळसळता उत्साह तर कार्तिकी पहाटेचा अभंग आहे
मूग्धा तर सा रे ग म प ची जान आहे
निर्णय देण जिथे परिक्षकांना कठिण वाटतय तर आपण काय ठरवणार?

सहमत...
पण माझं मत आर्याला गेलंय.
एक मत प्रथमेशला पण दिलंय.

मिहिर's picture

8 Feb 2009 - 9:36 pm | मिहिर

प्रथमेश आवडतो. आर्या चांगली म्हणते पण ती भाव फार मारते. अवधूतने म्हटल्यापासून ती स्वतःला आशा भोसले समजते असे वाटते. मुग्धा तर छान गातेच. पण तिच्या कारकिर्दीसाठी ती जिंकली नाही तर चांगले होईल असे वाटते.

सोज्वळ's picture

8 Feb 2009 - 10:52 pm | सोज्वळ

तुम्ही कुणी ऐकलयं का? कार्तिकी जिंकली आहे म्हणे...

- सोज्वळ
. _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _
मी पायी रूतल्या काचांवरती चिडतो, तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो |
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती, तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो ||
. _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _ . _

केदार's picture

9 Feb 2009 - 1:57 am | केदार

कार्तिकी महागायिका झाली आहे. अभिनंदन.

रोहितने शेवटचे मोरया मोरया काय म्हणले? जबरी.

केदार's picture

9 Feb 2009 - 1:57 am | केदार

कार्तिकी महागायिका झाली आहे. अभिनंदन.

रोहितने शेवटचे मोरया मोरया काय म्हणले? जबरी.